अंगाई..

सत्य धर्म's picture
सत्य धर्म in जनातलं, मनातलं
12 Sep 2015 - 1:48 pm

अंगाई

मी लहान असताना झोपण्यापूर्वी आईला खूप त्रास देत असे . त्यावेळी आजच्या T.V. सारखी साधने नव्हती त्यामुले मला झोपवता , झोपवता आई थकून जायची मी तिला रोज हैराण करून सोडायचो आणि मग ती अंगाई गायची , आता आईलापन जास्त आठवत नाही मग जेवढी आठवली तीच इथ देतोय .......

"कृष्णा घालितो लोळण ,
आली यशोदा धावून ,
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून ",

"आई मला चांदोबा दे आणून त्याचा चेंडू मी बनविण ,
असला रे कसला बाळा तू जगाच्या वेगळा ."

" कृष्णा घालितो लोळण ,
आली यशोदा धावून ,
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून ",
" आई मला चांदण्या दे आणून त्याच्या लाह्या मी बनविण ,
असला रे कसला बाळा तू जगाच्या वेगळा"

" कृष्णा घालितो लोळण ,
आली यशोदा धावून ,
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून ",
"आई मला साप दे आणून त्याचा चाबूक मी बनविण ,
असला रे कसला बाळा तू जगाच्या वेगळा"

मी झोपलो असा पाहून आई हळूच उठून जाऊ लागली कि अंगाई बंद झालेली पाहून मी भोकाड पसरले म्हणून समझायच अन आई
दुसरी अंगाई म्हणू लागायची ,

" राजा राणी ची नको , चिऊ ताई ची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची ,
वेळ माझी झाली आता झोपेची ."
"आयोधेचा राजा राम पहा ,
सीतेचा पती राजा राम पहा .........................................

अंगाई ऐकत आईच्या कुशीत झोप कशी यायची कळत सुद्धा नव्हत , नकळत संस्कार सुद्धा घडत होते.

आज या जमान्यामध्ये अशा जुन्या प्रथा , परंपरांना स्थान नसलेलं पाहून दुख होते.

आता ना कोणत बाळ अंगाई साठी रडत ना कोणती आई अंगाई गाते .?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टिप :- माझ्या आईकडून लहानपणी ऐकलेल्या आणि आईला आत्ता आठवत असलेल्या अंगाई वरून हे लिहित आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

12 Sep 2015 - 2:04 pm | अभ्या..

भाग्यवान आहात.
अशा आईलवेड्या लोकांचा हेवा वाटतो.

पद्मावति's picture

12 Sep 2015 - 2:06 pm | पद्मावति

किती गोड अंगाई.
चांदण्यांच्या लाह्या खूपच मस्तं कल्पना. लेख आवडला.

आता ना कोणत बाळ अंगाई साठी रडत ना कोणती आई अंगाई गाते .?

..याला मात्र मी असहमत. अहो, काळ कुठलाही असेना आई अंगाई गाणारच. आजची आई पारंपारीक अंगाया कदाचित नाही म्हणणार पण मुलांना झोप लागावी म्हणून काहीतरी गुणगुणणारच. ती सुद्धा अंगाई असते.

अभ्या..'s picture

12 Sep 2015 - 2:08 pm | अभ्या..

"हो जा जरा मतलबी" टाईपचे गुणगुणत असेल. चांगलय.

भिंगरी's picture

12 Sep 2015 - 2:11 pm | भिंगरी

सहमत!

भिंगरी's picture

12 Sep 2015 - 2:12 pm | भिंगरी

म्ह्णजे पद्मावतिच्या प्रतिसादाला सहमत.

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 2:15 pm | प्यारे१

माझी बायको अजूनही कधीतरी चिरंजीवांसाठी 'गोष्ट सांग मला रामाची' ही अंगाई म्हणते. मागच्या वर्षी रोजच.
सोहळा असतो तो. अनुभवायचा बस्स!

सत्य धर्म's picture

12 Sep 2015 - 2:21 pm | सत्य धर्म

" गोष्ट सांग रामाची " , पूर्ण करता आली तर बघा .

सत्य धर्म's picture

12 Sep 2015 - 2:21 pm | सत्य धर्म

" गोष्ट सांग रामाची " , पूर्ण करता आली तर बघा .

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 2:22 pm | प्यारे१

प्रयत्न करतो.

सत्य धर्म's picture

12 Sep 2015 - 2:18 pm | सत्य धर्म

चालीत म्हणता आली तर खूप गोड आहे हि अंगाई...........

छान लिहिलंय! अंगाई जरी म्हटली नाही तरी आईचा बाळाशी चालणारा प्रेमाचा संवाद, थोपटणं, गोष्टी सांगणं यातून देखील तोच परिणाम साधला जातो, असे माझे मत. हां, विशिष्ट लयीत, मंद सुरात म्हटलेली अंगाई बाळाला लवकर झोप येण्यासाठी मदत करत असावी. मात्र याबाबत डाॅ.च सांगू शकतील.

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 3:50 pm | प्यारे१

काऊ चिऊची/ चिऊ ताईची नको, राजा राणी ची नको,
गोष्ट सांग आई मला रामाची, वेळ माझी झाली आता झोपेची ||

राम काळा की गोरा
राम होता का गं बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा,
आवड होती का गं त्याला खेळाची
गोष्ट सांग आई मला रामाची||

राम दिसायचा कसा
राम हसायचा कसा
आभाळातील चांदोमामा मागायचा कसा
समजूत कुणी घातली त्या वेड्याची
गोष्ट सांग आई मला रामाची||

राम गेला का वनी
त्याला धाडिले गं कोणी
भीती कशी आली नाही त्याचे गं मनी
सोबत होती तिथे त्याला कोणाची
गोष्ट सांग आई मला रामाची, वेळ माझी झाली आता झोपेची ||

माझी मस्त झोप लागायची. हे ऐकून चिरंजीव झोपायचे पण कधीतरी खेळत बसलेले असायचे.
मग आम्ही एका काकाना बोलावणार आणि त्यांच्या भीतीनं साहेब चुळबुळ करत झोपणार.

सत्य धर्म's picture

12 Sep 2015 - 4:54 pm | सत्य धर्म

वा आजचा दिवस चं गेला खूप बर केलात हि अंगाई पूर्ण केलीत. आता माझ्या मुलाला पण हि अंगाई माझी बायको गाउन दाखवेल

पद्मावति's picture

12 Sep 2015 - 9:41 pm | पद्मावति

फारच सुंदर.
गोष्ट सांग रामाची....इतकी गोड अंगाई इथे शेअर केल्याबदद्ल धन्यवाद.

मस्त आहे. आंम्ही दुसरी तिसरीत असताना नाच केला होता यावर ग्येदरिंग मध्ये :D पूर्ण गाण्यात नुसत गोल गोल फिरत एकदा प्रश्न विचारल्याची आणि एकदा झोप आल्याची action एवढच! बघणारे नक्की झोपले असतील :D

अंगाई गीत गॅदरींग ला निवडणार्‍या बाईंना एक गोग्गो पापा.

आम्हीच झोपलो नाही नाचता नाचता यातच मिळवली असं म्हणून सगळ्यानी टाळ्या वाजवल्या असतील त्यावेळी :D

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2015 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा

खूप मत्त मत्त मत्त! आवल्ल अवल्ल आवल्ल! शुप्पल्लैक शुप्पल्लैक शुप्पल्लैक!

काही पुराणातल्या कथाही असतात ज्या झोपताना एकायच्या असतात. लहानपणी आजी अशा काहीशा कथा सांगायची त्याची आठवण झाली. सर्वसाधारण महाभारत किंवा रामायणातल्या अगदी लहानशा घटना असत. ज्या सर्वसाधारणपणे आपल्याला माहित नसतात.

मांत्रिक's picture

12 Sep 2015 - 11:21 pm | मांत्रिक

सहमत! पुराणातल्या कथा पुरणपोळीसारख्या गोड असत!
आजी सांगत असे त्याची आठवण झाली.

सध्या आमच्याकडं हे कार्यक्रम जोरात सुरु असल्यानं लिहावंसं वाटतंय.

रामायण, महाभारत, शिवाजी महाराज रोज एक 'गोत्त'. नवी नाही, चार पाच च. पुन्हा पुन्हा.
लाकूडतोड्या, ससा कासव, सिंह उंदीर जाळं शिकारी आता मागच्या सीटवर गेले.

मी गदाधारी हनुमंत, बाबा रामराया, मम्मा सीतामाता, कधी मी शिवाजी महाराज, मी सम्राट अशोक, टीव्ही वर बघून खंडे राया, कंबरेवर हात ठेवून इट्टला.... रोज दिवस अपुरा पडतो.

पळायचंय घरला. बघु कधी जमतंय.

'शर आला तो, धावुनि आला काळ...' हे गाणं माझी आई म्हणायची.

हे तसेच गाई पाण्यावर आणि बा नीज गडे नीछ गडे लडिवाळा.

कधी ऐकली नव्हती ही रामाची अंगाई.अगदी गोड आहे.
आजची आई बद्दल जोरदार आक्षेप आहे पण लेखविषय आवडला!

'कार्य'बाहुल्यातून वेळ नसेल मिळाला. होतं कधीकधी. ;)