"भेजा म्हणजे रे काय?.... भाऊ"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
28 Aug 2008 - 10:40 am

त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे ( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ थोडा मजेत जाईल ही एक ईच्छा ठेवून गेलो होतो.
तसे बरेच लोक भेटले म्हणा."हाय,हलो" बऱ्याच लोकांशी झालं आणि सह्ज म्हणून लायब्ररीत डोकावून पाहिलं. बरेच लोक वाचनात दंग होते.एक तरूण चेहरा ओळखीचा दिसला.पण मग डोकं खाजवावं असं वाटलं.हा चेहरा अजून इतका तरूण कसा राहिला.का वयोमानामुळे माझ्या मेंदुत फरक तर झाला नाही ना?.मी तरूण असताना हा अगदी असाच दिसायचा.

विनायक मोकाशी आणि मी एकाच वेळेला T.I.F.R मधे लागलो होतो.मोकाशी अजूनही असाच कसा राहिल?असा एक क्रेझी विचार मनात आला.
अर्थात हा सगळा माझा भ्रम आहे हे मला लगेच कळलं म्हणा.जरा धारीष्ट करून त्याच्या जवळ गेलो,आणि त्याला विचारलं,
"तू विनायक मोकाशीचा मुलगा तर नाहीस नां?"
माझ्या वयाकडे बघून तो चटकन उभा राहिला आणि मला म्हणाला,
"हो मी त्यांचा मोठा मुलगा. मी संजय.तुम्ही माझ्या वडलाना ओळखता?"
आणि मग सर्व जुन्या आठवणिची माझ्या कडून देवाण झाली.(घेवाण कशी होणार तो विनायक नव्हता विनायकचा मुलगा होता नां?)
मला म्हणाला,
"काका,आपण कॅन्टीनमधे जावून मोकळेपणाने बोलूया."
संजय आपल्या वडीलांसारखाच प्रेमळ आणि माणूसप्रेमी वाटला.हातातलं पुस्तक तसंच घेवून तो आणि मी कॅन्टीन मधे गेलो.त्याच्या कडून कळलं विनायक दोन वर्षापुर्वी वारला.त्याला शेवटी शेवटी ’अलझायमर’ झाला होता. संजय तो पर्यंत एमएस्सी झाला होता.आणि आता tifrच्या मोलेक्युलर बायालॉजीमधे पीएचडी करत होता. त्याच्या हातातल्या पुस्तकाच्या मथळ्यावरून तो मेंदूवर संशोधन करीत असावा असं मला वाटलं.
"पीएचडी" साठी तुझा कसला विषय आहे रे?"
असं मी त्याला वडीलकीच्या नात्यानेच विचारलं.
मला म्हणाला,
"तसं अनेक विषयावर मला इंटरेस्ट होतं,पण बाबांच्या अलझायमर ह्या व्याधीकडे गेले सतत दोन वर्ष expose झाल्याने ’मेंदु हा आहे तरी काय’ह्याची उत्सुकता वाढून मग त्यांच्या पश्चात त्यांची आठवण म्हणून हा विषय घेवून मी पीएचडी करायचं ठरवलं."
स्वतः उठून त्याने लाईनीत उभं राहून, दोन कप एस्प्रेसो कॉफी आणि चटणी स्यॅन्डवीच एका मोठ्या डीश मधे तो घेवून आला.
मला म्हणाला,
"बाबांना असा ब्रेकफास्ट बराच आवडायचा"
मला ते दिवस आठवले.आम्ही सर्व मिळून कामावर आल्यावर प्रथम काम सुरू करण्यापुर्वी कॅन्टीनमधे येवून रोज हाच ब्रेकफास्ट घ्यायचो.
गम्मत म्हण्जे डॉ.भाभा पण सर्वांबरोबर असेच लाईनमधे उभे राहून आपला ब्रेकफास्ट घ्यायचे.कुणीही केव्हडाही उच्च पदावर असे ना का सर्वांना नियम सारखा असायचा.वेटर आणून काही देत नसायचा.आणि दुसरं म्हणजे ’सोल्जर कॉन्ट्रीबुशन’, डॉ.भाभा पण स्वतःच्या खिशात हात घालून स्वतःचे पैसे द्दयायचे.

संजय आग्रह करीत मला म्हणाला,
" आणखी काय काका?"
तो रांगेत उभा असताना मी त्याचं पुस्तक सहज म्हणून चाळलं.’मेंदुच्या’ विषयावर ते क्लासिक पुस्तक होतं.
मी त्याच विषयावर त्याच्याकडून माहिती घेण्याचा विचार केला होता.
मी म्हणालो,
"मला तुझ्याकडून थोडक्यात मेंदु म्हणजे काय चीज आहे ही माहीती हवीयं.मला माहित आहे की तो गंभीर विषय आहे आणि पांच दहा मिनीटात सांगता येणार नाही,पण तुला सांगता येईल तेव्हडं ऐकायचं आहे."
संजय मला म्हणाला,
"तुमचं म्हणणं बरोबर आहे,पण अगदी बेसीक गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.सबंध मेंदु बद्दल न सांगता मेमरी म्हणजेच ज्याला स्मरणशक्ति म्हणतात ती काय ते सांगतो.
स्मरणशक्ति ही एक संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.माहिती आणि विचार जसे एखाद्दया एनसायक्लोपिडीयामधे असते त्याच्यापेक्षाही शंभरपटीने जास्त माहिती ह्या तिन पौंडाच्या गोळ्यामधे भरलेली असते.
स्वतःची डिसीझन घेणं,विचार करणं,आणि आपल्याला ह्व्या त्या गोष्टी करणं, हालचाल करणं ही सर्व कामं मेंदु करतो."
नंतर संजय मला म्हणाला,
"काका आपण माझ्या रुममधे जावूं या.आपण दोघे तिकडे आरामात बसून बोलूं."
मी म्हटलं,
"अरे तुझा वेळ मी घेत नाही ना?"
त्यावर तो मला म्हणाला,
"tifr ची खासीयत मी तुम्हाला काय सांगू?तुम्हाला सर्व माहित आहे.डॉ.भाभांच्या शिस्तित हे बसत नाही.त्यांच म्हणणं रिसर्च करणाऱ्यावर कसलीच बंधन असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो.
कांमाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे संवय लागते.माझ्या संशोधनाच्याच संबंधाने आपण बोलत असल्याने मी माझ्या कामाचा अपव्यय करीत नाही असं माझं मन सांगतं.आणि तुम्हाला ही ह्या विषयात इंटरेस्ट असल्याने मला तुम्हाला हवी असलेली माहिती सांगायला पण बरं वाटतं."
नंतर आम्ही वर जावून त्याच्या रुममधे बसलो.
संजय सांगू लागला,
"शॉर्टटर्म,लॉन्गटर्म,आणि ऍनसेसटरल असे मेमरीचे तिन प्रकार आहेत.माहिती लिहून ठेवणं, राखून ठेवणं(store करणं) आणि काढून त्याचा उपयोग करणं ही एक मेमरीची प्रोसेस आहे. काही वेळेला ही माहिती कायमची राखून ठेवणं आणि नंतर कधी तरी उपयोगात आणण्यासाठी काढून घेणं हे त्या त्या जरुरी प्रमाणे ठरवलं जातं.ही माहिती किती वेळ राखून ठेवणं हे पण प्रोसेस ठरवते."
मी म्हणालो,
"म्हणजे आता आपण दोघे कॅन्टीनमधे असताना जे काय बोललो,पाहिलं हे सर्व जरुरी प्रमाणे राखलं जाणार,आणि काढून घेतलं जाणार. खरं ना?"
"अगदी बरोबर " संजय म्हणाला.
" ही माहिती ’चंक्स’ मधे राखली जाते.आणि ती ’टेम्परोल लोब’ मधे,किंवा मधल्या मेंदूत किंवा ’मेडीयल टेम्परोल लोब’ मधे किंवा आणखी अनेक ठेकाणी राखली जाते.अगदी आत राखली जाते.हे ’चंक्स’ नंतर वापरले जातात. ’रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’असे चार प्रकार मेमरी प्रोसेसचे आहेत.
रिकॉल म्हणजे भूतकाळातली माहिती आठवणं.
रिकलेक्शन म्हणजे माहितीची ’रिकन्स्ट्रकशन करून मग आठवण करणं.
रिकगनिशन म्हणजे पुर्वीची झालेली घटना आठवणीत ठेवून नंतर तिची उजळणी करून लक्षात आणणं.
रिलर्नींग म्हणजे घटना परत परत आठवणं.म्हणजेच त्याच, त्याच घटनेची पुनावृत्ती करणं.
मी म्हणालो,
"म्हणजे संजय,तुला मी विनायक समजून पाहिलं ते ’रिकलेक्शन नाही काय?"
"अगदी बरोबर " संजय म्हणाला.
नंतर सांगू लागला,
" मघाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ’रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’हे प्रकार ’शॉर्टम’ मेमरीत मुळीच नसतात. ’शॉर्टम’ मेमरी ही काही सेकंडस ते मिनीट किंवा एक तास पर्यंतची आठवण असते.ह्या मेमरीला चंक्स ठेवायला अगदी थोड्याच प्रमाणात मेंदुत जागा असते.फोन नंबर डायल करताना,नंबर वाचून मग फोन केला जातो.नंतर तो नंबर विसरला जातो.थोड्या वेळा पुर्ती मेमरी ’इन युझ’असते.आणि ’लॉंग टर्म’ साठी राखली जात नाही.
शॉर्टटर्म मेमरी नसती तर आपल्याकडॆ येणार्‍या सर्व माहितीचा ओघ सांभाळताना आपल्या सर्व actions, हळू झाल्या असत्या.
मेमरी प्रोसेस मधली ही शक्यता शब्द,चित्रं,आवाज,वगैरे पाहून किंवा ऐकून त्याना पटकन ’रिकॉल’ करून थोडा वेळ आठवून आणि ती माहिती कायम राखून न ठेवता विसरून जाण्याने मेंदुतुन फुसून टाकली जाते.
’लॉंग टर्म ’ मेमरीला अगणीत जागा मेंदुत असते.त्यातली माहिती ’वापरा नाहीतर विसरा ’ (use it or lose it) ह्या प्रकारात तेव्हा जाते, जेव्हा त्याचे मेमरीतले ’चंक्स’ न वापरल्यामुळे ढकलून दिले जातात, आणि ती जागा थोड्या वेळा पुर्ती दुसऱ्या ’चंक्स ’ नी भरली जाते.
उत्तम ऊदाहरण म्हणजे आपण चावी कुठे ठेवली ती विसरतो,किंवा भेटायला जायला विसरतो वगैरे.
जेव्हा मेमरी खूप overload होते,तेव्हा क्षुल्लक गोष्टी आठवत नाहीत.अशावेळी काही तरी शारिरीक activity करावी.त्यामुळे मेंदुला माहितीचे ’ चंक्स’ rearrange करायला वेळ मिळतो."
घड्याळाकडे पहात संजय मला म्हणाला,
"काका lunch hour संपत येणार.बोलता बोलता कधी वेळ गेला ते कळलंच नाही."
असं म्हणत आम्ही कॅन्टीनच्या दिशेने जायला निघालो. बरेच लोक जेवून गेल्यामुळे लाईन मोठी नव्हती.
self service असल्याने गरम गरम स्टरलाईझड डिशीस हातात घेवून तेव्हडंच गरम जेवण घेत होतो.
’मुलगतवानी सुप,ब्रेडचेस्लाईसीस,फ्राईडचिकन,सलाड, फ्राईड राईस आणि राईस पुडींग’ मी घेतलं,आणि टेबलाकडे गेलो.संजयने पैसे अगोदरच देवून टाकले होते.जेवायला सुरवात करण्यापुर्वी माझ्या सुपकडे बघून मला संजय म्हणाला,
"काका हे मुलगतवानी सुप माझ्या बाबांना खूप आवडायचं.मी एक दोन वेळां त्यांच्या बरोबर इकडे जेवायला आल्यावर मला आग्रहाने हे सूप घ्यायला सांगायचे.मला पण हे सुप खूप आवडतं,पण बाबा गेल्यापासून मी त्यांची आठवण म्हणून मी ह्या सुपाचा त्याग केला,वर्ज केलं."
त्याची ही पितृभक्ति पाहून मला पण खूप गहिंवरून आलं.संवयी प्रमाणे ते प्रेम बघून मला एका गाण्याच्या दोन ओळी आठवल्या त्या ओठात पुटपुटताना पाहून,
संजयने विचारलं,
"काका त्या ज्यु लोकांसारखे जेवणापुर्वी तुम्ही काही प्रार्थना म्हणता की काय?"
आता मला राहवंलच नाही.मी म्हणालो तुला हे गाणं लागू होत नाही.
"पण म्हणून तर दाखवा.मला पण कविता आवडतात"
असं त्याने म्ह्टल्यावर,मी म्हणालो ऐक
"नजरेला दावी पाप
त्याला नेत्र म्हणू नये
विसरला आईबाप
त्याला पूत्र म्हणू नये"
तो हंसल्यावर त्याच्या गालावरची खळी पाहून मला परत विनायकची आठवण आली.जेवण आटोपल्यावर संजय म्हणाला,
"वरती जावू या थोडी उरलेली मेमरी बद्दलची माहिती सांगतो."
असं म्हणत आम्ही परत त्याच्या रुममधे गेलो.
संजय आता पुढचं सांगू लागला,
"एपीसोडीक मेमरी"हा एक मेमरीचा पोटप्रकार आहे.ह्याची प्रोसेस अशी आहे, ही आठवण खूप वर्षानी सुद्धा सहजच आणता येते.जितकं जास्त feeling असेल तेव्हडी ही आठवण चांगली राखली जाते आणि चांगली आठवली जाते.
लॉंन्गटर्म मेमरी आठवायला त्रास होवू लागला की त्याचं कारण वय होत जातं, तसं लोब्स बाद होतात.तसंच बालपणातल्या आठवणी आठवतात पण वर्षापुर्वीच्या आठवणी आठवत नाहीत, ह्याचंही कारण वंय होणं आहे."
मधेच संजयला इंटरप्ट करून मी म्ह्टलं,
"विसरून जाईन तुला सांगायचं म्हणून आत्ताच सांगतो,तुला जेवताना आणि सकाळ पासून आपण बोलत असताना मी तुझ्या विषयी एक बारकाईनं पाहिलं तुझे बोलतानाचे हातवारे,ते मधेच बोलायचं थांबल्यावरचं ओठावर ओठ काही वेळ दाबून ठेवण्याची संवय,हंसताना तुझ्या उजव्या गालावर पडणारी खळी पाहून मला तुझ्या बाबाची,विनायकची आठवण येते."
"आता बोल"
हे ऐकून परत हंसत हंसत गालावरची खळी दाखवत म्हणाला,
"काका,जणू तुम्ही मला ऍन्सेसट्रल मेमरीची माहिती द्दयायची आठवणच केलीत.ह्याच प्रकारच्या मेमरीबद्दल मला शेवटचं सांगायचं होतं.नकळत पण इनबिल्ट राखून राहिलीली ही मेमरी प्रत्यकाच्या genes मधे असते.ते instinct वागणं त्याच्यामुळेच दिसतं.वरचं माझ्या बद्दलचं तुमचं observation हे त्याच ऍन्सेसट्रल मेमरीमधे मोडतं. आणखी एक उदाहरण म्हणजे लहान मुल आंगठा कसं चोखतं,भूक लागल्यावर कसं रडतं,आपण एकमेकाला कसं अलिंगन देतो,दरवाजा कसा उघडतो हे सर्व प्रकार त्यातच येतात.
काका बोलता बोलता चार वाजले.मी तुम्हाला अगदी basic ते सर्व मेमरी बद्दल सांगितलं.आता आपण कॅन्टीन मधे गरम गरम चहा घ्यायला जावूया."
कॅन्टीन मधे जाता जाता मी त्याला म्हणालो,
"तुला विनायकने संजय हे नांव अगदी योग्य ठेवलंय.
महाभारतातला संजय जो आंधळ्या धृतराष्ट्राला त्याच्या महालात बसून कुरुक्षेत्रातली युद्धाची माहिती देत होता.
ती त्याच्या मेमरीच्याच जोरावर नाही काय?
आणखी एक गम्मत सांगतो.हिंदीत मेंदुला "भेजा" म्हणतात,तसंच "भेजा"म्हणजे हिंदीत दुसरा अर्थ पाठवलं,किंबा पाठवणे.
एका मुंबईतल्या पोस्ट्मनची आणि एका उत्तर भारतीयाची पत्रावरून "तुमकु भेजा नही" ह्या वाक्यावर जुगलबंदी कशी झाली हा विनोदी post माझ्या ’कृष्ण उवाच ’ website वर जरूर वाच."

चहा घ्यायला बसल्यावर संजयने दोन कप गरम गरम चहा आणि दोन ’अकुरी on टोस्ट ’आणले.
एका ब्रेड्स्लाईसवर उडदाची आणि चणाडाळीची कुटून केलेली तिखट चटणी फासून त्यावर चण्याच्या पिठाची जाड पेस्ट लावून मग ऑव्हन मधे toast बनवतात.
हा toast चहा बरोबर खायला खूपच मजा येते.
संजय मला म्हणाला,
"काका हा अकुरी on टोस्ट माझ्या बाबांना खूपच आवडायचा.त्यांची आठवण काढून मी न चुकता हा टोस्ट खातो."
चहा घेवून झाल्यावर संजयचा निरोप घेताना खूपच वाईट वाटलं.ह्याच्या रुपाने विनायक मोकाशाने माझ्या मेमरीत ही रेकॉर्ड केलीली आठवण निश्चीतच episodic memory असावी.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

सुनील's picture

28 Aug 2008 - 11:09 am | सुनील

लेख आवडला.

ललित लेखाच्या आवरणात शात्रीय माहिती फार सुन्दर रीतीने दिली आहे.

"देजा वू" चा अनुभव सर्वांना कधी ना कधी तरी आलेला असतोच. एखादी घडत असलेली घटना, भेटलेली व्यक्ती वा ऐकलेला संवाद इ. पूर्वी कधीतरी घडला होता असा भास होणे, याला "देवा वू" म्हणतात. ही काही फार गंभीर अशी समस्या नाही तरी असे भास हे स्मरणशक्तीच्या झालेल्या किंचित उलथापालथीमुळेच होतात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन's picture

28 Aug 2008 - 1:02 pm | नंदन

लेख आवडला. ललित लेखाच्या आवरणात शात्रीय माहिती फार सुन्दर रीतीने दिली आहे.
-- असेच म्हणतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

संदीप चित्रे's picture

29 Aug 2008 - 12:53 am | संदीप चित्रे

ललित लेख वाचताना शास्त्रीय माहितीही समजली. एरवी विज्ञान आणि गणित हमखास 'शॉर्ट टर्म मेमरीत' जातात :)

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Aug 2008 - 9:54 am | श्रीकृष्ण सामंत

नंदनजी,
आपल्याला लेख आवडल्याचे वाचून आनंद झाला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Aug 2008 - 9:34 am | श्रीकृष्ण सामंत

सुनीलजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"देजा वू" म्हणजे काय ते आपल्या स्पष्टीकरणावरून मला कळलं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण वडुलेकर's picture

28 Aug 2008 - 12:19 pm | अरुण वडुलेकर

ललित लेखाच्या आवरणात फार सुन्दर रीतीने दिलेल्या शात्रीय माहितीबद्धल धन्यवाद.
' मुन्नाभाई एम बी बीएस ' या चित्रपटात असे स्मरणशक्तीत झालेली उलथापालथ अथवा कांही आभास यांचा विनोदी ढंगाने केलेला उल्लेख आहे.
त्याला विनोदाने ' भेजामधे झालेला केमिकल लोच्या ' असे म्हटलेले आहे. आपला लेख वाचून त्याची आठवण झाली. खरोखरच अशी उलथापालथ होऊ शकते कां?

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Aug 2008 - 9:46 am | श्रीकृष्ण सामंत

अरुणजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
मी स्मृतीवर कुठे तरी वाचलं होतं.ती माहिती तशीच्या तशी शास्त्रीय माहिती म्हणून देण्याऐवजी जरा मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला एव्हडेच.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रकाश घाटपांडे's picture

28 Aug 2008 - 12:35 pm | प्रकाश घाटपांडे

मैने गांधी को नही मारा ची आठवण आली. माणुस नॉस्टल्जिक का होतो ते समजलं. सामंत साहेब सुंदर लेख आमच्या पर्यंत पोचवलात. शीर्षक आकर्षक असल्याने तो वाचला गेला.
प्रकाश घाटपांडे

सुनील's picture

28 Aug 2008 - 12:57 pm | सुनील

शीर्षक आकर्षक असल्याने तो वाचला गेला

म्हणजे तुम्ही २०% वाले (संदर्भ - आसपास शोधा म्हणजे सापडेल!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Aug 2008 - 10:01 am | श्रीकृष्ण सामंत

प्रकाशजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 8:59 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रकाशजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अमेयहसमनीस's picture

28 Aug 2008 - 2:00 pm | अमेयहसमनीस

लेख आवडला

छान माहिती दिली आहे.

अलझायमर रोगात मेंदू तील ऐसीटाईल कोलीन हे प्रथीन कमी होते.

मेंदू आकाराने आकूंचन पावतो.

६० नंतर हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.

अमेय

कोलबेर's picture

29 Aug 2008 - 1:00 am | कोलबेर

मेंदू तील ऐसीटाईल कोलीन हे प्रथीन

ऍसीटील कोलीन हे प्रथिन आहे?

(सेंद्रिय) कोलबेर

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 9:02 pm | श्रीकृष्ण सामंत

अमेयहसमनीसजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

भडकमकर मास्तर's picture

29 Aug 2008 - 2:14 pm | भडकमकर मास्तर

सामंतसाहेब, हा लेख छान जमलाय...
मजा आली...
उत्तम माहिती, त्या त्या प्रसंगात गुंफत मांडलीत... धन्यवाद
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Aug 2008 - 7:56 pm | श्रीकृष्ण सामंत

भडकमकरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

भाग्यश्री's picture

30 Aug 2008 - 5:50 am | भाग्यश्री

सामंत काका, लेख खूप आवडला! वाचनखुणांमधे टाकावा असा झालाय! एकदम संग्रहणीय..

अशाच विषयावर आधारीत असलेल रिडर्स डायजेस्टने काढलेलं एक पुस्तक आहे, 'मेकींग मोस्ट ऑफ युअर ब्रेन' .. अशीच सर्व माहीती, त्या अनुसरून काही मेमरीचे खेळ, चित्रं ..इतकं भन्नाट पुस्तक आहे ते! बोर झालं की उघडून बसायचे.. संग्रही असावे असे पुस्तक आहे..

देजावू बद्दलही त्यात माहीती होती.. डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांच्यातले सिंक्रोनायझेशन बिघडणे ( काही क्षणांपुरते) , हे देजावूचे एक कारण आहे.. बर्‍याचदा ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो,त्यांना देजावू जास्त होतो असंही लिहीले होते..

अजुन एक इंटरेस्टींग बाब.. जसं देजावू म्हणजे, अनोळखी गोष्टी ओळखीच्या वाटणे.. तसंच जमैसवू असे, ज्यात ओळखीच्या गोष्टी अनोळखी वाटतात.. जसे , घरातले फर्निचर, मांडणी अचानक काही क्षणापूरती अनोळखी वाटते..

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2008 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर

तसंच जमैसवू असे, ज्यात ओळखीच्या गोष्टी अनोळखी वाटतात.. जसे , घरातले फर्निचर, मांडणी अचानक काही क्षणापूरती अनोळखी वाटते..

अशी अवस्था उत्तम प्रतीचा चरस सेवन केल्याने होऊ शकते. उत्तम दर्जाच्या चरसाचा सुगंध आणि त्यातून येणारी वर वर्णीलेली उन्मुक्त अवस्था...अहाहाहाहा.... आजकाल साला पूर्वीसारखा चरस कुठे मिळतच नाही.

हेरंब's picture

30 Aug 2008 - 6:48 am | हेरंब

लेख उत्तम जमला आहे. अभिनंदन.
मेंदू या विषयावर लवकरच सुप्रसिध्द विज्ञानकथा लेखक 'सुबोध जावडेकरांचे एक पुस्तक प्रसिध्द होत आहे. ते सर्वांनी जरुर वाचावे.

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 9:06 pm | श्रीकृष्ण सामंत

हेरंबजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 7:33 am | श्रीकृष्ण सामंत

भाग्यश्रीजी,हेरंबजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं's picture

30 Aug 2008 - 11:26 am | सुचेल तसं

सामंत साहेब,

छान लेख. संजयची एक गोष्ट जरा वेगळी वाटली. त्याच्या बाबांना मुलगतवानी सुप आवडायचं म्हणून त्याने त्यांच्या निधनानंतर ते सोडून दिलं. तोच संजय त्याच्या बाबांना आवडणारं अकुरी on टोस्ट आवर्जुन खातो.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बाजारात तेजरस, शंखपुष्पी अशी औषधं उपलब्ध आहेत. त्यानी काही फायदा होतो का?

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2008 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर

त्याच्या बाबांना मुलगतवानी सुप आवडायचं म्हणून त्याने त्यांच्या निधनानंतर ते सोडून दिलं.
हे मलातरी पटत नाही. जी गोष्ट आपल्याला आवडते ती इतरांनाही आवडली तर आपल्याला जास्त आनंद होतो. त्यामुळे वडीलांना आवडणारी एखादी गोष्ट आपण करायची नाही म्हणजे पर्यायाने त्यांच्या आत्म्याला दु:ख द्यायचे असे वाटते.
माझ्या वडीलांना 'गुलाबजाम' आवडायचे. त्यांच्या मृत्यू नंतर माझ्या मावसभावाने मला विचारलं होतं, 'त्यांच्यासाठी तू काय सोडणार?' मी म्हणालो, ' अशी तर त्यांची आठवण सदैव माझ्या हृदयात जागृत असणार आहे. त्यातूनही त्यांच्या आवडीचे 'गुलाबजाम' खाताना मला त्यांचा तृप्त सहवासही लाभेल.

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 10:15 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रभाकरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपण म्हणता ते ही खरं आहे पण बरचंस हे व्यक्ति व्यक्तिच्या भावनेवर अवलंबून आहे.असं मला वाटतं.गेलेल्या व्यक्तिबद्दलचं वाटणारं प्रेम जो तो आपल्या समजूती प्रमाणे एक्सप्रेस करतो.
गेलेली व्यक्ति पाहून काहीना रडूं आवरत नाही तर काही शांत राहून आपलं दुःख दाखवतात.खरं आहे ना?
"सहज सुचलं" यांच्या प्रतिक्रियेवर मी दिलेलं स्पष्टीकरण आपण कृपया वाचल्यास कदाचीत आपल्या प्रतिक्रियेलाही संजयच्या दृष्टीकोनातून उत्तर दिल्या सारखं होईल असं मला वाटतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपला विचार बरोबर आहे,पण एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे ती ही की बरचसं हे व्यक्ति व्यक्ति वर अवलंबून असतं.त्याशिवाय त्या वस्तुचं सोडून देणं किंवा आवर्जून खाणं हे पण मागे राहिलेल्या व्यक्तिला ती वस्तु आणि आवडीने खाणार्‍या त्या व्यक्तिचं-हयात नसलेल्या- त्या त्यावेळी झालेलं मागे राहिलेल्या व्यक्तिवरचं इम्प्रेशनवर अवलंबून आहे.असं मला वाटतं.
"संजयने मुलगतवानी सूप बाबाना आवडायचं म्हणून सोडून दिलं"
याचं कारण बाबा हे सूप संजयच्या आईला दर विकएन्डला घरात करायला लावायचे.ते निघून गेल्यावर संजयच्या आइनेच ते घरी करायचं बंद केलं.कारण मुलगतवानी सुपाचा कप ओठाजवळ आणल्यावरून बाबांच्या आठवणीने आईला भरून यायचं.ही सिच्युएशन पाहून tifr मधल्या कॅन्टीन मधलं सूप संजयने आईबाबांसाठी सोडून दिलं.
अकुरी on टोस्टचं प्रकरण वेगळं आहे.संजय आपल्या सहकार्‍या बरोबर कॅन्टीन मधे जेवायला जाताना कधी कधी बाबांच्या बरोबर काम केलेले इतर सहकारी त्याच टेबलावर बसून जेवताना त्याला म्हणायचे,
"अरे संजय आज अकुरी on टोस्ट आहे.तुझ्या बाबांना खूप आवडायचा चला आपण त्यांची आठवण काढून खावूया"
म्हणून तो त्यांना जॉईन व्हायचा.
तिच गोष्ट मुलगतवानी सूपा बद्दल कुणी म्हणाल्यास तो आईची गोष्ट इतराना समजावून सांगायचा आणि त्यामुळे इतर त्याला ते घ्यायला आग्रह करीत नसत.
मला वाटतं मी आपल्या शंकेचं जमेल तव्हडं निरसन केलं असावं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं's picture

30 Aug 2008 - 10:40 pm | सुचेल तसं

सामंत साहेब,
आपले स्पष्टिकरण एकदम पटले. धन्यवाद.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

31 Aug 2008 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर

मला नाही पटले.
पण, जाऊदे. त्यावरून वादविवाद नकोत. संजयची भूमिका पटली नाही तरी, समजली मात्र आहे.
धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2008 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या वाचीव माहितीनुसारः-
मेंदू, एखाद्या वस्तूची माहिती साठविताना ती वेगवेगळ्या सेल्स मध्ये साठवून ठेवतो. ह्या सेल्सना जोडणारा एक पुल असतो. जेंव्हा त्या वस्तूचे स्मरण होते तेंव्हा ते पुल सर्व सेल्समधील माहिती 'जोडून' एक सलग वस्तु आणि त्या बद्दलचे ज्ञान आपल्या स्मरण केंद्रास करून देते.
उदा. 'हातोडा' ह्यावस्तूचे लोखंडाचा भाग वेगळ्या सेल मध्ये, दांडा वेगळ्या सेल मध्ये, त्याचे वजन तिसर्‍या सेल मध्ये, तो आपटल्यावर येणारा आवाज चौथ्या सेल मध्ये ......असे 'हातोडा' संबंधीत वेगवेगळी माहीती वेगवेगळ्या सेल्स मध्ये साठविली जाते. जेंव्हा आपण ह्यातील काही गोष्टीचे स्मरण करतो तेंव्हा हे सर्व 'पुल' सर्व माहिती 'जोडून' आपल्या नजरेसमोर हातोड्याचे चित्र उभे करतात.
अल्झमायर मध्ये हे पुल निकामी होतात. त्यामुळे नेहमीच्या वापरातील वस्तूंचे ज्ञानही रुग्णाला होत नाही. शर्ट किंवा पँट हातात घेतली तरी ह्याचे काय करायचे हे आठवत नाही. सतत बरोबर असिस्टंट लागतो.

अल्झमायर्स ची शक्यता टाळण्यासाठी सतत मेंदूला कामात ठेवावा असे म्हंटले आहे. म्हणून वयोवृद्ध माणसांनी 'शब्दकोडे' सोडविण्याची, तारखा-नांवे लक्षात ठेवण्याची प्रॅक्टीस ठेवावी, असेही सुचविले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2008 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेब,
लेख आवडला, लेखातली मेमरी प्रोसेसची माहितीही झक्कास !!!

-दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 10:21 pm | श्रीकृष्ण सामंत

डॉ.दिलीपजी,
आपल्याला लेख आवडल्याचं वाचून मला आनंद झाला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

देवदत्त's picture

30 Aug 2008 - 9:50 pm | देवदत्त

मस्त एकदम.
काही गोष्टी नीट समजण्याकरीता पुन्हा एकदा नीट वाचेन.

"tifr ची खासीयत मी तुम्हाला काय सांगू?तुम्हाला सर्व माहित आहे.डॉ.भाभांच्या शिस्तित हे बसत नाही.त्यांच म्हणणं रिसर्च करणाऱ्यावर कसलीच बंधन असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो. कांमाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे संवय लागते.माझ्या संशोधनाच्याच संबंधाने आपण बोलत असल्याने मी माझ्या कामाचा अपव्यय करीत नाही असं माझं मन सांगतं.आणि तुम्हाला ही ह्या विषयात इंटरेस्ट असल्याने मला तुम्हाला हवी असलेली माहिती सांगायला पण बरं वाटतं.
आपल्याला आवडली ही पॉलीसी. अशा वातावरणात खरोखरच संशोधनाला खूप मदत होत असेल :)

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 10:33 pm | श्रीकृष्ण सामंत

देवदत्तजी,
खरं आहे आपलं म्हणणं.
निसर्गाकडून निर्माण होणारी सृष्टी कुठल्याही बंधना शिवाय असते.गुलाबाने असंच फुलावं,मोगर्‍यानं तसंच फुलावं असं बंधन नाही.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अजिंक्य's picture

31 Aug 2008 - 2:59 pm | अजिंक्य

उत्तम लेख, सामंत साहेब....
मेंदू बद्दल अतिशय विवेचक स्वरूपात माहिती दिली आहे.
शीर्षकावरून असं वाटलं होतं, की हा एखादा विनोदी लेख असावा; पण वेगळाच विषय आहे.
सोबत संजय ची आठवण जोडल्यामुळे फक्त माहितीपर लेख न होता,
त्यातून माहिती तर मिळालीच, शिवाय उत्सुकतेने संपूर्ण लेख वाचल्या गेला.
धन्यवाद.

त्यांचं म्हणणं, रिसर्च करणार्‍यावर कसलीच बंधने असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो. कामाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे सवय लागते.

संपूर्णपणे सहमत.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

श्रीकृष्ण सामंत's picture

31 Aug 2008 - 7:31 pm | श्रीकृष्ण सामंत

अजिंक्यजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपल्याला लेख आवडल्याचे वाचून बरं वाटलं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुमीत भातखंडे's picture

1 Sep 2008 - 2:41 pm | सुमीत भातखंडे

छानच लेख
पुढील लेखास शुभेच्छा.