फैज अहमद फैज च्या एका कवितेचा अनुवाद

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
25 Jun 2015 - 7:06 pm

गझलसम्राट सुरेश भटांनी ज्यांना आपलं दैवत म्हटलं आहे त्या फैज अहमद फैज यांची खासियत म्हणजे त्यांच्या शायरीतला अद्भुतरम्य (romantic) आणि क्रांतिकारी (revolutionary) आशयांचा अतिशय सुंदर मिलाफ. त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे. सहजच आवड म्हणून:

काव्याचा विषय

विझत चालली आहे उदास, धुमसत जाणारी सांज
न्हाऊन निघेल आता चांदण्याच्या झऱ्यात रात
आणि आसुसलेल्या डोळ्यांची इच्छा पूर्ण होईल
आणि त्या हातांना स्पर्श करतील हे तहानलेले हात

तिच्या ओढणीचा काठ आहे कि गाल कि अंगवस्त्र आहे
काही तरी आहे खास ज्याने त्या चिकाच्या पडद्यावर उधळलाय रंग
जाणे त्या केसांच्या छायेच्या दाट धुक्यात
ती कानातली बाळी अजूनही चमचमते आहे कि नाही
आज परत त्या दिलखेच सौंदर्याची तीच तऱ्हा असेल
तेच स्वप्नी हरवल्यासारखे डोळे, तीच काजळाची रेख
गालाच्या रंगावर पावडरचा तो हलकासा अभ्र
चन्दनि हातावर धुसर शी मेंदीची लिपी
माझ्या विचारांचं, माझ्या कवितांचं जग हेच आहे
हाच आहे विषयांचा प्राण, अर्थांचं सौंदर्य हेच आहे

आजवर आरक्त, काळ्याकभिन्न शतकांच्या छायेत
आदम आणि हव्वाच्या संततीवर काय गुदरली आहे
मृत्यू आणि जीवनाच्या रोजच्या मोर्चेबांधणीमध्ये
आपल्यावर काय गुदरेल, पूर्वजांवर काय गुदरली आहे
का केवळ मरणाच्या आशेने जगत असतात
ह्या झगमगणाऱ्या शहरांतील हि असंख्य माणसे
हि सुंदर शेतं फुटू पाहतं यौवन ज्यांचं
कशासाठी यांमध्ये फक्त भूकच उगवते
पहावं तिकडे उभ्या असलेल्या या रहस्यमय भिंती
जळून विझले ज्यांमध्ये हजारोंच्या तारुण्याचे दिवे
हे प्रत्येक पावलावर त्या स्वप्नांचे कत्तलखाने
ज्यांच्या दीप्तीने प्रज्वलीत आहेत हजारोंची मने

हे पण आहेत, असे आणखीही कितीतरी विषय असतील
पण त्या चंचलेचे हळूच खुलत जाणारे ओठ
हाय! मनाला वेड लावणारा तो बाकदार देह
तुम्हीच सांगा, कुठे असाही जादूटोणा असेल ?
आमच्या काव्याचा विषय यांच्याशिवाय दुसरा नाही
कवीच्या मनाचा मायदेश यांच्याशिवाय दुसरा नाही

- फैज अहमद फैज

आदम आणि हव्वा - Adam and Eve

(अनुवाद सुधारण्याच्या दृष्टीने सुचनांचं स्वागत आहे)

कविता

प्रतिक्रिया

मूळ कविताही उपलब्ध करुन देता का?

अवश्य. थोड्या वेळात करतो.

पथिक's picture

25 Jun 2015 - 7:35 pm | पथिक

गुल हुई जाती है अफ़सुर्दा सुलगती हुई शाम
धुल के निकलेगी अभी, चश्म-ए-महताब से रात
और मुश्ताक़ निगाहों की सुनी जायेगी
और उन हाथों से मस्स होंगे ये तरसे हुए हाथ !

उनका आँचल है के रुख़सार के पैराहन हैं
कुछ तो है जिससे हुई जाती है चिलमन रंगीं
जाने उस ज़ुल्फ़ की मौहूम घनी छांवों में
टिमटिमाता है वो आवेज़ा अभी तक कि नहीं

आज फिर हुस्न-ए-दिलारा की वही धज होगी
वो ही ख़्वाबिदा सी आँखें, वो ही काजल की लकीर
रंग-ए-रुख़्सार पे हल्का-सा वो गाज़े का ग़ुबार
संदली हाथ पे धुंधली-सी हिना की तहरीर

अपने अफ़कार की अशआर की दुनिया है यही
जाने मज़मूं है यही, शाहिदे-ए-माना है यही

आज तक सुर्ख़-ओ-सियाह सदियों के साये के तले
आदम-ओ-हव्वा की औलाद पे क्या गुज़री हैं
मौत और ज़ीस्त की रोज़ाना सफाराई में
हमपे क्या गुज़रेगी अजदाद पे क्या गुज़री हैं

इन दमकते हुए शहरों की फारावां मख्लूक़
क्यों फ़क़त मरने की हसरत में जिया करती हैं
ये हसीं खेत, फटा पड़ता हैं जोबन जिनका
किसलिये इनमें फकत भूक उगा करती हैं

ये हर इक सिम्त पुरसरार कड़ी दीवारें
जल बुझे जिनमें हज़ारों की जवानी के चिराग़
ये हर इक गाम पे उन ख़्वाबों की मक़्तल गाहें
जिनके परतौ से चरागाँ हैं हज़ारों के दिमाग़

ये भी हैं, ऐसे कई और भी मज़मूँ होंगे
लेकिन उस शोख़ के आहिस्ता से खुलते हुए होंठ
हाय उस जिस्म के कमबख़्त दिल-आवेज़ ख़ुतूत
आप ही कहिये, कहीं ऐसे भी अफ़्सूँ होंगे ?
अपना मौज़ू-ए-सुख़न इनके सिवा और नहीं
तब'ए शायर का वतन इनके सिवा और नहीं

धन्यवाद, वाचते आहे. काही काही ओळींचा अनुवाद अधिक आवडला.

रातराणी's picture

26 Jun 2015 - 12:48 am | रातराणी

सुंदर जमलाय अनुवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा

छान जमलय.

चुकलामाकला's picture

26 Jun 2015 - 7:55 am | चुकलामाकला

सुंदर!

पथिक's picture

26 Jun 2015 - 10:08 am | पथिक

सर्वांचे आभार!

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 10:23 am | विशाल कुलकर्णी

जियो... अतिशय सुंदर !

पथिक's picture

29 Jun 2015 - 2:25 pm | पथिक

धन्यवाद!

पैसा's picture

26 Jun 2015 - 10:49 pm | पैसा

छान भावानुवाद!

पथिक's picture

29 Jun 2015 - 2:24 pm | पथिक

धन्यवाद!

अंगवस्त्र म्हणजे ठेवलेली बाई उर्फ वेश्या उर्फ कीप.

संस्कृतातील जाणकार व्यवस्थीत सांगू शकतील.

पैसा's picture

27 Jun 2015 - 9:30 am | पैसा

खरंच की!

पथिकबुवा शब्द बदलून सांगा तेवढा.

दोन्हीही अर्थ बरोबर आहेत: http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?table=molesworth&page=...