मोटरसाईकल रायडींग गिअर्स

मोदक's picture
मोदक in तंत्रजगत
20 Sep 2015 - 2:25 pm

.

"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.

आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो. हेल्मेट वगैरे वस्तुंची खरेदी अनेदा नीट माहिती न घेता केली जाते किंवा सोबत असलेला मित्र; त्याचे अनुभव आणि दुकानदाराने दिलेला सल्ला या गोष्टींची मदत घेतली जाते.

आपण या धाग्यामध्ये आपले खरेदीचे निकष (किंमत, सुरक्षितता, सोय, उपयुक्तता की आणखी काही..?) , माहितीचे स्त्रोत आणि एकंदर अनुभव या माहितीची देवाणघेवाण करूया.

**************************

**महत्वाचे**
पुढील माहिती संपूर्णपणे माझ्या वैयक्तीक अनुभवावरून लिहिली आहे; सुधारणा असल्यास अवश्य सुचवाव्यात. हीच्च माहिती बरोबर आहे असा दावा नाही.

**अती महत्वाचे**
"गाडी चालवताना वापरावयाच्या वस्तू / गिअर्सची अधिक माहिती मिळवणे" हा या धाग्याचा उद्देश आहे.

हुच्चभ्रू चाळे..
याची काहीही गरज नसते.
हेल्मेटचा वापर करावा का करू नये..? का वापर करावा किंवा का वापर करू नये..? हेल्मेटसक्ती असावी की नाही..?

वगैरे चर्चा करण्यासाठी कृपया वेगळे धागे काढावेत.

**************************

१) हेल्मेट

गाडी चालवताना वापरावयाची अत्यावश्यक गोष्ट. दुचाकीवर कितीही कमी अंतर किंवा 'घराजवळच जायचे आहे' असे काहीही असले तरी हेल्मेट वापरावेच!!

.

हेल्मेटमध्ये असे अनेक प्रकार असतात, मी स्वतः फुल फेस हेल्मेट वापरतो. वेगा कंपनीचे हेल्मेट साधारणपणे ८०० ते १२०० रूपयांपर्यंत येते. फुल फेस असल्याने गाडीवरून पडल्यानंतर मुख्यतः चेहरा आणि हनुवटीचे नीट संरक्षण होते.

सर्वसाधारणपणे दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा हेल्मेटने "Fall" सहन केल्यानंतर हेल्मेट कितीही चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी बदलावे.

२) गॉगल्स

आपल्या सोयीनुसार आणि सवयीनुसार डोळ्यांचे धुळ आणि उन्हापासून संरक्षण करणारा गॉगल वापरावा. रात्री गाडी चालवणार असल्यास पांढर्‍या काचांचा गॉगल वापरावा.

३) ग्लोव्ह्ज

साधे, लोकरी, वॉटरप्रूफ, प्रोबायकर असे अनेक प्रकारचे ग्लोव्ह्ज बाजारात मिळतात. आपल्याला सोयीचे असे ग्लोव्ह्ज वापरावेत.

.

मी वरील प्रकारचे प्रोबायकर ग्लोव्ह्ज वापरतो. चित्रात दिसत आहे त्याप्रमाणे या ग्लोव्हज मुळे पकड चांगली राहते, कोणत्याही दिशेने; सर्वप्रकारच्या अपघातांपासून संपूर्ण तळहाताला व्य व स्थी त प्रोटेक्शन मिळते. (सर्व ग्लॉसी भाग हार्ड प्लॅस्टीकचे आहेत.) बोटांच्या मधल्या पेरांवरती हवेसाठी जाळी आहे. त्यामुळे हाताला घाम येत नाही. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ वाटणे / चिकट हात वगैरे प्रकार होत नाहीत.

४) नी व एल्बो गार्ड

.

एखाद्या मोठ्या राईडला जेथे आपण दिवसभर गाडी चालवणार आहोत तेथे हे गार्डस वापरावेत. गुडघे, कोपर वगैरे अवयवांना संरक्षण मिळते.

५) आर्मर जॅकेट

.

आर्मर जॅकेटमध्ये पाठ, खांदे, कोपर, हात आणि छातीला रबर, फायबर किंवा प्लॅस्टीकचे पॅडींग असते व हे पँडींग जॅकेटमध्ये कव्हर केलेले असते. तसेच या जॅकेटमध्ये पावसाळी वापरासाठी एक वेगळी रेन अ‍ॅटॅचमेंट तर थंडीत वापरण्यायोग्य अशी एक विंटर अ‍ॅटॅचमेंट असते. पँडींग व सर्व अ‍ॅटॅचमेंटमुळे हे जॅकेट वजनाला बर्‍यापैकी जड असते.

आता माझे कांही प्रश्न..

१) तुमचा 'आर्मर जॅकेट' वापराचा अनुभव काय आहे?
२) अर्मर जॅकेट घेताना काय गोष्टी पडताळून पहाव्यात? (मी ठरवत असलेले जॅकेट "LS2" कंपनीचे Winter Linen and Rain Protection सह असलेले जॅकेट आहे. किंमत रू. ७८००/-)
३) आणखी काही अनुभव असल्यास अवश्य लिहावेत.

प्रतिक्रिया

दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा हेल्मेटने "Fall" सहन केल्यानंतर हेल्मेट कितीही चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी बदलावे.>>>>
कारण सांगाल का प्लीज?
मी ७ वर्षांत ५-६ वेळा काच बदललीय,पण एकच हेल्मेट वापरतोय.

वेळ आणि वापरानुसार हेल्मेटची "ड्युरेबलिटी" कमी होते.

वरून कितीही चकाचक दिसत असले तरी एकंदर संरक्षणक्षमता कमी झालेले हेल्मेट असू शकते.

हेल्मेट : फुल फेस हेल्मेटच वापरावे. त्यातही वजनाला हलके हेल्मेट उपयुक्त. मॉड्युलर हेल्मेट तितकी मजबूत नसतात. हाफ हेल्मेट, जर्मन हे प्रकार कुचकामी आहेत.

हातमोजे प्रोबायकरचे चांगले येतात. उन्हाळ्यात वापरायचे असल्यास अर्धी बोटे उघडी राहतील असे ग्लोव्ज येतात ते वापरू शकतो.

आर्मर जॅकेट खूप जड आणि जाडजूड नाही वाटणार का? रोजच्या वापरासाठी जरा गैरसोयीचे होईल असे वाटते. तुम्ही क्वेचुआच्या उत्पादनांमध्येही पर्याय शोधा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Sep 2015 - 9:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

+१! फुल फेस किंवा मोटो क्रॉस बेस्ट!

सर्वसाधारणपणे दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा हेल्मेटने "Fall" सहन केल्यानंतर हेल्मेट कितीही चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी बदलावे.
>>

बरोबर. तसाही त्यांचे आतमधील मटेरीअल खराब व्हायला लागते आणि मानेस, डोक्याला त्रास होतो. अजून एक सांगावेसे वाटते की कान मोकळे ठेवता येईल असे हेल्मेट बघावे.

बर्याचदा जेव्हा राईड एका तासापेक्षा वर जाते तेव्हा चष्मा असलेल्यांचे हाल होतात. कारण चष्म्याच्या काड्या आणि हेल्मेटचे प्रेशर ह्यामुळे कान पिचून जातात ;) (मला भरपूर अनुभव )

अर्धी बोटे उघडी असलेलं ग्लोव्ज नको. प्रत्येक पेरावर प्लास्टिक कोटिंग किंवा मजबूत आवरण असलेल घ्याव. चुकून पडलो तर बोटांना लागत नाही आणि बोट पहिल्यांदा चेंगरली जातात!

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 8:32 pm | मम्बाजी सर्वज्ञ

हेल्मेट मध्य Styrofoam नावाचे कम्पोझिट वापरतात, जे एक प्रकारच्या ग्लू/अढेसीव ने एकत्रित केलेले असते. या अढेसीव चा जीवन काल साधारणतः ५ वर्षे असतो. त्यामुळे ५ वर्षात हेल्मेट बदलणे गरजेचे असते.

हीच गोष्ट टायरच्या बाबतीतही लागू पडते. तुमचे टायर कोणते आहे ते तपासून त्याचे शेल्फ लाइफ किती आहे ते तपासून पहा. टायर वापरा अथवा न वापरा, ठराविक काळा नंतर ते बदलणे जरुरी असते.

सुबोध खरे's picture

22 Sep 2015 - 7:46 pm | सुबोध खरे

फुल फेस हेल्मेट पेक्षा फक्त डोक्यावर असणारे शिरस्त्राण जास्त चांगले.त्यःच्या पुढे असणारा वायझर चेहर्याचे वार्या/किड्यांपासून संरक्षण करतो.
There is solid evidence from motorsport that full face helmets (when used without an integrated head and neck restraint system) have a higher rate of base of skull fractures than open face. Unfortunately base of skull fractures are one of the worst injuries that can lead to a fatal high spinal cord paralysis. Conversely, there is no evidence that wearing a full face vs open face reduces fatalities from other types of head injury.

In some ways it is counterintuitive. Full face does reduce facial injuries. However, although they can be serious, facial injuries are generally non-fatal and easily treatable. In a crude way, in serious impacts the face acts as the bodies own "crumple zone" reducing the force transmitted to the skull and brain. Full face helmets are problematical in two respects. Generally they are more heavy, which magnifies the problems of head movements in high g impacts. Also, in direct blows to the chin the chin bar can act as a lever, and transmits more force to the skull base. This why head and neck restraint systems such as the HANS device are now compulsory in many forms of motorsport, as they mitigate both of these problems by restricting the motion of the head and reducing transmitted g forces to the skull base and brain.

I don't know all of this translates to skiing, or even cycling or motorbikes, as part of the major problem with full face in cars is the chin hitting the steering wheel. Also, even the highest g force injuries in skiing are going to be much less than those in motorsport or bike accidents etc.

However, as a general principle you want the lightest helmet possible, and one specifically tailored to the intended use
पहा
http://www.bikersrights.com/statistics/cooter/cooter.html

मोदक's picture

22 Sep 2015 - 8:03 pm | मोदक

धन्यवाद डॉक्टरसाहेब.. माझ्यामते हे सगळे मोटरस्पोर्ट्सला लागू असेल. साध्या गाडीवर ८०/९० च्या वेगात जाताना यातले कितपत लागू पडू शकेल याची शंका आहे.

आणखी शोधाशोध करून सविस्तर प्रतिसाद देतो.

सुबोध खरे's picture

22 Sep 2015 - 8:20 pm | सुबोध खरे

मोदक शेट
८०-९० हा आपला वेग आहे आणी समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग तेवढाच असेल तर मिळून वेग १६०-१८० किमी होतो. तेंव्हा कोणताही वेग हा कमी लेखू नये.
पूर्ण चेहर्याचे शिरस्त्राण (फुल फेस हेल्मेट) हे चेहर्याचे संरक्षण करते यात शंका नाही पण चेहरा तुटला फाटला तरी सुधारता/शिवता येतो. मेंदूचे तसे नाही. यास्तव अर्ध शिरस्त्राण हे जास्त चांगले. शिवाय पूर्ण चेहर्याचे शिरस्त्राण हे जास्त वजनदार असल्याने WHIP LASH INJURY म्हणजे मानेच्या कण्याला होणारी इजा किंवा फ्राक्चर जास्त होतात. http://patient.info/doctor/whiplash-and-cervical-spine-injury

तसेच एकदा अपघात झाला कि शिरस्त्राण बदलावे. याचे कारण त्याला आतून चीर गेलेली असेल तर ती वरून दिसत नाही आणी पुढच्या अपघाताचे वेळेस हि "बचत" आपल्याला फार महागात पडू शकते. तसेही पाच वर्षात शिरस्त्राण बदलावे कारण तोवर त्यातील फोम किंवा स्पंज बसल्यामुळे ते आपल्या डोक्याला नीट (फीट) बसत नाही. अर्थात बर्याच लोकांचे हेल्मेट हे फक्त पोलिसाला दाखवण्यासाठी असते त्यांची गोष्ट वेगळी.

थोडी शोधाशोध केली. ओपन फेस की फुल फेस हा वादाचा मुद्दा आहे असा सूर बहुतांश ठिकाणी आहे. अनेक देशांच्या नियमांमध्येही याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय नाहीये.

मला स्वतःला फुल फेस हेल्मेटचा चांगला अनुभव आला आहे ( हनुवटीच्या ठिकाणी घासलेल्या खुणा असलेले हेल्मेट पुढील भेटीत दाखवेन) मात्र आपल्या परिस्थितीला अनुरूप असे HANS Device कुठे मिळत आहे का याचीही शोधाशोध करेन.

जाताजाता..

डोक्याचा / हेल्मेटचा कोणता भाग रस्त्यावर आपटण्याची जास्त शक्यता असते हे दाखवणारे हे रोचक आकडे जालावर मिळाले.

.

कपिलमुनी's picture

23 Sep 2015 - 2:52 pm | कपिलमुनी

धन्यवाद

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Sep 2015 - 3:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

WHIP LASH वाला मुद्दा माहितीच नव्हता! धन्यवाद डॉक्टरसाहेब. हेल्मेट वापरणारे भरपूर लोक मान दुखण्याची तक्रार करतात, त्यामागे हे कारण असावे का? गाडी खड्डयातून गेली तर मानेला हिसका बसल्याचे जाणवते.

मोदक,

आकडेवारी रोचक आहे :)

माहितीपूर्ण डिस्कशन.

उगा काहितरीच's picture

21 Sep 2015 - 1:35 am | उगा काहितरीच

सध्या मॉड्युलर हेल्मेट + प्रोबाईकर ग्लोव्हज वापरतोय, हेल्मेटची सवय झाल्यावर हेल्मेटशिवाय गाडी नाही चालवा वाटत.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 2:51 pm | मम्बाजी सर्वज्ञ

तुम्ही कोणत्या प्रकारची बाईक वापरता आणि कुठे वापरता यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. पहिल्या चित्रात दाखवलेली स्पोर्ट्स बाईक असेल तर आर्मर जाकेटस चा प्रकार थोडा वेगळा असतो (लेदर मेड आणि थोडी घट्ट असतात पोटाजवळ). अशी जाकेटस भारतात मिळत असावीत पण जास्त माहिती नाही.
मी 'यामाहा आर वन' बाईक वापरतो, नायलॉन मटेरिअल (back armour + elbow and shoulder guards). मोटर वे वर स्पीड कधी कधी 90mph पर्यंत जात असल्याने trousers पण वापरतो. साधारणतः सगळा सेट एकत्र मिळतो. लवकरच लेदर सूट घेण्याचा विचार आहे कारण स्पोर्ट्स बाईक वर लेदर सूट मध्ये हालचाल करणे जर सोपे जाते नायलॉन सूट पेक्षा. हा सूट असल्याने इन्जुरी टाळली जाईल असे नाही, पण सांध्यांना सौरक्षण मिळते आणि बर्न इन्जुरी चे प्रमाण आटोक्यात आणता येते. हाय स्पीड रायडींग ला हे इक्विपमेंट असणे जरुरी आहे, लक्झरी नाही.

कपिलमुनी's picture

21 Sep 2015 - 3:13 pm | कपिलमुनी

नायलॉन मटेरिअल (back armour + elbow and shoulder guards).
कोणत्या कंपनीचे जॅकेट वापरता ?

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 3:26 pm | मम्बाजी सर्वज्ञ

मी richa कंपनी चे जाकेट वापरतो. हे बेसिक जाकेट आहे. थंडीत पण चांगले उपयोगी पडते.
http://www.brixmoto.co.uk/richa-bolt-waterproof-mens-motorcycle-jacket.h...

मी रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० आणि पॅशन प्लन या दोन बाईक वापरतो. कोणतीही गाडी असली तरी वेग ८०/९० च्या पुढे जात नाही.

..आणि बुलेटसारखे धूड चालवत असल्याने गाडी लीन करणे वगैरे प्रकार होत नाहीत.

मी बहुदा नायलॉन जॅकेटच घेईन.

(गोप्रो वापरता का?)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 5:12 pm | मम्बाजी सर्वज्ञ

गो प्रो नाही पण तसाच sjcam वापरतो.स्वस्त आहे, गो-प्रो च्या क्वालिटीचे नाही पण बर्या पैकी दर्जा असलेले फुटेज रेकोर्ड करतो. गो-प्रो ची किंमत जवळ जवळ तिप्पट आहे.

मला पुण्यात मिळत आहे तो "Sports Cam" नामक कंपनीचा कॅमेरा आहे. किंमत ७५००/-

९०० mAh बॅटरी आणि ३२ GB पर्यंत मेमरी सपोर्ट आहे. आणखी कन्फीगरेशन पुढीलप्रमाणे.

Click High Definition pictures and videos on the go, upto 12 Mega Pixels
*Applications: Motorcycle, Bicycle, Car recorder, Diving underwater, Extreme Sports, Outdoor Sport Activities, Marine Sports, Home security, etc
*Comes with all necessary mounts and accessories
*Waterproof casing for upto 30 Metres
*4X Zoom, 140 degree HD wide angle shots, 1080P HD, 44g weight
*2" LCD Screen
Slot for Micro SD Card upto 32GB
*1 year warranty for manufacturing defects

Detailed Technical Specifications given below –
1)Image Sensor:- 12Mega Pixels CMOS-Sensor
2)Colour:-Black
3)LCD:-2.0"LCD Screen
4)Image resolution:-12 Mega Pixels (4032*3024)
5)Video Compression Format:-H.264
Default resolution 6)Video:1080P/Picture:4032*3024
Image/ Video file format Video format:MOV/lmage format:JPG
7)Zoom:-4X
8)Lens:- 140° HD wide-angle lens
9)Memory:-Slot for Micro SD card up to 32 GB
10)OSD language:-English/French/Spanish/German/Italian/Chinese Simplied/Chinese
Traditional/Russian/Japanese
11)Connections USB2.0, HDMI
12)Battery life:-80 minutes(1080P)
13)Battery:-Battery Detachable 900mAh
14)Dimension:-(L*W*H) 59.3*24.6*41.1mm
15)Weight:-58g with batteries
16)Accessories:- waterproof case, waterproof case bracket, waterproof case clip, bike Bracket, multifunction clip, camera clip, helmet seat, bandages cleaning
cloth, power adapter, 3M stickers, USB cable, bracket adapter, manual
Applications Extreme Sports, Outdoor Sport Activities, Bicycle, Motorcycle ect.
17) Wifi :- can be operated with ur any smartphone.

Includes Waterproof Casing & Multiple Mounts, It sports 1080P HD video at 140 degree wide angle and 12 Maga pixels still shots

ही कंपनी ऐकली आहे का आधी?

मम्बाजी सर्वज्ञ's picture

22 Sep 2015 - 7:42 pm | मम्बाजी सर्वज्ञ

हो. इकडे हे क्यामेरे आहेत. मी वर लिहिलेला SJCam याच सारखा आहे, फक्त कंपनी वेगळी. गो-प्रो फार महाग आहेत (पण दर्जा पण चांगला आहे) आणि सगळ्यांना परवडतील असे नाही, त्यामुळे असे स्वस्त पर्याय बाजारात भरपूर आहेत. मी sportscam वापरला नाही पण अमेझोन वर शोधल्यावर लगेच सापडला. हे पहा - http://www.amazon.co.uk/s/ref=nb_sb_noss_1?url=search-alias%3Daps&field-...
यातले कोणते मोडेल तुम्ही पहिले ते सांगता येणे कठीण आहे पण तसा बरा असावा असे वाटते आहे कारण मी जेवा क्यामेरे शोधले तेवा या प्रकारच्या बर्याच कंपन्या बघितल्या (Contour, SJCam). एच पी सुधा अशा प्रकारचे क्यामेरे बनवते पण त्याचे माउंट कमी आहेत. इथे पहा - http://www.amazon.co.uk/s/ref=nb_sb_noss_2?url=search-alias%3Daps&field-...
तुम्ही जर क्यामेरा फक्त हेल्मेट ला लावणार असाल तर एच पी ची मोडेल्स चालून जातील पण ट्राय पोड वर लावणे किवा सायकल ला लावणे असा उद्देश असेल तर आधी माउंट आहे कि नाही त्याची खात्री करून घ्या. SportsCam चा कुणीतरी review पण टाकला आहे इथे -
https://www.youtube.com/watch?v=I5RjEiO_npw
मी स्वतः हा क्यामेरा वापरलेला नाही त्यामुळे फार सांगू शकणार नाही. माझा SJCam आणि Contour या Action camera चा अनुभव तसा बरा आहे. हे दोन्ही क्यामेरे go pro इतके भारी नाहीत पण पिक्चर क्वालिटी चांगली आहे रेकोर्डिंग ची. माउंटस अवेलेबल आहेत मार्केट मध्ये बर्याच इनस्टरुमेंटस साठी आणि साध्या पी सी ला जोडून विडीओ डाऊन लोड करता येतो. ते water-proof पण आहेत. कदाचित sportscam पेक्षा थोडे महाग असू शकतील (कारण इथे बरेच चालतात).
ब्याटरी लाइफ हा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. Contour ची ब्याटरी जवळ जवळ २.५ ते ३ तास चालते. मिक्रोफोन पण आहे आणि स्वतःचा आवाज रेकोर्ड करता येतो.
इथे अपघात झाला तर अशा क्यामेरा चे फुटेज कायदेशीर पुरावा म्हणून गणले जाते. इन्शुरन्स कंपनी आणि पोलिस पण हे फुटेज असेल तर काम पटकन करू शकतात त्यामुळे बरेच लोक वापरतात.

मोदक's picture

22 Sep 2015 - 8:03 pm | मोदक

धन्यवाद.. चेकवतो.

अनुप कोहळे's picture

23 Sep 2015 - 3:46 pm | अनुप कोहळे

Mobius Action Cam सुद्धा चंगल पर्याय आहे. भारतात जरा जास्त किंमत आहे. अमेरीकेतुन कुणी येत असेल तर मागवा.
फारच छान रिझल्ट्स आहेत.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 3:01 pm | मम्बाजी सर्वज्ञ

लेदर सूट मध्ये 'वन पीस' प्रकार आहे तो फारसा सोयीस्कर वाटत नाही. भारतातल्या तापमानाला तर नक्कीच नाही. जर शहरातच बाईक चालवणार असाल तर नायलॉनस बरे आहेत लेदर पेक्षा. जाकेट चे वजन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चांगली जाकेट्स कमीत कमी २.५ ते ३ किलो पासून सुरु होतात कारण आर्मर च्या जोडीला आतमध्ये अस्तर पण असते. आतले अस्तर (छोटे जाकेट) चेन ने जोडलेले असते, पूर्णपणे काढता येते. अशी जाकेट्स थंडीत उपयोगी पडतात. शहरातल्या 'रायडींग' ला जाकेट्स हलकी असणे जरुरी आहे. जर मोकळ्या रस्त्यावर 'मोकाट' पाळायचे असेल तर जरा 'तगड्या' क्याटेगरीतले जाकेट असणे हि एक 'मुलभूत गरज' आहे.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 3:44 pm | मम्बाजी सर्वज्ञ

जाकेट आणि trousers चे साईझ हा एक गोंधळात टाकणारा विषय आहे. प्यान्ट्स सारखे यांना नंबर्स नाहीत (मी तरी बघितले नाहीत). L(Large), S(Small), XL(Extra Large), XXL(Super Large) असे वेगवेगळे प्रकार आहेत. मला मध्यम प्रकारातले शर्टस आणि प्यान्ट्स येत असल्या तरी जाकेट्स XL प्रकारातले वापरावे लागतात. त्यामुळे मी कधी ऑन-लाईन खरेदी केली नाही जाकेट ची. मी गाडी कामाला जायला पण वापरत असल्याने ऑफिस च्या कपड्यांवर जाकेट आणि trousers वापरतो. त्यामुळे थोड्या मोठ्या आकाराचे आहेत. जे लोक फक्त recreation साठी बाईक वापरतात ते शोर्ट आणि टी शर्ट वर जाकेट वापरतात त्यामुळे थोडे छोट्या आकाराचे जाकेट्स चालून जातात. हाय स्पीड ला थोडे घट्ट आणि छोटे जाकेट्स (लेदर) जास्त उपयोगी पडतात कारण गाडी lean करता येते पटकन, सीट वरून उठून पटकन बाजूला सरकता येते किवा बाजू बदलता येते. रोजच्या ऑफिस च्या प्रवासाला असल्या कसरती करत नसल्याने सध्या तरी नायलॉन मध्ये समाधानी आहे.

वेल्लाभट's picture

22 Sep 2015 - 4:05 pm | वेल्लाभट

लैच्च प्याशनेट्ट दिसता.
वाह. मी दुचाकीवेडा नाही पण हे वाचायला जाम आवडतं.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

22 Sep 2015 - 8:35 pm | मम्बाजी सर्वज्ञ

बाईक चे लायसन्स घेतले ते 'लोकल एरिया'त पटकन फिरता यावे म्हणून. इथे मोटारसायकलसना बर्याच ठिकाणी पार्किंग फुकट आहे. ट्राफिक मध्ये न अडकता पटकन पोचता येते त्या मुले बाईक्स बर्या पडतात.
कधी कधी मोटार वे वर लोक रांगेत बसून राहतात कार मध्ये आणि मोटारसायकल असेल तर दोन गाड्यांच्या मधून जाता येते इथे - It is legal to lane split under certain conditions here. ऑफिस ७० मैलांवर आहे घरापासून आणि सोमवारी आणि शुक्रवारी गर्दी बरीच असते तेव्हा उपयोग होतो मोटारसायकलचा.

भारतात परत जाण्या अगोदर एकदा तरी स्पोर्ट्स बाईक चालवायची असे ठरवले होते कारण मोकळे आणि चांगले रस्ते आणि तुलनेने कमी किमतीत मिळणाऱ्या हाय पावर बाईक्स ज्या भारतात १० लाखाच्या वर आहेत. इथे 1000cc च्या मोटारसायकलस अगदी १ लाखापासून मिळतात (second hand) आणि मेंटेन पण करतात लोक व्यवस्थित. सुरुवात केल्यावर इंटरेस्ट आला आणि बरेच काही शिकलो. घरच्या घरी बर्याच गोष्टी रेपेअर करण्या पासून गाय्रोस्कोप आणि भौतिक शास्त्रा पर्यंत. इथे एका लोकल इन्सट्रकटर कडून धडे घेताना त्याने बर्याच गोष्टी शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या. GP race मध्ये मोटारसायकल जमिनीला चिकटवून का वळवतात त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण समजल्यावर लक्षात आले गेली ३० वर्षे आपले समज बरेच चुकीचे होते. Target fixation हा प्रकार प्रत्यक्षात बर्याच वेळा घडला होता मोटार सायकल चालवताना पण तो काय आहे आणि गाडी चालवताना स्वतःच्या उपयोगासाठी कसा वापरायचा ते कधी कुणी सांगितलेच नव्हते. मी कधीच मोटारसायकल रेस चा 'चाहता' नवतो पण आता TT रेस मधले ओवरटेक आणि त्यातल्या तांत्रिक बाबींमध्ये बराच रस आहे. It was adrenaline rush for me once upon a time not any more. I enjoy smooth ride more than a dashing stint.

याची एक काळी बाजू पण आहे. मोटारसायकल वरचा अपघात म्हणजे मरण जवळ जवळ नक्कीच. इथले अपघात मोटारसायकलस्वार न दिसल्यामुळे होतात कारण सगळेच कमीत कमी 50mph + च्या वेगाने पळत असतात. त्यामुळे उत्तम जाकेट्स आणि प्रोटेकटीव गेअर हि मुलभूत गरज आहे. एक वेळ बाईक फार भारी आणि सुसाट पळणारी नसली तरी चालते.

एस's picture

22 Sep 2015 - 10:54 pm | एस

क्या बात है?

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Sep 2015 - 3:45 pm | अनिरुद्ध.वैद्य

वॉव!

शास्त्रोक्त प्रशिक्षण वगैरे घेतले की तुम्ही! खूप छान माहिती विदित केलीत!

धन्यवाद!

मम्बाजी सर्वज्ञ's picture

23 Sep 2015 - 7:28 pm | मम्बाजी सर्वज्ञ

धन्यवाद! अजून शिकतो आहे, बरेच काही बाकी आहे. लायसन्स मिळाल्यावर पुढे काही advance कोर्स करता येतात, सध्या त्याच्या मागे आहे. ऑफिस ची वेळ आणि कोर्स चे टायमिंग जुळत नाही त्यामुळे वाट बघतोय सुट्टीची. आता कदाचित पुढच्याच वर्षी जमेल. इथे 'track day' नावाचा प्रकार असतो.
https://www.castlecombecircuit.co.uk/trackdays/bikeinformation.asp
तो एकदा करायची इच्छा आहे. तिथे अजून काही नवीन गोष्टी शिकवतात. त्या जरी हाय स्पीड रेसिंग शी संबंधित असल्या तरी बर्याच वेळा सध्या रस्त्यावर सुधा उपयोग होतो त्यांचा.
तू नळीवर बरेच चांगले ट्रेनिंग विडीओ आहेत. त्यांचा पण बराच उपयोग होतो.

मोदक's picture

22 Sep 2015 - 7:13 pm | मोदक

धन्यवाद!!!!

मी LS2 कंपनीचे XL साईझचे नायलॉन जॅकेट घेतले. XXL अंगावर जास्त सोयीचे वाटत होते परंतु त्याचे शोल्डर आणि एल्बो गार्डस खाली घसरत होते. XL पर्फेक्ट्ट बसले.

मदतीबद्दल अनेक धन्यवाद!!!! :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Sep 2015 - 3:40 pm | अनिरुद्ध.वैद्य

पत्ता द्यावा मालक दुकानाचा, मी सुद्धा लांब प्रवासाच्या तयारीत आहे. तेव्हा एक एक गोष्ट जमवतोय :)

प्रोबायकर, महात्मा गांधी रस्ता. कँप, पुणे.

अनुप कोहळे's picture

23 Sep 2015 - 3:50 pm | अनुप कोहळे

दुकानाचा पत्ता सांगा. मी सुद्धा शोधात आहे एका चांगल्या जॅकेटच्या.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

22 Sep 2015 - 8:09 pm | मम्बाजी सर्वज्ञ

झकास! बुलेट ३५० - its a gem!

मी मुख्य लेख लिहिताना एक महत्वाचा मुद्दा विसरलो, गाडी चालवताना कोणते शुज वापरावेत?

मी सध्या अ‍ॅक्शन ट्रेकींग (अँकल-सह) हे घोट्याच्याही वर येणारे शुज वापरतो. तुमचा काय अनुभव आहे?

.

अनुप कोहळे's picture

23 Sep 2015 - 4:08 pm | अनुप कोहळे

मोदक साहेब, सायकल वरुन मोटारसायकल वर प्रोमोट झाले. बुलेट ३५० एकदम मस्त बाईक आहे.
हार्दिक अभिनंदन.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

23 Sep 2015 - 5:59 pm | मम्बाजी सर्वज्ञ

प्रोबयकर च्या फेसबुक पेज वर हा प्रकार बघितला - Komine Riding jeans with complete पद्दिंग.
भन्नाट आहे, इथे फार पॉप्युलर आहे. सध्या जीन्स मध्ये आर्मर प्लेटिंग करून मिळते. हा एक चांगला ऑप्शन आहे.

बूट : बुटा बद्दल फार काही आधी लिहिले नाही कारण भारतातल्या ट्राफिक ला आणि अंतराला मला ते फार सुटेबल वाटले नाहीत. जर तुम्ही घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर जाऊन काम करणार असलात तर अंगावरची घोंगडी काढून बूट बदलून 'नॉर्मल' ड्रेसिंग मध्ये यायला १० मिनिटे तरी घालवावी लागतात. हेच सोपस्कार परत घरी येताना. आणि सूर्यदेव पेटले असतील तर ह्या सगळ्याच्या आत उकडून हैराण व्हायला होईल. एकदा गाडीने स्पीड पकडला कि किवा थोडा फार वारा वाहायला लागला तर गरम हवेत सुधा प्रोब्लेम येत नाही पण ३०+ डिग्री असेल तर थोडी चीड चीड होतेच.

हे मात्र खरे कि चांगले बूट = चांगले प्रोटेक्शन. मी खाली दिलेल्या लिंक मधले बूट घेतले आहेत. वापरलेले घेतले त्यामुळे नाममात्र किमतीत मिळाले.

http://www.amazon.co.uk/Richa-Drift-Motorbike-Motorcycle-Black/dp/B00C3F...

याला एक स्वस्त आल्टरनेटिव म्हणजे 'इंडसट्रीअल शूज' पण ते दिसायला बोजड असतात. मी काही लोकांना 'स्टील टो' वाले शूज घातलेले बघितले आहे पण त्याबद्दल उलट सुलट चर्चा पण ऐकली आहे -
१. फार काल थंड राहतात (हिवाळ्यात).
२. जर पायावर पडलेले वजन अति असेल तर बोटे नक्की जातात (उद. अवजड चाक पायावरून जाणे इत्यादी. ( ते बूट नसताना बोटांचे काय होत असावे हा वेगळा प्रश्न!))

कपिलमुनी's picture

23 Sep 2015 - 6:13 pm | कपिलमुनी

shoes

लै भारी आहेत. लाँग राईड साठी उपयुक्त !

झक्कास शूज आहेत. मुनीवर; एकदा त्या प्रोबायकरला भेट द्या. असले सगळे प्रकार आहेत तेथे.

मी 'अ‍ॅक्शन ट्रेकींग' वर समाधानी असल्याने बुटांचा फार विचार केला नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 'अ‍ॅक्शन ट्रेकींग' असले की गाडी पार्क केल्यानंतर कितीही चालावयाचे असले (उदा. एखादा छोटासा ट्रेक!) तरी काही फरक पडत नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Sep 2015 - 11:25 pm | अनिरुद्ध.वैद्य

स्टोरमध्ये बघितले होते! ६K+ किंमत पाहून बाजूला ठेऊन दिले ;)

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 11:19 am | सुबोध खरे

अशा बुटांचा एक फायदा असतो तो म्हणजे खाच खळगे असणार्या रस्त्यावर घोटा मुरगळत नाही. (लष्करातील डी एम एस बूट घातल्यावर वाटेल तिथे पळताना हा फायदा त्वरित जाणवला होता.)
परंतु फार उंच बूट असतील तर पाय उबून येतात विशेषतः महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतात जेथे उष्ण हवामान आहे.शिवाय्पायाच्या भेगात चिखल्या होतात. यासाठी नाय्सील सारखी पावडर मोज्याच्या आत आणि बाहेर टाकून मग बूट घालावेत.
लेह लदाख सारख्या ठिकाणी असे बूट म्हणजे वरदानच आहे कारण पाय थंडीने गारठून जात नाहीत कि उथळ पाण्यात पाय पडला तर गोठत नाही.

अशा बुटांचा एक फायदा असतो तो म्हणजे खाच खळगे असणार्या रस्त्यावर घोटा मुरगळत नाही.

+१११११

आज मी हेल्मेटच्या आत घालायचा मास्क घेतला. १५० रू.ला मिळाला. माकडटोपीसारखा असतो तो २०० रू. सांगीतला. मुंबईसारख्या धुळीने भरलेल्या ठीकाणी मास्क वापरल्याने चेहर्‍याचे धूळीपासून रक्षण होते.

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 12:50 pm | सुबोध खरे

जसे हेल्मेट पाच वर्षांनी किंवा अपघात झाला तर बदलावे तसेच हेल्मेटचा वायझर दर वर्षी पावसाळ्याअगोदर बदलावा. कारण त्याच्या प्लास्टिक वर चरे पडतात आणि त्यात पाणी साठून पाउस पडत असताना आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेचे विकृतीकरण(distortion) होते. हे विशेषतः रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशात फार त्रासदायक होते. या वायझरची किंमत फक्त १०० रुपये असते पण १०० पैकी ९० जण तो वायझर बद्लत नाहीत.
(आळसामुळे).
हाच सल्ला ज्यांना लांब सहलीवर जायचे आहे त्यांनी पण पाळावा. सुस्पष्ट प्रतिमा हा अपघात टाळण्याचा एक प्रभावी उपाय आहे.

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 11:25 am | भटकंती अनलिमिटेड

ग्लोव्हज साठी खरं तर प्रोबाईकचे ग्लोव्ह्ज अजिबात वापरु नयेत. (देव न करो पण) अपघात घडला तर फॉल सहन करणेकामी त्यांचा काहीच उपयोग नाही. त्याऐवजी लेदरचे ग्लोव्हज वापरावेत. क्रॅमस्टरचे बेसिक लेदर ग्लोव्ह्ज साधारण १६००/- मध्ये मिळतात आणि त्याचे रिव्ह्यूदेखील चांगले आहेत. इतर ब्रॅंड्समध्ये रायनॉक्स, स्पार्टन, अल्पाईनस्टार वगैरे कंपन्या असे ग्लोव्ह्ज बनवतात. मी स्वतः स्पार्टनचे (आताचे कंपनी नाव अस्पिडा) ‘पेगासस’ हे लेदरचे ग्लोव्ह्ज वापरतो.

हेल्मेट्समध्ये आयएसाआय हे बेसिक रेटिंग आहे. किमान त्या रेटिंगचे हवेच. शक्यतो पूर्ण चेहरा झाकेल असे एकसंध हेल्मेट वापरावे. मॉड्युलर हेल्मेटमुळे त्याचा आघात सहन करण्याची शक्ती कमी होते. आयएसआय च्या पुढे डीओटी, इसीइआर-२२ हे चढत्या भाजणीचे सेफ्टी रेटिंग्ज आहेत. तशी किंमतही वाढत जाते. रात्री बाईक चालवणार असाल तर संपूर्ण पारदर्शक काच असलेलेच हेल्मेट वापरावे. साधारण अडीच हजारापासून मध्यम चांगले हेल्मेट्स मिळतात. LS2, Cross हे बाहेरच्या देशातले चांगले ब्रॅंड्स आहेत. आणि Steelbird, Vega, Wrangler हे भारतीय ब्रॅंड्स आहेत.

लॉंग राईड्स नियमित करत असाल तर जॅकेट्स आवश्यक आहेत. संपूर्ण नायलॉनची किंवा कॉरड्युरा फ़ॅब्रिकची जॅकेट्स साधारण चार हजारापासून मिळतात. परंतु भारतीय उष्ण हवामानात ही वापरणे त्रासदायक आहे. त्याऐवजी कॉरड्युरा+जाळी/मेश असे कॉम्बिनेशन असलेले जॅकेट सोयीस्कर ठरते. त्याला आतून पाऊस/थंडीपासून संरक्षणासाठी जोडजॅकेट असते. अशा जॅकेट्सची किंमत ६५००/- पासून पुढे सुरु होते. अस्पिडा, रायनॉक्स, क्रॅमस्टर असे ब्रॅंड्स उपलब्ध आहेत. जॅकेट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्याचेरबर-फोम आर्मर जे आहे ते CE/KNOX रेटेड असावे. शिवाय ते काढून जॅकेट धुताही यायला हवे. आर्मर्स खराब झाली की दुसरी तशीच वेगळी मिळायला हवीत.

मोदक's picture

29 Sep 2015 - 2:05 pm | मोदक

ग्लोव्हज साठी खरं तर प्रोबाईकचे ग्लोव्ह्ज अजिबात वापरु नयेत. (देव न करो पण) अपघात घडला तर फॉल सहन करणेकामी त्यांचा काहीच उपयोग नाही

याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

30 Sep 2015 - 3:18 pm | मम्बाजी सर्वज्ञ

रिव्यू वाचला. तो बर्यापैकी बरोबर वाटला. माझे या ग्लोव्स बद्दलचे मत एवढे वाईट नाही आहे. ते थोडे नाजूक आहेत आणि कमी मजबूत आहेत हि गोष्ट खरी आहे. पण मला उन्हाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त वाटले. लेदर पेक्षा नक्कीच जास्त व्हेनटिलेशन आहे. पण हिवाळ्यात उपयोगाचे नाहीत. तीच गोष्ट पावसात. अतिशय वेगात जर हे ग्लोव्स असताना हात जमिनीवर घासले तर नक्कीच त्रास होणार, विशेषतः तळ हात घासला तर. हात घासणे आणि आपटणे या दोन वेगळ्या प्रकारच्या इंज्युरी आहेत. जर हात आपटला तर बहुतेक वेळा कुठले ग्लोव्स आहेत याने फार फरक पडत नाही. व्हायची ती जखम होतेच (generally trauma/whiplash), त्यामुळे ग्लोव्स चा मुख्य उपयोग हात घासताना होतो.
या सर्वापेक्षा मला हे ग्लोव्स नॉर्मल रायडींग करताना बरे वाटले. तळ हातावर थिकनेस थोडा कमी आहे त्यामुळे ग्रीप चांगली घेता येते. जर सारखे 'ब्रेक्स' लावायची वेळ येत असेल तर ग्लोव्स किती चांगले आहेत त्यावर हातांवर येणार ताण अवलंबून असतो. जाड ग्लोव्स मध्ये ब्रेक लावण्याची क्रिया थोडी संथ होते. थोड्याच काळा नंतर मनगट आणि आजू बाजूचे स्नायू तक्रार करायला लागतात.

मी हिवाळ्यात लेदरचे ग्लोव्स वापरतो कारण वर 'भटकंती' साहेबांनी लिहिल्या प्रमाणे हे उपयोगाचे नाहीत. पण मला हे ग्लोव्स आवडले कारण ग्रीप फार छान मिळते.

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 4:36 pm | भटकंती अनलिमिटेड

जेव्हा आपण नियमित राइडिंग करतो त्यात मोठ्या हायवे राईड्स गृहआहे धरुनच प्रतिसाद देतोय. शहरातल्या राईड्सना ( म्हणजे <६० किमी घर ते घर, जिथे वेग साधारण ५०किमी/तास) ग्लोव्ह्ज नसले तरी चालतात किंवा आपण वापरता तसे ग्लोव्ज अगदी योग्य आहेत. परंतु मोठ्या हायवे राईड्ससाठी मात्र वेग कायमच अधिक असतो. साधारण ८०-११० किमी/तास. अशा वेळी हातांना दोन्ही प्रकारच्या इजा होऊ शकतात. शिवाय पडण्याच्या स्थितीत आपल्या प्रतिक्षिप्त क्रियेने आपण तोल सावरण्यासाठी, घसरण्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी आपण हातांचा वापर करत असल्याने हात घासून सोलवटण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी निश्चितच high abrasion resistant ग्लोव्जची गरज असते. हा गुणधर्म साधार्ण अशा प्रकारे असतो = धातूच्या किंवा कार्बन फायबरची जाळी > लेदर > कुठल्याही प्रकारचे कापड.
धातूच्या जाळीचे ग्लोव्ज वजन जास्त असल्याने बनवत नाहीत. कार्बन फायबरचा वापर ग्लोव्जच्या knuckles मध्ये केला जातो. लेदरच्या ग्लोव्जचा वापर सर्रास सर्व प्रोफेशनल आणि आपल्यासारख्या हौशी बाईकर्समध्ये लोकप्रिय आहे.
उन्हाळ्यात ग्लोव्जमध्ये घाम येऊन ग्रिप जाऊ नये म्हणून ग्लोव्जना दोन्ही बोटांच्या मध्ये, knuckles च्या कार्बन फायबर आवरणाखाली धातूची, किंवा लेदर मेशची जाळी असते. शिवाय आतल्या बाजूला छिद्रे असतात. त्यामुळे हवा खेळती राहून घाम येण्याच्या समस्येचं निराकरण होते. अर्थात ग्लोव्ज वापरुन ब्रेक, क्लचच्या वापराची सवय करुन घ्यावी लागते. चांगल्या क्वालिटीच्या अगदी योग्य साईझचे ग्लोव्ज घेतले तर मनगट, बोटे, हात यांपैकी कुठल्याच स्नायूंवर ताण येत नाही.

Aspida Pegasus Gloves
माझा अनुभव: मी गेल्या डिसेंबरात लेदर ग्लोव्ज घेतले आणि महिनाभर शहरात सरावासाठी वापरले. नंतर डिसेंबराच्या थंडीत आणि मराठवाड्याच्या (वैजापूर, औरंगाबाद, जालना लोणार) दुपारच्या उन्हात कधी कधी चार-चार तास सलग अशी एकूण १५००किमी राइड करुनही कधी जास्त घाम येतोय असे वाटले नाही. शिवाय हात उन्हाने काळेही झाले नाहीत हा बोनस ;-)
____________
भटकंती अनलिमिटेड

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 4:39 pm | भटकंती अनलिमिटेड

Aspida Pegasus Gloves

मी गेले ३ वर्षे प्रोबायकर ग्लोव्हज वापरतो आहे - मला काही प्रॉब्लेम जाणवला नाहीये आणि हिमालयात जाताना हे ग्लोव्हज नक्की घालणार नाही.

मला त्या ब्लॉगमध्ये जाणवलेला मोठ्ठा प्रॉब्लेम सांगतो.

इथे त्यांनी प्रोबायकर ग्लोव्हजची यथेच्छ चीरफाड केली आहे. (The entire thing is just not meant for humans, They barely provide any protection.) वगैरे वगैरे

नंतर त्याच लेखामध्ये IF you are looking for something to take to Ladakh, check out our review of the DSG Acqua gloves. असे म्हणून DSG Acqua gloves ची माहिती दिली आहे. परंतु त्यामध्ये

Are they cold proof? "Not entirely"

Should you take them to Ladakh?

Hell no. They are only good for dry winters, like we get up north. Anything with rain or snow and your fingers will feel like they are in a freezer. Also, they need too much care to take off and put back on, something you won’t have the courtesy of doing when stuck on a cold mountain pass with a hailstorm. This is the most important, actionable result of this DSG Acqua review – DO NOT take them to Ladakh!

नक्की काय प्रकार आहे हा?