आमची ही-"मुंबई"

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
31 Aug 2008 - 4:27 pm

वृषाली ची आमची मुंबई कविता वाचुन माझी एक बरीच अगोदर लिहिलेली कविता आठवली. खुप दिवसानीं.
काही अपरिहार्य इंग्रजी शब्द आहेत्-त्यासाठी क्षमस्व.

धावता धावता एक नजर घड्याळाच्या काट्यावरती
पळणार्‍या पावलांना , आमच्या मुम्बई ची खास गती
आठ-तीन,आठ-सात कुठली लोकल मिळेल आज
विंडो जर मिळाली तर पोचलेच मग स्वर्गात हात.
नाही तर आहेच लटकत जाणं, तो ही प्रवास एन्जॉय करणं
घामाच्या वा पावसाच्या धारांमध्ये भिजुन जाणं
पाउस ,खड्डे ,मेगा-ब्लॉक.. रेल रोको,बॉम्ब्-ब्लास्ट
पळणार्‍या मुम्बई ची कधीच थाम्बत नही वाट.
सेन्ट्रल,वेस्ट्रन,हार्बर यांच्या जगण्याच्या गरजा असतात
फ्लाय-ओवर च्या गुन्त्यामधे,चार चाके पळत असतात
वीक्-एंडचा प्लॅन काय,मार्केट चा ट्रेंड काय
सेल वरती बोलता बोलता खेळण्यासारखे धावतात पाय
मुंबई चं नाव गती ,फास्ट्-फॉर्वर्ड सार्‍याच गोष्टी
धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी
तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे
गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

वृषाली's picture

31 Aug 2008 - 4:43 pm | वृषाली

कविता फार सुंदर आहे.

वृषाली

विसोबा खेचर's picture

31 Aug 2008 - 5:32 pm | विसोबा खेचर

धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी
तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे
गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे

सुंदर कविता, जियो....! :)

पिवळा डांबिस's picture

31 Aug 2008 - 9:37 pm | पिवळा डांबिस

मुंबई चं नाव गती ,फास्ट्-फॉर्वर्ड सार्‍याच गोष्टी
धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी
तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे
गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे
क्या बात है! मान गये!!

मदनबाण's picture

1 Sep 2008 - 7:52 am | मदनबाण

छान कविता..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

अजिंक्य's picture

1 Sep 2008 - 12:12 pm | अजिंक्य

छान कविता!

आठ-तीन,आठ-सात कुठली लोकल मिळेल आज
विंडो जर मिळाली तर पोचलेच मग स्वर्गात हात.
नाही तर आहेच लटकत जाणं, तो ही प्रवास एन्जॉय करणं
घामाच्या वा पावसाच्या धारांमध्ये भिजुन जाणं

हे आवडलं. (कदाचित रोज अनुभवतोय म्हणून असेल!)
अशाच कविता करत राहा.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2008 - 3:23 pm | प्रभाकर पेठकर

विषय छान आहे पण कविता म्हणावी तितकी प्रभावी वाटली नाही. काव्य प्रतिभा आहेच. पण , प्रयत्न अजून जास्त केला पाहिजे.

मुंबईच्या 'धावत्या' आयुष्यात मीही ७-२९ ही गाडी पकडायचो. माझे मुंबई बाहेरील नातेवाईक मला हसायचे. म्हणायचे,' ७-२९ काय म्हणतोस सरळ साडेसात म्हण की.' मी म्हणायचो नाही,' साडेसातला गाडी प्लॅटफॉर्मच्या बाहेर असते. ७-२९च बरोबर आहे.'
मुंबईकरांना तिथली लोकल 'काटेकोर आणि वक्तशिर' बनविते.

सुमेधा's picture

1 Sep 2008 - 4:19 pm | सुमेधा

हाय फुलवा :) ,

मुंबई चं नाव गती ,फास्ट्-फॉर्वर्ड सार्‍याच गोष्टी
धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी
तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे
गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे

हे अगदि अप्रतिम ग... मस्तच .... अजुन अपेक्षा वाढल्यात हं... :)