( दीडशे रे.....)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
25 Aug 2015 - 4:52 pm

दीडशे रे..........

एक शाळा होती सुंदर
तीत मुले होती शंभर
मग आणखी आले पन्नास
किती किती झाले रे?
दीडशे रे

दीडशेला भागू मी की, दीडशेने गुणू मी
भागू गुणू, भागू की गुणू
गुणू भागू, गुणू की भागू
दीडशे रे

तो सट्टे कसकसले लावे अन्‌ हरतो हो
लावे अन्‌ हरतो हो
मग किती सेशन गेले, अन्‌ पैसे पण गेले रे
पण आशेवर लढला, अन्‌ खेळतच राही रे
तो डाव खेळ-खेळला, हरला हरला आणि हरला
बिल थकले उधार झाली, उधारीत हाय ती खाल्ली
जहरासाठी पैसे नव्हते रे
दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे
दीडशे रे

बांधून ये रिक्षाला
काटेरी तारांना
पंचर कर रिक्षाची चाके रे
छोले तर ती खाते ना
आणि कुलचे पण खाते ती
आणि चावून ती अनरसे
सांबार पण गिळते ती
पोटात गुळबुळबुळते, धावून जाते गडबडते
पण बिल ते बस्स फडफडते, रिक्षाचे काय जळते
येतात जातात रुपये रे
दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे
दीडशे रे

-- स्वामी संकेतानंद

(डिस्क्लेमरः पहिले शाळाविषयक कडवे("किती किती झाले रे" वाले) माझे नाही. ते आमच्या भागात, गाणे आले तेव्हापासून, हिट आहे. कोणत्या पोराने ते बनवले होते ह्याची कल्पना नाही. उर्वरित बांधकाम माझे आहे.)

काहीच्या काही कविताविडंबन

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 4:59 pm | पगला गजोधर

ऐ आर संकेतामान !

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 5:14 pm | प्यारे१

खीक्क्क्!
म्हणून पाह्यलं. एकदम चालीत बसतंय.

बहिरुपी's picture

25 Aug 2015 - 5:15 pm | बहिरुपी

असेच म्हणतो.

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 5:19 pm | स्वामी संकेतानंद

गात गातच लिहीलं आहे न देवा!!

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 5:23 pm | स्वामी संकेतानंद

पोस्टमध्ये एक उल्लेख राहून गेला. संपादकांनो, तेवढे एक करा.

पहिले शाळाविषयक कडवे("किती किती झाले रे" वाले) माझे नाही. ते आमच्या भागात, गाणे आले तेव्हापासून, हिट आहे. कोणत्या पोराने ते बनवले होते ह्याची कल्पना नाही. उर्वरित बांधकाम माझे आहे.

प्रचेतस's picture

25 Aug 2015 - 5:41 pm | प्रचेतस

खल्लास.

पैसा's picture

25 Aug 2015 - 5:52 pm | पैसा

स्वाम्या, २५ तारीख झाली. अजून दिल्लीत असशील तर एकीकडे रिक्षा आणि छोले कुलच्यांची बिले आणि खिशात दीडशे फक्त रुपये? कसं भागणार?

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 7:15 pm | स्वामी संकेतानंद

म्हणून दिल्लीवाली गर्लफ्रेंड नक्को रे बाबा! अर्थात इतर भागातल्याही तशाच असू शकतात. आमाला कसलाच अनुभव नाही. :P

थॉर माणूस's picture

25 Aug 2015 - 5:53 pm | थॉर माणूस

अरे काय? खत्तरनाक... चालीत फिट बसलंय.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2015 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जी की म'हान रचनांएं.. =))

नाखु's picture

26 Aug 2015 - 11:00 am | नाखु

'हाण रचनांएं..

बाकी कवीता रोचक्+भेदक आहे!

श्रीरंग_जोशी's picture

25 Aug 2015 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी

लैच भारी. एकदम मीटरमध्ये आहे.

चाणक्य's picture

25 Aug 2015 - 10:41 pm | चाणक्य

भारीये हे

दमामि's picture

26 Aug 2015 - 11:13 am | दमामि

जबरदस्त!!

द-बाहुबली's picture

26 Aug 2015 - 1:20 pm | द-बाहुबली

एकदम दिलसे रे...

बोका-ए-आझम's picture

26 Aug 2015 - 7:15 pm | बोका-ए-आझम

कुलचा-छोले कुठले? नंद की हट्टीपुढे सगळे पानी कम आहेत.