अडगळीतला इतिहास

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जे न देखे रवी...
2 Sep 2015 - 10:45 am

अडगळीतला इतिहास !!!

परवा जुन्या अडगळीत, मनाच्या
एक जुने पुस्तक सापडले, इतिहासाचे
जर धूळ झटकली त्यावरची
अन मग जरा बाजूला वळून पहिले

मागच्या बुक शेल्फ वर
अजून काही पुस्तके होती इतिहास सांगणारी
दोन्ही पुस्तके इतिहासाचीच,
पण एक सनावळ्या मध्ये अडकलेले
अन एक मात्र वर्तमानाचे अस्तित्व सांगतच
भविष्याचा हि वेध घेणारे

अभ्यासाच्या पुस्तकामध्ये
शिवाजी महाराज, अन झाशीची राणी
एखादा धडा किंवा चार ओळी
अन जमलच तर एखादे चित्र
इतक्यातच संपून जातात

आग्र्याहून सुटका किती कष्टाची
आणि जीवावर बेतलेली होती
आणि "मेरी झांसी नाही दुंगी"
म्हणायला किती मोठे जिगर पाहिजे
हे आम्हाला माहीतच नाही ,
कारण आमचे क्रमिक पुस्तक
त्यावर भाष्यच करत नाही

सुखदेव , भगत सिंग आणि राजगुरू
यांना फाशी झाली आणि ते हसत हसत फासावर गेले
एवढच परीक्षेतले उत्तर माहित आम्हाला
पण त्यामागचा त्यांच्या विचार बद्दलचा
प्रश्न कधी नाहीच विचारला परीक्षेत

सावरकरांना स्वात्यंत्र वीर , क्रांतीसुर्य
असे म्हणतात इतके जरी शिकलो आम्ही
तरी "माझी जन्मठेप" "सन्यस्त खड्ग "
कमला अन सहा सोनेरी पानांपासून
आमच्या पुस्तकाची पाने किती तरी योजने दूरच राहिली

आमच्या साठी राजा राम मोहन राय
केवळ एका सतीच्या प्रथेत अडकले
लोकमान्य मंडाले मध्ये अडकले, अन
आगरकर, फुले , कर्वे केवळ "समाज सुधारक"
म्हणून दोन चार गुण मिळवण्या इतकेच
आठवणीत सामावले

म्हणे आम्ही इतिहास शिकलो
स्वातंत्र्याचा , केवळ पुस्तकात होता तेवढाच
शंभर किंवा त्या पेक्षा हि कमी मार्काचा

खरा इतिहास शिकलो असतो
तर फार बरे झाले असते
कमीत कमी वाहतुकीचे नियम तरी मोडले नसते ,
इतके तरी देशा साठी नक्की केले असते आम्ही

पण एक बरे झाले कि
कमीत कमी घरात तरी
खऱ्या इतिहासाला ,
बुक शेल्फ मध्ये जागा आहे
प्रत्येक घरात देवघर सोबतच
एक असा कप्पा असेल तर
इतिहास जपणारा, तर
परत एक इतिहासच घडेल , नाही का

- शीतल

कविता

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

2 Sep 2015 - 12:18 pm | बबन ताम्बे

आवडली.

पद्मावति's picture

2 Sep 2015 - 1:26 pm | पद्मावति

फार सुंदर कविता.
मनापासून आवडली.

अतिशय चांगला विचार!!! आवडली.

सुनील's picture

2 Sep 2015 - 2:27 pm | सुनील

दवणीय कविता!

केवळ एका सतीच्या प्रथेत अडकले

ह्या ऐवजी -

केवळ सतीच्या एका प्रथेत अडकले, असे करा!

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 2:33 pm | प्यारे१

+११११
असेच.

शीतल जोशी's picture

2 Sep 2015 - 9:31 pm | शीतल जोशी

धन्यवाद , तुम्ही सुचवलेला बदल योग्य आणि उत्तम आहे

एक एकटा एकटाच's picture

2 Sep 2015 - 10:39 pm | एक एकटा एकटाच

वाह!!!!!

तुडतुडी's picture

7 Sep 2015 - 12:58 pm | तुडतुडी

मस्त . अगदी खरं आहे

शीतल जोशी's picture

8 Sep 2015 - 9:02 am | शीतल जोशी

मनापासून धन्यवाद