विखुरलेलं चांदणं

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
24 Sep 2015 - 1:23 pm

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं,
ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण

हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं,
मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं.

हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं,
त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं.

हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं,
मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं.

हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं,
तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं?

(नाव सुचलंच नाही कवितेला.)

प्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

24 Sep 2015 - 2:07 pm | वेल्लाभट

पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ झालाय. बाकी काव्यातले भाव उत्तम.

चांदणे संदीप's picture

24 Sep 2015 - 2:15 pm | चांदणे संदीप

अगदी हेच वाटले मलाही!

सस्नेह's picture

24 Sep 2015 - 2:41 pm | सस्नेह

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं,
ओसरत चाललं आहे हळव्या समुद्राचं उधाण.

असे चालेल का ?
..कविता मस्त.
'विखुरलेलं चांदणं' हे नाव चालेल का ?

रातराणी's picture

24 Sep 2015 - 6:11 pm | रातराणी

अर्रर घोळ घातला का मी!
ताई शीर्षक आणि बदल दोन्ही आवडले
हळवा + समुद्र + उधाण हे कोम्बिनेश्न्च जबरा आहे!

उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं असं केलं तर? बाकी १ नं.

रातराणी's picture

24 Sep 2015 - 6:16 pm | रातराणी

धन्यवाद! हाही बदल छानच आहे!

एस's picture

26 Sep 2015 - 2:26 pm | एस

उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं

माझ्यामते असेच हवे होते. यमकही जुळेल आणि चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्यात्मकता आणखी वाढेल.

क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराची मात्रा लुप्त दाखवायचा असल्यास तिथे अनुस्वार देतात. उदा. येणे/येणं. ह्याला अपवाद म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता स्त्रीलिंगी असेल तर शेवटची मात्रा लुप्त होत नाही. उदा.ती आंबा खाते. इथे 'खाते' चं 'खातं' होत नाही. हा नियम काही विशेषणांनाही लागू पडतो. उदा. कसेबसे/कसंबसं.

ह्यामुळेच येणं आणि उधाण हे यमकात बसत नाही. त्याऐवजी उधाणणं असे क्रियापद वापरले तरी चालू शकेल.

निनाव's picture

24 Sep 2015 - 8:25 pm | निनाव

Kavita khoop aavadli. Chhaanach vtakta jhaale aahe.

विवेकपटाईत's picture

24 Sep 2015 - 8:52 pm | विवेकपटाईत

कविता आवडली

रातराणी's picture

24 Sep 2015 - 11:22 pm | रातराणी

धन्यवाद!
मला बदल करून देतील का कुणी सासं
पहिल्या कडव्याची दूसरी ओळ
ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण

अशी करायची आहे आणि शिर्षक विखुरलेल चांदण द्यायच आहे.

स्नेहाताई खूप खूप आभार इतके छान बदल सुचवल्याबद्दल!

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 12:10 am | वेल्लाभट

डन

रातराणी's picture

25 Sep 2015 - 12:06 am | रातराणी

अरे वा! कुणी बदललं? मनापासून धन्यवाद सा सं !

सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे काम त्याच संपादिकेचं दिसतंय ज्यांनी चांदणं बिखरवलं आहे.

एस's picture

25 Sep 2015 - 1:21 am | एस

एक मजला सोडून वरती बघा की!

प्यारे१'s picture

25 Sep 2015 - 2:06 am | प्यारे१

मायला. आय माय स्वारी बरका.
कोण सं, कोण सा सं, कोण स्व सं आणि कोण काय करतंय काही कळत नाही राव.

एक एकटा एकटाच's picture

25 Sep 2015 - 12:16 am | एक एकटा एकटाच

सुरेख रचना

मनीषा's picture

6 Oct 2015 - 2:27 pm | मनीषा

सुंदर !

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं,
तुझ्या स्वप्नातलं माझं ते तुझ्यात हरवुन जाणं..

हे कसं वाटतंय. .

रातराणी's picture

10 Oct 2015 - 1:46 am | रातराणी

मस्त!

रेवती's picture

10 Oct 2015 - 1:49 am | रेवती

वा! छान कविता.