फार पुर्वी, किशोर वयात असतांना , कोणतीही लग्न पत्रिका पाहिली कि नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे " गोरज मुहुर्त म्हणजे नेमका किती वाजेचा मुहुर्त ? ' कधीतरी , कोणीतरी ज्ञानात भर घातली कि गो म्हणजे गाय , खेड्यापाड्यात गायी सायंकाळी शेतातून घरी येतात , त्यावेळी जी धूळ ( रज ) उडते , ती वेळ म्हणजे ' गो-रज ' मुहुर्त ! !
अलिकडे मुहुर्तावर महत्वाच्या घटना घडवून आणण्याचा प्रघात पडला आहे. विषशत: लग्न पत्रिकेत मुहुर्ताचा उल्लेख असल्याशिवाय , ती लग्न पत्रिका अपुर्णच वाटते. काहींना वाटते की लग्न पत्रिकेत लग्नाची वेळ ठरवितांना , वधू-वरांचा जन्म-दिनांक,जन्म-वेळ पाहिली जाते. यात पुन्हा एक प्रश्न निर्माण होवू शकतो कि जन्म पत्रिका सुद्ध अचुक कशी ठरविणार ?
त्याबाबत पुन्हा शंकेला जागा आहेच ! प्रत्यक्ष व्यवहारामध्ये नवर्या मुलाकडील मंडळीस ,जर मुलगी, कोणत्याही कारणाने पसंत नसली , तर सरळ व स्पष्ट्पणे नकार देण्याऐवजी, वरपिता , आडवळणाने " मुलीची जन्मपत्रिका , आमच्या गुरुजींनी तपासली , पण मुलाच्या पत्रिकेशी जुळत नाही हो " असे सांगून मोकळा होतो. अर्थातच निसर्ग नियम ' अपाय तेथे उपाय ' असल्याने येथे ' जुळणारी पत्रिका बनवून देणारे ' आहेतच की !
थोडेसे विषयांतर झाले. तेंव्हा शुभ मुहुर्त पहाणे तसेच शुभमुहुर्त पाहून सुद्धा त्याप्रमाणे न वागणे हे भारतीयांचे मुळ लक्षण आहे असे वाटते.या बाबतीत कोणी टोकले तर " चालायचचं हो , थोडा वेळ इकडे कां थोडा वेळ तिकडे ! त्याला काय हुतंय ? " असे उद्गार काढल्यावर , सांगणारा थोबाडीत मारल्यासारखा चेहरा करतो.
आपल्या पुर्वजांनी सांगून ठेवले आहे कि ' शुभस्य शीघ्रम ' -- जे ( कार्य ) शुभ वाटते आहे ते लगेच करुन टाकणे हे योग्य .उगाच मुहुर्त पहाण्याच्या भानगडीत पडू नका.
माझ्या बुद्धी व तर्कानुसार , मला जे जास्तीत जास्त योग्य वाटते त्यासाठी मी मुहुर्ताची वाट कां पहावी ? मुहुर्ताची वाट पाहून कार्य सुरु केल्यानेच ते पुर्ण होइल याची खात्री कोण व कशाच्या आधारावर देइल ? माझे तर उलट असे म्हणणे आहे कि वाइट कामालाच मुहुर्ताची वाट पहावी लागते. उदाहरणार्थ एखाद्या चोराला चोरी करावयाची असेल तर तो काळोखी अमावस्येची रात्र, उत्तर रात्री ,दीड दोन वाजेनंतर ते पहाटे चार वाजेच्या आत, घरातील सर्व लोकांची नीजानीज झालेली पाहून, पहारेकरी झोपला असेल किंवा डुलक्या देत असेल तर अशा सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी करुनच म्हणजे योग्य " मुहुर्त " पाहुनच चोरी करावयास निघणार. त्याने असा ' मुहुर्त ' जर पाहिला नाही , तर त्याचे काम फत्ते होणारच नाही. उलट अर्थाने म्हणावयाचे तर असे ही म्हणता येईल कि चोराने असा ' शुभ मुहुर्त ' पाहुनच त्याचे काम सुरु करणे योग्य !
तेव्हां सांगायचा मुद्दा असा कि ' प्रामाणिक व स्वछ हेतू असलेले कोणतेही काम करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहुर्ताची गरज नाही.' सांगोपांग व कितीही परिपुर्ण विचार केला तरी तो कोणत्या ना कोणत्या अंगाने कुठेतरी कमीच पडणार. तेव्हां " जो जो जब जब होना है , सो सो तब तब होता है " अस निसर्ग नियम लक्षात ठेवून, शुभकार्याला लागावे हे उत्तम ! " मुहुर्त शुभ शोधण्यापेक्षा, कार्य शुभ असावे , मग मुहुर्ताची वा शुभ मुहुर्ताची गरजच काय ? असे मला वाटते.
प्रतिक्रिया
18 Jul 2015 - 3:46 pm | टवाळ कार्टा
जाणकारांच्या प्रतिक्षेत :)
18 Jul 2015 - 3:46 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे. अधिक माहिती साठी
यंदा कर्तव्य आहे? जरुर वाचा.
19 Jul 2015 - 9:19 am | निलरंजन
अगदी योग्य
19 Jul 2015 - 9:56 am | एस
अगदी बरोबर.
19 Jul 2015 - 10:47 am | कंजूस
गोरज मुहुर्तवेळी रवि अष्टमस्थानी असतो ते काहींना नकोसे असते परंतु कामकरी लोकांना मात्र त्यांच्या सोयय्रांना तेव्हाच सवड सापडते आणि त्यांना गोरज मु बरा पडतो.
चोर लोक ज्योतिषाकडे जात नाहीत परंतू चोरीला निघतांना शकुन नक्कीच पाहतात.माल मिळणार का मार याची सूचक चिन्हे असतात.अभद्रसूचक घटना दिसल्यावरही कधीकधी निघावेच लागते कारण पैसे संपलेले असतात.
चर्चा करून कोणी दुसय्राचा सल्ला मानत नाही.
19 Jul 2015 - 11:07 am | सतिश गावडे
गोरज मुहूर्त म्हणजे कातरवेळ आणि अष्टम स्थान म्हणजे पश्चिम क्षितिजाचे जन्म-कुंडलीतील दर्शनीय स्थान असा काहीसा अर्थ घेता येईल का?
19 Jul 2015 - 3:54 pm | जयन्त बा शिम्पि
गोरज मुहुर्ताच्या वेळी गड्बड , गोंधळ असण्याची शक्यता १०० टक्के असते , पण कातर वेळ म्हणजे साधारणतः दुपारची ४ वाजे पासुन सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ची वेळ असावी. ज्यावेळी सगळीकडे सामसूम असते.एकट्या दुकट्या माणसाला सुद्धा भिती वाटावी अशी वेळ . जाणकारांनी अधिक माहीती लिहावी.
20 Jul 2015 - 11:20 am | सुनील
संध्याकाळी ४ ते ६ सामसूम?? कुठच्या गावात??
बाकी, कुठल्याशा गावात दुपारी १ ते ४ सामसूम असते असे म्हणतात बॉ!
19 Jul 2015 - 6:44 pm | कंजूस
चार ते सहा रवि अष्टमात आणि सहा ते आठ सप्तमात ( भार्यास्थानात ) असतो .तापदायक जाळणारा ग्रह अस्ताला जाताना बरा.
20 Jul 2015 - 12:17 am | आयुर्हित
अष्टमात रवि असलेली पत्रिका असलेली व्यक्ति आपल्या पित्याच्या घरापासून/गावापासून लांब राहते, असे आढळून येते. याचा फायदा असा की वधु लग्नानंतर पित्याच्या घरी येवून राहात नाही!
20 Jul 2015 - 11:29 am | टवाळ कार्टा
खिक्क...कैच्याकै...ज्यांच्या अष्टमात रवि नाही असे कितीतरी इंजीनिअर पुण्यातच सापडतील
मुलगी लग्नानंतर स्वतःच्या जन्मदात्यांच्या घरी जास्तवेळा येउ शकत नै हा फायदा???? आणि कोणाचा फायदा आहे यात??? यावर अनाहितांच्या* प्रतिक्रिया बघू आता
*ढिस्क्लेमर (ज्यांना लाग्ते त्यांच्यासाठी) - अनाहिता हा शब्द अनाहिता विभागाच्या मेंब्रांसाठीच वापरलेला आहे...कारण त्या certified महिला मिपाकर हैत
20 Jul 2015 - 7:06 am | कंजूस
नणंद येत नाही हे सुनेसाठी आनंद.
अष्टमात रवि येतो म्हणजे गोरज मुहुर्ताच्या काळी असे म्हणायचे होते.वधुच्या कुंडलीत नाही.
नाटक सिनेमावाल्यांचे ,करमणूक क्षेत्रात रविचे महत्त्व शून्य त्यामुळे त्यांचे मुहुर्त संध्याकाळीच.त्यांना गुरू शुक्र हवेत.