सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ८- हाँ यही रस्ता है तेरा.. तुने अब जाना है.. (अंतिम)

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
29 Jun 2015 - 1:10 am

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल आणि गोंपा
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ७- जुले लदाख़!!

सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...

लदाख़मधून निघताना ह्या प्रवासासंदर्भात खूप आठवणी मनामध्ये येत आहेत. फक्त पंधरा दिवस असूनही ह्या प्रवासाने खूप काही दिलं. खूप काही बघायला मिळालं. लोकांसोबत भेटी गाठी झाल्या. स्वत:लाही काही प्रमाणात भेटणं झालं. घरून निघाल्यापासून परतीच्या प्रवासात सतत असे अनुभव येत राहिले. स्टेशनवर सायकल पार्सल करताना तिथे काम करणा-या मुलांनी हेलमेटसोबत मला पाहून म्हंटलं होतं की, तू तर क्रिशसारखा दिसतो आहेस! तिथपासून परत येईपर्यंत असे वेगळे अनुभव येत राहिले.

जेव्हा मी लदाख़ला जायला निघत होतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रियांचं थोडं आश्चर्य वाटलं. लोक अशी‌ प्रतिक्रिया देत होते जसं मी युद्धावर जातो आहे. हळु हळु लक्षात आलं की, ह्याचं कारण कदाचित हे असावं की, आपण लोक आपल्या जीवनामध्ये काहीही थोडं वेगळं करणं जवळजवळ विसरून गेलो आहोत. त्यामुळे जेव्हा कोणी थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो; तेव्हा आपण त्याला चूक ठरवतो किंवा मग त्याउलट त्यावर टोकाची प्रतिक्रिया देतो. आणि आपल्यामध्ये असलेल्या आपल्या देशाबद्दलच्या अज्ञानाविषयी काय सांगावं? अशा प्रतिक्रिया एका मर्यादेपर्यंत स्वाभाविक आहेत; पण पुढे त्यातून आपली संकुचित विचारसरणीच दिसते. अर्थात् तरीही लोकांनी खूप उत्साह वाढवला. आणि अशा प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या.

ह्या संपूर्ण प्रवासात अशी परिस्थिती निर्माण झाली; ज्यामध्ये सामान्यत: न होणा-या; न दिसणा-या घटना घडल्या. सैनिकांसोबत राहणं; लदाख़ी घरामध्ये मुक्काम करणं; लोकांना खोलवर जाऊन भेटणं... सायकलिंग खरोखर अद्भुत आहे. सगळ्या लोकांपर्यंत सायकलिंग पोहचतं. त्याला विझिबिलिटी चांगली मिळते. त्यामुळे काही‌ लोकांना विचार करण्याची प्रेरणाही मिळते. त्यामुळे एका प्रकारे त्यांच्या मनामध्ये हळु हळु स्थान मिळतं. त्यामुळेच फक्त लोकांना भेटणं आणि बोलणंच झालं नाही; तर त्यांचं जीवन जवळून बघताही आलं. सायकलिंगमध्ये अप्रत्यक्ष प्रकारे पर्यावरण; फिटनेस आणि देशाच्या एकात्मतेचा संदेशही दिला जातो. जे कोणी लदख़मध्ये सायकल चालवताना बहायचे; त्यांना स्वाभाविकच प्रश्न पड़ायचा की, हा इथे कसा काय सायकल चालवतो आहे! ह्या संदर्भात सायकलीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. लदाख़मध्येच दहा किलोमीटर अंतरामध्ये सुमारे शंभर वाहनं तरी सायकलीला बघत असणार आणि त्यात बसलेले चारशे- पाचशे प्रवासीसुद्धा. नक्कीच हा संदेश त्यांच्यापर्यंत अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष प्रकारे पोहचत असणार. इतक्या सैनिकांना केलेले सॅल्युट आणि उत्तरात मिळालेले सॅल्युट!

असे अनेक विशेष अनुभव आले. जम्मूवरून श्रीनगरला पोहचल्यानंतर लगेचच करगिलची जीप हेतली. त्यावेळी श्रीनगरच्या काही ड्रायव्हर्सनी विचारलं, एक दिवस श्रीनगरमध्ये थांबून जा; इथेही फिर. करैलच्या जीपमध्ये करगिलचा एक निवृत्त पोलिस होता. करगिलचे लोक कश्मिरींवर किती नाराज आहेत, हे कळालं. करगिल जिल्हा मुस्लीम बहुल तर आहे; पण येतो लदाख़ प्रदेशामध्येच. कश्मीरचे लोक लदाख़चं खूप शोषण करतात. अनेक वेळेस हे बघायला मिळालं. करगिलपासून लेहपर्यंत रस्त्यावर हाताने, खुणेने किंवा थांबून प्रोत्साहन देणारी कश्मीरची‌ वाहनं फार थोडी होती. कश्मीर प्रॉपर (जम्मू आणि लदाख़ क्षेत्र सोडून) मधले लोक दुस-यांना स्वत:पेक्षा थोडं वेगळं ठेवतात.

लामायुरूमध्ये अनेकांनी माझ्यासोबता सेल्फी घेतलीच; पण एक जण वेगळेच भेटले. हॉटेलमध्ये चहा पिताना गप्पा झाल्या. सायकल बघून त्यांनी‌ चौकशी केली. त्यांनी सांगितलं की, ते नेहमी लामायुरूला येत असतात आणि त्यांना वाटतं की, त्यांनी पूर्वीसुद्धा अनेकदा लामायुरू बघितलं आहे (बहुतेक पूर्वजन्मी). आता ते लामायुरूमध्ये ध्यान करत आहेत. मी त्यांच्या ध्यानाला शुभेच्छा दिल्या. लदाख़मध्ये ब-याच जणांना असा अनुभव आहे. प्रोद्युतजींनीसुद्धा नंतर सांगितलं होतं की, काही जागी गेल्यावर त्यांना जाणवलं होतं की, ही जागा तर पूर्वीच बघितलेली आहे. मलासुद्धा लदाख़मध्ये येण्याची इतकी तीव्र इच्छा का झाली? हिमालयाचं इतकं गहन संमोहन का आहे?

तयारी करताना जेव्हा उच्च पर्वतीय प्रदेशात श्वास घेण्याविषयी विचार करत होतो; तेव्हा काही बाबी स्पष्ट झाल्या. एक तर उच्च पर्वतीय क्षेत्रामध्ये दीर्घ श्वसनच सामान्य श्वसन आहे. हवेची कमतरता असल्यामुळे आपोआप दीर्घ श्वासच घेतला जातो. त्यामुळे उंच पर्वतांवर राहणारे सर्व लोक स्वाभाविक प्रकारे दीर्घ श्वसनच करतात. आणि दीर्घ श्वसन हा ध्यानाचा पाया असतो. दूसरी गोष्ट ही‌ समजली की, लदाख़ असेल; उत्तराखंड- हिमाचलचे काही भाग असतील किंवा तिबेट- मानस सरोवर असेल; तिथे आपल्याला जे नजारे दिसतात; त्यांमध्ये एक गोष्ट विशेष आहे. संपूर्ण निळं आकाश आणि निळे सरोवर! आणि अत्यंत विस्तृत असा अजस्र नजारा. ध्यानामधील तज्ज्ञ म्हणातात की, ध्यानात मेंदूतील लहरींचा रंग निळा असतो. निळा रंग एका अर्थाने ध्यानाचा सूचक आहे. त्यामुळे असं तर नसेल की, ह्या उच्च पर्वतीय प्रदेशामध्ये नैसर्गिक प्रकारे ध्यान होण्यास मदत मिळत असेल? दीर्घ श्वसन तर असतंच. तिसरी गोष्ट- अत्यंत विस्तृत व अजस्र नजा-यामुळे अहंकार गळून पडतो. सर्वत्र उंच पसरलेले पर्वत आणि एखाद्या मुंगीसारखे आपण! अहंकार खाली येतो. ह्या तीनही गोष्टींना मिळून वाटलं की, नक्की उच्च पर्वतीय प्रदेश आणि ध्यान प्रक्रिया ह्यामध्ये काही संबंध असला पाहिजे. आणि तसंही हिमालय अगणित योगी आणि ध्यानी लोकांची भूमी आहे. एका अर्थाने ध्यान ऊर्जेचं एनर्जी फिल्ड आहे.

..ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता असं वाटतं की, बहुतेक आपण उत्तुंग पर्वतांचा जो संबंध पुण्यासोबत जोडतो; तो पुण्याऐवजी ध्यानाशी निगडीत असला पाहिजे. कारण अशा जागी गेल्यावर आपोआप ध्यान होण्यास मदत मिळत असणार. म्हणूनच कदाचित तिबेट जगातली अशी एकमेव संस्कृती राहिली; ज्या संस्कृतीने स्वत:ला ध्यानामध्ये खोलवर कसं जावं, ह्याच एका विषयाला वाहून घेतलेलं होतं. लदाख़ तिबेटचाच भाऊ आहे. मागच्या वेळेप्रमाणे ह्यावेळीही अनुभव आला की, नजारा इतका अद्भुत असतो की, आपण खरोखर त्यात 'हरवून जातो.' स्वत:चं वेगळं अस्तित्व वाटेनासं होतं; पृथकता कमी होताना दिसते. कर्ता गळून पडतो; साक्षीभाव वाढतो. जर इतका विराट पर्वत समोर असेल; तर 'करण्यायोग्य' काही उरतच नाही; फक्त 'बघण्यायोग्य' राहतं. त्यामुळेच कदाचित आपल्याकडे प्रथा आहे की, जेव्हा कोणी चारधाम यात्रा करून यायचा, तेव्हा सर्व गाव त्याला भेटायला जायचं. ध्यान ऊर्जा वाटून घेण्यासाठीच हे असावं. असो.

..ह्या प्रवासामध्ये सर्व सायकलिस्ट मित्रांचाही मोलाचा वाटा आहे. नीरज जाटजींना तर हा अनुभव समर्पित आहे. त्यांच्याशिवाय लदाख़मध्ये सायकलिंग करणं शक्यच नव्हतं. किंबहुना त्यांच्यामुळेच सायकल नव्याने घेतली. त्याशिवाय परभणीचा सायकल ग्रूप आणि इंटरनेटवर अनुभव शेअर करणा-या सायकलिस्टचीही भुमिका महत्त्वाची होती. आजची पिढी खूप नशीबवान आहे. तिला सर्व माहिती उपलब्ध आहे; जे पूर्वी कधीच झालं नव्हतं. आज सर्व क्षेत्रांबद्दल आणि सर्व विषयांबद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे की, कोणी जर पुढे जाऊ इच्छित असेल तर थांबण्याची काहीच गरज नाही. त्याचाही‌ खूप फायदा झाला. जर ही माहिती नसती, तर अशा प्रवासाचा विचारही करू शकलो नसतो. अनेक विदेशी आणि भारतीय सायकलिस्टनीसुद्धा लदाख़मध्ये सोलो सायकलिंग केलेलं आहे. सचिन गांवकरसारखे सायकलिस्ट एखाद्या सामाजिक विषयाचं उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण देशाची परिक्रमा करतात. हे सगळे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत.

सायकलनी संपूर्ण प्रवासात मोठी साथ दिली. ट्रेनमध्ये पार्सल करताना तिच्यावर बराच अन्याय झाला. कसंही तिला जावं लागलं. जम्मूनंतर जीपच्या टपावर बसून जावं लागलं. पण सायकलीने शंभर टक्के सहकार्य केलं. खरं पाहिलं तर हिमालयात सायकलिंग करण्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत. एक तर थंड हवेमुळे टायर गरम होऊन फुटण्याची‌शक्यता नाही. गती कमी असते आणि रस्त्यावर ओलावा असल्यामुळे पंक्चर होण्याची शक्यताही थोडी कमी असते. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे संपूर्ण प्रवासात प्रत्येक क्षण नैसर्गिक एसी लावलेला होता! मी जे डोंगर चढलो; तेसुद्धा एका अर्थाने आरामात चढलो. नमिकेला आणि फोतुला मी रमत गमत चालत चालत गेलो. अगदी आरामात. नंतर उतार तर फुकटच होता! एकूण पाहिलं तर पायी पायी रमत गमत जाणे; एसीमध्ये सायकल चालवणे आणि नंतर फ्रीमध्ये उतरणे! आणि लोक जे कौतुक करतील ते म्हणजे सोन्याहून पिवळं! मजाच मजा! पण हे सुंदर स्वप्न खर्दुंगलासारख्या रस्त्यांवर भंगलं!!

१० जून! लेहवरून सरळ जम्मूला काही जीप जातात. लेहमधून संध्याकाळी पाच- सहा वाजता निघून दुस-या दिवशी सकाळी श्रीनगर आणि न थांबता रात्री‌ जम्मूला पोहचवतात. सव्वीस- सत्तावीस तासांचा हा नॉनस्टॉप प्रवासही एखाद्या ट्रेकसारखा असतो. सरळ जम्मूपर्यंत जाणारी जीप मिळाल्यामुळे श्रीनगरमध्ये सायकल उतरवण्याचं आणि वर बांधण्याचा प्रश्नच नाही. सायकलीने पूर्ण सहकार्य केलं; पण सायकल घरापासून करगिलपर्यंत नेताना असंख्य अडचणी आल्या. ट्रेनमध्ये सायकल पार्सल करणं; मग ती उतरवून घेणं; जर उतरवली नाही; तर दुस-या स्टेशनवरून परत घेणं; बसवर ठेवणं अशा कित्येक अडचणी होत्या. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी काही ना काही सेटिंग आणि फिल्डिंग लावून 'ओळख' काढावी लागली. त्याचा वेगळा ताप झाला. तेव्हा कुठे सायकल करगिलला नेता आली. त्याचीच काळजी जास्त होती. अशा परिस्थितीत विदेशी सायकलिस्ट आणि फिरणा-यांचं त्रिवार कौतुक वाटतं. एक तर त्यांना इथे असंख्य कल्चरल शॉक्स झेलावे लाअतात. आपल्या देशात कोणत्याच गोष्टीची नेमकी बिनचुक माहिती कुठेच मिळत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोठा उपद्व्याप करावा लागतो. अशा स्थितीमध्ये हे लोक इतके मोठे प्रवास कसे करत असतील! दुर्गम भागांमध्ये दीर्घ काळ कसे फिरत असतील! त्यांचं चलन आपल्या चलनाहून साठपट सक्षम आहे; मान्य; पण तरीही आपल्या सिस्टीममध्ये येऊन इतकं काही करून दाखवणं खरोखर खूप आश्चर्यजनक आहे.

ह्या प्रवासात अनेक बिकट प्रसंग आले. लेहमधून निघताना प्रचंड वाईट वाटलं. खूप दु:ख झालं. इतकं वाईट तर घरून निघतानाही वाटलं नव्हतं. लेहचा निरोप घेणं हा ह्या प्रवासातला दुसरा सर्वांत कठिण क्षण होता. सर्वाधिक कठिण प्रसंग कोणता असेल? रात्री सायकल चालवणं, पावसात चालवणं की चढावावर कसंबसं स्वत:ला पुढे ओढत नेणं? नाही. सर्वाधिक कठिण प्रसंग आठ महिन्यांच्या मुलीचा निरोप घेण्याचा क्षण होता. खरोखर...

लेह ते जम्मूपर्यंतचा प्रवास चांगला झाला. रात्री दोनवाजता द्रासमध्ये पोहचल्यावर तीन तास तिथे थांबलो. पहाटेचा प्रकाश आल्यानंतरच पुढे झोजिलासाठी वाहनं सोडली जातात. झोजिलावर प्रचंड बर्फ आहे. काय रस्ता आहे हा! तिथे सायकलिंग केलं असतं तर खरी मजा आली असती... एक गोष्ट खूप चांगली आहे की, ही जीप श्रीनगरमध्ये थांबणार नाही. श्रीनगरमध्ये उतरणारी सवारी नाही आहे. प्रत्येकाला श्रीनगर शक्यतो टाळायचं आहे आणि पर्याय नसल्यामुळे श्रीनगरमधून जावं लागत आहे. श्रीनगरमधले पोलिस लेहच्या वाहनांकडून पैसे उकळतात. जम्मू क्षेत्राच्या आणि लदाख़च्या वाहनांचे नंबर पाहून त्यांना अडवतात व पैसे उकळतात. करगिलच्या गाड्यांना सोडून देतात. श्रीनगरमध्ये प्रोटेस्ट/ बंद नाही चालू आहे. पोलिसांच्या तावडीतून जीप लवकरच सुटली. ड्रायव्हर लदाख़ी आहे. त्याची क्षमता जोरदार आहे. आता श्रीनगर- जम्मू रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागायला नको. नाही तर कितीही वेळ थांबावं लागू शकेल. पण नशीबाने बनिहाल व्यतिरिक्त कुठे ट्रॅफिक लागला नाही. रामबनमध्ये चिनाब नदी दिसली. हिमाचलमध्ये उगम पावून किश्तवाडमार्गे ती इथे येते. अजूनही तिचं रूप पहाडी नदीचंच आहे. आपण जसे आपल्या मूळ उगमाकडे जातो किंवा त्याच्या जवळ पोहचतो; जीवन धारा आपोआप शुद्ध होते. रात्री उशीरा जम्मूला पोहचलो. एक रात्र थांबून उद्या अमृतसरला जाईन. तिथून ट्रेनचं बूकिंग केलं आहे.

नंतर ट्रेनच्या प्रवासातही लेहवरून परत जाणारे प्रवासी भेटले! परत कौतुक. ते वयस्कर सरदारजी होते. त्यांच्यासोबत गप्पा रंगल्या. 'इक ओंकार सत्नाम कर्ता पूरख निर्मोह निर्बैर...' ओळीचा अर्थ त्यांनी सांगितला. नांदेडचे हे सरदार संत नामदेवांच्या वाणीने खूप प्रभावित झालेले होते. गप्पांच्या ओघात जम्मूमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रोटेस्टचा विषय निघाला. त्यांनी सांगितलं की, हे सर्व शिवसेनेने केलं‌होतं. जम्मू- कश्मीरमध्ये शिवसेनेला आपली उपस्थिती दाखवायची आहे; म्हणून त्यांनी गुरुद्वा-यामध्ये लावलेले पोस्टर्स काढले. तिथेच प्रोटेस्ट सुरू झालं. त्यांनी नंतर बरेच अनुभव सांगितले. ते म्हणाले की, आज कश्मीरमध्ये दोन लाख शीख राहतात. आणि ते स्वत:च्या बळावर तिथे राहात आहेत. छत्तीसिंहपूरासारख्या गावांमध्ये अतिरेक्यांनी छत्तीस सरदारांना ठार मारलं होतं; पण तरीही सरदार तिथे भक्कम उभे राहिले. आज श्रीनगर शहरातसुद्धा पन्नास हजार सरदार राहात आहेत आणि तेही निर्भयपणे. त्यांचं म्हणणं होतं की, कश्मिरी हिंदूंनी कश्मीरमधून मायग्रेशन करण्याऐवजी तिथेच थांबायला हवं होतं. अत्याचाराला शौर्याने उत्तर द्यायला हवं होतं. सरदार हेच करत आले आहेत. पण ज्यावर ही वेळ आली; त्याच्या वेदना तोच जाणो.

लदाख़ प्रवासातून काय मिळालं? ह्या प्रवासाचं कन्क्लुजन काय आहे? व्यावहारिक दृष्टीने बघितलं तर काही मिळालं नाही. उलट नऊ हजार खर्चच आला. पण थोडं वरच्या पातळीवर बघितलं तर अनेक गोष्टी मिळाल्या ज्या अनमोल होत्या. सर्व नजारे; अविस्मरणीय प्रसंग; आयुष्यभराच्या आठवणी; लोकांना भेटणं आणि स्वत:ला भेटण्याचा प्रयत्न! शेवटी इतकंच म्हणेन की, एक विश्वास मिळाला की, हाँ, यही रस्ता तेरा है| ह्या रस्त्याने तुला पुढे जाता येऊ शकतं. पुढे एखाद्या प्रवासामध्ये ह्याचा पुढचा पडाव येईल. तोपर्यंत मध्यंतर झालं आहे. शेवटी लदाख़ प्रवासाचं सार हेच आहे- “अभी अभी हुआ यकीं... जो आग हैं मुझमें‌ कहीं.. हुई सुबह... मै जल गया... सूरज को मै निगल गया...”

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

साईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

साईकिल पर जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

साईकिल पर जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल और गोंपा

साईकिल पर जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा
साईकिल पर जुले लदाख़ भाग ७- जुले लदाख़!!

साईकिल पर जुले लदाख़ भाग ८- हाँ यही रस्ता है तेरा.. तुने अब जाना है.. (अन्तिम)

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

29 Jun 2015 - 8:15 am | उगा काहितरीच

Hats off! केवळ इतकेच म्हणेल...

अमृत's picture

29 Jun 2015 - 9:24 am | अमृत

__/\__
__/\__ अतिशय प्रेरणादायी.

यशोधरा's picture

29 Jun 2015 - 9:35 am | यशोधरा

सगळ्यात सुंदर भाग!

लॉरी टांगटूंगकर's picture

29 Jun 2015 - 12:00 pm | लॉरी टांगटूंगकर

+१

मधुरा देशपांडे's picture

29 Jun 2015 - 2:01 pm | मधुरा देशपांडे

+२

पाटील हो's picture

30 Jun 2015 - 1:28 pm | पाटील हो

+३

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jun 2015 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा

+३

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jun 2015 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा

+३

एस's picture

29 Jun 2015 - 10:13 am | एस

पोचल्याची पोच.

मित्रहो's picture

29 Jun 2015 - 10:51 am | मित्रहो

लेखमालिकेची सुंदर सांगता. सारेच लेख खूप आवडले आणि आपल्या अनुभवातून बरेच काही शिकायला मिळाले.

आपण लोक आपल्या जीवनामध्ये काहीही थोडं वेगळं करणं जवळजवळ विसरून गेलो आहोत.

100% सहमत, निदान मी तरी.

क्रेझी's picture

29 Jun 2015 - 10:58 am | क्रेझी

अचाट! खुप सुंदर आहे ही लेखमाला..तुम्ही नक्कीच पुढचा प्रवास लवकर आखाल अशी आशा आणि त्यासाठी सदिच्छा :)

झकासराव's picture

29 Jun 2015 - 11:48 am | झकासराव

अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बोका-ए-आझम's picture

29 Jun 2015 - 11:52 am | बोका-ए-आझम

मी आधी दिलेलीच प्रतिक्रिया परत देतो - तुसी ग्रेट हो.नमस्कार कुबूल करो! __/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2015 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

आपण लोक आपल्या जीवनामध्ये काहीही थोडं वेगळं करणं जवळजवळ विसरून गेलो आहोत.

एका भन्नाट प्रवासाच्या वाचकाला बरोबर ओढून घेऊन जाणार्‍या प्रवाही वर्णनाचा हा शेवटचा भागही तेवढाच हृद्य मनोगताने सजलेला आहे. हा अनुभव आमच्या बरोबर वाटून घेण्यासाठी धन्यवाद !

अ़जून जरूर लिहा !

अविनाश पांढरकर's picture

29 Jun 2015 - 12:15 pm | अविनाश पांढरकर

लेखमालिकेची सुंदर सांगता. सारेच लेख खूप आवडले

आपण लोक आपल्या जीवनामध्ये काहीही थोडं वेगळं करणं जवळजवळ विसरून गेलो आहोत.

100% सहमत!!

जगप्रवासी's picture

29 Jun 2015 - 4:49 pm | जगप्रवासी

अप्रतिम लेख आणि खूप महत्वाचं म्हणजे

स्वत:लाही काही प्रमाणात भेटणं झालं.

मोहनराव's picture

29 Jun 2015 - 5:14 pm | मोहनराव

हा सर्व प्रवास आम्ही तुमच्या बरोबर एंजॉय केला. तुमचे विचार कळले.
तुम्ही येथील सगळ्यांना एक प्रकारची प्रेरणा दिलीत. शेवटचा लेख तर केवळ अप्रतीम!!

आपण लोक आपल्या जीवनामध्ये काहीही थोडं वेगळं करणं जवळजवळ विसरून गेलो आहोत.

मान्य!
अप्रतिम लेखमालेबद्दल दंडवत स्विकारा ___/\___

वेल्लाभट's picture

29 Jun 2015 - 6:31 pm | वेल्लाभट

अत्तिशय अप्रतिम !
अत्तिशय अप्रतिम !

राघवेंद्र's picture

29 Jun 2015 - 6:39 pm | राघवेंद्र

अतिशय सुंदर लेखमाला. सगळे भाग आवडले आणि शेवटचा भाग अप्रतिमच !!!!

पु. प्र. शु. !!!

मार्गी's picture

30 Jun 2015 - 11:48 am | मार्गी

सर्व वाचकांना व आवर्जून प्रतिसाद देणा-यांना मनःपूर्वक बावीस अब्ज सतरा कोटी चौरेचाळीस लक्ष अठ्ठ्याएंशी हजार सातशे सव्वीस वेळेस धन्यवाद!!!! :) :) :)

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 12:08 pm | टवाळ कार्टा

अचाट साहस

नाखु's picture

30 Jun 2015 - 12:53 pm | नाखु

सहमत अजून अनुभव असतील तेही लिहा..

पंखा नाखु

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2015 - 1:22 pm | स्वाती दिनेश

तुमच्या ह्या साहसी प्रवासाचा थरार , लेख आणि फोटोतून आमच्यापर्यंत खूप परिणामकारक रीतीने पोहोचला.
सगळेच भाग वाचले आणि खूप आवडले. फोटो परत,परत पाहिले.
लिहित रहा..
स्वाती

प्रचेतस's picture

30 Jun 2015 - 4:37 pm | प्रचेतस

सगळे भाग आजच वाचले.
केवळ अप्रतिम.

शंतनु _०३१'s picture

30 Jun 2015 - 6:33 pm | शंतनु _०३१

निशब्द …।

रुबरु रोशनी -------------------

विलासराव's picture

1 Jul 2015 - 3:30 pm | विलासराव

मी चाललोय १ ऑगस्टला. जम्मूपर्यंत ट्रेंन. पुढे लोकल जे मिळेल ते. ४ जन आहोत. येताना मनाली मार्गे दिल्ली.
काय सल्ला दयाल?

मार्गी's picture

3 Jul 2015 - 3:08 pm | मार्गी

नमस्कार! ग्रेट! जास्तीत जास्त एंजॉय करा! हार्दिक शुभेच्छा!

आपण लोक आपल्या जीवनामध्ये काहीही थोडं वेगळं करणं जवळजवळ विसरून गेलो आहोत.

अगदीच सहमत!!

सई कोडोलीकर's picture

7 Jul 2015 - 1:04 pm | सई कोडोलीकर

तुमच्या अतिशय साहसी मोहिमेचे हे सगळे लेख वाचायला खुप मजा आली.
फोटो, स्थलवर्णने, स्वतःच्या वेगवेगळ्या मनःस्थितीचं कथन, त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांची कारणमिमांसा, हे सगळं तपशीलातून वाचताना गुंगायला झालं. नव्या भागाची वाट बघितली गेली.

या यशस्वी मोहिमेबद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढच्या अशाच एखाद्या नव्या मोहिमेसाठी शुभेच्छा :-)