शब्द

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
16 Oct 2015 - 5:44 pm

प्रेरणा: http://www.misalpav.com/node/33189

शब्दांचा पसारा सारा,
शब्दांचाच आसरा,

शब्द भुलवून नेतात,
शब्द झुलवत ठेवतात,

शब्द दिलासा देतात,
शब्द अंतही पाहतात,

शब्द मने तोडतात,
शब्द नाती जोडतात,

शब्द वार करतात,
शब्द घायाळ करतात,

शब्दांच्या जखमा सलतात,
मनात निरंतर उरतात,

जखमा ज्या कधी न भरतात,
जखमा त्या वेदना देत जगतात,

कायमस्वरूपी....

फ्री स्टाइलमुक्तक

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

16 Oct 2015 - 6:31 pm | प्यारे१

आमचा धागा ही प्रेरणा????

___/\___

आंतरजाल हे देण्याघेण्याचं व्यासपीठ आहे. माहिती, विचार. आणखी कधी चार द्या दोन घ्या हे देखील. चालू द्या. ;)

विवेकपटाईत's picture

16 Oct 2015 - 8:08 pm | विवेकपटाईत

आवडली.
शब्द ब्रह्म आहे
शब्द शैतान आहे
शब्द युद्ध आहे
शब्द शांती आहे
......

मांत्रिक's picture

16 Oct 2015 - 8:37 pm | मांत्रिक

आवडली!