शेयर बाजारातला परतावा. मिथके आणि वस्तुस्थिती

प्रसाद१९७१'s picture
प्रसाद१९७१ in काथ्याकूट
15 May 2015 - 5:45 pm
गाभा: 

ह्या धाग्यात टाकलेले टेबल कोणी मला नीट टाकुन देवु शकेल का?

शेयर बाजारा वर एक धागा आणि वरचे प्रतिसाद वाचले. त्यावरुन काही फार सोप्या सजेशन वाचण्यात आल्या, म्हणुन विचार केला की गेल्या ५ वर्षात नक्की काय झाले आहे ते बघावे. हा विदा आहे, ज्याचा त्याने बघुन त्यातुन अर्थ काढावा. ह्या तक्त्यातल्या सर्व कंपन्या प्रचंड मोठ्या वगैरे आहेत, आणि त्या जवळपास ५०-६० टक्के शेयर मार्केट रीप्रेसेंट करतात.

ज्या सुचना बघण्यात आल्या त्या थोडक्यात अश्या

१. निफ्टी इंडेक्स फंड मधे गुंतवणुक करावी आणि निश्चिंत व्हावे. खाली बघा, निफ्टीने ५ वर्षात ९.९ टक्क्याच्या रेट नी वार्षिक परतावा दिलेला आहे.
२. चांगली मॅनेजमेंट आणि आपल्याला कळणारा धंदा असला तर गुंतवणुक करावी. टाटा समुहाचे उदा दिले होते. खालच्या तक्त्यात बर्‍याच टाटा समुहाच्या कंपन्या आहेत, त्यांचे काय झाले आहे गेल्या पाच वर्षात ते बघा. टीसीएस सोडली तर परताव्याच्या बाबतीत अंधार आहे. तश्याच चांगली मॅनेजमेंट असणार्‍या इंफोसीस, विप्रो, लार्सन, महींद्रा, रीलायन्स अश्या पण कंपन्या आहेत त्यांचे ही बघा. स्टेट बँक आणि भेल चे पण काय झाले ते बघावे. ( एकतर चांगली मॅनेजमेंट म्हणजे काय? हा खरा प्रश्न आहे )
थोडक्यात बरोबर ५ वर्षापूर्वी जर निफ्टी इंडेक्स फंड कोणी घेतला असता तर त्याला १० टक्के परतावा मिळाला असता. किंवा कोणी हे खालच्या लिस्ट मधले सर्व शेयर सारख्याच प्रमाणात ५ वर्षापूर्वी घेतले असते तर १०.२% वार्षिक परतावा मिळाला असता.
महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची तर ह्या परताव्यातील बरासचा भाग ( ७० टक्के ) फक्त गेल्या एका वर्षातला आहे. म्हणजे मोदी निवडुन आले नसते तर आत्ता हा परतावा ३-४ % इतकाच असता.

तुम्ही जर धोका पत्करत असाल तर त्या साठी कीती परतावा मिळाला पाहीजे हे ज्याचे त्याने ठरवावे.

Company Price on 17-May-2010 Today's Price CAGR
-------------------------------------------------------------------------

Nifty 5150 8260 9.9%
BHEL 466 230 -13.2%
Tata Power 127 73 -10.5%
Tata Steel 531 363 -7.3%
Reliance 1020 873 -3.1%
Tata Motors 434 519 3.6%
SBI 225 287 5.0%
Tata Chemicals 339 443 5.5%
Tata Global Bev 107 147 6.6%
Wipro 387 538 6.8%
L&T 1110 1591 7.5%
Infosys 1307 1960 8.4%
Bajaj Auto 1081 2186 15.1%
M&M 519 1243 19.1%
ITC 131 326 20.0%
Dr. Reddy 1404 3496 20.0%
TCS 744 2509 27.5%
HUL 240 841 28.5%
Sun Pharma 156 946 43.4%


माझे दोन शब्द :

१. शेयर बाजारात सहज रीतीने पैसे कमावणे २००७ पासुन अवघड झाले आहे. सध्याच्या काळात विप्रो, इंफोसिस रीलायंस सारख्या दहा वर्षात पैसे १०० पट करणार्‍या संधी येणार नाहीत ( त्याला ही कारणे आहेत पण ती आत्ता नकोत )
२. कंपनी मोठी आहे, तिची प्रोडक्ट चांगली आहेत म्हणजे तिच्या शेयर मधुन चांगला परतावा मिळेलच असे नाही.
३. शेयर मधे जर पैसे मिळवायचे असतील तर खरेदी विक्री करत रहाणे गरजेचे आहे. ही समजुन उमजुन करायची गोष्ट आहे. त्या साठी खूप वेळ घालायला लागत नाही. आठवड्यात एकदा २ तास डाटा जमवून नजर टाकली तरी चालेल. पण चुकीचे समज बाळगु नयेत. ह्यात कुठला ही सोप्पा मार्ग आणि शॉर्ट कट नाही.
४. चॅनेल वर फक्त सक्सेस स्टोरीज ऐकायला मिळतात, पण ती फक्त एकच बाजू असते.

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

15 May 2015 - 5:52 pm | प्रसाद१९७१

Company
Price on
17-May-2010
Today's Price
CAGR
 

Nifty
5150
8260
9.9%
1.603883

BHEL
466
230
-13.2%
0.493562

Tata Power
127
73
-10.5%
0.574803

Tata Steel
531
363
-7.3%
0.683616

Reliance
1020
873
-3.1%
0.855882

Tata Motors
434
519
3.6%
1.195853

SBI
225
287
5.0%
1.275556

Tata Chemicals
339
443
5.5%
1.306785

Tata Global Bevarages
107
147
6.6%
1.373832

Wipro
387
538
6.8%
1.390181

L&T
1110
1591
7.5%
1.433333

Infosys
1307
1960
8.4%
1.499617

Bajaj Auto
1081
2186
15.1%
2.022202

M&M
519
1243
19.1%
2.39499

ITC
131
326
20.0%
2.48855

Dr. Reddy
1404
3496
20.0%
2.490028

TCS
744
2509
27.5%
3.372312

HUL
240
841
28.5%
3.504167

Sun Pharma
156
946
43.4%
6.064103

पगला गजोधर's picture

15 May 2015 - 5:53 pm | पगला गजोधर

३. शेयर मधे जर पैसे मिळवायचे असतील तर खरेदी विक्री करत रहाणे गरजेचे आहे. ही समजुन उमजुन करायची गोष्ट आहे. त्या साठी खूप वेळ घालायला लागत नाही. आठवड्यात एकदा २ तास डाटा जमवून नजर टाकली तरी चालेल. पण चुकीचे समज बाळगु नयेत. ह्यात कुठला ही सोप्पा मार्ग आणि शॉर्ट कट नाही.

काय डेटा जमवावा ? त्याचा कसा अभ्यास करावा ? असा अन्वयार्थ काढावा ?

खरेदी विक्री करत रहाणे गरजेचे आहे

मग काश्याप्रकारचे शेअर ? कधी घ्यावे ? कधी विकावे ?

या बाबात अधिक उलगडून सांगाना सर …

प्रसाद१९७१'s picture

15 May 2015 - 7:09 pm | प्रसाद१९७१

सोमवारी.

हे दोन नियम नक्की पाळा
- जर प्रमोटर्स चे शेयर्स त्यांनी प्लेज केलेले असतील तर अश्या कंपन्यांच्या वाट्याला अजिबात जावू नये.
- निफ्टी मधल्या पहील्या ३०-३५ कंपन्या आणि ज्युनियर निफ्टी मधल्या पहील्या १०-१५ कंपन्या सोडुन जर गुंतवणुक करायची असेल तर प्रमोटर्स चा हीस्सा ५०% च्यावर तरी असावा.

हे दोन नियम भांडवलाच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने पाळणे गरजेचे.

म्हया बिलंदर's picture

15 May 2015 - 6:08 pm | म्हया बिलंदर

कॅल्क्युलेटेड रिस्क हा शब्द मला कोणितरी सांगितलेला आणि तो तितकाच खरा देखिल आहे.
पण यात्लं "कॅल्क्युलेशन" कसं करायचं आणि "रिस्क" केव्हा घ्यायची हा खरा प्रश्न.
तर यात बर्‍याच गोष्टींचा आभ्यास लागतो, उदा: कंपनि फंडामेन्टल्स, त्यांचा वार्षिक लेखा जोखा, सध्याचि स्थिती, ई.
म्हणून मि तरी कोणालाहि सरळ शेअर बाजारात गुंतवणुकिचा सल्ला देत नाहि.
आधि प्रत्येकाने स्वतःचा विमा काढावा, घरच्यांना सुरक्षित करावे.
नंतर सरकारी योजना, पोश्टाच्या योजना, ई. मध्ये गुंतवणुक करुन गुंतवणुक सुरक्षित करावि.
मग म्युच्युअल फंड कडे यावे, म्हणजे (शेअर)बाजारात न जाता देखिल बाजाराचि तोंड ओळख होते.
मग जर सगळं जमतय असा आत्मविश्वास आला (आणि काही उरलं)कि उतरावं मैदानात.

प्रसाद भागवत's picture

15 May 2015 - 8:54 pm | प्रसाद भागवत

निफ्टीने ५ वर्षात ९.९ टक्क्याच्या रेट नी वार्षिक परतावा दिलेला आहे....

निफ्टीने( वा एखाद्या शेअरने) दिलेला परतावा केवळ (अ-ब) असा दोन तारखांमधल्या फरकाने काढणे योग्य आहे काय ?? निफ्टीमधील जवळ्जवळ प्रत्येक् समाविष्ट कंपनी डिव्हीडंड देत असते. तो सहाजिकच बाजारभावातुन वजा होतो. तो ही टक्केवारे काढताना विचारांत कशी काय घेणार ?? हुया छोट्याश्या मुद्द्यामुळे चुकलेली ही आकडेवारी prasad71साहेब परत सादर करतील अशी मला खात्री आहे.

ह्या परताव्यातील बरासचा भाग ( ७० टक्के ) फक्त गेल्या एका वर्षातला आहे असे त्यांनी म्हटले आहे... ह्यातील '७० टक्के' ह्या प्रमाणाबाबतची आकडेवारीही ते देतील अशी मला आशा आहे. त्याचबरोबर एखाद्या सलग कालावधीतील सकारात्मक परतावा देणारा कालखंड असा वगळावयाच असेल तर मग तशा काही कारणाने ( उदा युरोपियन संकट) नकारात्मक परतावा देणारा कालावधीही 'विषेष' म्हणुन वगळावयास हवा की नको??. prasad71साहेबांनी त्याचीही आकडेवारी तयार ठेवलीच असेल.

दरम्यानच्या काळांत मी माझ्यापरीने या समस्येचे उत्तर शोधले आहे आजच्या तारखेला गेल्या ०५ वर्षांचा विचार करता किमान. याच काळांत Large Cap फंड्स पैकी 08, diversified मध्ये 20 तर small cap वर्गातल्या 35 योजना अशा आहेत की ज्यांनी प्रतिवर्षी 15% पेक्षा अधिक परतावा दिला. म्हणजेच आजमितीस एक दोन नव्हे तर 60 पेक्षा अधिक योजना आहेत ज्यांनी गेली 05 वर्षे 15% पेक्षा अधिक परतावा दिला अगदी ईंडेक्स फंड्स बाबत बोलायचे तर 11 योजनांनी 10.25% पेक्षा अधिक परतावा दिलेला दिसतो.(.ह्यात कोणत्याही ETF चा समावेश नाही अन्यथा हा परतावा कदाचित थोडा अधिकही दिसु शकला असता.)

असणारी सुलभता, तरलता(liquidity) आणि करमुक्तता ही वैषिष्ट्ये पाहता याच काळांत अन्य कोणते उपलब्ध पर्याय होते ज्यांपुढे हा परतावा वाईट ठरतो??..

चांगला गुंतवणुक सल्लागार नेहमीच अशा उत्तम फंड्स मध्ये गुंतवणुक करा, किंवा निवडक १०/१५ कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा असेच सांगतो.त्यामुळे प्रत्येक शेअरचे काय झाले याचा लेखाजोखा मांडत बसण्यापेक्षा वरील वस्तुस्थितीकडे डोळेझाक का करावी?? मतलब आम खाने से होना चाहिये या पेड गिनने से ?? वाचकांनी ठरवावे.

आजानुकर्ण's picture

15 May 2015 - 10:16 pm | आजानुकर्ण

खाली बघा, निफ्टीने 5 वर्षात 9.9 टक्क्याच्या रेट नी वार्षिक परतावा दिलेला आहे.

हा गैरसमज आहे. निफ्टीचा पूर्ण परतावा पाहण्यासाठी निफ्टी टोटल रिटर्न इंडेक्स वापरा. (दुवा)
तुलना करण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटचे उदाहरण घेतले तर ५ वर्षाचा करपश्चात परतावा हा एफडीच्या जवळपास दुप्पट आहे हे लक्षात येईल. थोडक्यात 70 टक्के परतावा वि. 30 टक्के परतावा यात काय निवडायचे ते तुम्हीच निवडा. निफ्टीत गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तथाकथित रिसर्च, डेटा अॅनालिसीस, वारंवार खरेदी-विक्री वगैरेची काहीही आवश्यकता नाही.

.demo {
border:1px solid #C0C0C0;
border-collapse:collapse;
padding:5px;
}
.demo th {
border:1px solid #C0C0C0;
padding:5px;
background:#F0F0F0;
}
.demo td {
border:1px solid #C0C0C0;
padding:5px;
}

Table 1

इंडेक्स
17 मे 2010
15 मे 2015
करपूर्व वार्षिक परतावा
करपश्चात वार्षिक परतावा
1000 रु.ची वाढ

निफ्टी टोटल
6293.1
10905.75
11.631
11.631
1733

निफ्टी
5059.1
8262.35
10.3102
10.3102
1633

फिक्स्ड डिपॉझिट
100
157.5
9.5
6.96
1300

आजानुकर्ण's picture

15 May 2015 - 10:19 pm | आजानुकर्ण

वरील सारणीत 15 एप्रिल ऐवजी 15 मे हवे. स्वसंपादनाची सुविधा उपलब्ध नाही असे दिसते.

बाकी "third world toilet called India" ला घाबरुन कायम चा इंग्लंड मधे पळुन आलेला, प्रसाद. यांना भारतीय बाजाराबाबत अमाप उत्सुकता आहे हे वाचून मन भरुन आले.

अनुप ढेरे's picture

15 May 2015 - 10:40 pm | अनुप ढेरे

बाकी "third world toilet called India" ला घाबरुन कायम चा इंग्लंड मधे पळुन आलेला, प्रसाद. यांना भारतीय बाजाराबाबत अमाप उत्सुकता आहे हे वाचून मन भरुन आले.

अगदी!

बाकी तुम्ही दिलेल्या टेबलशी सहमत आहेच. हेच जर १० वर्षांसाठी कंसिडर केलं तर अजून चांगले परतावे दिसतील.

प्रसाद भागवत's picture

18 May 2015 - 2:10 pm | प्रसाद भागवत

+१..सहमत

लॉर्ड फॉकलन्ड's picture

15 May 2015 - 10:36 pm | लॉर्ड फॉकलन्ड

शेयर बाजारात सहज रीतीने पैसे कमावणे २००७ पासुन अवघड झाले आहे.

असहमत.खालील कंपन्यांनी गेल्या १-५ वर्षात मला भरपूर फायदा दिलेला आहे.

कोल इंडिय,स्टेट बँक्,येस बँक,आयआरबी,पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन,श्रेणुज अ‍ॅण्ड कंपनी,पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन्,एल अ‍ॅण्ड टी,टाटा मोटर्स्,मारूती सुझुकी,आयडीएफसी,वोकहार्ट,इन्फोसिस

यातल्या काही कंपन्यांनी १ वर्षात १००% अधिक फायदा दिला, तर अनेक कंपन्यांनी सरासरी वार्षिक २०% हून अधिक फायदा दिलेला आहे.

अनुप ढेरे's picture

15 May 2015 - 10:42 pm | अनुप ढेरे

धागाकर्त्याने इथे गुंतवणूक विषयक सल्ला दिलाय अस दिसतय. इथे माझ्यामते त्याने स्वतःचे क्रिडेंशियल्स स्पष्ट करावेत किंवा तो स्वतः यातल्या कुठ्ल्या गोष्टी फॉलो करतो हे तरी डिक्लेअर करावं.

हे सगळं गणित मांडताना समभाग विभाजन लक्षात घेतलेले आहे काय? माझ्या आठवणीप्रमाणे कमीत कमी इन्फोसिसच्या समभागांचे २०१० नंतर एकदातरी विभाजन झालेले आहे. एकास एक या प्रमाणात

लॉर्ड फॉकलन्ड's picture

16 May 2015 - 3:29 pm | लॉर्ड फॉकलन्ड

इन्फोसिसने २०१४ मध्ये १:१ बोनस शेअर दिला.बोनसच्या दिवशी ४२०० च्या आसपास भाव होता.बोनस मिळाल्यानंतर तो भाव २१०० च्या जवळपास होता.सध्या १९५० चा रेट आहे.बोनसमुळे शेअर दुप्पट होऊन सुद्धा भाव निम्म्यापेक्षा कमी आहे. त्यायावर्षी पुन्हा एकदा १:१ बोनस जाहीर केला आहे.अजून कम-बोनस असल्याने त्यापूर्वी शेअर घेतल्यास बोनस शेअर मिळतील.

रामपुरी's picture

16 May 2015 - 2:54 am | रामपुरी

"बाकी "third world toilet called India" ला घाबरुन कायम चा इंग्लंड मधे पळुन आलेला, प्रसाद. यांना भारतीय बाजाराबाबत अमाप उत्सुकता आहे हे वाचून मन भरुन आले"
आजानुकर्णांना १०० वेळा अनुमोदन... :) :) :)

बेकार तरुण's picture

16 May 2015 - 6:21 am | बेकार तरुण

प्रसाद१९७१ सर,
मी जे दुसर्या धाग्यावर उत्तर लिहिले होते, त्याल काहि गृहितके होती, आणी त्यातिल एक होतं की सामान्य माणसाने काय करावे, ज्याला रोज भाव बघायला अथवा डाटा जमवून अभ्यास करायला वेळ नसतो.
असो, असं एकुण म्हणतात की शेअर बाजार हा शेवटी झीरो सम गेम आहे, म्हणजेच दुसर्‍या शब्दात सांगायच झाले तर प्रत्येक सिद्धांत कधी ना कधी (आणी कधि फार थोड्या वेळासाठी तर कधी दीर्घ काळासाठी) बरोबर ठरतो. हे जर मान्य असेल तर पुढील प्रतिसाद वाचावा, अथवा सोडुन द्यावे.
आधी नमुद करतो की आपण जो विदा दिला आहे, त्यात फक्त परताव्याचे आकडे सोडुन खूप काहि वाचता येइल, पण ते जाउदे आत्ता.
तर, जसं काहि लोकांचा टेक्निकल वर विश्वास असतो तसा काहि लोकांचा फंडामेंटल वर असतो, तर काहिंचा क्वांट वर असतो, तर काहि लोक फक्त फ्लोज बघुनहि ट्रेड करतात, आणी ह्यातिल प्रत्येक जण थोड्या फार प्रमाणात नफा कमवतो. आणी प्रत्येकाल वाटत असते कि फक्त माझीच विचार सरणी पैसे बनवुन देउ शकते आणी म्हणुनच काहि प्रमाणात तो त्या विचार सरणीने गुंतवणुक करत असतो.
पण जर मी एक सामन्य माणुस आहे, आणी मला नफा कमवायचा आहे शेअर मार्केट मधे तर मला पहिले माझी रिस्क् मिनिमाईज केली पाहिजे. कारण मला डाटा मिळाला ईकॉनोमिक टाईम्स वाचुन तरि त्याचा अर्थ काय लावायचा हे कळेलच असे नाहि, आणी बर्‍याच वेळा ते योग्य वेळी कळेलच असे नाहि. अथवा जेव्हा कळेल तेव्हा कदाचित वेळ गेलेली हि असू शकते. उदा. मी जर पेपर ९३० ला वाचायला घेतला आणी मार्केट मधे पहिल्या १५ मिन मधेच धावपळ झाली असेल तर?? जर त्याला मार्केट बीट कसे करायचे वगैरे यायला लागले तर त्याने म्युट्युयल फंड मधे फंड मॅनेजर बनावे आनि कोट्यावधी फक्त पगारात मिळवावे.
म्हणुन साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाने काय करावे ह्याचे मला जे वाटले ते विवेचन केले होते.
मी दिलेली मिथके तुम्ही रिस्क कमी करायचे पर्याय म्हणुन वाचलित तरि चालतील. कारण मला कुठेहि असं म्हणायच नाहिये कि हि गॄहितिके वापरुन तुम्हास सगळ्यात उत्तम परतावा मिळेल (कदाचित खूप दीर्घ काळात मिळेलहि, यु एस मार्केट चा गेल्या १२० वर्षांचा विदा देउ शकतो). पण ही गॄहितिके वापरल्यास तुमचा संभाव्य तोटा नक्किच कमीत कमी होऊ शकतो, जी मला वाटत ले मॅन चि पहिलि आणी अत्यंत महत्वाचि पायरि असावि स्टॉक मार्केट मधे पाउल ठेवण्या आधी. तसच आपण जर ह्या कं चा पी ई व ईतर रेशिओज पाहिले तर असं लक्षात येईल की ते फारसे करेक्ट झाले नाहियेत (टाटा स्टील सारखे कमोडिटी प्लेयर्स सोडुन). आणी जर आपणास भारताचा जी डी पी ६ - ८% वाढेल अशी खत्री असेल, तर ह्या कं चा निव्वळ नफाहि तेवढा कमित कमि वाढेल(खर तर बराच जास्ती, कारण भारताचा कॉ प्रोफिट टू जी डी पी रशिओ बराच कमी आहे), आणी जर पी ई समान राहिला तर मला गुंतवणुकीवर नक्किच बरा परतावा मिळेल.
तर तुम्ही ज्या काहि कं. ची नावे दिलि आहेत, त्यातील आय टी सी (सिगारेट मार्केट शेअर - ८५% व्हॅल्यु टर्म्स) सोडुन एकाहि कं चा मार्केट शेअर ४०% च्या वर नाहि. ईन फॅक्ट ४०% च्या जवळ पासहि नाहि. तसच त्यात काहि पी एस यु चि देखिल नावे आहेत जसं की कोल ईंडिया (उत्तम असेट्स पण तितकीच रटाळ मॅनेज्मेंट, वार्षिक उत्पादन त्याच पातळीवर ठप्प आहे) तसच भेल आणी एस बी आय पण, ज्याना मी उत्तम व्यवस्थापन म्हणुन मानत नाहि ! रिलायन्स च्या मॅनेजमेंट्ला मी तरि उत्तम च्या जवळ पासचा दर्जाहि देणार नाहि. तसच टाटा स्टील हा कमोडिटि प्लेयर आहे, तुम्हि ५ एवजी जर ६ -७ वर्ष मागे गेलात (२००८ २००९) तर हाच शेअर तुम्हाला स्टील सारखा तगडा नफा देउन गेलेला दिसेलहि.
जशी आपण ५ वर्षाचा कालावधीची आकडेवारि दिलि आहे, तसं मी पण अजुन कोणतातरि कालवधी देउन माझ म्हणण पटवुन देउ शकतो, पण त्यानि काय मिळणार आहे??
आधी म्हणल्या प्रमाणे ह्या मार्केट मधे प्रत्येक जण काहितरि स्ट्रॅटेजी वापरत असतो, आणी मला सर्वांबद्दल आदर आहे. कारण तसं पाहिल तर कोणिच सदैव चुक नसत आणी कोणिच सदैव बरोबर पण नसत.
एक सांगतो, माझ एक मित्र आहे - तो गेले १२ १५ वर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशि काहि ठराविक (३ ४ कं.चे शेअर्स घेतो, भाव काहि असो), अजुन तरि तो प्रॉफिट मधे आहे. मला हे नाहि म्हणायच कि तो करतो ती बेस्ट स्ट्रेटेजी आहे, पण त्याला ति सोयिचि वाटते आणी तो परतावा मिळवत आहे.
आपल्याकडे काहि डाटा पॉईंट्स पाहुन रिटर्न खात्रीलायक रित्या मिळवायची स्ट्रेटेजी असल्यास आणी आपण ती शेअर करायला तयार असल्यास, मला जाणुन घ्यायला खूप आवडेल.
मी वर जे काहि लिहिले आहे ते मला योग्य वाटते म्हणुन लिहिले आहे, ते वाचुन कोणिहि इन्व्हेस्ट करा असं सांगितलेलं नाहि, प्रत्येकाने आपल्या जबाबदारिवर गुंतवणुक करावी, कारण आपल्या घामाचा पैसा कितिहि कमी जास्ती असला तरि आपणा स्वताला अनमोलच असतो.

श्रीरंग_जोशी's picture

16 May 2015 - 9:14 am | श्रीरंग_जोशी

अभ्यासपूर्ण व समतोल विवेचन आवडले. हे क्षेत्र माझ्यासाठी तसे अनभिज्ञच आहे. पण मी काही वर्षांपूर्वी बरेच प्रयोग करून पाहिले.

महत्वाची सूचना - खाली लिहिलेली माहिती केवळ माहिती म्हणून बघावी. त्याचा उपयोग सल्ला समजून केल्यास अन नुकसान झाल्यास परिणामांसाठी मला व मिसळपाव.कॉमला जबाबदार धरू नये.

मी भारतात काम करत असेपर्यंत डिमॅट अकाउंट उघडूनही टॅक्स सेवर म्युच्युअल फंड घेण्याखेरीज त्याचा उपयोग केला नव्हता. कारण एकच होते उत्पन्नच एवढे जेमतेम होते की शेअर्स खरेदी करणे शक्यच नव्हते. एका वर्षी तर आयकर वाचवण्यासाठी पर्सनल लोनचे पैसे टॅक्स सेवर म्युच्यअल फंड मध्ये गुंतवले.

अमेरिकेत तुलनेत नवा असताना काही काळ भारतातील डिमॅट अकाउंटद्वारे विविध कंपन्यांने अगदी थोडे थोडे शेअर्स घेतले. त्या काळात जमेल तेवढी बचत करून भारतात (तेही पुण्यात) घर घेण्यासाठी (अर्थातच पहिले) एफ डी करत होतो. जवळपास ७० विविध क्षेत्रांतल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले (डिसेंबर २००८ ते मे २००९). बहुतांश कंपन्या वर्षानुवर्षे मार्केट (शेअर मार्केट नव्हे) टिकून असाव्यात हा थंब रुल वापरला. थोड्याफार नव्या कंपन्यांचेही पेपरमधले स्तंभ वाचून घेतले.

गुंतवणूकीच्या प्रमाणात सर्वाधिक फायदा झाला तो रिलॅक्सो फुटविअरमधे. ₹२८.९ ला खरेदी केलेला शेअर गेल्या वर्षी ₹ २३७.५ ला विकला. मधल्या काळात बोनस मिळून शेअर्सची संख्या पाच पट झाली होती. जेवढ्या रकमेत खरेदी केली त्याच्या ४० पट रक्कम विक्री केल्यावर मिळाली. ३९ पट रक्कम नफा. दुर्दैवाने मी इतके कमी शेअर्स घेतले होते की (त्यापेक्षा कमी घेणे नियमानुसार शक्य नव्हते ;-) ) या क्षेत्रातले जाणकार लोक हसतील.

७० पैकी हातांच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच कंपन्यांच्या शेअर्समधे तोटा झाला. सर्वाधिक मॉझरबेअर या कंपनीच्या शेअरमध्ये. ₹ ५५ ला घेतलेला शेअर ₹३.८५ ला विकावा लागला. मधल्या काळात बोनस शेअर वगैरे काही नाही. ही कंपनी काळाबरोबर अजिबात स्पर्धात्मक राहू शकली नाही.

तांत्रिक कारणांमुळे मी भारतात खरेदी केलेले सर्व शेअर्स विकून डिमॅट खाते बंद केले. मिळालेल्या नफ्यावर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन असल्याने भारतात तर टॅक्स भरावा लागला नाही पण अमेरिकेत माझ्या आयकराच्या रकमेत वाढ झाली (प्रत्यक्षात वार्षिक टॅक्स रिफंड कमी मिळाला).

सुधीर's picture

16 May 2015 - 11:25 am | सुधीर

जशी आपण ५ वर्षाचा कालावधीची आकडेवारि दिलि आहे, तसं मी पण अजुन कोणतातरि कालवधी देउन माझ म्हणण पटवुन देउ शकतो, पण त्यानि काय मिळणार आहे??

डेटा मायनींग बायस असू शकतो. गेल्या पाच वर्षात (एप्रिल-१० ते मार्च-१५) लमसम इंडेक्स इन्व्हेस्टमेंटचे (निफ्टी इटीएफ वा इंडेक्स्ड म्युच्युअल फंड मधले) परतावे म्हणावे तितके आकर्षक नाहीत. (९-१०%). पण त्याच कालावधित दर महिन्याला केलेल्या सम-समान (एसआयपी) इंडेक्स इन्व्हेस्टमेंटचे परतावे १५-१६% आहेत. पण याचा अर्थ ५ वर्षाच्या कालावधीसाठी इक्विटी मधली एसआयपी गुंतवणूक नेहमीच चांगली असाही होत नाही. कारण (एप्रिल-०९ ते मार्च-१४) या पाच वर्षासाठी एसआयपी इंडेक्स गुंतवणूकीचे परतावे सुद्धा ६-७% आहेत.

स्वतंत्र्य स्टॉक्स मध्ये गुंतवणूक (शॉर्ट टर्म) करण्यात काहीच हरकत नाही. पण.... गुंतवणूक विदीन इक्विटी क्लास अगोदरच वेल डिव्हर्सिफाईड असेल तरच. अन्यथा ५-६ कंपन्यांपुरतीच इक्विटी इन्व्हेस्टमेंट असल्यास पोर्टफोलिओ डिव्हर्सिफाईड नसण्याची शक्यता अधिक असेल. त्यामुळे पोर्टफोलिओ मध्ये नॉन सिस्टीमॅटीक रिस्क जास्त असेल.

प्रत्येक पोर्टफोलिओला बेंचमार्क असावा लागतो. पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी. निफ्टी ईटीएफ लार्ज कॅप गुंतवणूकीसाठी बेंचमार्कच्या जवळ जाणारे परतावे देतो. फार कमी अ‍ॅक्टीव्ह पोर्टफोलिओ मॅनेजर्स सातत्याने बेंचमार्क्स बिट करतात असे आढळून आले आहे. म्हणून कमी मॅनेजमेंट फी असलेले इंडेक्स्ड फंड्ज वा इटीएफ्स परदेशात लोकप्रिय आहेत.

शेवटी शेअरमार्केट कडे झटपट पैसे कमविण्यापेक्षा इक्विटी अ‍ॅसेट क्लास म्हणून पहायला हवे हे माझे मत आहे. दर वेळा इक्विटी क्लास शॉर्ट टर्म मध्ये फिक्स्ड इंन्कम क्लासला आउट परफॉर्म करेलच असे नाही. तो अंदाज बांधणे (कॅपिटल मार्केट एक्स्पेक्टेशन्स) ही सुद्धा अ‍ॅसेट अलोकेशन्स करण्यापूर्वीची एक पायरी आहे. हा ज्यांना इंडिव्हीज्युअल स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकडेमोडीची मेहनत करणे शक्य नाही त्यांच्यासाठी इटीएफ एक चांगला ऑप्शन आहे. निदान परतावे बेंचमार्क पेक्षा फारसे वेगळे नसतात.

प्रसाद१९७१'s picture

18 May 2015 - 11:58 am | प्रसाद१९७१

माझ्या ह्या धागा काढण्यामुळे काहीतरी गोंधळ झाला आहे.
शेयर बाजारात उत्तम परतावा मिळत नाही असे माझे अजिबात म्हणणे नाही. मला स्वताला गेल्या ४ वर्षात चांगला परतावा मिळत आहे.

पण सर्व काही फार सोप्पे आहे अश्या टाईप चे सल्ले आल्यामुळे मला ही दुसरी बाजू दाखवून द्यावीशी वाटली.
त्यातुन इतकेच सांगायचे होते की, सहज सोप्पे काही नाही.

प्रसाद भागवत's picture

18 May 2015 - 2:07 pm | प्रसाद भागवत

प्रसादराव, आपला हेतु स्तुत्य आहे पण आपले शिर्षक मात्र बाजारातील परतावा 'मिथके आणि वस्तुस्थिती' असे आहे ज्यातुनच परतावा मिळत नाही असे सुचविले गेले आहे. तेंव्हा गोंधळ झाला असेलच तर तो आपला, शिर्षक देण्यांत झालेला आहे.

आपला रोख बाजारासारख्या विषयावर सोपी, सहज चर्चा होवुच शकत नाही ,किंवा बाजारात पैसा मिळविण्याचे तंत्र 'गुढ, गुह्यच असले पाहिजे असा दिसतो. पण ज्या धाग्यांचा हवाला आपण देत आहात त्यात नेमके चुकीचे काय सांगितले आहे हे पटवुन दिलेत तर बरे पडेल.आणि दरम्यान हे करण्याच्या आपल्या प्रयत्नात आपण देत असलेल्या तर्कातील चुकांचे काय ??

बाजारांत तेजी मंदीची चक्रे असतात हे कोणीच अमान्य केलेल नाही किंवा ज्याप्रमाणे एखादे औषध कितीही प्रभावी असले तरी ते 100% उपयोगीठरेलच असे नाही तसेच बाजारातील प्रत्येक गुंतवणुकदार प्रत्येक वेळी यशस्वीच होईल असा दावाही कोणी केलेला नाही. मुळांत नव गुंतवणुक्दारांस बाजारांतील गुंतवणुकीची 'सवय' लागावी हा अशा लेखनामागचा( सल्ल्यामागचा नव्हे...मी आपणाला दुरुस्त करतो, हे सल्ले नव्हेत) उद्देश असतो आणि अशी सवय एकदा लागली की गुंतवणुक ही केवळ एकदाच केली जात नाही तर ती वारंवार केली जाते. सहाजिकच केवळ कोठल्यातरी दोन दिनांकामधील तुलना करुन आलेला निष्कर्ष हा काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचा आविर्भाव आणणेच चुकीचे आहे.

मागील एका पोस्ट्मध्येच मी आपल्या..... 'ज्याला कुठल्याही शेयर चे किंवा मार्केट चे उद्या, पुढच्या ३-६ महीन्यात, पुढ्यच्या वर्षात काय होणार हे जर माहीती असेल तर तो स्वता लागले तर कर्ज घेउन पैसे नाही का घालणार? दुसर्यां ना सल्ले विकतोय म्हणजेच त्याला त्याच्या सल्ल्या बद्दल काडीचीही खात्री नाही."..... ह्या विचारसरणीला अगदी आकडेवारीसह सविस्तर उत्तर दिले होते. त्यावर उत्तर द्यावयाचे सोडुन आपण पुन्हा पुन्हा तो मुद्द्दा उगाळताय. आजही परत सांगतो. एखाद्याकडे जर आंब्याची बाग असेल तर त्याने सगळी फळे स्वतःच खायला हवीत, जर फळे उत्तम अवीट गोडीची असतील तर तो विकेल कशाला ?? अशाच थाटाचे आपले विधान आहे.

केवळ सोपे उपाय सुचविणे म्हणजे चुकीचे, असे एखाद्याला वाट्त असेल तर आजच्या अमाप माहिती पारदर्शकपणे उपलब्ध असलेल्या जगांत शेअरबाजाराच्या जीवावर गेली 05 वर्षे प्रतिवर्षी 15% पेक्षा जास्त परतावा देत असलेल्या अक्षरशः डझनावारी योजनापैकी एखादी निवडणे यात अवघड काय आहे.?? असो. धन्यवाद

सुधीर's picture

18 May 2015 - 7:20 pm | सुधीर

आज एक इंटरेस्टींग ट्वीट वाचलं. https://twitter.com/shunalishroff/status/600270990015221760
रोनाल्ड वेनने १९७६ ला या दिवशी अ‍ॅपलेचे १०% शेअर्स केवळ ८०० डॉलर्सला विकले होते ज्याची किंमत आजमीतीस सुमारे ५८ बिलिअन डॉलर्स आहे. नशीब एकेकाचं :)