स्वयंपाकघरातील इंजिनियरींग

शब्दानुज's picture
शब्दानुज in तंत्रजगत
8 May 2015 - 7:38 pm

इंजिनियरींगला आल्यापासुन स्वयंपाकघर आणि इंजिनियरींग यात अनेक समान दुवे सापडले त्यातले काही पुढे देत आहे यातुन अतिशय बेसिक संकल्पना सांगता येतील.

आपण रोज चहा करतो. आपल्याला दुधाची चव पाहिजे साखरेची गोडी पाहिजे म्हणुन सगळे एकत्र करुन गरम करतो.
तसेच काही धातुंमध्ये काही विशेष गुण असतात. वेगवेगळे धातु एकत्र करुन करता येतात. याला मेटल अलॉय म्हणतात.
जसे आपल्या आवडिनुसार साखरेचे प्रमाण ठरवतो तसेच धातुंचेही ठरवता येते.

आपण ईडली करताना बघितले आहेच. पीठ घेऊन ते पात्र्ात टाकतात. आणि उष्णता दिल्यावर ते पीठ त्या भांड्याचा आकार घेते. तुम्हाला हेच धातुपासुन करता येते. धातुचा रस करा जो आकार पाहिजे त्या आकारात टाका. याला मेटल कास्टींग म्हणतात.

कणिक तयार करण्याची प्रकिया पावडर मेटलर्जी सारखीच आहे. पिठ घेतात मिठ पाणी टाकतात पुन्हा लाटुन भाजतात. तसेच वेगवेगळ्या धातुचे पिठ करतात एकत्र करुन त्यात गरजेनुसार द्रव्य टाकले जातात दबाव टाकतात आणि शेवटी तापवतात.

बॉयलर म्हणजे मोठा कुकर असतो. उच्च दाब मिळवताना अपघात होऊ शकते. बॉयलरवर कुकरसारखी शिट्टी बसवलेली असते. यात अतिशय साधी संकल्पना वापरली जाते. शिटटीला काही वजन असते. जेव्हा दाब या वजनापेक्ष्ा कमी असतो तेव्हा ती जागेवर असते. जेव्हा दाब वजनापेक्ष्ा वाढतो तेव्हा तो दाब शिट्टिला उचलतो. ही शिटटी एका छिद्र्ावर एखाद्या कव्हरसारखी बसवलेली असते. शिटटी उचलली की छिद्र मोकळे होते आणि त्यातुन वाफ बाहेर टाकली की आतला दाब कमी होतो.

शितावरुन भाताची परिक्ष्ा तिथेही करतात. भात शिजला की नाही हे जसे एका दाण्यावरुन ठरवतात तसेच फॅक्टरीमद्धे काही ठराविक वस्तुंमधुन एक बाहेर काढतात आणि त्यातुन तो पुर्ण 'भात' कसा झाला हे काढतात. याला सॅंपलिंग इन्स्पेशन असे म्हणतात.
वेळेअभावी इथेच थांबतो.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 10:20 pm | संदीप डांगे

हे सर्व तुम्ही लिहिलेले इंग्रजीत नसल्याने काहीच कळले नाही... आणि मराठीत लिहिल्याने ते इंजिनिअरिंगच नाही असे आमच्या काही मित्रांचे म्हणणे आहे. (ह. घ्या)

जोक्स अपार्ट. बाकी कल्पना आवडली.
सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगितले. आमचेही म्हणणे असेच काहीसे होते. असो.

अनुप ढेरे's picture

8 May 2015 - 10:22 pm | अनुप ढेरे

चान चान...

मला काही वेगळंच वाटलं होतं. मागे एकदा जॅक डॅनियलने स्वयंपाकातली केमिस्ट्री यावर एक माष्टरक्लास घेतला होता, तसं काहीतरी वाटलं.

पैसा's picture

9 May 2015 - 8:46 am | पैसा

केमिकल्स कसली होती?

आदूबाळ's picture

9 May 2015 - 10:47 am | आदूबाळ

नेहेमीची आपली. केमिकल इंजीनियरिंगमध्ये शिकलेली तत्त्वं स्वैपाकात कशी वापरता येतात असा मुद्दा होता. उदा० बटाटेवडा तळताना कोणती केमिकल रिऍक्शन होते, वगैरे.

पैसा's picture

9 May 2015 - 11:09 am | पैसा

जेडीचं नाव बघून अंमळ वेगळी शंका आली!

हाडक्या's picture

10 May 2015 - 1:34 am | हाडक्या

घ्या.. तुमच्या मनातच पाप हो. बाकी कै नै.. ;)

शेखरमोघे's picture

8 Jul 2015 - 3:22 am | शेखरमोघे

थोडेसे विषयान्तर - एका (जुन्या काळातील) राजकीय नेत्याला (जाडी कमी करण्याकरता) हलके अन्न खाण्याचा वैद्यकीय सल्ला मिळाला. त्याने पुढील तर्क लढवत "आता मला खायला फक्त बटाटेवडेच चालतील" असे जाहीर केले.
१.आपल्याला माहीत असलेल्या रोजच्या खाण्याच्या वस्तूत पाणी बरेच हलके असते कारण अनेक खाद्य पदार्थ त्यात बुडतात.

२. तेल तर पाण्याहून हलके कारण पाण्यावर तरन्गते, आणि बटाटेवडे त्याहून हलके कारण तयार होतानाच कसे छान तेलावर तरन्गतात!!

अच्छा, म्हणजे शिट्टीला जे वजन असतं तेसुद्धा हिशेब करून ठरवलं जातं! कधी लक्षात नव्हतं आलं...

धन्यवाद!

पिवळा डांबिस's picture

9 May 2015 - 11:17 am | पिवळा डांबिस

"उचलली शिट्टी, केलं छिद्र मोकळं, आणि टाकली वाफ बाहेर"
असं कायसंसं फिलिंग आलं!!!!
:)

तिमा's picture

9 May 2015 - 11:31 am | तिमा

या विषयावर कोणी, स्वयंपाकघरातील वापरल्या जाणार्‍या यंत्रांवर विंजनेर भाषेत विवेचन करावे. तसेच, 'चिट्टी चिट्टी बँग बँग' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, अंड्यापासून आपोआप ऑम्लेट तयार होऊन ते तुमच्या बशीत, अलगद कसे येते, असल्या काहीतरी मॉडर्न इंजिनिअरिंगबद्दल लिहा.

पिवळा डांबिस's picture

9 May 2015 - 11:36 am | पिवळा डांबिस

अंड्यापासून आपोआप ऑम्लेट तयार होऊन ते तुमच्या बशीत, अलगद कसे येते

= प्रेमळ बायको!!!
आमच्या सासर्‍यांचं 'मॉडर्न इंजिनियरिंग'च ते!!!!
:)

घरात आपली आई साखर दोन डब्यात भाऊन ठेवते, ऐक डबा संपला कि दुसरा डबा वापरात काढल्या क्षणीच, वाण्याकडून पहिल्या डब्यात मावेल इतकी साखर घ्यायची, ह्या प्रक्रीयेला 2 बिन इन्वेंटरी म्यानेजमेंट सिस्तिंम, असे ओप्रेशनल रिसर्च विषयामध्ये म्हणतात, याचा प्रत्यय इंजी व एम बी ए, दोहोमध्ये आला.

सतिश गावडे's picture

9 May 2015 - 12:12 pm | सतिश गावडे

दोन गॅस सिलिंडर्सचंही असंच असतं. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2015 - 1:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जस्ट इन टाईम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

"जस्ट इन टाईम" च्या दृष्टीने "टू बिन् सिस्टीम" मधला दुसरा न वापरला जाणारा सिलिंडर (पहिला संपेपर्यंत राखीव ठेवलेल्या काळात) "अव्हॉइडेबल वेस्ट/लॉस" होईल !

जस्ट इन टाईम म्हणजे पहिला सिलिंडर कधी संपणार याचे कोष्टक ठरवून दुसरा सिलिंडर असा मागवायचा की तो पहिला सिलिंडर संपण्याच्या वेळेस (व्यवहारात, फारतर एक दिवस आधी) आला पाहीजे; थोडक्यात न वापरले जाणारे संसाधन (अनयुज्ड असेट) शून्य (व्यवहारात, जवळ जवळ शून्य) असले पाहिजेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2015 - 7:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्याकडची सिलिंडर डिलीव्हरी सिस्टीम तेवढी भरवशाची नाही. ऑर्डर दिल्यापासुन एका विशिष्ट कालावधीमधे सिलिंडर मिळाला असता तर जे.आय.टी. वापरता आलं असता. तसचं सिलिंडर कधी संपेल ह्याचीही खात्री आपण देउ शकत नाही (पाहुणे वगैरे) पण वेळेआधी आलेल्या सिलिंडर मुळे तसं पहायला गेलं तर जागेचा अपव्यय सोडला तर बाकी कुठलाही थेट भार ग्राहकाला सोसायला लागत नाही. मोठ्या कंपन्यांच्या इन्व्हेंटरीच्या बाबतीमधे मात्र गोडाउन, सिक्युरिटी, ए.एस.आर.एस., वीज, त्या पद्धतीचं मटेरियल साठवायसाठी विशिष्ट पद्धतीच्या वातावरण पद्धती गरजेच्या असतील तर तो खर्चं (उदा. रेफ्रिजरेशन वगैरे) एवढे खर्च करावे लागतात. त्यापेक्षा लागणारं मटेरिअल लागणार्‍या प्रमाणात लागणार्‍या स्पेसिफिकेशन्स मधे आणि लागणार्‍या जागी आणणं हा पैसा वाचवायचा उत्तम उपाय ठरतो.

पण ह्यामधे काही रिस्क्स ही आहेत. एखाद्या वेळी एखाद्या व्हेंडरकडुन पुरवठा झाला नाही तर आख्खी लाईन बंद राहु शकते. काही तासांमधे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होउ शकतं. (व्हेंडर क्लॉज मधे ह्याचा खर्च व्हेंडरवर डेबिट टाकुन वसुल केला जातो.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी फक्त "टू बीन" आणि "जस्ट इन टाईम" या दोन वेगळ्या प्रणाल्यांमधील फरक सांगितला होता. :)

गॅस पुरवठ्याच्या बाबतीत भारतातील सिलेंडरने पुरवठा ही पद्धत JIT ला योग्य नाही; ते पाईपने गॅस पुरवठा केल्यासच (आणि ते ही भरवशाने केले तरच) शक्य आहे.

हाडक्या's picture

10 May 2015 - 1:43 am | हाडक्या

वा वा .. !! ज्ञानकण ! ज्ञानकण !! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2015 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपरोधाचे कारण समजले नाही.

काही चूक असल्यास समजाऊन घ्यायची इच्छा आहे.

अहो, उपरोध नाही हो एक्का काका.. :)
खरंच आनंदाने म्ह्टलंय. इतर वेळी इतकी चेष्टा मस्करी चाललेली असतेच की. पण असं माहिती वाढवणारं काही वाचायला मिळालं की पण मस्त वाटतं.

पगला गजोधर's picture

9 May 2015 - 12:36 pm | पगला गजोधर

पण सिलिंडरच्या त्या प्रकाराचे, first in first out (fifo) शी नाते जास्त जवळचे वाटते.

सतिश गावडे's picture

9 May 2015 - 12:41 pm | सतिश गावडे

first in first out (fifo) हे जरा सविस्तर समजावून सांगा ना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2015 - 1:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फीफो अर्थात फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जे रॉ मटेरिअल पहिल्यांदा आलेलं आहे त्यावर प्रक्रिया करुन त्याचं उत्पादनात रुपांतर करुन बाहेर काढणं.

फिफो प्रमाणेच LIFO (Last in first out), FILO (First in last out), FICFO (First in Cure first out), LICLO (Last in cure last out) अश्या अनेक पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी FICFO आणि LICLO फक्त ज्या उत्पादनांना क्युअरिंग आवश्यक असतं अश्या ठिकाणी वापरलं जातं. जसं की वाईन, लोणची वगैरे वगैरे. इन्व्हेंटरी कॉस्ट कमी करायसाठी ह्या गोष्टी माहित असणं खुप आवश्यक असतं.

टवाळ कार्टा's picture

9 May 2015 - 5:30 pm | टवाळ कार्टा

हे सगळे सगाला माहित नसेल असे तुला का वाटले बालका?

पुढच्या वेळेस यापेक्ष्ा जास्त अवघड संकल्पना मांडेन. अवघड सुरवातितुन ते निरस झाले असते माझ्याकडुन. सर्वांना सर्व माहित असेलच असे नाही. काही प्रतिकियातुन तुम्ही ते पाहु शकाल.

सतिश गावडे's picture

9 May 2015 - 10:40 pm | सतिश गावडे

@टका - मी तो प्रश्न मुद्दाम विचारला.
फिफो, लिफो वगैरेची आपल्याला माहिती असलेली उदाहरणे (क्यू, स्टॅ़क वगैरे) ही डेटा स्ट्रक्चर्समधील आहेत. मॅन्युफॅक्च्युरिंगमधील काय उदाहरणे असतात ते माहिती करुन घ्यायचे होते. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2015 - 11:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगाला माहित असलं तरी बाकी जगाला माहित असेलचं असं नाही रे बालका. ;)

शब्दानुज's picture

10 May 2015 - 8:08 am | शब्दानुज

संभाव्य धोका पाहता मी संपादक मंडळाला बालविकास व संरक्षण मंडळ स्थापण्याची शिफारस करतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 8:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गल्ली चुकलात का काय रावसाहेब?

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 9:20 am | टवाळ कार्टा

आणि मला झेड+ शिकूरीटी

पगला गजोधर's picture

9 May 2015 - 2:28 pm | पगला गजोधर

शिवाय माझी आई, कोणताही खाद्य पदार्थ (पोहे भाजी आमटी वै) तयार करण्याआधी सर्व लागणारी सामग्री (चिरलेला कांदा तमाते आल लसुन पेस्ट खवलेले खोबरे वै ) ओट्यावर क्रमाने ठेवली जाईची ( ज्या क्रमाने ते कढइत जाणे आपेक्षित आहे, त्या क्रमाला सह्हायक अश्या प्रकारे )पुढे ह्या अश्या पद्धतीच 'टोयोटा असेम्ब्ली लाइन' समजून घेताना उपयोग झाला.

इथले संचालक मंडळ चवीचे स्फोट करते तरीही चौकशीचे आदेश देता येत नाहीत.

ह भ प's picture

9 May 2015 - 6:27 pm | ह भ प

आपला घरातला नेहेमीचा प्रेशर कूकर (नवा, चांगल्या कंपनीचा) किती दाबानंतर फुटतो?
एकक 'बार' किंवा 'किलोग्रॅम प्रती स्क्वेअर सेंटीमिटर' समजू..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2015 - 7:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मेल्टिंग सीलही असल्यानी वन इन बिलियन चान्स असतो फुटायचा. त्यातही तुम्ही समुद्रसपाटीपासुन किती उंचीवर स्वयंपाक करत आहात हा मुद्दा महत्त्वाची भुमिका पार पाडतो.

स्पंदना's picture

10 May 2015 - 12:13 pm | स्पंदना

बर्मग्काय्ठरल?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 12:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काय्नाय्बॉठरलाजुन्ठरलंकिसांगतोकी.

वाईच्जल्दिकराभात्कापोळ्या. मलालईकाम्हायतीबाकिची.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 12:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भात्बीनकोअन्पोळ्याबीनकोत्झॅक्तांब्डापांढराअन्ज्वारीचीभाक्रीचालतय्ब्गात्याब्रबोर्हिर्व्यामिर्चीचाठेचामिळालात्तर्सोन्याहुन्पिवळं.

सिंगापुरात रोटीप्राता बनवताना,त्याला हाताने लाटून/ थापून, भिरभिर्यासारखे हवेत उडवून परत हातात क्याच करताना एरोडायन्यामिक्स कशी त्यात आपली भूमिका अदा करते ते ...

शब्दानुज's picture

10 May 2015 - 2:24 pm | शब्दानुज

मला नाही वाटत तिथे एरोडॅनामिकचा संबध असेल.
तुम्ही पाण्यात पोहलात का? तुम्हाला जाणवले असेल की पाणी तुम्हाला सहजासहजी पुढे जावु देत नाही. प्रत्येक फ्लुईड असेच वर्तन करते
हवा हेही फ्लुईड आहे तेही पुढे जायला अडवत असते. जेवढा जास्त संपर्क तेवढा जास्त विरोध.
म्हणुन नव्या गाडीला streamlined असते ज्यात गाडी पुढे जाताना हवा बाजुला टाकली जाते.
आकार बघितल्यास पुढुन मागे वाढत जातो ज्यातुन सुरूवातिला कमी संपर्क येतो नंतर वाढवला जातो.
कारण तुम्हाला आम्हाला चपटं करुन गाडित
नाय घालता येत.

आणि तुम्ही रोटी कायम हवेत उडण्यासाठी करणार नाही त्यामुळे जेवढा जास्त विरोध असेल हवेचा तितकी लवकर खाली येईल नाहीतर त्या इतरत्र उडण्यारया रोटीमागे पळण्यात दुसरया जेवणाची वेळ व्हायची.

संदीप डांगे's picture

10 May 2015 - 4:26 pm | संदीप डांगे

उडत्या रोटीत सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर करून रोटी कमी श्रमात मोठी केली जाते.

त्यासाठी कणीक खूपच सैल मळावी लागेल ना? म्हणजे पर्यायाने मैदा वापरायला लागेल.

संदीप डांगे's picture

11 May 2015 - 2:20 am | संदीप डांगे

मैदाच वापरायची तशी गरज नाही. पण थोडं सैल तर लागेलच.

हुप्प्या's picture

11 May 2015 - 3:52 am | हुप्प्या

मुगाच्या डाळीची तांदूळाबरोबर खिचडी बनवतात. पण तूर, उडीद ह्यांची बनवत नाहीत. ह्याचे कारण मूग व तांदूळ एकदम शिजतात. बाकीच्या डाळी उशीरा शिजतात. हा बहुधा स्पेसिफिक हीट ह्या गुणाशी संबंधित असावा असे वाटते. चूभूद्याघ्या.
परोठे सदृश पदार्थ ज्याच्या आत सारण भरलेले असते ते चांगले बनायचे असेल तर दोन्ही एकत्र शिजणे आवश्यक आहे. पोळी कच्ची व आतले सारण शिजलेले वा उलट झाले तर चांगले होत नाही. हा ही स्पेसिफिक हीटशी संबंधित प्रकार असावा असे वाटते.
साखरेचा वा गुळाचा पाक आणि त्याचे गुणधर्म ह्याविषयी विज्ञान काय सांगते ते समजावून घ्यायला आवडेल. एकतारी पाक, तीन तारी वगैरे फिजिक्सच्या भाषेत कुठला गुणधर्म आहे? चिकटपणा मोजण्याचे काही माप आहे का?

एक अजून सोपा वैज्ञानिक प्रकार म्हणजे वेलची वगैरे सुगंधित मसाले पदार्थ शिजताना घालत नाहीत. शेवटी पदार्थ थोडा थंड झाल्यावर घालतात. उदा. खीर, लाडू इ. ह्याचे कारण म्हणजे ह्यातील उडून जाणारे (व्होलाटाईल) तेल. ह्या तेलामुळेच तो विशिष्ट स्वाद त्या मसाल्याला मिळतो. तपमान जास्त असेल तर हा स्वाद उडून जातो आणि मग पदार्थाला हवा तितका स्वाद लाभत नाही. याउलट कांदा, लसूण शिजवून घालतात म्हणजे त्याचा अतिरिक्त उग्र स्वाद पदार्थात उतरत नाही.

शब्दानुज's picture

11 May 2015 - 8:01 am | शब्दानुज

बाकी प्रश्णांबाबत साशंक आहे पण चिकटपणा ' व्हिस्कोसिटी ' यातुन मोजला जाऊ शकतो.

किंवा सरळ एक बॉक्स घ्या छोटासा जो वरुनखालुन रिकामा असेल
एका सपाट भागावर तो ठेवा. त्यावर बॉक्स ठेऊन पदार्थ अोता. बॉक्स अलगद उचला. पदार्थ काही प्रमाणात पसरेल. प्रत्येक पदार्थ कमी अधिक प्रमाणात पसरतो त्यातुन जो कमी पसरला तो जास्त चिकट
वरचा शब्द व्हिस्कोसिटी याबाबत वापरतात जो त्या पदार्थातिल वाहण्याला होणारा विरोध दाखवतो.
पदार्थाचे कण एकमेकांना धरुन असतात. पदार्थ वाहतो आहे म्हणजे त्यांची धरुन ठेवण्याची क्षमता कमी होत आहे .म्हणजे चिकटपणा कमी होत आहे.
बाकी प्रश्णांची उत्तरे इतर मिपाकर देतीलच.
स्पेसिफिक हिट म्हणजे एका डिगिने तापमान वाढवण्यासाठि किति उष्णता लागते.
सोप्या शब्दात सांगायचे तर काही माणसे शिघ्रकोपी असतात थोड जरी बोललं की पारा चढतो. म्हणजे स्पेसिफिक हिट कमी आहे.
जेव्हा उष्णता दोन पदार्थांना देतात ती दोघांकडुन वेगवेगळी वाटली जाते. [एकसारखच शिकवताना ज्याचा लक्ष जास्त त्याला जास्त कळत असातला प्रकार] जर दोघांनाही मिळालेली उष्णता ते शिजतील अशी असली की झालं .
इतर प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतिक्ष्ेत.

पगला गजोधर's picture

11 May 2015 - 11:46 am | पगला गजोधर

एकतारी पाक, तीन तारी वगैरे फिजिक्सच्या भाषेत कुठला गुणधर्म आहे?

कोहेसिवनेस, अधेसिवनेस व कॅपीलॅरीटी …

साखरेचा वा गुळाचा पाक आणि त्याचे गुणधर्म ह्याविषयी विज्ञान काय सांगते ते समजावून घ्यायला आवडेल. एकतारी पाक, तीन तारी वगैरे फिजिक्सच्या भाषेत कुठला गुणधर्म आहे? चिकटपणा मोजण्याचे काही माप आहे का?

या संदर्भात मला आवडलेलं एक पुस्तक---- स्वयंपाक घरातील विज्ञान
डॉ. वर्षा जोशी
रोहन प्रकाशन

gogglya's picture

14 May 2015 - 12:29 pm | gogglya

ज्ञान नाही पण स्वत: सामिष पाक्रू बनवत असल्यामुळे कान्दा परतताना जर जास्त वेळ घेऊन मन्द आचेवर परतला तर चव अजुन छान लागते. दम बिर्याणी, खीमा आणी अजून पदार्थ बनावताना याचा अनुभव घेतालेला आहे. सध्याच्या जमान्यात cycle time reduction च्या नादात मुलभूत वेळेला महत्व देण्यात यावे या ठाम मतापर्यन्त पोहोचलो आहे.

पगला गजोधर's picture

14 May 2015 - 12:15 pm | पगला गजोधर

कान्दा परतताना जार जास्त वेळ घेऊन मन्द आचेवर परतला तर चव अजुन छान लागते

बर झालं, मिपावर कामाचा माणूस भेटला ….
@gogglya, एक फ़्लेवर मला जमत नाहीये… शंका विचारायला …. व्यनि करू कि खरड टाकू ?