(लावू कशी पाटी मी दुकानला हो )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
29 Aug 2008 - 1:31 pm

(लावू कशी पाटी मी दुकानला हो )

मुंबई व उर्वरीत महाराष्ट्रातील फलक मराठीतुन करण्याची महापालिकेने ( मनसेने ) दिलेली मुदत काल संपली. त्यावर हे भाष्य

चाल: येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला
-------------------------------------------------------------------------
नेहमीच राजे तुमची घाई
नका जावू दुकान फोडायला
लावू कशी पाटी मी दुकानला हो,
लावू कशी पाटी मी दुकानला

दुकानांवर पाटी मराठी
आज राहते काढी उद्या सकाळी
नियम करते दुसरेच कोणी
श्रेय ही लाटतय आपल्याला हो
लावू कशी पाटी मी दुकानला

गाव हाय आमचं मोठ व्यस्त
भैय्या, सिंधी करी धंदा मस्त
मराठीमाती विसरुन आज
निघाले आदेश तोडायला हो
लावू कशी पाटी मी दुकानला

काका होते कलानगरा
'सामना' त्यांचा कराया हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
पोर गेलं जर्मन शिकायला हो
लावू कशी पाटी मी दुकानला

तुम्हाला साहेबा सांगत्ये ऐका
काढून ठेवा तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
मराठी लागलाय भांडायला हो
मराठी लागलाय भांडायला

विडंबनमाध्यमवेध