साधु हास्यानंद 2

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
3 May 2015 - 7:48 pm

आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो.  भुतकाळातील आनंदी क्षण  विसरतो,  दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो.  आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो.  जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल,  आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, '

हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.

' आज मी काय करीत आहे ते पहा स्वतःकडे थोडे लक्ष द्या,  आज मी कोणते कार्य केले त्या कार्यातून मला खरोखरच आनंद मिळाला का ? हे स्वतःला विचारा,  जेव्हा तुम्हाला याचे उत्तर सापडेल तेव्हा तुमच्यात खरोखरच बदल घडेल, '

' आणि दुःखावर मात करण्यासाठी ह्याची सवय लावली पाहिजे,  श्री कृष्ण गीतेत म्हणतात, ' उद्याची चिंता सोडा, ' कारण उद्या तुम्ही घडवत आहात,  आज तुम्ही  दुसर्‍याची निंदा केलात त्याचा परिणाम दुसऱ्यावर न होता जास्त करून स्वतःच्याच मनावर होतो हे लक्षात ठेवा, प्रत्येकास साधे व सरळ आयुष्य मिळालेले असते पण स्वतःच्या विचाराने मनुष्य घडतो, '

ह्या प्रवचना नंतर हसरे बाबा खुप ठिकाणी प्रसिद्ध झाले,  अनेक गावातील लोक त्याचा सल्ला घेण्यास येऊ लागले. आलेला प्रत्येक भक्त हसत मुखाने बाहेर येत.

एक दिवस साधु हास्यानंद आजारी पडले,  गावातील व आसपासच्या गावातील लोक त्याना पाहण्यासाठी येऊ लागले,  ते हसत सर्वांना आशिर्वाद देत.

त्या दिवशी साधु हास्यानंद अंगणात बिछान्यात झोपले होते,  त्याच्या भोवती गावकरी उभे होते,  साधु हास्यानंद यानी हळुच आपले डोळे उघडुन गावातील लोकांना पाहिले,  लगेच गावातील दोन लोक त्याच्या जवळ बसले.

सर्वांना माहिती  होते की,  साधु हास्यानंद काहीतरी बोलतील,  आणि ते  हाळु आवाजात म्हणाले, ' मी आता जास्त वेळ तुमच्या बरोबर राहू शकत नाही,  त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर मला आहे त्या अवस्थेत  
अग्नी द्या,  माझे कपडे बदलू नका,  मला अंघोळ घालु नका, '

एवढे बोलून साधु हास्यानंद या जगाचा निरोप घेतला.
सर्व गाव दुःखात बुडाले.

रात्र झाली होती,  साधु हास्यानंद सांगितल्या प्रमाणे त्याना आहे त्या अवस्थेत अग्नी देण्यात येणार होती.

सर्व गावकरी जमले होते,  साधु हास्यानंद याचा मृतदेह त्या चंद्र प्रकाशात  सर्वांना दिसत होता.

शेवटी त्याच्या मृतदेहाला अग्नी दिला आणि सर्वाना दुःख वाटले.
प्रत्येकजण अश्रू पुसत होता.

काही क्षणात त्या अग्नी तुन एक एक करीत दारू गोळा बाहेर येऊन आकाशात उडू लागले,  आकाश अनेक रंगाने उजळला.

गावकरी आश्चर्य चकित होऊन पाहु लागले,  ती  चमक व प्रकाश पाहुन त्याची मने आनंदीत झाली.

जाता जाता साधु हास्यानंद यानी सर्वांना आनंदीत केले.

समाप्त

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

3 May 2015 - 8:10 pm | नगरीनिरंजन

काय उपयोग? एकाही ग खाली टिंब नाहीय. ;-)
बाकी कथा समजली आणि बरी वाटली. दोन भाग नसते तरी चालले असते.

पैसा's picture

3 May 2015 - 8:09 pm | पैसा

गोष्ट आवडली. पण़ मोजींंचा अकाउंट़ ह्याक़ झाला का़ काय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 8:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चितेतुन दारु गोळा उडु लागला? ह्म्म...पोस्ट मॉर्टेम करायला हवं होतं. गॅसेस झाले असणार खुप.

मोहनराव's picture

4 May 2015 - 2:51 pm | मोहनराव

खिक्क!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2015 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोजी बर्‍याच दिवसांनी आले; पण आले ते स्वतःचा ट्रेडमार्क (अशुद्धलेखन, शब्दांच्या आजूबाजूची अगम्य टिंबे, अतार्किकता, वाहनांचे चमत्कार घडवणारे अपघात, इ, इ) विसरून आले.

मोजी क्यां हों गंया तुमकाँ ??? कहांं ग़या हंमंरां मोजी (कपाळ बडवणारी स्मायली कल्पावी) ???
कुछ लेते क्यों नही... क्यों नही... क्यों नही... (प्रतिध्वनी आल्यासारखे वाचावे) !!!

शिवोऽहम्'s picture

4 May 2015 - 3:19 am | शिवोऽहम्

कुछ जम्या नहीं. जीवनराव, तुमच्याकडुन काहीतरी अद्भुत, अचाट, अतर्क्य असे वाचायला मिळेल या अपेक्षेने धागा उघडला तर हे काय नस्ते चर्हाट?

मोटरसायकलच्या धडकेमुळे ट्रक पुलावरून कोसळला वगैरे येऊ देत..

मोजी,बास करा हे शुध्दलेखन आणि टिंबं न देणं,सरळ कथा लिहिणं.नाही वाचवत अाता.

खटासि खट's picture

4 May 2015 - 11:33 am | खटासि खट

खरंच. वाघाने घासफूस खाऊ नये म्हणतात..

खटासि खट's picture

4 May 2015 - 11:21 am | खटासि खट

अगं बाई ! पहिल्या भागात पण आतीशबाजी आहे का हो भावजी ?

असंका's picture

4 May 2015 - 11:30 am | असंका

संपली?

नाही, छान होती गोष्ट पण ते अटीचं काय झालं ते सांगितलंच नाहीत की....

नाखु's picture

4 May 2015 - 11:40 am | नाखु

जीमोंच्या कथेत गुंतवळ-विषय,नी सोंच्या कथेत कथासार आणी अकुंच्या कथेत अर्थ शोधायचा नसतो.

नवी चारोळी:

कथा वाचली तर आनंद
कथा वाचवली तर अत्यानंद
कथा समजली तर परमानंद
जींमो हरवले तर देव आनंद*

*(सन १९८६ ते अखेरपर्यंतचाच)
गरजूंसाठी उप्युक्त लिंकाळी देवकार्य

असंका's picture

4 May 2015 - 12:13 pm | असंका

:-))

ते नी सो काय आहे ते कळळं नाय...

नाखु's picture

4 May 2015 - 12:51 pm | नाखु
असंका's picture

4 May 2015 - 7:13 pm | असंका

अगायायायायाया
(अत्ता कळलं)

:-))

तिमा's picture

4 May 2015 - 12:42 pm | तिमा

तुमच्या कथा नेहमी बोधकथा असतात. पण ह्या कथेतून काय बोध घ्यावा ते कळले नाही.
तब्येतीची काळजी घ्या, त्याशिवाय खास कथा प्रसवणार नाहीत.

एस's picture

4 May 2015 - 1:28 pm | एस

मोजी सुधारल्याचा तसा आनंद आहे, पण आता पूर्वीसारखे त्यांच्या धाग्यावर आनंदाने प्रतिसाद देता येणार नाहीत याचे दु:ख पण!... :-(

मोहनराव's picture

4 May 2015 - 2:53 pm | मोहनराव

हमरे मोजी कहां गए? :(

(एक मोजी फॅन)

मोजीं च्या कथेत आता राम नाहि राहिला :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 May 2015 - 9:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रांम!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2015 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

"मोजींच्या* कथेत काय जान नाय राह्यली भाय" असं म्हणायचं आहे काय तुम्हाला ?!

* mohite jeevan उर्फ मोजी