होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 2:33 pm

नमस्कार मंडळी
बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत.
मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची.
असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत)
मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा.
पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय. हर एकाची रीत न्यारी, हर एकाची नीती न्यारी. मग ठरवलेच. कुछ चुनिंदा आयडी के लिए खास डिझाइन बनाये जाये. आयडीचा स्वभाव, त्यांचे लेखन, प्रतिसाद याचा विचार करतानाच थोडे गरगरल्यासारखे झाले. लैच व्हरायटी भरुन राह्यलीय राव इथे.
सो पेशे मिपाकर सम डिझाइन्स.
चांगल्याक कामाची सुरुवात गणेशाने करतात म्हणे. मग आमच्या सुपरशेफ गंपाला इसरुन कसं चालायचं? हे डिझाईन खास त्याच्यासाठीच.
t1
नेक्स्ट येताहेत आमच्या मिपाच्या लाडक्या सुगरण, ज्यानी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती ग्रेव्ही होते म्हणे, त्याच त्या सुप्रसिध्द मास्टरशेफ सानिकास्वप्निल अन मृणालिनी. ह्यांच्यासाठी हा खास टीशर्ट सेट. एकातच ५ येतील. हे शर्ट वापरुन त्या कायम किचनमध्ये राहतील अन आम्हाला नवनवीन नमुने पेश करतील ह्या अपेक्शेने ही ऑफर आहे.
t2
प्रचेतसरावांची सिनेयरिटी हाय पण दगडी डिझाईन शर्टावर छापायचे म्हणजे सोपे वाटले काय. बर्र त्यात सुध्दा ही दर्पण सुंदरी सातवाहनाच्या काळातील नसून वाकाटकाच्या आहे असे लेण्यामृत एकावे लागायचे. यांच्या शर्टवर आख्खी लेणीसुधा छापता आली असती म्हणा पण ती ऑर्डर बुवांकडून येणार आहे असे कळले.
t3
प्रचेतसराव म्हणले की बुवा हे उच्चारावेच लागत नाही, लॉरेन हार्डी सारखी यांची जोडी अभेद्य आहे. किंवा टीआगोबा, शर्टात्मा असे म्हणले तरी चालेल. बुवांसाठी हा खास शर्ट. हा रंग त्यांना विषेष प्रिय असल्याचे त्यांनीच दाखवून दिले आहे त्तस्मात दिलाय तो घालावा. बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो.
t4
वडगावमार्गे पिंचीत आलो मग नाखून काका अन क्याप्टन्याला इसरुन कसे चालेल. हे डिझाईन खास दोघांचाठी. त्यांचे ते ओळखून घेतील. काळजी नसावी. नाखून काका तुमचा स्पेसबार लवकर दुरुस्त करुन घ्या हो.
t5
t6
अर्र या मार्गे येतायेता सिंव्हगड रोडच्या दोन सिंव्व्हाना इसरुन चालणार नाही. एक सिंव्ह आध्यात्मिक गुरगुरतो आणि गायला लागला की आनंद शिंदेला घाबरवतो. म्हशींवर विशेष प्रेम आहे म्हणतात. दुसरा सिंव्ह नुसताच घाबरवतो. ह्याच्या सूडबुध्दीमुळेच मिपाचे संस्कार जरासे का होइना टिकलेत असे त्यांचे वैयक्तिक मत आहे. असोत बापडे. कोकण्यांच्या नादी कुणी लागावे. त्यांचे डीझाइन त्यांनी घेतील, चटणीपाकीटासारखा नीचपणा करणार नाहीत हया अपेक्षेने दोन शर्ट देत आहे.
t7
t8
ते आमचा टेक्निकल परशान्त (जरा कमी दामले) त्याला तर टीशर्ट मस्ट आणि मस्तच. कधीही भेटो स्वतःच्या दिलखुलासपणाने अन देखणेपणाने दुसर्‍याला कॉम्प्लेक्स देतो. प्रशांता, साह्यबा भारतात कधी असलास तर घाल हो हा शर्ट,
t9
मध्येच औरंगाबादच्या शक्तीकेंद्राला विसरुन चालणार नाही. टीशर्ट हा प्राडाँचा आवडता पोषा़ख आहे असे कळलेय. या टीशर्टात ते अजून टेक्नोसॅव्ही दिसतील असा विश्वास आहे.
t10
बोकेश अर्थात बोका ए आझमांचे आगमन मिपावर जरी उशीरा झालेय तरी त्यांनी अल्पावधीतच आपल्या दमदार म्यांउने मिपाकरांना जिंकलेय, त्यांच्या या राजेशाही वाटचालीसाठी खास डिझाईन.
t11
ब्याटमानापाचा स्नेह काय वर्णावा. त्यांनी म्हणावे अन आम्ही त्यांना टीशर्टावर टीशर्ट पुरवावे. काय करणार बिचारे लॉजिकचा एक सूट चढऊन बसलेत उतरवायलाच तयार नाहीत. असो.
t12
आदूबाळाने तर सध्या सगळ्याच मिपाकरांचे इन्क्लुडिंग संपादकमंडळांचे मन जिंकून घेतलेय. या लाडक्या अन अत्यंत गुणी बाळासाठी हा खास टीशर्ट. (मळवलास की आपण दुसरा घेऊ हं)
t13
हुशार लोकांची नावे येताहेत तर क्लिंटन ऑर गॅरी ट्रुमन साह्यबांना बोलावलेच पाहिजे. त्यांना त्यांचे मशीन सांभाळू द्या. हिशोबात घोळ होणार नाही. त्यांच्यासाठी अजून एक आम आदमी शर्ट आहे पण तो एके पीएम झाल्यावर देण्यात येईल.
t14
क्लिंटनराव अन राजकारण विषय आले की माई येणारच. त्यांच्या ह्यांनी टीशर्ट घालायला परमिशन नाकारलीय म्हणे. असु दे. ह्यांचे मत कधी चुकत असते काय.
t15
असेच न चुकणारे अन माईंशी भांडल्याशिवाय न करमणारे एक व्यक्तिमत्व आपल्या मिपाची शान वाढवतेय. विजयादशमीसाठी रा़हून ठेवतील हा शर्ट कदाचित. श्रीगुरुजी, विडंबनापेक्षा मोदींच्या राजकारणात जास्त मज्जाय हो.
t16
राजकारण असो की समाजकारण, विज्ञान असो की कला, भटकंती असो की अध्यात्म, प्रत्येक ठिकाणी एक्क्याची भुमिका पार पाडणारे आमचे डॉ. सुहास म्हात्रे यांना त्यांच्या जुन्या आयडीची ओळख कायम राहावी म्हणुन हा शर्ट.
t17
च्यामारी हा छॉटासा शर्ट कुणाचाय बरे? एखादी पिवशी आणा अन घेऊन जा.
t18
.
अरर्रर दमलात काय इतके श्याम्पल पाहून? मंडळी ईतक्यात कार्यक्रम संपणार नाही. अजून बरेच गणमान्य राजमान्य आयडी अन त्यांचे टीशर्ट येणार आहेत.
ह्या डीझाईन्ससाठी आम्ही बर्‍याच शक्यतांचा विचार केला आहे. ही व्हरायटी पाहून अजून काही मागण्या आल्यास त्यांचा पण विचार केला जाणार आहे.
सो...... स्टे टुन्न्न्न्न्न्ड.
कीप वाचिंग.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

या धाग्यात आणखी २० टीशर्टची भर घातली जाऊन धाग्याची दखल घेतली जावी अशी विनंती.
नेहमी काय शिरेस?

दखल घेण्यासारखाच धागा आहे असं आमच्या हिच्या त्याच्या तिच्या ह्याचं मत. ;). कं बोल्ता?

ऑन शिरेस नोटः उत्तम कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि उत्कृष्ठ सादरीकरण तसेच कुणालाही न दुखावता त्या आयडीच्या नेमक्या गोष्टींचा घेतलेला चित्ररुपी आढावा यामुळे हा धागा दखल घेण्यास पात्र ठरतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2015 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंटाळा आणनारे प्रतिसाद लिहिणार ?

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

21 Sep 2015 - 10:16 pm | प्यारे१

का हो?
धाग्याचं नाव काय आहे पहा की जरा.

अभ्या..'s picture

21 Sep 2015 - 10:28 pm | अभ्या..

च्यामारी लावला का ह्याण्डब्रेक. जरा चांगले चाललेले बघवत नाही. छचोर धागा असला म्हणून काय झाले सेंचुरी तरी होऊ दे.

प्यारे१'s picture

21 Sep 2015 - 10:30 pm | प्यारे१

मला का बोलतो? म्या काय केलो?

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 12:13 pm | सुबोध खरे

उत्तम कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि उत्कृष्ठ सादरीकरण तसेच कुणालाही न दुखावता त्या आयडीच्या नेमक्या गोष्टींचा घेतलेला चित्ररुपी आढावा
+१०००

भाते's picture

21 Sep 2015 - 8:56 pm | भाते

हे सगळे कपडे कुठुन मागवायचे? माल घरपोच मिळेल का? किमान किती घ्यावे लागतिल? माल आल्यावर पैसे दिले तर चालेल का?
बापरे! खूप प्रश्न विचारले मी. इथेच थांबतो.

दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत. हा धागा आवडला हेवेसांनल.

आनन्दिता's picture

21 Sep 2015 - 10:52 pm | आनन्दिता

आदुबाळ आणि माई चा टी शर्ट सगळ्यात जास्त आवडला. :)

सतिश गावडे's picture

21 Sep 2015 - 10:53 pm | सतिश गावडे

प्रचंड आवडले हे डीझाईन्स !!!

प्रचेतस's picture

22 Sep 2015 - 12:02 am | प्रचेतस

तुझा म्हसराचा शर्ट मलाही लै लै आवडला बरं का.

चित्रगुप्त's picture

21 Sep 2015 - 11:37 pm | चित्रगुप्त

व्वा. अगदी वेगळाच कल्पक, कलात्मक धागा. अतिशय सुंदर. सर्वच टीशर्टं बहारदार. अभिनंदन.

अभ्या..'s picture

21 Sep 2015 - 11:59 pm | अभ्या..

येस्स्स्स्स्स्स्स्स.
चीज झाले धाग्याचे.
चित्रगुप्तजी तुमच्या शर्टाचे डिझाइन पुढील भागात आहे बरं का. :)

जेपी's picture

22 Sep 2015 - 8:34 am | जेपी

मस्त ..

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Sep 2015 - 9:39 am | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त टी शर्टस् माई आणी बोका यांचा लय भारी.

शित्रेउमेश's picture

22 Sep 2015 - 10:43 am | शित्रेउमेश

भन्नाट कल्पना... जबराट डिझाईन्स....

च्यायला... कुठुन सुचत ओ तुम्हाला ???

अभ्या..'s picture

22 Sep 2015 - 11:29 am | अभ्या..

ह्ये डिझाईन खास सेन्च्युरीसाठी.
t20
आमच्या वेळंचं काही राहिलं नाही म्हणत बध्द्कोष्ठी पिंका टाकत सगळीकडे फिरणार्‍या पण हिकडे न फिरकणार्‍या माझ्या लाडक्या ज्येष्ट, श्रेष्ठ, आजी माजी हुच्चभ्र्हु सदस्यांना सप्रेम भेट.

कोमल's picture

22 Sep 2015 - 12:14 pm | कोमल

२ वेळा URL जात आहे.
हे बघ

खुश का???

अभ्या..'s picture

22 Sep 2015 - 12:46 pm | अभ्या..

खुश खुश. सध्यातरी. :)

या मदतीसाठी आगामी व्हिआयपी कोट्यातला पहिला टीशर्ट तुमचा डिझाईन असेल.

एकदम यूआरएल डिझाईन आहे. खुश?

कोमल's picture

22 Sep 2015 - 1:48 pm | कोमल

खुश खुश. सध्यातरी. :)

प्यारे१'s picture

22 Sep 2015 - 2:51 pm | प्यारे१

अजून किती?
कंटाळा आणनारे प्रतिसाद लिहिणार ?

-ट्युलीप चिरुटे

तुम्ही पण भर घातल्याबद्दल लैच्च हाभार ;)

अभ्या..'s picture

22 Sep 2015 - 3:17 pm | अभ्या..

c
निघताय ना महाराज?

डीझाईन आवडलं नाही. दुसरं हवं आहे.

ह्यांच्यासाठी रंगीबेरंगी लंगोटांचे प्रिंट असलेला टीशर्ट डिझाईन कर रे!! =))

प्यारे१'s picture

23 Sep 2015 - 12:26 pm | प्यारे१

टी शर्ट नको तसला. लंगोट च डिज़ाइन कर भारीपैकी. सूड ची आठवण म्हणून वापरायला होईल लोकांना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Sep 2015 - 12:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भिकबाळी पण प्रिंट करायची त्याच्याबरोबरचं :)!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2015 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

भिकबाळी पण प्रिंट करायची त्याच्याबरोबरचं :)!!

3D प्रिंटर असेल तर ते पण करता येईल, हाकानाका ! ;) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Sep 2015 - 5:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

३डी प्रिंटिंग ला हरकत नाही पण ती अंगावर घालायची गोष्ट असल्याने टोचली तर लफडं होईल =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2015 - 5:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

नॉर्मल भिकबाळी कानात घालतात आणि ती ३डी च अस्ते ना !?

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2015 - 12:56 pm | अत्रुप्त आत्मा

टी शर्ट नको तसला. लंगोट च डिज़ाइन कर भारीपैकी. सूड ची आठवण म्हणून वापरायला होईल लोकांना.

आगागागागागा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

कर डिझाईन!! शिवथरघळीतल्या कट्ट्याला ऐनवेळी कोणाला मिळाला नाही लंगोट, तर त्यांना द्यायला होईल. चिमणूची कल्पनाशक्ती भारी आहे. फक्त ते आपल्या धार्मिक उद्देशाला बाधा आणू शकतं. ;)

मधुरा देशपांडे's picture

22 Sep 2015 - 2:10 pm | मधुरा देशपांडे

जबरदस्त!!

माईसाहेब अन् श्रीगुरूजी डिझाईन सगळ्यात जास्त आवडले...

सगळ्यांनी त्यांचेच कौतुक केले पण दोघेही धाग्याकडे फिरकले नाहीत हो. फार वाईट वाटतेय. :(

एकमेकाचे डूआयडी तर नव्हेत? ;)

नाखु's picture

22 Sep 2015 - 5:22 pm | नाखु

कल्जी नको माई (त्यांच्या) यांना विचारल्याशिवाय येणार नाहीत. आणि ते आल्याशिवाय गुरुजी फिरकत नाहीत असा प्रवाद आहे.

तू यांचे परवानगीसाठी काही प्रयत्न करून पहा.

ना खु

दमामि's picture

22 Sep 2015 - 4:50 pm | दमामि

लय भारी!!!!

माझिया मना's picture

22 Sep 2015 - 4:52 pm | माझिया मना

अफलातून डिझाईन्स्..
लै अावड्या..

खटपट्या's picture

22 Sep 2015 - 5:40 pm | खटपट्या

अगागागा !! पार टीशर्टाचा बाजारच उठवलाव मांडलाव की !!
सर्व मिपाकरांना घालता येइल असे टीशर्ट डीजाईन कराना राव.

बघा की! नवीन मेंब्रांना अगदीच वगळलंय!

भारी आहे! सगळेच एकसे बढ़कर एक!

बाळ सप्रे's picture

23 Sep 2015 - 12:42 pm | बाळ सप्रे

भन्नाट निरीक्षण..
माई, श्रीगुरुजी, गंपा, सानिकास्वप्नील हे टीशर्ट खासच...

अजुन येउद्या.. होउ द्या खर्च..

नीलमोहर's picture

23 Sep 2015 - 12:46 pm | नीलमोहर

विविध आयडींसाठी नि:स्वार्थ भावाने टी-शर्ट बनवून देणार्‍या मा.श्री अभ्यादादा यांच्यासाठी हा विशेष टी-शर्ट,
अखिल मिपापरिवारातर्फे सप्रेम भेट !!

ab

नीलमोहर's picture

23 Sep 2015 - 12:49 pm | नीलमोहर

खास कस्टंबाईज्ड बनवलाय बरंका हो !!
(हापिसात असल्यामुळे फटाफट बनवलाय, तरी सांभाळून घेणे)

प्यारे१'s picture

23 Sep 2015 - 12:54 pm | प्यारे१

ले बटे.
सगळ्यात भारी अभ्याच दिसतंय आता....

चांदणे संदीप's picture

23 Sep 2015 - 12:53 pm | चांदणे संदीप

अभ्यादादा मज्जाय! :)

अभ्या..'s picture

23 Sep 2015 - 2:12 pm | अभ्या..

एकच नंबर डिझाईन. सगळ्या शर्टात हाच भारी दिसतोय. कलर्स लै आवडले. थान्कू थान्कू.
म्या मंडळाचा आभारी हाय.

नीलमोहर's picture

23 Sep 2015 - 5:24 pm | नीलमोहर

आवडला ना.... मग बरंय,

हापिसात काम थोडं बाजूला ठेऊन, बाजूवाल्यांच्या चौकशा + चौकस नजरांकडे दुर्लक्ष करून,
साहेब यायच्या आत एवढा उपद्व्याप केल्याचं चीज झालं.
(चीज काय आता भूक लागली काय ?? चीज नव्हे ... टी-शर्ट झाला !!)
बरेच दिवसांनी काहीतरी वेगळं केल्याचं समाधानही मिळालं, मजा आली.

बाकी कल्पना मुळात तुमचीच होती, आम्ही फक्त सर्वांना आनंद देणार्‍याला थोडं खुश करण्याचा प्रयत्न केला एवढंच.

बोका-ए-आझम's picture

23 Sep 2015 - 3:52 pm | बोका-ए-आझम

हा एकच शब्द अभ्याभाऊच्या टी शर्टसाठी.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Sep 2015 - 2:06 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त. मलापण दे की एक! ;)

अभ्या..'s picture

23 Sep 2015 - 2:14 pm | अभ्या..

येणारे येणारे. गणमान्य राजमान्य लोकांची डिझाईन्स दुसर्‍या भागात आहेत.
आणि बिकासर तुम्हाला सोडून मिपाला शर्ट देत बसण्यात कै अर्थय का?

आमच्यासाठी कुर्त्याची वैग्रे सोय होईल का कै ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2015 - 5:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

A

पैजारबुवा,

सस्नेह's picture

23 Sep 2015 - 7:07 pm | सस्नेह

=))

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2015 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते

वाट बघतॉय हां!

बिका मालक, तुम्हाला नाराज करणार नै. ते परवडणार पण नै.
ह्या धाग्यावरचा १५० वा प्रतिसाद. खास तुम्हच्या शर्टासहित. ;)
t21
आवडल्याचे कळवणे.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2015 - 2:29 pm | बिपिन कार्यकर्ते

झक्कास! (तेवढा हिरवा रंग अंमळ कमी पडलाय हं!) ;)

कपिलमुनी's picture

7 Oct 2015 - 1:44 pm | कपिलमुनी

;)

बिकांच्या टीशर्टसाठी अगदी हेच्च डिझाईन परफेक्ट बसेल असं वाटलं होतं.

बादवे, ती उंटांची माळफुले राहिलीत. ती बॅकसाईडला गेली असावीत असा कयास आहे! ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2015 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त डिझाईन. फक्त काळ्याऐवजी हिरव्या रंगाच्या छटा जास्त शोभून दिसल्या असत्या ;) :)

pradnya deshpande's picture

23 Sep 2015 - 3:42 pm | pradnya deshpande

एकाहून एक छान आहेत टी शर्ट . निरीक्षण शक्तीची कमाल आहे. हॉटेलात येणाऱ्या सगळ्याना तयार करून द्या असे टी शर्ट

यशोधरा's picture

23 Sep 2015 - 4:21 pm | यशोधरा

सगळेच टीशर्ट मस्त!
मला एक टीशर्ट मिळेल का अभ्या?

पिशी अबोली's picture

24 Sep 2015 - 5:25 pm | पिशी अबोली

खल्लास रे अभ्यादादा.. माईंचा फार आवडलेला आहे..

अन्या दातार's picture

25 Sep 2015 - 5:28 pm | अन्या दातार

मेरा टी शर्ट कब आयेगा???

पाषाणभेद's picture

27 Sep 2015 - 11:34 am | पाषाणभेद

जबरा. कार्ट्याच्या अंगात कला आहे.

जव्हेरगंज's picture

2 Oct 2015 - 3:28 pm | जव्हेरगंज

जबरदस्त टिशर्ट आहेत. पण तुमची चित्रकला पाहायला आवडेल. कोठे भेटतील का तुमच्या चित्रांचे सँपल?

अद्द्या's picture

7 Oct 2015 - 4:32 pm | अद्द्या

भारी म्हणजे काय

लैच भारी

मला पण हवाय

ऑर्डर घेऊन टाक
अकौंट नंबर देऊन टाक .. लग्गेच करून घेऊ :D

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 4:37 pm | अंतरा आनंद

मस्तच.