इंदूर - भाग ३ - सराफा

Primary tabs

मोदक's picture
मोदक in भटकंती
29 Apr 2015 - 8:58 pm

इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी

इंदूर - भाग २ - रावेरखेडी

>>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....

या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो.
भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले.

रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता..

.

.

सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्‍यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात

.

आम्ही सुरूवात गराडू पासून केली

.

हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता.

भुट्टे का कीस..

.

गुलाबजाम

.

"मालपुये"

.

मूंग दाल हलवा..

.

"लच्छेवाली रबडी"

.

हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता.

.

इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार...

.

थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला..

.

या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच..

.

.

चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे..

तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते.

सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो..

.

"भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली.

घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली.

संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले..

नमकीन्सच्या दुकानात गिर्‍हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार.

.

.

आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!)

इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले.

एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

होबासराव's picture

29 Apr 2015 - 9:05 pm | होबासराव

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रकाशित करु का धागा. ;) मानसिक छळ करणारे छायाचित्र
देवा, मोदकाला क्षमा कर.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

29 Apr 2015 - 9:10 pm | मोदक

:))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 9:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास!!!!

सराफा बिराफा असे काही नसते, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. संपादक मंडळाला विनंती की असे धागे अप्रकाशित करावे आणि अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल सदस्यावर कारवाई करण्यात यावी.

२ दिवस सराफा :( मजा आहे तुमची

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2015 - 11:24 am | पिलीयन रायडर

खरय... फक्त भास आहे..

आत्ता माझ्या पोटात खवळलेली भुक सुद्धा मोहमायाच...

अनुप ढेरे's picture

29 Apr 2015 - 10:06 pm | अनुप ढेरे

कहर!!!

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 10:34 pm | टवाळ कार्टा

बाइकचे फतु कुठाय

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 11:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तु मुलगी बघायला गेल्यावर तिच्या काकाकडे बघत बसतोस का रे? ;) नै म्हणजे एवढे भक्कम खादाडी फोटो आहेत आणि ह्याला बैकचं पडलयं. ;)...

पहिले दोन भाग बघ :P

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 11:45 pm | टवाळ कार्टा

मी पक्षीवाला आहे...हे गोग्गोड नै जमत

ओके, थंडरबर्ड खाता का आपण?

बॅटमॅन's picture

30 Apr 2015 - 5:07 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2015 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 9:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुडुक पेटला... ;)!!!!

=))

रवीराज's picture

29 Apr 2015 - 11:12 pm | रवीराज

भुट्टे का कीस च्या ऐवजी चुकुन असे वाटले..
मस्तच आहे सराफा.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2015 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

गुलाबजामचं तळं & रबडीबासुंदी तलाव पाहुनhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-shocked015.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2015 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी खादाडीयात्रा !

जळजळ, मत्सर, भूक आणि अशाच अनेक भावना/ संवेदना एकाच वेळी जाग्या झाल्या आहेत! :(

सुबोध खरे's picture

29 Apr 2015 - 11:44 pm | सुबोध खरे

मोदक यान्चा त्रिवार निषेध.रात्री परत भूक लागली.

करून टाका अप्रकाशित च्यामारी टोपी...

पानाची बोळवण तीन वाक्यांत केल्याबद्दल निषेध. अजून डीटेल हवेत. चटणी कोणती, जर्दा कुठला वगैरे.

नाय ब्वा, मला निकोटीनची जबरदस्त अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे जर्दा वगैरे लै मोठे प्रकार झाले.. साधा किमाम पण झेपत नाही. त्यामुळे त्या बाबतीत पास.

सध्या मसाला पानमध्ये अनेक प्रयोग करून "रामप्यारी" वर सेटल झालो आहे.

(रामप्यारीचे डिटेल्स कोणाला माहिती असतील तर जरूर सांगा.)

जुइ's picture

30 Apr 2015 - 1:10 am | जुइ

hungry

अप्रतिम. गुलाबजाम चा फोटो तर कातिल. कधी येणार योग इन्दूराला जायचा? तो पर्यंत दुधाची तहान ताकाच्या फोटोवर भागवून घ्यावी लागणार :(

पाषाणभेद's picture

30 Apr 2015 - 4:04 am | पाषाणभेद

फोटो छान आहेत. एकदम.

माझे इंदूरातले दिवस आठवले. रूम पार्टनरचे नातेवाईक सुदामा नगरला असल्याने तेथे जाणे झाले की सराफा बाजारात वरचेवर चक्कर व्ह्यायची. ऑफीस छोट्या ग्वालटोलीत होते. तो भाग मध्यवर्ती अन भरपूर वर्दळीचा आहे. तेथूनच राजवाडा परीसरात भरपूर पायी चक्कर व्ह्यायचे. म्हणजे मी करायचो. ऑफीसातला बॉय समवयस्क असल्याने आम्ही एकत्रच फिरायचो. दिवसा आम्ही दोघे वेगवेगळी हॉटेले धुंडाळून नाश्टा करायचो. त्या काळी दुपारचे भरपेट जेवण क्वचितच केलेले आठवते. सारा दिवस फुटकळ खाणे पोटात ढकलून पुर्ण व्ह्यायचा. ऑफीसात कामे नसल्याने (!) दिवसभर परीसरात भटकंती व्ह्यायची. रेल्वे स्टेशन, तेली गल्ली, जेल रोड, छत्री, सरवटे बस स्टँड, राजवाडा, बडा गणपती, स्टेडीयम, मधू मिलन टोकीज, लायब्ररी, स्टेडीयम, दवा बाजार, ५६ दुकान आदी परीसर तर मी कोळून प्यायलो आहे. माझ्या आधीचे बाहेरून आलेले मेडीकल रिप्रेंझ्टेटिव्ह नोकरीत असलेल्या मुलांनी जेवढे इंदूर पाहीले नाही तेवढे इंदूर मी त्या कमी कालावधीत पाहीले. तेथे राहत असतांना मी जाणीवपुर्वक पायी फिरत असे. कारण सीटी बस उशीरा निघत अन तेवढ्या वेळात आपण इच्छीत स्थळी पोहचत असू.

बाकी नोकरीत जेव्हा फिल्ड व्हिजीट असायची ती पिथमपूरला असायची अन तेव्हा मात्र जेवणाचे फार हाल व्हायचे. हाल असे की सकाळच्या नाश्ट्याचा डबा करून सोबत न्यावा लागत असे अन दिवसभर तेवढ्यावरच समाधान मानावे लागे. अर्थात त्याची भरपाई इतर दिवशी इंदूर ऑफीसात राहून करावी लागे अन आम्ही ती करत असू.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2015 - 4:56 am | श्रीरंग_जोशी

काय ते फटू, अहाहा...

पुभाप्र.

पैसा's picture

30 Apr 2015 - 9:30 am | पैसा

हलकट मोदक! मी हा धागा वाचला नै आणि फटु त्याहून बघितले नैत!

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2015 - 12:45 pm | दिपक.कुवेत

कुठे फेडशील रे हि पापं?? हे देवा मोदकला माफ करं. त्याला माहित नाहि त्यानी हे फोटो दाखवून किती जणांचा रोष पत्करला आहे. प्रचंड चलबीचल झालेय मनाची.

कंजूस's picture

30 Apr 2015 - 10:20 am | कंजूस

छान.
कोल्हापुरात दुधदुभते,कडधान्ये तेल याची रेलचेल असून अशी प्रसिद्धि का नाही? लाल पांढरा रस्सा आणि मिसळ?

शाकाहारी फोटो बघुन इतकी जळजळ पहिल्यांदा झाली.

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 11:09 am | टवाळ कार्टा

+११११११११११

नूतन सावंत's picture

30 Apr 2015 - 11:07 am | नूतन सावंत

मोदक, तिन्ही धागे एकाच बैठकीत वाचून काढले.ऐकीव माहिती खूप होती साराफ्याबद्दल.पण प्रेक्षणीय महिती तुझ्यामुळे मिळाली.माहितीपूर्ण लेख.त्यातथोरल्या बाजीराव पेशव्यांची समाधी अनपेक्षितपाने समोर आली.त्याबद्दल तर तुला दंडवतच.समाधीचे दर्धन घेण्याची ओढ जीवाला लागावी इतके कातर वर्णन.

चौकटराजा's picture

30 Apr 2015 - 11:34 am | चौकटराजा

२०१५ च्या ऊत्तरार्धात इंदुरास जाण्याचा योग असल्याने आपली काई जळजळ झाली नाही. पोहा जलेबी या विचित्र कॉम्बोबद्दल
जोरूके भाईकी तोंडसे सुना है .

चित्रगुप्त's picture

30 Apr 2015 - 1:39 pm | चित्रगुप्त

चौरा साहेब, इंदुरात खादाडी करा, पण रोज सकाळी एक ग्लास ज्यूस जरूर प्या, म्हणजे खादाडी बाधणार नाही. रात्रीचे खाणे टाळायचे असेल, तर दिवसा 'छप्पन दुकान' मधे सराफावाले सर्व तेच पदार्थ मिळतील.
साठीत जरा जपावे लागते हो.

नर्मदेचे पाणी प्यायल्यावर कुठे काय बाधते काका? जगातील सर्वोत्तम पाणी

भयंकर टेम्टिंग फोटो...!!! ते गराडू फार इंटरेस्टिंग वाटतंय मला..
मस्त वर्णन & लेखनशैली!

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2015 - 12:31 pm | स्वाती दिनेश

तिन्ही धागे आजच पाहिले व वाचले.. फोटो पाहून आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन खादाडी कराविशी वाटते आहे..
स्वाती

चित्रगुप्त's picture

30 Apr 2015 - 1:03 pm | चित्रगुप्त

व्वा. मस्त. अजून इंदुरात असाल, तर 'छप्पन दुकान' मधे जाऊन 'एग बेंजो' किंवा 'मटन बेंजो' हा प्रकार पण चाखा. मात्र तिथला व्हेज बेंजो काही खास नसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2015 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा

@ 'छप्पन दुकान' >> नोंद घेणेत आली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2015 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ.

'छप्पन दुकान' मधे काल 'एग बेंजो' खाल्ला - ठीक वाटला. मसाला ऑम्लेट आणि ब्रेड + चटपटा मसाला असा प्रकार वाटला.

इंद्राणी नामक एक मिठाई आणि "रसमलाई+पेठा" असाही एक प्रकार खाल्ला.

.

नेहमीप्रमाणे सराफा भेटही झाली. आणखी काही नवीन प्रकार असल्यास जरूर कळवावेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 10:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इंद्राणी =)) =)) =)) =))

गणेशा's picture

30 Apr 2015 - 1:25 pm | गणेशा

वा .. वा .... काय खाण्याची मजा आहे भाऊ ...

मी_आहे_ना's picture

30 Apr 2015 - 1:43 pm | मी_आहे_ना

मोदकशेठ, धाग्याचं नाव बघूनच 'भरपेट जेवण झाल्याशिवाय हा धागा उघडायचा नाय' असं ठरवल्यामुळं फार जळजळ / छळ होण्यापासून वाचलो :)
धागा नेहमीप्रमाणेच झकास..

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Apr 2015 - 2:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!, सराफा म्हणा किंवा ५६ दुकान इथली खासियत म्हणजे पांढरेशुभ्र कुर्ता पायजामा घातलेले दुकानदार अन स्वच्छ्ता , गराडू म्हणजे आपण इंग्लिश मधे जे "यॅम" म्हणतो ते कंदमुळ आहे, मस्त प्रकार असतो, इंदौरी खास मसाला म्हणला तर तो म्हणजे "जिरावन" असतो! वाह परत एकदा सराफा सफ़र घडविले बद्दल आभारी आहोत!

*सराफा किंवा छप्पन दुकान भागाला जियोटॅगिंग केले आहे काय? नसल्यास ह्या मुद्द्याचा पाठपुरावा केला पाहिजे!!

नाय वो, "जिरावन" नाय त्यो.

मी मसाले विकत घेताना गराडू मसाला हवा असेही विचारले, पण गराडू मसाला तो दुकादार स्वत: तयार करतो असे कळाले.

रॉजरमूर's picture

1 May 2015 - 10:25 pm | रॉजरमूर

याची रेसिपी You tube वर सापडली

रॉजरमूर's picture

2 May 2015 - 12:50 am | रॉजरमूर

आणि अगदीच आठवण आली त्या गराडू ची तर सोप्पय सरळ
घरी करून बघा .

रॉजरमूर's picture

1 May 2015 - 9:45 pm | रॉजरमूर

yam म्हणजे मराठीत ले
"सुरण " काय ?

यॅम हे तुकतुकीत त्वचेचं रताळ्यासारखं कंदमूळ आहे. याला मध्य भारतात गराडू म्हणून ओळखतात,
Yam

सुरणही कंदमूळच, पण ते वेगळं, त्याची त्वचा खडबडीत असते: त्याला अरबी (टॅरो रूट) म्हणतात.
suran/ arbi

पैसा's picture

1 May 2015 - 10:33 pm | पैसा

अरबी म्हणजे अळकुडी, अळूचे मूळ. फोटोत अळकुडीच आहे. सुरण बराच मोठा असतो.

रॉजरमूर's picture

1 May 2015 - 10:46 pm | रॉजरमूर

दुवा उघडल्यावर पूर्ण जगाचा नकाशा दिसतोय
ते स्पेसिफिक ठिकाण (इंदोर सराफा) नाही दिसत आहे
त्या zee maps साईटवर अगोदर registration करावं लागतं काय ?

बहुगुणी's picture

1 May 2015 - 11:45 pm | बहुगुणी

नकाशात इंदूरवर क्लिक करा, म्हणजे पत्ता मिळेल.

रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. आधिक माहितीसाठी हा लेख.

एस's picture

30 Apr 2015 - 5:00 pm | एस

कोणीतरी फक्त 'पान' या विषयावर एक धागा काढा बरं. (पट्टीचे पान खाणारे (म्हणजे पानपट्टी नव्हे) या क्याटेगरीतील लोकांस खास विनंती).

आदूबाळ's picture

30 Apr 2015 - 6:21 pm | आदूबाळ

आमेन!

रामदास काकांचा लोकप्रभामध्ये एक डिट्टेल लेख आला होता. पण सध्या लिंक सापडत नाहीये. :(

बॅटमॅन's picture

30 Apr 2015 - 5:10 pm | बॅटमॅन

अगागागागागागा....हे समदं खायचं तर डाएट घाला रासभजघनमंडळी आणि हर हर महादेवच मग!!!!
बापरे, कधी एकदा जातोय इंदुरास...जातोच आता. माळव्यावर स्वारी केलीच पाहिजे. हीच ती 'उत्तरदक्षण प्रांतीची सुवर्णनदी'.

प्रचेतस's picture

1 May 2015 - 10:09 am | प्रचेतस

अगदी अगदी.
असेच म्हणतो.

नाखु's picture

2 May 2015 - 9:26 am | नाखु

यष्टीत एक जागा आमची पकडणे.
या गोड खाण्याचा गोड गाण्याशी काही संबध आहे काय ! जाणकारांनी बत्त्या पेटवाव्यात ही विनंती.
भाजीपाला
नाखु

कुठे काय? काहिच दिसले नाहीये. गराडू, गुलाबजाम, पाणीपुरीचा ष्टॉल काही म्हणता काही दिसलेच नाही. असे असताना कशाला उगीच काय बोलू? फक्त पाणीपुरीचे इतके प्रकार असतात हे माहित नव्हते असे म्हणते.

संदीप डांगे's picture

30 Apr 2015 - 6:03 pm | संदीप डांगे

काय राव तुम्ही...?

आता आमच्या डोक्यात चक्र फिरायलेत ना... आताच नाशिकहून गाडी काढून निघालोतर ५ तासांत पोचू.. मस्त खाणं चापू, मस्त नर्मदेत वाकू.. मस्त फिरु.... मस्त हे... मस्त ते .... मस्त.... मस्त... मस्त....

छ्या... उगाच डोक्याचा सराफा केला बॉ...

चित्रगुप्त's picture

2 May 2015 - 1:59 am | चित्रगुप्त

इंदूरास गेलात, तर लगे हाथ मांडूगड, महेश्वर आणि ओंकारेश्वर देखील बघायला विसरू नका. सिमरोळ वरून जाल, तर जवळच 'कजली गड' ही बघण्यालायक आहे.

मोहनराव's picture

30 Apr 2015 - 6:12 pm | मोहनराव

काय छळ लावलाय!!

कवितानागेश's picture

1 May 2015 - 9:30 am | कवितानागेश

खाऊ का गिळू??!

हाफशेंच्युरी निम्मीत्त सर्व मिपाकरांचा सत्कार (धागाकर्ते सोडुन) एक एक ईनो* पाकीट देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते
*अटी लागु.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 10:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एका इनो पाकिटानी काय होणारे? दोन-चार टेंपो पहिजेत किमान.

एका इनो पाकिटानी काय होणारे? दोन-चार टेंपो पहिजेत किमान.
देऊ की*

*पुन्हा अटी लागु..

पैसा's picture

1 May 2015 - 10:26 am | पैसा

तू ये-फुकट देईन? नैतर आपापल्या पैशांनी विकत घ्या म्हणायचं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 10:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

भाग्यश्री कुलकर्णी's picture

1 May 2015 - 11:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी

इंदोरला चार वर्ष राहिलेय.आयुष्यातल्या चांगल्या आठवणी आणि भोचकचा सहवास याच गावी घडलाय....रावेरखेडीला बाईकवर गेलेय त्याच्यासोबत.....परत डोळ्यासमोर ते दिवस आले...मनाचा कोपरा हळवा आहे या गावाबाबतचा...

स्वाती दिनेश's picture

3 May 2015 - 9:34 pm | स्वाती दिनेश

मलाही भोचकची पाणीपुरीच आठवली होती चटकन.. मुद्दामच लिहिले नव्हते.. :(

हो. भोचकरावांचा ब्लॉग अनेकदा वाचला आहे आणि यावेळीही आठवणीने चाळला होता. :(

क्षमस्व!

इंदोर मध्ये हलवायाकडे लच्छेवाली रबडी बनवताना पाहिली आहे. मोठ्या लोखंडी कढई मध्ये दुध तांबूस झाल्यांनतर झाऱ्याने घेऊन कढई वरच्या लोखंडी, दुध नसलेल्या, भागावर मारतात .चर्र असा आवाज येउन लच्छी तयार होते.
सकाळी फेरफटका मारल्यावर दुध जलेबिचा नास्ता हमखास असायचा.
इंदोर सारखे दुकानात मोठ्या परातीत भरून ठेवलेले पोहे ( मुळात मराठी पदार्थ असून ) महाराष्ट्रात दिसत नाहीत . तेथे पोहे त्यांच्यावर शेव पेरुन खातात.

चौकटराजा's picture

2 May 2015 - 11:25 am | चौकटराजा

इन्दुरविषयी काही वाचायचे असेल तर अरूण दाते यांचे शुक्रतारा हे आत्मचरित्र वाचा असे सुचवावेसे वाटते. जावेद अख्तर
सी के नायडू राहुल द्रविड , लता मंगेशकर ही महान नावे इंदुरास जोडलेली आहेत.

स्नेहांकिता's picture

2 May 2015 - 1:23 pm | स्नेहांकिता

दु दु मोदकाचा कच्कुन णिशेध !!

स्पंदना's picture

3 May 2015 - 2:24 am | स्पंदना

कस खायच म्हणते मी इतक? बर खाऊन गप रहावं तर ढींडोरा पिटायला इकडं?
हात!

राहुल अग्रवाल's picture

3 May 2015 - 11:18 am | राहुल अग्रवाल

जळ जळ वाढली पोटातलि

आह्ह... मालपुवा आणि रबडी यांचे काँबिनेशन म्हणजे स्वर्गसुख ! एकदा हे काँबिनेशन ट्राय मारुन तर पहाच ! :)
माझ्या बायडीला पाणीपुरी खायला घातली होती... ५ वेगवेगळ्या पाण्याच्या पुर्‍या खाउन ती सॉलिड्ड खुश झाली होती...

{नमकिन प्रेमी } :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)

किरण रवंदळे's picture

3 May 2015 - 4:22 pm | किरण रवंदळे

गणेश नमकिन?

नमन स्वीट्स अँड नमकीन्स.

नगरीनिरंजन's picture

3 May 2015 - 4:29 pm | नगरीनिरंजन

जीवघेणा धागा आहे हा!

पियुशा's picture

4 May 2015 - 1:20 pm | पियुशा

वाह ! लैच्च चटपटीत तोपासु धागा.

सर्व प्रतिसादकांचे भरपूर आभार्स!! :)

एक प्रश्न - गुजरात मध्ये मिळणारा जिराळू आणि इंदोरातला जिरावण हे एकसारखेच मसाले असतात की त्यात काही फरक असतो?

(मी दोन्ही टेस्ट केले. साधारण सारखी चव आहे. पण नक्की फरक कळत नाहीये)

मस्त वर्णन आणि फोटो.जुने दिवस आठवले.भरपुर मनसोक्त खादाडि केलीये इंदोरात.सराफा तर खास आवडत.एकतर घराजवळ होत त्यात खाण्यापिण्याची घरात सगळ्यांना आवड.दाल बाटी अप्रतिम चवीची मिळायची इंदोरात. पोहे आणि कचोडि सकाळपासुन मिळायची.सगळ्यात सुंदर कचोडि शाळेच्या कँटीनमधे मिळायची तीहि १ रूपयात.
मुख्य म्हणजे शाळेला जायचा रस्ता सराफातुन होता.अर्थात दिवसा तिथे हे स्टॉल नसायचे ते फक्त रात्री.राजवाडा,सराफा,खवा बाजार,कपडा मार्केट असा गजबजाट असलेल्या दुकानातील वस्तु पहात शाळा कधी यायची समजायच नाहि.
सराफाच्या अलीकडे एक हलवाइवाला होता.बाहेरच प्रचंड मोठ्या कढईत मसाला दुध आटवत बसलेला असायचा.त्याच्याकडचे गरम दुध अप्रतिम असायच.मोठ्या डावाने ग्लास भरून त्यावर अलगद सुकामेवा पसरलेला वरचा थर पटकन उचलुन दुधावर असा काहि जलद्गतीने घालायचा कि बास.
आता जायला हव इंदुरात.सराफासाठी.

दत्ता जोशी's picture

3 Oct 2015 - 12:10 pm | दत्ता जोशी

रोजच्या धकाधकी आणि कंटाळवाण्या चाकोरीबद्ध आयुष्यामधून थोडा बाहेर पडून जगण्याची खरी लज्जत चाखण्यासाठी भटकंती, खादाडी आणि वाचन याची आवड असणे फार गरजेचे आहे असे मला वाटते. तुम्ही मिळालेला वेळ असे छन्द जोपासण्यासाठी खर्ची घालत आहात हजे बघून बरे वाटले. मला पण माझे जुने दिवस आठवले. फोटो पण मस्त. बाजीरावांच्या समाधीचे दर्शन परत एकदा घडले आणि समाधीची उपेक्षा पाहून पुन्हा खूप वाईट वाटले. सराफा फारच टेम्पटिंग..! शेअरिंग साठी धन्यवाद.
अवांतर : लोक पुण्याला खादाडांचे शहर म्हणून का हिणवतात? :-(

कौशिकी०२५'s picture

3 Oct 2015 - 4:26 pm | कौशिकी०२५

काय हे...हपिसात हे तीन्ही भाग वाचले आणि आता कधी जाता येइल हेच चालु झालेय डोक्यात..
असो...अप्रतिम आणि ओघवतं प्रवासवर्णन...फोटो तर क्या बात है !

उपेक्षित's picture

8 Jul 2017 - 6:06 pm | उपेक्षित

इंदुरास्नी खादाडी करायला २ वर्षांमागे बाय्डीसंग खास ३ दिवस गेलो होतो पण सेल मध्ये लागलेल्या विमानाचे तिकीट काढून, अपना पलेस मध्ये राहिलो होतो तेव्हा.
त्या २/३ दिवसातच आयुष्यातला मोठा (परत व्यवसाय करायचा) निर्णय विचार करून घेतला होता त्यामुळे इंदूर माझ्यासाठी खास आहे.

आणि आता काय तो सराफा बाजार देवा पार पोट फुटेस्तोवर हादडले होते आम्ही.