महिला दिन (शत शब्द कथा)

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Jun 2015 - 9:56 am

महिलामंडळाने ठाण मांडलय,
फाटक्या “चिंधीच्या” तुटक्या झोपडीसमोर,

तीन दगडाची चुल, मोडकी ट्रंक,
आजारी सासू, तिथेच खेळणारी चिंधीची शेंबडी पोरं

तिला जाणीव करून देणार, तिच्या हक्कांची, अधिकारांची
आजचा शेवटचा टास्क,
सकाळपासुन चार “क्लायंट” केलेत, हा शेवटचाच !
बर्गर, पाच-सहाच इडल्या, सकाळचा ज्युस,बस्स
उन्हे तापलीयेत, फ्रीजमधली चिल्ड बिअर वाट पाहतेय…

चिंधी कुठे उलथलीय कोण जाणे?
एक दिवस नसती गेली कामाला, काय बिघडणार होते?
किती वाट पाहायची उन्हात अजुन?

उकिरड्याआड लपलेली चिंधी…
बाया काय जायाला न्हायी,
दाल्ल्याने हाग्यादम भरलाय, गोडधोड कर सांजच्याला
येक चिपटीबी आन, सरपनाच्या पैक्यातुन गुत्त्यावरनं
नर्सबायनं सांगटलय…

म्हैलादिन का काय म्हंत्यात ते हाय म्हनं आज!

माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित !

विशाल...

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

23 Jun 2015 - 10:01 am | श्रीरंग_जोशी

कटू वास्तव परिणामकारकपणे मांडलय. अधिक काय लिहिणार...
कधी तरी अशा कथा पूर्णपणे काल्पनिक म्हणता याव्यात...

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2015 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा

@कधी तरी अशा कथा पूर्णपणे काल्पनिक म्हणता याव्यात... .>> +++१११

विशाल कुलकर्णी's picture

23 Jun 2015 - 10:07 am | विशाल कुलकर्णी

खरोखर समर्पणभावाने, निस्वार्थवृत्तीने काम करणारे/करणार्‍याही आहेत भरपूर, परंतू दुर्दैवाने त्यांची संख्या अशा 'महिलामंडळापेक्षा' कमीच आहे. :(

उगा काहितरीच's picture

23 Jun 2015 - 10:30 am | उगा काहितरीच

वास्तव ...sadly :-(

पैसा's picture

23 Jun 2015 - 10:32 am | पैसा

फोटोपुरती समाजसेवा आणि दाखवेगिरी सगळीकडेच आहे. खरे काम करणारे नेहमी मागेच रहायचे.

खेडूत's picture

23 Jun 2015 - 11:08 am | खेडूत

छान.

शतशब्दकाव्य सुद्धा म्हणता येईल!

पद्मावति's picture

23 Jun 2015 - 12:23 pm | पद्मावति

बापरे....भयानक आहे...पण दुर्दैवाने सत्य परिस्थिती आहे....

रातराणी's picture

23 Jun 2015 - 12:29 pm | रातराणी

2 वेळा टाइप करून प्रतिसाद डिलीट केला. :( Speechless.

खटपट्या's picture

23 Jun 2015 - 12:30 pm | खटपट्या

कथा आवडली..

विशाल कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 10:24 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !

नूतन सावंत's picture

24 Jun 2015 - 10:39 am | नूतन सावंत

नि:शब्द

नाखु's picture

24 Jun 2015 - 11:45 am | नाखु

गप्राव जरा !

पांढरपेशा

स्वगतः किमान शब्दात सत्य खरव्डलेस.

पंखा नाखु

मुक्त विहारि's picture

24 Jun 2015 - 11:46 am | मुक्त विहारि

आणि खिन्न...

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 12:55 pm | कपिलमुनी

कटू पण सत्य

विशाल कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 2:38 pm | विशाल कुलकर्णी

_/\_

वेल्लाभट's picture

24 Jun 2015 - 3:49 pm | वेल्लाभट

छान मांडणी.