पदार्पण (सिक्वल कथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 12:58 pm

एक हॉस्पिटल, बाहेर वर्दळ पण वॉर्डमधे गूढ भयाण शांतता, बाहेर नर्सची लगबग, औषधांचा कडूजहर वास, सातव्या मजल्यावरच्या स्पेशल वॉर्डमधे तो सलग वर्षभर बेडवर खिळून होता… सुरुवातीला काही विसीटर्स यायचे, फुलं बुके वैगरे उशाजवळ ठेवून जायचे, पण एक दोन महिन्यांतच ते थंडावलं. त्या रात्रीसुद्धा त्याच्या जवळचा मॉनिटर बीप बीप असं कोकलू लागलेलं, त्याच्या शरीरात कुठेतरी काहीतरी उलथापालथ होत असावी, आवाजामुळे दोन नर्स धावत आल्या. एक ड्युटीवरची सिनिअर व दुसरी नुकतीच दोन आठवड्यापूर्वी रुजू झालेली नवखी. नर्स जवळ येऊन इंजेक्शन देत म्हणाली, 'सालभरसे बेचारा कोमामे है '…….

अचानक उजवा डोळा उघडला, पिवळा झोत पडला डोळ्यावर, तो डोळा बंदही करवत नाहीये. अचानक झाला बंद.आता डावा उघडला. पुन्हा तोच झोत. कोण करतंय हे? कुठे आहे मी? डावा डोळापण बंद झाला. कुणीतरी आहेत आजूबाजूला. कुजबुजतायत काहीतरी. काय बोलतायत काही कळत नाहीये नीटसं. उभे आहेत आजूबाजूला माझ्या. माझ्याचकडे बघतायत का ? त्यांचे चेहरे नीटसे दिसत नाहीयेत. कोण आहेत ते? इथे कधी आलो मी? मला हलताही येत नाहीये. की बांधून ठेवलंय त्यांनी मला? नाही.. नक्कीच नाही.. आसपास आपले कोणीच नाही.. आपण एकटे पडलो आहोत. डोके गरगरत होते आणि त्यात तो पुन्हा हरवू लागला.. सत्य आणि असत्य, वास्तव आणि आभास, प्राप्य आणि दुष्प्राय, म्हटलं तर दोन टोकांचे दोन ध्रुव आणि म्हटलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू, पाठीला पाठ लावून येणाऱ्या. त्यांच्यामधल्या सीमेवरच्या या धूसर शापित प्रदेशात त्याची चाललेली ही आत्ताची वणवण, तरीही त्याच्या हाती काहीच लागत नव्हतं अजुन... पाच..चार.. तीन.. दोन.. एक.. शून्य..... आणि दुसर्याच क्षणाला तो मैदानावर उभा होता …. …….

आता शेवटचा चेंडू, दोनच धावा जिंकायला.... क्षेत्ररक्षणात पुन्हा त्यानुसार बदल करण्यात आले, आक्रमक क्षेत्ररक्षणचा फास अजून करकचून आवळण्याची हीच अत्यंत योग्य वेळ होती. कर्णधाराने क्षेत्ररक्षण आकसले, त्याने क्षेत्ररक्षकांना क्रीजपाशी आणले, 'त्याला' त्याने सिली मिडऑन वर उभे केले. रणजीमधे त्याने याठिकाणी कैकवेळा फलंदाजाने शॉट मारल्यानंतर अत्यंत जोरात येणाऱ्या चेंडूला थोपवलेले. हा चेंडू फार महत्वाचा होता. स्ट्राइकवरचा फलंदाज अडमतडम फटके मारण्यासाठी प्रसिद्ध होता. जर त्याचा फटका बरोबर बसला असता तर सामना त्यांच्या खिशात होता पण जर चुकला तर... आता सारा या जर-तरचा खेळ होता. बॉलर बॉलिंग मार्कवरून वेगात धाऊ लागला, तसा स्टेडीअमवरील प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. अपेक्षेप्रमाणे सुटलेला चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा वाटला. फलंदाजाने त्याच्या नेहमीच्या शैलीत दांडपट्टा फिरवला..अक्षरशा आंधळीशॉट होता तो. काही समजायच्या आतच त्या गोळ्याने 'त्याच्या' वेध घेतला होता. प्रतिक्षिप्तपणे त्याने गरकन मान वळवलेली, पण नेमका मानेच्यावर आणि दोन कानांमधल्या कवटीला तो लागला होता. घाव वर्मी बसला होता आणि तो जागच्या जागीच कोसळला होता.…….

आता त्याच्या समोर उभा होती मिट्ट अंधारी… आजही त्याला पदार्पणाच्या सामन्यातला स्वतःचा 'तोच' एक क्षण हवा आहे, त्या एकाच क्षणात तो जिंकेल, आणि मग पुन्हा पहाट होईल, त्यानंतरच त्याची अंधारकोठडीतून सुटका होईल, तोपर्यंत काळरातीशी खेळतचं राहावं लागेल त्याला, त्याच्या पदार्पणातला सामना.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

खेडूत's picture

19 Aug 2015 - 1:15 pm | खेडूत

!

सिक्वल शंभर शब्दांचाच असावा आणि मूळ कथेच्या प्रतिसादात दिला तर दोन्ही समोर रहातील असं वाटतंय . ..

पगला गजोधर's picture

19 Aug 2015 - 2:08 pm | पगला गजोधर

सिक्वल शंभर शब्दांचाच असावा

नै, असं काही कम्पल्शन नै, शंभर शब्दात लिहा किंवा लिहू. 'जिथे १०० = ९९, तिथे काहीही … '

या कथेचं प्रीक्वल चा दुवा नवीन मिपाकरांसाठी

एस's picture

19 Aug 2015 - 11:33 pm | एस

कथेचा पुढील भाग हाही शतशब्दकथा असायला हवा होता. ही कथा चांगली असली तरी एकदा शंभर शब्दांमध्ये लिहून पहा, परिणामकारकता बरीच जास्त वाढेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2015 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही कथा छान आहे पण शतशब्दकथा नाही.

या स्पर्धेच्या नियमांप्रमाणे सिक्वलसुद्धा शशक असायला हवी (संबधीत भाग पटकन घ्यानात यावा यासाठी ठळक केला आहे)...

अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील
- ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे!
- वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात.
- ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील.
- वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील.

पगला गजोधर's picture

20 Aug 2015 - 2:40 pm | पगला गजोधर

सहजच लिहिली हि कथा (काहीतरी लिहायला मेंदू शिवशिवत होता, म्हटलं वादग्रस्त धागा काढण्यापेक्षा हे बर
अवांतर: सिलेक्ट झालो तर सिक्वल शशक लिहून काढीन (अगदी वेगळी या कथेपेक्षा) लक्ष असू द्या म्हणजे झालं ;) )

नीलमोहर's picture

19 Aug 2015 - 4:58 pm | नीलमोहर

हृदयद्रावक,
अप्रतिम..

चिगो's picture

19 Aug 2015 - 5:21 pm | चिगो

जबराट कथा.. मागील वर्षभरात क्रिकेटच्या मैदानावर झालेले दुर्दैवी, अपघाती मृत्यु आठवून गेले..

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 1:52 pm | प्यारे१

+१

एक एकटा एकटाच's picture

19 Aug 2015 - 11:06 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

रातराणी's picture

20 Aug 2015 - 12:49 am | रातराणी

मस्त जमलाय सिक्वल.

मास्टरमाईन्ड's picture

20 Aug 2015 - 1:49 pm | मास्टरमाईन्ड

झकास जमलाय.

तुषार काळभोर's picture

20 Aug 2015 - 2:57 pm | तुषार काळभोर

नियमाप्रमाणे स्पर्धेला पात्र नसली तरी स्वतंत्र कथा म्हणून +१

नूतन सावंत's picture

20 Aug 2015 - 6:47 pm | नूतन सावंत

सुरेख.

बोका-ए-आझम's picture

21 Aug 2015 - 8:23 am | बोका-ए-आझम

मस्तच. पण पगकाका, जरा शंभर शब्दांत लिहून बघा. अजून effective होईल असं वाटतंय.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 4:09 pm | पगला गजोधर

अभी तो मै लेट थर्टीज् में हु सिर्फ

वरची गोष्ट १०० शब्दात लिहिणे खूपच अवघड आहे ओ सर !