अनुत्तरीत प्रश्न

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
2 May 2015 - 9:11 am

लहानाचा झालो मोठा, पंखात आले बळ,
बुडलो ज्या रंगात तो माझाच रंगच होई,

होती स्वप्न डोळ्यात, होते बळ पंखात,
मागे न बघता, स्वप्नात जगत राही,

सरले सगळे दूर, ठेविले सगळे मागे,
आठवणींना सुद्धा आसवात बुडवित राही,

झोकून देई स्वतःला, गुलाबी या चिखलात,
शोधितो असे काय, न मिळून कशात राही,

उघडून पाहतो मुठ, हात रिते दिसतात,
रेषांची जाळी मात्र, सामोरी भुलवत राही,

काही करू तरीही, तहान ही शमेना,
वासनेच्या दलदलीत, अडकत मी राही,

मृगजळामागे भ्रमाच्या, नेहमी धावत आहे,
थकून जातो जेव्हा, घेरून निराशा राही,

शोध हा संपेल, का होईल तो सुरु आता,
अजणतेच्या अंधारात, मी घुटमळत आता राही,

घेतला श्वास पहिला, जन्मलो होतो जेव्हा,
संपेल का हा शोध, थांबेल तो तेव्हा ?

समजून घेण्या कोडे, कोठे सुरवात करावी,
फक्त हाच प्रश्न आता अनुत्तरीत राही,

पारिजात.

फ्री स्टाइलमुक्तक

प्रतिक्रिया

मितान's picture

2 May 2015 - 9:23 am | मितान

'उनुत्तरीत'कविता !
यमक-छंद वगैरे टोटल लागेना हो !!!

पैसा's picture

2 May 2015 - 10:22 am | पैसा

आता अनुत्तरित झाली ही कविता!

आपण मेलो की सगळेच संपणार हो! आमचे गुरुजी म्हणतात सगळेच टेंपररी आहे. मग कसला शोध आणि कसली उत्तरे! आज काय आहे तेवढंच बघायचं.

विवेकपटाईत's picture

2 May 2015 - 9:31 am | विवेकपटाईत

न सुटणारा प्रश्न आहे हा, महाभारतातला ययाति हे पात्र मनुष्याच्या कधी न संपणाऱ्या भोगाचे चित्र आहे.

विशाखा पाटील's picture

2 May 2015 - 10:16 am | विशाखा पाटील

'अजनाते' 'श्वाश' 'उनूत्तरित'... बाकी चांगलंय.