साधु हास्यानंद 1

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
1 May 2015 - 11:50 am

एक गाव होते.नाव होते आनंदपुर.गाव लहान होते पण गावचे लोक खुप आनंदी आसे. त्याचे एकच कारण होते ते म्हणजे त्या गावात एक साधु बाबा राहत. त्याचे नाव त्याच्या स्वभावा नुसार पडले होते. त्याचे नाव होते साधु हास्यानंद . लोक त्याना हासरे बाबा नावाने ओळखत.
गावातील जवळ जवळ सर्वच लोक त्याचा सल्ला घेत. त्यामुळे गावातील लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला दिसत.

एक दिवस गावातील लोकांनी त्याचा प्रवचनाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरविले. मग प्रतिष्ठित मंडळीनी त्याना या कार्यक्रम बद्दल सांगितले त्या वर ते म्हणाले,
'मला खुप खुप आनंद झाला,  तुम्ही मला माझे विचार सागण्याची विनंती केली,  त्याबद्दल धन्यवाद,  मी तयार आहे तुमच्या विनंती नुसार, '
सर्व जण खुश झाले, एकमेकांशी बोलू लागले.
तेवढ्यात ते म्हणाले, ' पण एका अटी वर,'
सर्व जण एकमेकांकडे आश्चर्याने पाहु लागले,  ते पाहून साधु म्हणाले, ' एवढे काही विशेष नाही,  एक गंमत तुम्हाला सांगतो ते ऐका, एकदा काय झाले गणपती बाप्पा आपला प्रसाद खात होते, खुप वेळ झाला ते प्रसाद खात होते,  ताटातील प्रसाद संपत होता,  आणि गणपती बाप्पा ना वाटत होते की नेहमी आपल्या जवळ आपला प्रसाद चोरून खाणारा उंदीर कुठे दिसत नाही म्हणुन ते आजुबाजूला पाहत प्रसाद खात होते.अचानक त्याना मोठी शिंक येते आणि बाप्पा शिंक तात व बरोबर त्याच्या समोर त्याना उंदीर दिसतो.
मग गणपती बाप्पा त्याला विचारतात ,' तु कोठे होतास रे?,'
तर उंदीर म्हणाले, ' तुम्ही मला प्रसाद कमी देता म्हणून मी तुमच्या सोंडेत लपलो होतो,'
त्यावर गणपती बाप्पा मोठ मोठ्याने हसु लागले आणि विचारले, ' पण कधी? ,'
त्या वर उंदीर म्हणाले, ' जेव्हा तुम्ही झोपला होता तेव्हा, '
यावर ऐकणारे सर्व लोक ही जोरजोरात हसु लागले, त्यानंतर त्याचा आशिर्वाद घेऊन बाहेर जाऊ लागले.

प्रवचन या कार्यक्रम आस अजुन एक आठवडा बाकी होता,  म्हणुन गावातील लोकांनी जवळ पास च्या गावातील लोकांना ही कार्यक्रम येण्याचे सांगितले.  
त्यामुळे भरपूर लोक आपल्या गावात येणार व एक उत्सवाचे वातावरण तयार होणार याची उत्सुकता प्रत्येकास लागली होती.
अनेकांना त्या दिवसाची ओढ लागली होती.

शेवटी तो दिवस उजाडला,  सकाळपासून आसपासच्या गावातून गाड्या भरून फुले येत होती. गावातील लोकांनी भव्य मंडपाची सजावट चालु केली होती. मंडप फुलाने बहरला होता.
साधु हास्यानंद याची बैठक व्यवस्था सर्वांना आकर्षक वाटेल आशी होती.

सकाळी दहा वाजता कार्यक्रम चा शंख वाजला. सर्व गावकरी शांत होऊन साधु हास्यानंद याच्या वाटे कडे पाहु लागला.
त्याची वाट फुलाने सजवली होती. अचानक
भगवे वस्त्र परीधान केलेले साधु हास्यानंद  मंडपात प्रवेश केला.  आणि सर्वांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसेच त्याच्या जयघोष ने सर्व परीसर दुमदुमला.

साधु हास्यानंद आपल्या आसनावर बसले व एवढा मोठा जय घोष पाहुन त्यांना त्याना प्रसन्न वाटले.
सर्व भक्तांना हात करुन शांत रहाण्याची विनंती केली.  आणि आपल्या प्रवचनाला सुरवात केली.
' माझ्या प्रिय भक्तांना माझा नमस्कार ,मला आनंद वाटतोय कि तुम्ही माझा स्विकार केलात खरे तर हा माझा स्विकार नसुन तो माझ्या विचाराचा स्विकार करत आहात,  त्याबद्दल मी मनपूर्वक आनंदी आहे.
उद्या मी या जगात नसेल तरीही माझे विचार तुमचे रक्षण करतील. ह्यामध्ये मी धन्य होईल, '
हे ऐकल्यावर सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या.
पुढे म्हणाले, ' या पृथ्वीवर फक्‍त मनुष्य हसु शकतो,  आणि या हसण्याने मनुष्य दुःखा पासुन दुर जातो,  एक गोष्ट लक्षात ठेवा,  जगात प्रत्येकास दुःख आहे,  मग तो कितीही मोठा राजा आसो,  त्याला ही दुःख असते, '

सर्व जण गंभीरता ने ऐकत होते.

क्रमशः

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2015 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

छ्यां बा, आज काय नेहमीचा मोजी टच नाय ! ;)

तेवढ्यात ते म्हणाले, ' पण एका अटी वर,' बुवांनी अट घातली पण नंतर नुसती गोष्ट सांगितली, अट सांगायला ते विसरले आणि माहित करून घ्यायला गाववाले विसरले ! :)

सिद्धार्थ ४'s picture

1 May 2015 - 12:04 pm | सिद्धार्थ ४

मोजी टच नाय ! ;)

आदूबाळ's picture

1 May 2015 - 12:14 pm | आदूबाळ

एवढं काही विशेष नाही असं म्हणाले ना साधुबुवा. नंतर सांगतील अट.

चला प्रवचनात जागा राखुन ठॅंवंतॉं

नाखु's picture

1 May 2015 - 12:46 pm | नाखु

चोर चार जागा पकड, मी भाजलेल्या शेंगा आणायला चाललोय तुला कणीस पॅयजे काँ ते साँग.
आणि टक्या कुठेय ते शोधून ठेव.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 1:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नांखुंकांकां तुंम्हांलां फंक्तं जेंपीं आंणिं टंक्यां दिंसंतों. मंलां पंणं पांहिंजें कंणींसं!!!

नाखु's picture

1 May 2015 - 3:01 pm | नाखु

तुझ्या साठी पण सारखा जागा सोडून साधूच्या मागे फिरू नको ! उगा लोकांना शँका ञेते !

असंका's picture

1 May 2015 - 12:05 pm | असंका

सुंदर सुरुवात...
पुभाप्र.

तिमा's picture

1 May 2015 - 12:07 pm | तिमा

ह्या हास्यानंदांनीच नंतर 'संध्यानंद' पेपर काढला का हो ?

डु मोजी पण निघालेत का? मजा नाही आली राव:(

इरसाल's picture

1 May 2015 - 12:16 pm | इरसाल

ले़ख(क) गेला चुलीत पहिली प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे.

स्वामी हास्यानंद हेच्च जीवन ("ब्रह्मचर्य हेच ..." या चालीवर)

अन्या दातार's picture

1 May 2015 - 12:22 pm | अन्या दातार

शोएब अख्तर किंवा डेल स्टेन सारखा बॉलर पुढचा बॉल अधिक वेगात टाकणार म्हणून सरसावून पोझिशन घ्यावी, अन बॉलरने कैच्याकै स्लो पेस बॉल टाकावा असे झाले.

असो, तरीही आम्ही वाचत(च) आहोत.

प्र चं ड अपेक्षाभंग!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 1:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचंड अपएक्शेने लेखं उंघंडला...पंण निंरांशा जांली.

टवाळ कार्टा's picture

1 May 2015 - 2:14 pm | टवाळ कार्टा

थोडी निराशा पण क्रमशः बघून थांबतो अजून

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/object/lock-smiley-emoticon-emoji.png

अंतरा आनंद's picture

2 May 2015 - 1:57 pm | अंतरा आनंद

(जमले तर एका वाक्यात नाहीतर सविस्तर)उत्तरे द्या.
त्या गणपतीच्या उंदराचे काय झाले?
लोकं भाषण गंभीर तेने का आईकत होते?

नाखु's picture

2 May 2015 - 2:32 pm | नाखु

हा मोजीभाऊंचे कॅथेतील "आवश्यक घटक" आहे
संदर्भ लायब्रेरीत मेलेला उंदीर आणी मनिमौ.
आजचे

(ग)धड्या खालील प्रश्न

  1. हास्यानंदाचे शिष्याचे नाव अत्यानंद होते का परमानंद त्याचा शोध लावा.
  2. नवमिपाकरांना या साधुबाबांकडे पाठवावे कि मुवींच्या बाबांकडे स्वउदाहरण सोदाहरण स्पष्ट करा.
  3. मोजींची आधीची कथामाला कधी पूर्ण होईल याचा अंदाज लावा. पर्याय अ.बैलपोळा ब्.शिमगा. क.धुळ्वड ड्.सर्वपित्री अमावस्या.
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 May 2015 - 4:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाद खुळा च्या च्या ऐवजी शंकासुर हे चौराक्षरी नावं कसं वाटेलं?

ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

मुक्त विहारि's picture

2 May 2015 - 7:24 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

विवेकपटाईत's picture

2 May 2015 - 7:49 pm | विवेकपटाईत

कथेचा आनंद तरी घेऊ द्या....

यसवायजी's picture

2 May 2015 - 9:18 pm | यसवायजी

जुणे जीमो परत या. तुम्हे तुम्हारे काळे मावशीकी शप्पत है.

अगम्य's picture

2 May 2015 - 11:43 pm | अगम्य

मोजी ह्यांचा ID नक्कीच hack झाला असला पाहिजे. हे इतरच कोणाचे तरी लेखन वाटते.

तिमा's picture

3 May 2015 - 1:02 pm | तिमा

आज, जागतिक हास्यदिन आहे, त्या निमित्ताने दुसरा भाग आणि तोही जीमो टच असलेला, येऊ द्या.