मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!

Hrushikesh Marathe's picture
Hrushikesh Marathe in जे न देखे रवी...
3 Jun 2015 - 11:58 pm

तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं,
तुझं हसणं, तुझं दिसणं, सारं काही नवीनच,
तरीही या नव्याचा मला ध्यास जडे..!

मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!

मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम
तु म्हणावे चल निघुया अन् मी म्हणावे थांब,
दिवसभर चालू आपले हे खेळ वेडे..!

मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!

दिवस असला सोबत तरीही,रात्र स्वप्नांची कधीना सरे
रात्रंदिवस संवाद आपुले, तरीही पडती हे क्षण अपुरे,
क्षण सोबतचे आठवी मन, अन् रमे त्यातचं वेडे..!

या नात्याची ओळख न उलगडे..!
मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!

हृषीकेश

कविता

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

4 Jun 2015 - 8:47 am | सतिश गावडे

तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं,

यावरुन सुशिंच्या कुठल्याशा कादंबरीतील नायकाने विवाहित नायिकेला उद्देशून म्हटलेल्या ओळी आठवल्या:

तुझं येणं जाणं
तुझं हसणं तुझं रुसणं
तुझ्या नुसत्या असण्यानं माझं जीवन समॄद्ध केलं
तेव्हढं एक सांगायचं राहूनच गेलं...

छान लिहित आहात. मात्र प्रत्येक लेखनामध्ये किमान दोन तीन दिवसांचा अवधी द्या. लोकांना तुमचे लेखन वाचू द्या. त्यावर चर्चा करु द्या. असा अवधी दिल्याने तुमचे लेखन अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल.

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 9:14 am | Hrushikesh Marathe

धन्यवाद सतीश..जरूर..

यशोधरा's picture

4 Jun 2015 - 8:55 am | यशोधरा

मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम >> आँ? का म्हणे?
बाकी कविता ओके. लिहित रहा.

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 9:12 am | Hrushikesh Marathe

ऑफिस मधल्या नवीन रुजु झालेल्या कलीगला उद्देशुन कविता आहे. त्यात तो काम करत असतो आणि ती नवीन रुजु झाल्यामुळे तिला फारसे काही काम नसते.... अशा काहीशा अर्थाने

पैसा's picture

4 Jun 2015 - 9:17 am | पैसा

तुम्ही मला २५ वर्षांपूर्वी का नाय भेटलात ओ?

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 9:26 am | Hrushikesh Marathe

Kaa o..asa kaa :)

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 9:29 am | श्रीरंग_जोशी

२५ वर्षांपूर्वीचं जौद्या, तुम्हाला इथेही खूप काम असतं म्हणे ;-) .

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 9:30 am | Hrushikesh Marathe

ha ha ha ha

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 12:54 pm | टवाळ कार्टा

अज्जून पण वेळ नै गेलीये ;)

पैसा's picture

4 Jun 2015 - 3:18 pm | पैसा

आता मी नोकरी सोडलीय. तेव्हा भेटले असते तर माझं काम त्यांच्या गळ्यात घालून माझ्या नवर्‍याबरोबर भटकले असते ना! =))

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 3:45 pm | टवाळ कार्टा

खिक्क

यशोधरा's picture

4 Jun 2015 - 9:18 am | यशोधरा

मज्जाय मग. कोणतं ऑफिस?

स्वानुभव नाहीये :D पण अशीच एक कल्पना..

हत तेरे की! काय उपयोग!कखयालीच पुलाव होय! पकवा मग.

सतिश गावडे's picture

4 Jun 2015 - 9:27 am | सतिश गावडे

हल्ली सार्‍या आयटी कंपन्यांमध्ये अँटी हॅरॅसमेंट पॉलिसीज असतात. जरा जपून.

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 9:29 am | Hrushikesh Marathe

Yup satish..

सतिश गावडे's picture

4 Jun 2015 - 9:34 am | सतिश गावडे

तुम्ही "प्यार का पंचनामा" हा चित्रपट पाहिला नसेल तर जरूर पाहा.

बॅटमॅन's picture

4 Jun 2015 - 5:42 pm | बॅटमॅन

एक नंबर, तुफान, इ.इ. पिच्चर आहे. डोळे उघडल्याचा क्षण त्यात लैच्च भारी दाखवलेला आहे.

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 9:58 am | Hrushikesh Marathe

Pahilay :p

अजया's picture

4 Jun 2015 - 11:35 am | अजया

मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम >

हे फारच आवडल्या गेले आहे!

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 12:12 pm | Hrushikesh Marathe

Thanks :)

अन्या दातार's picture

4 Jun 2015 - 3:34 pm | अन्या दातार

प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्याचे काम तुम्हाला कुणी आउटसोर्स केलंय काय? इमानेइतबारे करताय म्हणून विचारले. ;)

प्रतिक्रिया की ओरतिक्रिया? अंमळ कन्फूजन झाल्याने विचारले. ;)

वेल्लाभट's picture

4 Jun 2015 - 3:50 pm | वेल्लाभट

चांगला प्रयत्न

असं प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देत बसू नये, एकाच प्रतिसादात सगळ्यांच आभारप्रदर्शन, उट्टं काढणं वैगरे उरकून टाकावं. हापिसात शष्प काम नसेल तर मात्र चालू द्या.

मित्रहो's picture

4 Jun 2015 - 11:34 pm | मित्रहो

म्हणूनच तर कुणाचे तरी काम करुन द्यायचे खयाली पुलाव चालले आहे.

रातराणी's picture

4 Jun 2015 - 11:54 pm | रातराणी

छान आहे !!