(चा)वटपोर्णिमा

फुंटी's picture
फुंटी in जनातलं, मनातलं
2 Jun 2015 - 3:12 pm

आजच्या वटपौर्णीमेनिमित्त whatsapp फेसबुकवर अनेक मेसेज येत होते.त्यातले एकदोन सरळ शब्दात शुभेच्छा देणारे मेसेज वगळता बरेचसे मेसेज खिल्ली उडवणारे होते.विवाहसंस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी हे व्रत सुरु झाल असाव.आजच्या काळात याचा फोलपणा जाणवू लागला आहे.म्हणून असे विनोदी मेसेज उत्स्फुर्तपणे शेअर केले जातात. एकंदर स्त्री-पुरुष संबंध आणि त्याला दिलेली विवाहाची चौकट असा हा गुंतागुंतीचा प्रकार आहे.अर्थात हि चौकट केवळ चौकात पाळायची असते यावर ७०% जोडपी सहमत होतील.लिव्ह इन रिलेशनशिप च्या जमान्यात विवाह बंधन हे खूपच जाचक ठरत आहे. या सगळ्यात माणसाची भावनिक उर्जा प्रचंड खर्च होते.एकीकडे तंत्रज्ञान वापरून ,संवादाच्या सहज सोप्या माध्यमांमुळे भावनिक जवळीक साधण्याचे प्रमाण सर्रास आढळते आहे.दुसरीकडे एकनिष्ठेची व्रते सांभाळत दुभंगलेल्या अवस्थेत आजच मनुष्यमन गेलेलं आहे.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

2 Jun 2015 - 3:21 pm | टवाळ कार्टा

यात चावट काय आहे???

तुझ्या सारख्या सदस्यांना आकर्षित करण्यासाठी दिलेलं नाव आहे ते. =))

टवाळ कार्टा's picture

2 Jun 2015 - 3:45 pm | टवाळ कार्टा

तू आजोबा कॅटेगरीमध्ये पोचला वाट्टे ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ

ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ

असले अश्लील आवाज काढू नको मेल्या!!

हाडक्या's picture

2 Jun 2015 - 8:17 pm | हाडक्या

तुझ्याच मनात पाप, मेल्या..!!
अन्यथा कित्ती कित्ती निष्पाप असा तो आवाज आहे .. ;)

सतिश गावडे's picture

2 Jun 2015 - 8:35 pm | सतिश गावडे

अन्यथा कित्ती कित्ती निष्पाप असा तो आवाज आहे .. ;)

तो तुमचा समज आहे.

हाडक्या's picture

2 Jun 2015 - 8:52 pm | हाडक्या

आपणास मुद्दा कळालेला नाही.

चालू-द्या तुम चेनि रर्थक अत्मरंजन!!

तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात.

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2015 - 9:13 pm | प्रसाद गोडबोले

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ

ही तुमची स्वमतांध दांभिकता आहे.

हाच प्रश्न गलगलेन्ना पडला !

टका च नाहि आम्हि सुद्धा तशाच कुठल्या आशेने हा धागा उघडला होता.

नाव आडनाव's picture

2 Jun 2015 - 3:34 pm | नाव आडनाव

क्रमशः नाही?

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 3:39 pm | संदीप डांगे

तमाशाचं दिल्खेचक बोर्ड बघून आत घुसावं आणि समोर बाबाम्हाराजांचं किर्तन सुरु असावं असं काहीतरी झालंय..

एक एकटा एकटाच's picture

2 Jun 2015 - 3:45 pm | एक एकटा एकटाच

अगदी अगदी.....

माझ पण अगदी शेम टु शेम झाल बघा......

अनुप ढेरे's picture

2 Jun 2015 - 4:05 pm | अनुप ढेरे

अगदी! वरून तमशा आतून किर्तन

फुंटी's picture

2 Jun 2015 - 3:58 pm | फुंटी

खिक

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:01 pm | काळा पहाड

लेखकाच्या वैयक्तीक माहिती मधूनः

माझ्याविषयी

मी आईबापानं ओवाळून टाकलेला गरीब माणूस हाये.आजूक लगीन झालेला मिलत नाय.तवा इथें आपन डबल गेम करायला आलेलो हाये..

बाकी चावट शिनेमे वगरे आवडतातच...

प्लस हे पन आहेच.
चावट सगळं आवत्तं त्याना.

फुंटी's picture

2 Jun 2015 - 10:41 pm | फुंटी

'माझ्याविषयी ....'मध्ये लिहिलेलं माझ्याबद्दलची वस्तुस्थिती दर्शवते .त्यात सोयीस्कर हेतुदमन होत नाहीये हेच पुरेस आहे.

सतिश गावडे's picture

2 Jun 2015 - 10:46 pm | सतिश गावडे

हेतुदमन काय असते?

मनातले हेतू दडवून ठेवणे.

शब्दबम्बाळ's picture

2 Jun 2015 - 6:51 pm | शब्दबम्बाळ

नुकतेच वटपोर्णिमेवर क्रांतिकारक काव्य वाचून मोठ्या अपेक्षेने इथे आलो होतो...
बोर्डावर येथे झणझणीत रस्सा मिळेल असे लिहून लोकांना वरण खायला द्यावं असे झालंय इथे!

अवांतर : एखाद्याने लिहिलेली वैयक्तिक माहिती धाग्यावर जाहीर करणे योग्य आहे का?

विवेकपटाईत's picture

2 Jun 2015 - 7:26 pm | विवेकपटाईत

पुरुष मनांची घोर निराशा,
खोडा पहाड निकला चुहा
काहीही म्हणा धाग्याला प्रतिसाद मिळतील, हे निश्चित.

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2015 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले

चारोळी धागा .

डिलीट होणार हे निश्चित !

धागा डिलीट करायच्या लायकीचा असेलही परंतु त्यात मांडलेल्या विषयावर एकही सदस्याने मत व्यक्त केल नाही.विवाहसंस्था,स्त्री पुरुष नातेसंबंध या सगळ्याकडे आजचा तरुण कसा पाहतो या गोष्टी निश्चितपणे बोलल्या जाणं गरजेच आहे.थाटामाटात विवाह होत असले तरीही त्यात मानवी मनाची कुचंबणा जास्त होताना दिसते.मानवी मनाच्या भावविश्वातील सूक्ष्म हालचालींचा वेध घेण्याचा उद्देश हि पोस्ट टाकताना होता.

लालगरूड's picture

2 Jun 2015 - 7:54 pm | लालगरूड

लेखकाला काय सांगायचे आहे???

गरुडबाळा तू १९ वर्षांचा आहेस किनै? २१ वर्षांवरील लोकांसाठी आहे ते, तू डोळे मिटून घे बरं!!

बॅटमॅन's picture

2 Jun 2015 - 8:02 pm | बॅटमॅन

असा के एल पी डी करण्याची शिक्षा भयंकर अस्ते.

फालतु लेख ..माझा नेटपॅक वाया गेला..

धागा डिलीट करायच्या लायकीचा असेलही परंतु त्यात मांडलेल्या विषयावर एकही सदस्याने मत व्यक्त केल नाही.विवाहसंस्था,स्त्री पुरुष नातेसंबंध या सगळ्याकडे आजचा तरुण कसा पाहतो या गोष्टी निश्चितपणे बोलल्या जाणं गरजेच आहे.थाटामाटात विवाह होत असले तरीही त्यात मानवी मनाची कुचंबणा जास्त होताना दिसते.मानवी मनाच्या भावविश्वातील सूक्ष्म हालचालींचा वेध घेण्याचा उद्देश हि पोस्ट टाकताना होता.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jun 2015 - 10:28 pm | श्रीरंग_जोशी

या किंवा यासारख्यां विषयांवर पूर्वी चर्चा झालेले धागे आहेत. कृपया एकदा नजरेखालून घाला.
चर्चाप्रस्ताव मांडताना इतकाही त्रोटकपणे मांडू नका.

चर्चांचे धागे असतीलही .परंतु प्रत्येक माणसाला त्यात रस वाटण कठीण असत.माझ्यासारख्या काही लोकांना एखादी चर्चा ,विषय स्वतःच्या लंगड्या विचारांना कुबड्या म्हणून पुढे सरकण गरजेच वाटत.असो.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jun 2015 - 10:49 pm | श्रीरंग_जोशी

एखादा चर्चाप्रस्ताव मांडताना पूर्वी झालेल्या चर्चा वाचल्यास अधिक नेमकेपणाने नवे काही तरी मांडता येते. प्रस्तावात पूर्वीच्या चर्चांचे दुवे दिल्यास जुन्या - नव्या सदस्यांना चर्चा करण्यासाठी महत्वाचे संदर्भ मिळू शकतात.

पैसा's picture

3 Jun 2015 - 11:07 am | पैसा

माझ्यासारख्या काही लोकांना एखादी चर्चा ,विषय स्वतःच्या लंगड्या विचारांना कुबड्या म्हणून पुढे सरकण गरजेच वाटत.

धाग्यात तुमची स्वतःची मते काय आहेत. तशी ती का आहेत याबद्दल लिहिलं असतं तरी धागा बराच हलला असता. बाकी सगळं ठीकच आहे.

मत ,विचार बनण ही एक प्रक्रिया असावी.जी माझ्या बाबतीत सुरु आहे.त्यामुळे या विषयावर माझं मत बनवण्याची आणि ते मांडण्याची घाई मला नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2015 - 7:37 am | अत्रुप्त आत्मा

असंबद्ध विस्कळित मांडणि... विषय एक मुद्दे अनेक!

त्यामुळे आमचा पास!