इंजिनियरींगला आल्यापासुन स्वयंपाकघर आणि इंजिनियरींग यात अनेक समान दुवे सापडले त्यातले काही पुढे देत आहे यातुन अतिशय बेसिक संकल्पना सांगता येतील.
आपण रोज चहा करतो. आपल्याला दुधाची चव पाहिजे साखरेची गोडी पाहिजे म्हणुन सगळे एकत्र करुन गरम करतो.
तसेच काही धातुंमध्ये काही विशेष गुण असतात. वेगवेगळे धातु एकत्र करुन करता येतात. याला मेटल अलॉय म्हणतात.
जसे आपल्या आवडिनुसार साखरेचे प्रमाण ठरवतो तसेच धातुंचेही ठरवता येते.
आपण ईडली करताना बघितले आहेच. पीठ घेऊन ते पात्र्ात टाकतात. आणि उष्णता दिल्यावर ते पीठ त्या भांड्याचा आकार घेते. तुम्हाला हेच धातुपासुन करता येते. धातुचा रस करा जो आकार पाहिजे त्या आकारात टाका. याला मेटल कास्टींग म्हणतात.
कणिक तयार करण्याची प्रकिया पावडर मेटलर्जी सारखीच आहे. पिठ घेतात मिठ पाणी टाकतात पुन्हा लाटुन भाजतात. तसेच वेगवेगळ्या धातुचे पिठ करतात एकत्र करुन त्यात गरजेनुसार द्रव्य टाकले जातात दबाव टाकतात आणि शेवटी तापवतात.
बॉयलर म्हणजे मोठा कुकर असतो. उच्च दाब मिळवताना अपघात होऊ शकते. बॉयलरवर कुकरसारखी शिट्टी बसवलेली असते. यात अतिशय साधी संकल्पना वापरली जाते. शिटटीला काही वजन असते. जेव्हा दाब या वजनापेक्ष्ा कमी असतो तेव्हा ती जागेवर असते. जेव्हा दाब वजनापेक्ष्ा वाढतो तेव्हा तो दाब शिट्टिला उचलतो. ही शिटटी एका छिद्र्ावर एखाद्या कव्हरसारखी बसवलेली असते. शिटटी उचलली की छिद्र मोकळे होते आणि त्यातुन वाफ बाहेर टाकली की आतला दाब कमी होतो.
शितावरुन भाताची परिक्ष्ा तिथेही करतात. भात शिजला की नाही हे जसे एका दाण्यावरुन ठरवतात तसेच फॅक्टरीमद्धे काही ठराविक वस्तुंमधुन एक बाहेर काढतात आणि त्यातुन तो पुर्ण 'भात' कसा झाला हे काढतात. याला सॅंपलिंग इन्स्पेशन असे म्हणतात.
वेळेअभावी इथेच थांबतो.
प्रतिक्रिया
14 May 2015 - 12:32 pm | gogglya
जे काही तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते !