अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव

Jack_Bauer's picture
Jack_Bauer in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 12:24 am

अनेक मिपाकरांनी माझ्या पहिल्या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे मी हा दुसरा लेख लिहीत आहे - अमेरिकेत आल्यावर माझा पहिला हॉटेलचा अनुभव. मागच्या लेखात मी माझा अमेरिकेला येण्याबाबतचा अनुभव लिहीला होता.
http://www.misalpav.com/node/31795

मी न्यूयोर्कमध्ये पोहोचल्यावर मित्राकडे आलो. तो त्याच्या roommates बरोबर राहायचा पण त्याचा roommate समर vacation साठी भारतात गेला होता आणी त्याच्या जागी माझी राहायची सोय झाली. मित्राच्या घरी पोहोचल्यावर गप्पा वगैरे झाल्या. मित्राला दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या universityमध्ये on -campus जॉबसाठी जायच असल्याने त्याने रात्रीच त्याच्याकडची घराची चावी मला दिली. जवळ जवळ २३ तासाचा सलग प्रवास झाला होता त्यामुळे मी खूप दमलो होतो आणि काहीही न खाता सरळ झोपून टाकलं.

दुसर्या दिवशी थेट सकाळी ११:३० वाजता जाग आली. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. फ्रेश होऊन काहीतरी खायला म्हणून घराबाहेर पडलो. न्यूयोर्कमध्ये १-२ block चाललं कि अनेक हॉटेल्स दिसतात. माझी ही अमेरिकेत पहिलीच वेळ, त्यातून मी veg खाणारा. चालता चालता बरीच हॉटेल्स लागत होती पण आपल्याला कोणते चालेल हे काही नक्की कळत नव्हतं. न्यूयोर्कमध्ये summer सुरु होता. त्या रणरणत्या उन्हात चालून खूप तहान लागली होती. १५-२० मिनीट चालल्यावर शेवटी एके ठिकाणी veg falafel असा बोर्ड पाहीला आणी जवळ गेलो तर छान खमंग वास आला आणि मी सरळ त्या हॉटेल मध्ये घुसलो.

हॉटेल तस लहानच होतं, फ़क़्त ६-७ टेबल्स होती. तिथे एका टेबलवर जाऊन बसलो. माझ्या टेबलवर अर्धा लिटरची पाण्याची बाटली आधीपासूनच ठेवली होती. भारतात हॉटेलमध्ये गेलं की विचारतात साध पाणी की बिसलेरी? मला वाटला अमेरिकेत ही अशी पद्धत असेल की प्रत्येकाला बिसलेरीचच पाणी by default ! . मी ती सीलबंद बाटली उघडून घटाघटा पाणी प्यायलो. जवळ जवळ निम्मी बाटली संपवली. मग थोडं निवांत होऊन इकडे तिकडे पाहू लागलो तो बोर्ड दिसला - सेल्फ सर्विस ! मग मी उठून आतल्या बाजूच्या counter वर गेलो, ऑर्डर दिली. एवढ्यात प्यायलेल्या पाण्याने कामगिरी चोख बजावली आणी मी counter वरच्या माणसाला रेस्टरूम कुठे आहे ते विचारल. त्याने त्या दिशेला बोट दाखवलं आणि मी एका अंधार्या कोपऱ्यापाशी आलो. तिथे रेस्टरूमच्या दिव्याचे बटन होते ते मी खाली केले (लाईट सुरु होण्यासाठी ) आणी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण कोणीतरी आत होतं म्हणून मी तिथेच बाहेर वाट बघत थांबलो. थोड्या वेळात एक माणूस बाहेर आला आणि मला म्हटला " Did you turn the lights off when I was taking my dump?" च्यायला झाला का घोळ …. अमेरिकेत बटन वर म्हणजे लाईट चालू आणी खाली म्हणजे बंद ह्याचा आत्ता मला खुलासा झाला. lessons learned …. भारतात ह्याच्याबरोबर विरुद्ध आहे त्यामुळे माझा हा घोळ झाला. मी त्या माणसाला sorry म्हणून पटकन आत घुसलो. साधारण मिनिटभराने बाहेर आलो तेव्हा तोच माणूस मी ज्या टेबलवर बसलो होतो तिथे उभा राहून मोठ्या मोठ्याने ओरडत होता. "Who the hell drank my water ?" म्हणजे ती पाण्याची बाटली त्याची होती !!!! मग माझे बाकीच्या टेबलकडे लक्ष गेलं आणी माझ्या लक्षात आलं की बाकीच्या कोणत्याही टेबलवर बाटली नाहीये. याचाच अर्थ अमेरिकेत अशी by default बिसलेरी वगैरे द्यायची काही पद्धत नाहीये .. lessons learned again …… मला अगदी शरमल्यासारखे झाले, मी त्या माणसाकडे जाऊन पुन्हा त्याला sorry म्हटलं आणी सांगितलं की मी ते पाणी प्यायलो आणी मी त्याचे तुम्हाला पैसे देतो. तो माणूस अतिशय वैतागून मला म्हटला " why are you after me man ? Why ? " असं म्हणत तरातरा तिथून निघून गेला. इतक्यात counter वरील माणसाने order तयार आहे असं सांगितलं पण आता इतका तमाशा तिथे झाल्यावर मला आता तिथे थांबण्याची बिलकुल इच्छया होत नव्हती. मी ते पार्सल घेऊन घरी यायला निघालो आणि मनात विचार आला …. " अमेरिकेत तुझ स्वागत आहे मित्रा …. आपण कितीही शिकलेले असू पण वेगळा देश, निराळी संस्कृती आपल्याला किती काही शिकवून जातात नाही ? "

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 12:41 am | श्रीरंग_जोशी

दुसर्‍या देशात नव्याने गेल्यावर अन विशेषकरून एकट्याने फिरताना असे अनुभव येतातच.

मी नवा असताना डाइन इन रेस्तराँमध्ये गेल्यावर मित्र बाहेर फोनवर बोलत असताना अन तेथील फ्रंटडेस्कवर कुणी नसताना भारतातल्या सवयीनुसार थेट रिकाम्या टेबलावर जाऊन बसलो होतो.

तसेच पहिल्या आठवड्यातच मी मॅकडॉनल्डसमध्ये जाऊन चिकन बर्गर विदाउट चिकन मागितला तर मला बर्गरमधील खालचा व वरचा ब्रेड मिळाला ;-) .

आमच्या कंपनीचे ऑनलाइन ट्रेनिंग होते युएसए थ्रू इंडियन कल्चरल लेन्सेस. ते मी अमेरिकेत जाण्यापूर्वी घेतले होते. त्यामुळे थोडाबहुत फायदा झाला. पण ते अर्ध्या तासाचे ट्रेनिंग काय काय शिकवणार :-) .

Jack_Bauer's picture

1 Jul 2015 - 12:46 am | Jack_Bauer

इथे US च्या McDonald मध्ये जाऊन फ़क़्त fries खाऊन आलो होतो कारण veg काहीही मिळत नाही. भारतात मात्र McDonald मध्ये veg मध्ये भरपूर options आहेत

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 12:53 am | श्रीरंग_जोशी

भारतातून येतान प्रत्येक गोष्ट ठाऊक करून येणे शक्यच नसते. सुरुवातीला तुमच्या भोवताली कशी माणसं असतात यावर सुरुवातीचे अनुभव कसे येणार ते ठरते.

अमेरिकेत कुणी पहिल्यांदा येणार आहे असे कळले की मी खालील धाग्याचा दुवा पाठवतो.

मदत हवी आहे

काळा पहाड's picture

1 Jul 2015 - 11:40 am | काळा पहाड

बर्गर किंग मध्ये व्हेज ऑप्शन असतो की

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 7:55 pm | श्रीरंग_जोशी

हो पण मॅकडॉनल्ड्स जेवढ्या ठिकाणी आढळते तेवढे बर्गर किंग आढळत नाही.

तसेच भारतातल्या मॅकडॉनल्ड्सची सवय असल्यास अमेरिकेत नव्याने आलेल्या माणसाची पाऊले तिकडेच वळतात.

मी तिथे फक्त फ्राइज व स्ट्रॉबेरी मिल्कशेक घ्यायचो.

संदीप डांगे's picture

1 Jul 2015 - 12:56 am | संदीप डांगे

अरे मस्त लिवलंय जॅकबॉरभौ,

एकदम मीषटर भीन ची आटोन आली.

अतिशय छान आणि प्रामाणिक अनुभव कथन. आवडले.

उगा काहितरीच's picture

1 Jul 2015 - 1:07 am | उगा काहितरीच

सरळ झोपून टाकलं

तुम्ही नक्की कुठल्या भागातले ?
बाकी लेख आवडला, मागच्या भागापेक्षा निश्चितच चांगला झालाय. येऊद्या अजून अनुभव .

बहुतेक इचल्करनजी असाव.

कोल्हापूर

रेवती's picture

1 Jul 2015 - 6:28 am | रेवती

ओक्के.

एक एकटा एकटाच's picture

1 Jul 2015 - 7:49 am | एक एकटा एकटाच

मस्त

छान लिहिलय

भारी लिहिलंय ,। अजून अनुभव टाकत राहा

छान लिहिलंय ..लिहित राहा

सुनील's picture

1 Jul 2015 - 9:33 am | सुनील

दोन्ही लेसन्स लर्न्ड जब्राट!!

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2015 - 11:50 am | टवाळ कार्टा

मजेशीर आहे पण ते पाण्याच्या बॉटलचे मला जरा वेंधळेपणाचे वाट्ले :)

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 12:13 pm | बॅटमॅन

मस्तच!!!!!

सीरियसलि- अमेरिकेतले अनुभव जर कुणी मुपी शैलीत लिहिले तर काय मजा येईल राव. खल्लासच.

Jack_Bauer's picture

2 Jul 2015 - 11:01 pm | Jack_Bauer

मुपी शैलीत म्हणजे काय ?

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2015 - 11:08 pm | श्रीरंग_जोशी
सुबोध खरे's picture

1 Jul 2015 - 12:17 pm | सुबोध खरे

छान लिहिलंय ..लिहित राहा

मुक्त विहारि's picture

1 Jul 2015 - 12:20 pm | मुक्त विहारि

जमल्यास अजून लिहा...

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Jul 2015 - 12:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

छान!!!!

बबन ताम्बे's picture

1 Jul 2015 - 12:56 pm | बबन ताम्बे

मलाही पहील्यांदा असेच धडपडावे लागले.
पहील्याच शनिवार/ रविवार च्या सुट्टीत नायगरा फॉल्सचा प्लॅन केला.
शनिवारी सकाळी पहाटे पाचला टॅक्सीने रीव्हर साईड या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. तिथुन मला बोस्टनला जायचे होते. तिथून एका चायनिज टुर ट्राव्हलची बस पकडायची होती.

रिव्हर साईड स्टेशनवर पहाटे पाच वाजता चिट्पाखरूही नव्हते. तिकिट खिडकी बंद. स्टेशनमधे प्रवेश करण्यासाठी आडवा बार. तिकिट तीन डॉलर असे तिकिट खिडकीवर लिहीले होते पण मला कळेना आता तिकीट कुठे काढायचे आणि स्टेशनमधे प्रवेश कसा करायचा? एव्ह्ढयात मला त्या आडव्या बारच्या बाजुला एक स्लॉट दिसला. मी डोके चालवले की यात तीन डॉलरची नाणी टाकली की बहुतेक प्रवेश करता येईल आणि तिकीट पण मिळेल. मी तीन डॉलरची नाणी टाकली, पण कसचे काय. तिकीट काय आले नाही. तेव्ह्ड्यात एक अमेरिकन प्रवासी आला. त्याला मी माझी "कैफीयत" सांगीतली. तो म्हटला तुझे तीन डॉलर गेले. जेंव्हा तिकीट खिडकी बंद असते, तेंव्हा ट्रेन ड्रायव्हर कडे पैसे देऊन तिकिट घ्यायचे असते. आणि हा आडवा बार ढकलाला की प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता येतो. तिकीट विंडो बंद असताना हा बार खुला असतो.

त्याचे मी आभार मानले. तेव्ह्ढ्यात ट्रेन आली आणि मी घुसलो. ट्रेन ड्रायव्हर माझ्याकडे बघत होता आणि मी काय करावे या विचारात होतो. शेवटी मी मनाचा हिय्या केला आणि त्याला मी काय गाढवपणा केला ते सांगीतले. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. परत तो अमेरीकन प्रवासी माझ्या मदतीला आला. त्याने त्या ड्रायव्हरला सांगीतले की हा इंडीयन नवा आहे आणि त्याला ट्रेन मधे तिकेट घ्यायचे माहीत नव्हते. त्याने तीन डॉलर आधीच टाकलेत ! मी ओशाळून सिटवर जाऊन बसलो.

अमेरीकेत पहीला धडा मला मिळाला. माहीत नसेल तर स्वतःची अक्कल दुस-या देशात पाजळू नये. ओव्हर कॉन्फीडन्स बाजूला ठेवावा आणि थोडा संयम राखून प्रॉपर माणसाला विचारावे.

शि बि आय's picture

1 Jul 2015 - 4:29 pm | शि बि आय

खुप काही शिकवणारा अनुभव !! छान. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत..

मित्रहो's picture

1 Jul 2015 - 6:43 pm | मित्रहो

बाकी अमेरीकेत एकवेळ फुकटात बियर मिळेल पण पाणी फुकट मिळणे कठीण आहे. मिळाले तर ते बर्फ टाकलेले पाणी.

विवेकपटाईत's picture

1 Jul 2015 - 7:21 pm | विवेकपटाईत

मस्त मजा आली, काही शिकायला ही मिळाले, काही सांगता येत नाही केंव्हा आमच्या ही कामी येईल.

अविनाश पांढरकर's picture

2 Jul 2015 - 5:06 pm | अविनाश पांढरकर

काही सांगता येत नाही केंव्हा आमच्या ही कामी येईल

जुइ's picture

1 Jul 2015 - 8:29 pm | जुइ

चांगले लिहिले आहे!

संदीप चित्रे's picture

1 Jul 2015 - 8:45 pm | संदीप चित्रे

वेलकम टू यू एस ऑफ ए!

सविता००१'s picture

1 Jul 2015 - 8:52 pm | सविता००१

मस्त

पहिल्या भागापेक्षा यातलं लिखाण उजवं आहे. पहिल्यांदा लिहीताना आम्हीसुद्धा काही विशेष दिवे लावले नव्हते. शुद्धलेखन एकदा डोळ्याखालून घालत चला. बाकी बर्‍यापैकी चाल्लंय.

टवाळ कार्टा's picture

2 Jul 2015 - 5:36 pm | टवाळ कार्टा

फक्त "आम्ही वयाच्या मानाने बरे लिहिलेले" असे लिहायचे र्हायले कै? ;)

तुझा मिपावरचा सगळ्यात पहिला लेख काढ आणि अगदी कालपरवा लिहीलेला काढ. alt+tab करुन दोन्ही वाच. उत्तर मिळतं का बघ!

ट्रेड मार्क's picture

2 Jul 2015 - 2:33 am | ट्रेड मार्क

१. McDonald मध्ये egg on the roll मध्ये beef चा slice घालून दिला होता. खायच्याआधी आत काय आहे हे बघायची सवय (अमेरिकेत आल्यापासून) असल्याने वाचलो.

२. अमेरिकेत नवीन असताना माझ्या एका शुद्ध शाकाहारी मित्राने veg burger आहे का असे विचारल्यावर त्याला एका deli store मध्ये Tuna Sandwich दिलं. तो पण लगेच जरा वेगळं काहीतरी खायला मिळतंय म्हणून घेत होता. आणि मी आश्चर्यानी बघतोय त्याच्याकडे की हा मासे कसे काय खायला लागला? वेळीच सावध केल्याने वाचला.

३. ठराविक वारी उपास करणारा एक मानव…. उपासाचे पदार्थ मिळत नाहीत म्हणून पिझ्झा खायचा आणि तो पण pepperoni. त्याला वाटायचं कि ते tomato slices आहेत त्यामुळे बरेच महिने त्यानी उपास pepperoni पिझ्झा वर केले.

बाकी बरेच अनुभव आणि फजितीचे प्रसंग आहेत. सवडीनी लिहीन इथेच प्रतिसादात किवा नवीन धाग्यवर.

स्रुजा's picture

2 Jul 2015 - 3:03 am | स्रुजा

हाहा छान लिहिलंय.

मी पहिल्या २-३ वेळा एक्टीच कामासाठी आले होते त्यामुळे बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा खा ण्यापिण्याचं सामान भरपुर आणलं होतं. काही मिळालं नाही खाण्याजोगं तर खिचडी बरी वगैरे सुटसुटीत हिशोब. इतर बर्‍याच गोष्टी माहिती असल्या तरी काही गोष्टीत हमखास गफलत होतेच.
एकदा चिली सूप ऑर्डर केलं होतं हिवाळ्यात. मला वाटलं चिली म्हणजे मिरची घालुन केलं असेल सूप.तसं ही इथे तिखट मीठ घालत च नाहीत पदार्थात अशी माझी सुरुवातीला यायचे तेंव्हा समजुत झाली होती. त्यामुळे मिरची घालुन सूप म्हणजे दिवाळीच की. चिकन तो पर्यंत खायला लागले होते त्यामुळे ब्रॉथ घालुन केलेल्या सूप चं वावडं नव्हतं. बिंधास मागवलं, कलीग मला म्हणे अरे वा, तू बीफ पण खातेस? म्हणलं नाही ब्वा ! तर म्हणे अगं चिली म्हणजे ग्राऊंड बीफ मध्ये चिली पावडर घालुन सूप. गेले पैसे वाया ! मग तिने जरा ज्ञान दिलं चिली मध्ये नेहेमी बीफ च असतं, चीज बर्गर मध्ये नुसतं चीज नस्तं, बीफ पॅटी वर चीज घालतात म्हणुन चीज बर्गर वगैरे. पेपरोनी पिझा मध्ये पेप्पर (मिरी) किंवा बेल पेपर ( आपली सिमला मिरची) दोन्ही नसतात. पोर्क ला पेपरोनी म्हणतात वगैरे गोष्टींचा शोध त्या दिवशी लागला. ज्याला जे म्हणतात त्या नावाने पदार्थ लिहायला काय होतं कोण जाणे. तसं ही ज्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत ते पदार्थ ऑर्डर करायचे नाहीत अशी मी एक सावधानता पहिल्यांदा आले तेंव्हापासुन बाळगली होती. भले सकाळ संध्याकाळ घरची मुगाची खिचडी खायची वेळ आली तरी बेहत्तर.

या चिलीच्या किस्स्यानंतर नवर्‍याला फोन वर सांगत होते की कशी मी थोडक्यात वाचले तर तो मला म्हणे अगं तिथल्या गायींच्या पोटात नसतात देव. सगळे ३३ कोटी भारतीय गायींच्याच पोटात मावलेत. त्याला नुसतेच हात जोडले मी ;)

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2015 - 3:19 am | श्रीरंग_जोशी

अनुभवकथन आवडले.

गेल्या वर्षी मी, माझी बायको, सासरेबुवा अन १० वर्षांचा भाचा असे पिझ्झा खायला गेलो होतो. पंच पिझ्झा नावाचे चेन रेस्तराँ होते. भाच्याने पेपेरोनी पिझ्झा मागवला अन आम्ही तिघांनी व्हेज पिझ्झा. सर्वांचे खाउन झाले अस भाच्याचा बराच शिल्लक होता.

सासरेबुवांनी त्याच्या प्लेटमधून एक स्लाइस उचलली. ते खाणार तेवढ्यात आम्ही त्यांना टोकले की ते चक्क नॉनव्हेज खात आहेत. ते म्हणाले यावर तर टोमॅटोच्या स्लाइस घातल्या आहेत ;-) .

माझ्या अगोदर अमेरिकेत शिकण्यासाठी आलेल्या मावसबहिणीचे तत्वज्ञान एकदम सोपे आहे. जोवर आपण जाणूनबुजून मांसाहारी पदार्थ ऑर्डर करून खात नाही तोवर आपण शाकाहारी. नाही तर अनावधानाने खाऊन तर तांत्रिकदृष्ट्या मांसाहार कधीच केलेला असतो ;-) .

फ्लेवर्ड योगर्टमध्ये सुद्धा जिलेटीन असते.

जोवर आपण जाणूनबुजून मांसाहारी पदार्थ ऑर्डर करून खात नाही तोवर आपण शाकाहारी.

हाहाहा. हे बेस्ट आहे.

फ्लेवर्ड योगर्ट चं आज च कळलं. अवघड आहे. फार खोलात न शिरता दही उपासाला पण चालतं वगैरे स्वतःचं समाधान करुन खाणे इष्ट. ;) तसं आमच्याकदे दही नावाचंच एक दही मिळतं, त्यात जिलेटीन वगैरे नसतं हे मी जस्ट कन्फर्म केलं.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2015 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी

प्रत्येक फ्लेवर्ड योगर्टमध्ये जिलेटीन नसतं. फक्त इनग्रेडियंट्स वाचून खात्री करून घ्यावी कुठलेही पूर्वी न खाल्लेले प्रथम खाण्यापूर्वी. मी फ्लेवर्ड योगर्ट हापिसात लंच करताना खात असतो बरेचदा.

बाकी भारतीय मांसाहारी मंडळीही फसतात. त्याला ते चिकन समजतात ते जेनेटिकली मॉडिफाइड प्राण्याचे मांस असते अशी ऐकीव माहिती आहे.

चौकटराजा's picture

2 Jul 2015 - 4:03 pm | चौकटराजा

असे अनुभव मिपावर वरचेवर लिहिले जावेत.काहीतून आपल्या देशाबद्द्ल घ्रुणा वाटली तरी काहीतून आपण एका मस्त देशात रहातो हे समजून येइल.

भुमन्यु's picture

2 Jul 2015 - 5:51 pm | भुमन्यु

अगदी सहमत

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

2 Jul 2015 - 10:07 pm | अरवीन्द नरहर जोशि.

सहमत आहे.

हुप्प्या's picture

3 Jul 2015 - 7:58 am | हुप्प्या

एक मुलगा वर्षभरासाठी सिंगापूर की कुठतरी गेला होता. ऑफिस संपल्यावर गाडीने (ट्रेन) घरी यायचा. वाटेत एक मॅकडॉनल्ड लागायचे. तिथे साहेब चीज बर्गर खाऊ लागले. साधारण सहा महिने रोज ऑफिसमधून येताना चीज बर्गरचा रतीब सुरु होता. एक दिवस एक जाणकार मित्र बरोबर होता त्याने त्याचे खाणे पाहून विचारले तू नॉन व्हेज खातोस? कधीपासून? हा चक्रावला. नॉन व्हेज छे, हा तर चीज बर्गर आहे. नुसते चीज, नॉन व्हेज कुठे आहे? मित्राने डोक्यावर हात मारून घेतला. "अरे बाबा ती पॅटी आहे ती बीफची आहे!" तेव्हा साहेबांना उलगडा झाला. पण सहा महिन्याच्या पोषक आहारामुळे किडकिडीत असणारा तो मनुष्य चांगलाच गुटगुटीत झाला होता! घरचे लोक खूश झाले. पण ही गोष्ट त्याने अनेक दिवस गुपित ठेवली होती.

हुप्प्या's picture

3 Jul 2015 - 8:02 am | हुप्प्या

एक नवखा मुलगा भारतातून आला. बर्गर किंग, म्याक, टॅको बेल अशा फास्ट फूडमधे जेवायचा. पण जेवण झाले की त्या ट्रेसकट उरले सुरले तो त्या कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यायचा! अनेक दिवसांनी कुणीतरी ते पाहून त्याला समजावले की बाबा रे, तो ट्रे फेकायचा नसतो. पण तोवर तिथल्या कर्मचार्‍यांचे शिव्याशाप ऐकावे लागले असणार ह्यात शंकाच नाही!

नूतन सावंत's picture

3 Jul 2015 - 10:58 am | नूतन सावंत

छान लिहिताय.पुभाप्र.