बस -- शतशब्दकथा

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
29 Jul 2015 - 1:51 pm

आज क्युएचा शेवटचा दिवस. बरोबरचे सगळे अगोदरच इतर प्रोजेक्टवर गेलेले, हा एकटाच शेवटपर्यंत बसलेला. कोअर टीम मेंबर ना..
"हुश्श, हे दोन झाले की सुटलो, मग जरा क्युए सोबत बसलो के सगळे पूर्ण होईल. आज तरी ६ची बस पकडता येईल." तो मनातल्या मनात.
तेव्हढ्यात फोन वाजला. "अरे तू आज लवकर येणारेस माहितेय ना?"
"हो हो, निघतोच आता."

त्याने भरभर ते दोन बग फिक्स केले, बिल्ड करून डीप्लॉय पण केले. पटपट निघून बसमधे गाणी ऐकत बसला. बरोबर सहा वाजता ड्रायव्हरने स्टार्टर मारला. बस प्रिमायसेसमधून बाहेर पडते तोवर फोन आलाच.
"अरे बाबा निघालोय, पोचेन लवकरच".

"मनीष मी विकास बोलतोय, बिल्डमधे मेजर इश्यू मिळालाय"

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2015 - 2:06 pm | टवाळ कार्टा

अग्गाग्गा....ब्रोब्रचे असे थांबताना ब्रेच बघित्लेत

मी-सौरभ's picture

29 Jul 2015 - 2:26 pm | मी-सौरभ

आता सिक्वेल येणार का याचा...

खटपट्या's picture

29 Jul 2015 - 2:47 pm | खटपट्या

बिचारा !!

बिल्डमधे मेजर इश्यू असेल तर डीप्लॉय कसं काय झालं ?

सदस्यनाम's picture

29 Jul 2015 - 3:15 pm | सदस्यनाम

काये हे?
बग, बिल्ड, डिप्लॉय??
कथेच्या मु़ख्य संकल्पना तरी सगळ्याना कळतील अशा टाका ना प्लीज.
आम्ही नाही हो आयटीत. :(

वेल्लाभट's picture

29 Jul 2015 - 3:21 pm | वेल्लाभट

अनुभवलंय हे. बग, बिल्ड वगैरे नाही तरी बाकीचं काहीसं असंच. निघायच्या वेळी आलेला फोन, फसलेले प्लॅन्स.
शिव्या येतात तोंडात, मुठी आवळल्या जातात... पण .... पण काहीच नाही. असो.

जडभरत's picture

29 Jul 2015 - 4:47 pm | जडभरत

सहमत! शिव्या म्हणजे काय? आकाशातील देवता देखील कान झाकून घेत असतील अशा वेळेस!!!

वेल्लाभट's picture

29 Jul 2015 - 5:00 pm | वेल्लाभट

हो ना.

ब़जरबट्टू's picture

29 Jul 2015 - 3:43 pm | ब़जरबट्टू

MH - ४११०५७ काय ?

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jul 2015 - 4:28 pm | माम्लेदारचा पन्खा

ऑफीसलाच ऑनसाईट समजून तिथेच राहत चला !!

पगला गजोधर's picture

29 Jul 2015 - 5:03 pm | पगला गजोधर

ऑफीसलाच ऑनसाईट समजून तिथेच राहत चला !!

लेकिन पँकेज तो देसीही होगा नं !!
:(...

उगा काहितरीच's picture

29 Jul 2015 - 6:04 pm | उगा काहितरीच

प्याकेज तो किन्ना भी चलेगा , पर कोई लेत्याच नही . ;-)

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jul 2015 - 9:31 pm | माम्लेदारचा पन्खा

चरणकमलांचा फोटो पाठवा .......

स्रुजा's picture

29 Jul 2015 - 10:27 pm | स्रुजा

हेहे , सत्यकथा :)

बीन देअर डन दॅट :(