मोटरसाईकल रायडींग गिअर्स

मोदक's picture
मोदक in तंत्रजगत
20 Sep 2015 - 2:25 pm

.

"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.

आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो. हेल्मेट वगैरे वस्तुंची खरेदी अनेदा नीट माहिती न घेता केली जाते किंवा सोबत असलेला मित्र; त्याचे अनुभव आणि दुकानदाराने दिलेला सल्ला या गोष्टींची मदत घेतली जाते.

आपण या धाग्यामध्ये आपले खरेदीचे निकष (किंमत, सुरक्षितता, सोय, उपयुक्तता की आणखी काही..?) , माहितीचे स्त्रोत आणि एकंदर अनुभव या माहितीची देवाणघेवाण करूया.

**************************

**महत्वाचे**
पुढील माहिती संपूर्णपणे माझ्या वैयक्तीक अनुभवावरून लिहिली आहे; सुधारणा असल्यास अवश्य सुचवाव्यात. हीच्च माहिती बरोबर आहे असा दावा नाही.

**अती महत्वाचे**
"गाडी चालवताना वापरावयाच्या वस्तू / गिअर्सची अधिक माहिती मिळवणे" हा या धाग्याचा उद्देश आहे.

हुच्चभ्रू चाळे..
याची काहीही गरज नसते.
हेल्मेटचा वापर करावा का करू नये..? का वापर करावा किंवा का वापर करू नये..? हेल्मेटसक्ती असावी की नाही..?

वगैरे चर्चा करण्यासाठी कृपया वेगळे धागे काढावेत.

**************************

१) हेल्मेट

गाडी चालवताना वापरावयाची अत्यावश्यक गोष्ट. दुचाकीवर कितीही कमी अंतर किंवा 'घराजवळच जायचे आहे' असे काहीही असले तरी हेल्मेट वापरावेच!!

.

हेल्मेटमध्ये असे अनेक प्रकार असतात, मी स्वतः फुल फेस हेल्मेट वापरतो. वेगा कंपनीचे हेल्मेट साधारणपणे ८०० ते १२०० रूपयांपर्यंत येते. फुल फेस असल्याने गाडीवरून पडल्यानंतर मुख्यतः चेहरा आणि हनुवटीचे नीट संरक्षण होते.

सर्वसाधारणपणे दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा हेल्मेटने "Fall" सहन केल्यानंतर हेल्मेट कितीही चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी बदलावे.

२) गॉगल्स

आपल्या सोयीनुसार आणि सवयीनुसार डोळ्यांचे धुळ आणि उन्हापासून संरक्षण करणारा गॉगल वापरावा. रात्री गाडी चालवणार असल्यास पांढर्‍या काचांचा गॉगल वापरावा.

३) ग्लोव्ह्ज

साधे, लोकरी, वॉटरप्रूफ, प्रोबायकर असे अनेक प्रकारचे ग्लोव्ह्ज बाजारात मिळतात. आपल्याला सोयीचे असे ग्लोव्ह्ज वापरावेत.

.

मी वरील प्रकारचे प्रोबायकर ग्लोव्ह्ज वापरतो. चित्रात दिसत आहे त्याप्रमाणे या ग्लोव्हज मुळे पकड चांगली राहते, कोणत्याही दिशेने; सर्वप्रकारच्या अपघातांपासून संपूर्ण तळहाताला व्य व स्थी त प्रोटेक्शन मिळते. (सर्व ग्लॉसी भाग हार्ड प्लॅस्टीकचे आहेत.) बोटांच्या मधल्या पेरांवरती हवेसाठी जाळी आहे. त्यामुळे हाताला घाम येत नाही. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ वाटणे / चिकट हात वगैरे प्रकार होत नाहीत.

४) नी व एल्बो गार्ड

.

एखाद्या मोठ्या राईडला जेथे आपण दिवसभर गाडी चालवणार आहोत तेथे हे गार्डस वापरावेत. गुडघे, कोपर वगैरे अवयवांना संरक्षण मिळते.

५) आर्मर जॅकेट

.

आर्मर जॅकेटमध्ये पाठ, खांदे, कोपर, हात आणि छातीला रबर, फायबर किंवा प्लॅस्टीकचे पॅडींग असते व हे पँडींग जॅकेटमध्ये कव्हर केलेले असते. तसेच या जॅकेटमध्ये पावसाळी वापरासाठी एक वेगळी रेन अ‍ॅटॅचमेंट तर थंडीत वापरण्यायोग्य अशी एक विंटर अ‍ॅटॅचमेंट असते. पँडींग व सर्व अ‍ॅटॅचमेंटमुळे हे जॅकेट वजनाला बर्‍यापैकी जड असते.

आता माझे कांही प्रश्न..

१) तुमचा 'आर्मर जॅकेट' वापराचा अनुभव काय आहे?
२) अर्मर जॅकेट घेताना काय गोष्टी पडताळून पहाव्यात? (मी ठरवत असलेले जॅकेट "LS2" कंपनीचे Winter Linen and Rain Protection सह असलेले जॅकेट आहे. किंमत रू. ७८००/-)
३) आणखी काही अनुभव असल्यास अवश्य लिहावेत.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

30 Sep 2015 - 5:37 pm | कपिलमुनी

तेवढच सांगितले आहे .

बाकी उन्हाळा , पावसाळा आणि हिमालयामधला हिवाळा यासाठी वेगवेगळे ग्लोव्ह्ज वापरावे हे उत्तम

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 6:47 pm | भटकंती अनलिमिटेड

DSG Aqua ने करवून घेतलेला पेड रिव्ह्यूदेखील असायची शक्यता एकवेळ गृहित धरता येईल. परंतु प्राईस ब्रैकेटचा विचार केल्यास दोन्हीमध्ये तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे ही शक्यता मोडीत निघते. चांगले संरक्षण देणारे ग्लोव्ज या किंमतक्षेत्रात येत नाहीत हे सत्य आहे. अन्य साईट्सवर देखील रिव्ह्यू वाचावा. BCMTouring अथवा TeamBHP, xBHP वगैरे साईट्सवरही प्रोबाईकर ग्लोव्जचे इंप्रेशन तितकेसे चांगले नाही. In fact मराठवाडा राईडच्या वेळी माझ्यासोबत ध्रुव मुळ्ये हा मित्र होता आणि त्याने हे ग्लोव्ज ऐनवेळी आणले होते. त्याच्या म्हणण्यानुसार ग्लोव्जचा फायदा होण्याऐवजी ते टोचण्याचा त्रास व्हायला लागला होता. निव्वळ प्रोबाईकरची निंद हा माझा एकमेव उद्देश नसून "quality (and safety) never comes cheap" हे नमूद करण्याचा आहे.

ग्लोव्स चा मुख्य उपयोग हात घासताना होतो.

प्रोबायकरचा व्यवस्थीत उपयोग होतो. स्वानुभव आहे. ;)

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 6:58 pm | भटकंती अनलिमिटेड

प्रोबायकरचे palm region मटेरियल फॅब्रिकचे (neoprene to be precise) बनवले असल्याने हायस्पीडला हात घासताना त्याचा विशेष उपयोग नाही. शिवाय त्याला तळहाताच्या आतल्या बाजूला contoured padding नसल्याने ते हॅंडलग्रिपवर वाजवीपेक्षा अधिक गच्च धरावे लागते. त्यामुळे लांबच्या राईडसाठी हाताला रग लागणे, कधी अचानक जेव्हा (ओव्हरटेक करताना) ऍक्सलरेटरवर ग्रिपची गरज असताना रग लागल्याने forearms मधून त्राण जाणे असे प्रकार उद्भवू शकतात.

शेवटी प्रत्येकाचा सवयीचाही काही भाग असतोच. त्यामुळे माझा प्रोबायकरवरचा अविश्वास हा कदाचित सवयीमुळेही असू शकेल. पण इतर तज्ञदेखील प्रोबायकरच्या अविश्वासालाच दुजोरा देतात. आपल्या सुरक्षिततेसाठी चांगले हेल्मेट, चांगले रेटेड जॅकेट आणि चांगले ग्लोव्ज हे अगदी जरुरीचे आहेत हे इथे नमूद करु इच्छितो.

Good quality gloves have better knuckle protectors along with good padding on the palms to absorb and protect you in case of an accident.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

30 Sep 2015 - 8:03 pm | मम्बाजी सर्वज्ञ

माल्कानू! गैरसमज नसावा!!!!
प्रो बाईकर चे ग्लोव्स चांगले आहेत असे म्हणत नाही मी. ते उत्तम 'एन्ट्री लेवेल' ग्लोव्स आहेत आणि मला त्यांची सवय झाली म्हणून अजून वापरतोय. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत त्यामुळे निवडीत थोडा फार फरक पडणारच. मोदक साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, ६0kmph-७0kmph (कदाचित त्यापेक्षा थोडा कमी) स्पीड च्या वर वापरायचे ग्लोव्स नाहीत ते. रस्त्यावर खडी पडली असेल तर अजूनच बेकार हालत होईल. तुम्ही जर हिमालयात जाण्याचा प्लान करत असाल तर मी नक्कीच दुसरी पेअर जवळ ठेवा आणि ती लेदर ची असे सुचवेन. अर्थात स्पीड आणि हवामानावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 9:17 pm | भटकंती अनलिमिटेड

गैरसमज का असेल? उलट जेवढी कंस्ट्रक्टिव्ह चर्चा चालली आहे की, मोटरसायकलिंगची सुरक्षितता, तत्संबंधीची साधने आणि फायदे तोटे आपणा सर्वांसोबत करताना आणि आपल्याकडून जाणून घेताना इंटरेस्ट (आणि येत्या वीकेंडला राइडिंगची खाज) वाढत आहे.

ते उत्तम 'एन्ट्री लेवेल' ग्लोव्स आहेत आणि मला त्यांची सवय झाली म्हणून अजून वापरतोय

+111111

कपिलमुनी's picture

30 Sep 2015 - 7:11 pm | कपिलमुनी

Product
Cheapest
Average
Expensive
Helmet
2,400
3,000
3,800
Jacket/Armor
1,500 (Armor)
5,000 (Jacket)
6,500 (Jacket)
Pants/Knee Guard
730 (Knee Guard)
1,950 (Knee Guard)
6,000 (Pants)
Boots
2,000
2,000
3,000
Gloves
500
1,000
3,000
Total
7,130
12,950
22,300

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Oct 2015 - 11:43 am | अनिरुद्ध.वैद्य

बायोनिक्स नी गार्ड बद्दल काय मत आहे? कोणी वापरले आहे का?

http://www.cramster.in/Products/Cramster-Accessories/CRAMSTER/Bionix-Kne...

नाय ब्वा.. मला तरी अनुभव नाही. मी फॉक्स कंपनीचे एक कामचलाऊ एल्बो आणि नी गार्ड घेतले आहेत. ठीक आहेत.

.

मिपा वर रोज येतोय पण बर्याच दिवसात लिहायला वेळ मिळत नवता. काही संदर्भ गोळा केले होते ते इथे देतो आहे.

१. स्टील टो असलेले बूट साध्या बुटा पेक्षा जास्त चांगले असतात : http://mythbustersresults.com/episode42
२. लेदर चे प्रकार : जर लेदर जाकेट घेणार असलात तर महत्वाची माहिती : http://advleather.com/leathercare.html
३. मोटारसायकल बद्दल बरीच माहिती एका पुस्तकात - https://books.google.co.uk/books?id=84hF-qoR5I8C&pg=SA7-PA14&lpg=SA7-PA1...

तू नळीवर twist of the wrist शोधा. जुना विदिओ आहे पण काही अतिमहत्वाच्या गोष्टी फार साध्या सोप्या पद्धातीने सांगितल्या आहेत - https://www.youtube.com/watch?v=DWgb0MtgNlo .

मोदक's picture

28 Oct 2015 - 3:59 pm | मोदक

धन्यवाद. सवडीने बघतो.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Oct 2015 - 5:22 pm | भटकंती अनलिमिटेड

स्टील टो असलेले बूट साध्या बुटा पेक्षा जास्त चांगले असतात.

सहमत आहे. जेसीबीचे ओरिजिनल बूट स्टाईल आणि सेफ्टी दोन्हीसाठी वरचढ आहेत.
http://www.safetyshoebazaar.com/safety-footwear-jcb

मला सायकल आणि बाईक टूरसाठी हायड्रेशन पॅक / कॅमल बॅग घेण्याची गरज वाटत आहे.

साधारणपणे किती लिटरचे ब्लॅडर घ्यावे..? आणि बॅग + ब्लॅडर घेताना नक्की काय काय बघावे..?

मला सायकल आणि बाईक टूरसाठी हायड्रेशन पॅक / कॅमल बॅग घ्यावीशी वाटत आहे.

साधारणपणे किती लिटरचे ब्लॅडर घ्यावे..? आणि बॅग + ब्लॅडर घेताना नक्की काय काय बघावे..?