इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी

Primary tabs

मोदक's picture
मोदक in भटकंती
8 Apr 2015 - 8:34 pm

"मोदक.. यावेळी नक्की इंदूर ला जावूया."

हाफिसातला शेजारी आणि मूळचा 'इंदौरी' असलेल्या भुषणने पुन्हा एकदा इंदूरवारीच्या चर्चेला सुरूवात केली.

इंदूर, सराफा आणि ५६ दुकान या तीन गोष्टींमुळे या ट्रीपला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आमचा सर्वात आधी ठरलेला बेत होता "इंदूरमध्ये होळी साजरी करणे" परंतु हाफिस आणि इतर कामांमुळे त्याला जमले नाही.
(म्हणून मी घाटवाटांवरची सायकल राईड करून आलो!)

इंदूरचा प्लॅन त्याला विचारताच त्याने पठडीतले उत्तर दिले.
"रात्री पुण्यात बसमध्ये बसायचे, सकाळी इंदूर. ११ / १२ तास लागतात!"

या प्रस्तावाला मी फारसा उत्सुक नव्हतो. बसचा इतका लांब प्रवास झोपून वगैरे करण्याला मला प्रचंड कंटाळा आहे. शेवटी गाडीवरून जावूया असा प्रस्ताव मांडला. त्यानेही लगेचच होकार दिला.

मी मे/जून महिन्यात सायकल घेतली त्या दरम्यान एकदा बुलेटही बुक केली होती. त्यावेळी बुक करतानाच "Royal Enfield Classic 350 Black" अशी सर्वात उशीरा मिळणारी आणि जास्तीत जास्त वेटींग पिरीयड असणारी गाडी बुक केली होती. कारण मला तेच मॉडेल आणि तोच रंग हवा होता. नंतर अंतर्जालावर (http://www.teambhp.com) वर बुलेट संदर्भात मिळेल ती माहिती वाचण्यास सुरूवात केली.

(नीलकांता - दीडेक वर्षांपूर्वी सुचवलेले पुन्हा एकदा सुचवत आहे.. http://www.teambhp.com सारखा एखादा फक्त रस्ते, ऑटोमोबाईल व गाड्यांचा विभाग सुरू केला तर धमाल येईल!!)

बुलेट 350 CC की 500 CC?
Classic की Thunderbird?
गाडी घेताना व नंतर काय माहिती आवश्यक आहे?
गाडी घेताना काय काळजी घ्यावी?
गाडी घेतल्यापासून मोठ्या राईडपर्यंत काय काळजी घ्यावी?

या दरम्यान शोरूमला फोन करून "मेरा नंबर कब आएगा?" टाईप्स प्रश्न विचारणे सुरू होतेच. १४० वेटींग वरून नंबर हळूहळू उतरत होता. ८०, ६२, ३५ असे नंबर कळत होते. या काळातच जोमाने सायकलींग सुरू असल्याने बुलेटची फारशी भूक लागली नव्हती. "येईल त्यावेळी येवूदे" अशा निराकार(!) भावनेने बाकीचे उद्योग सुरू होते. यथावकाश वेटींग पिरीयड संपला. गाडी लवकरच ताब्यात मिळेल असे वातावरण तयार झाले. अगदी २० / २२ नंबर उरले तेंव्हा मनराव, सोन्याबापू मंडळींशी चर्चा करून आणखी माहिती मिळवली.

डिसेंबर महिन्यात बुलेट मिळाली!!!!!

.

आता छोट्या मोठ्या ट्रीप सुरू केल्या. पुणे-कोल्हापूर, पुणे-सांगली, पुणे-गणपतीपुळे, दोन तीनदा कोकण.. अशी गाडी पळवत होतो. पहिली दोन सर्विसींग पार पडल्यानंतर मोठ्या ट्रिपचा विचार सुरू केला आणि अचानक हा इंदूरचा प्रस्ताव आला.

इंदूरच्या प्रवासाचा रूट नक्की कोणता हे ठरत नव्हते.

.

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद-भुसावळ-बुर्‍हाणपुर-सनावाद-इंदूर
पुणे-अहमदनगर-शिर्डी-कोपरगांव-मनमाड-मालेगांव-धुळे-पलासनेर-सेंधवा-जुलवानिया-इंदूर
पुणे-राजगुरूनगर-नारायणगांव-संगमनेर-कोपरगांव-मनमाड-मालेगांव-धुळे-पलासनेर-सेंधवा-जुलवानिया-इंदूर

हे तीन मार्ग होते. निव्वळ अंतराचा विचार करून मार्ग ठरवता येणार नव्हता कारण 'रस्ता कसा आहे?' हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. आणखी एक महत्वाचा मुद्दा होता उकाडा आणि ऊन. ऐन उन्हाळ्यात मध्य भारतात जाताना या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे होते.

शेवटी अनेक रूटची माहिती मिळवून "पुणे-अहमदनगर-शिर्डी-कोपरगांव-मनमाड-मालेगांव-धुळे-पलासनेर-सेंधवा-जुलवानिया-इंदूर" हा रूट ठरला आणि प्रवास थोडा सुसह्य व्हावा म्हणून गुरूवारी संध्याकाळी निघून २०० किमी अंतरावर शिर्डीमध्ये मुक्काम करावयाचे ठरले. राहिलेला टप्पा एका दिवसामध्ये सहज शक्य होता.

आता मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने पुन्हा एकदा गाडीचे चेकिंग करून घेतले. प्रवासाआधीच्या वीकांताला (मिपावरच मिळालेल्या सल्ल्यांप्रमाणे) चाकांमध्ये नायट्रोजन भरून सहजच एक २०० किमीची एक राईड करायची म्हणून खोपोलीला चक्कर मारली. गाडी चालवताना कंटाळा येत नव्हता आणि पॅशन प्लसच्या तुलनेत तुफान पॉवर आणि आराम मिळत होता.

यथावकाश गुरूवार उजाडला. हाफिसातले काम आवरून निघायला ५ वाजले. मी आणि भुषण, त्याच्या मागे एक मोठी सॅक आणि त्याला मागे टेकायला एक फळी जोडून त्याला एक उशी जोडलेली अशा यंत्रणेसह आम्ही अहमदनगर कडे कूच केले.

पहिला थांबा..

.

लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगांव, शिरूर वगैरे गावे एका लयीत मागे पडत होती.. शिक्रापूरला आणि शिरूरला ट्रॅफीक लागले. कारण..? काही नाही. रस्त्यावरच्या दोन्ही बाजूच्या लोकांना एकाच वेळी इकडून तिकडे जायचे होते व काहींना यू टर्न घ्यायचा होता.

अभी इंदूर दूर है!

.

अहमदनगरच्या अलिकडे अचानक शिर्डी बायपास रस्ता दिसू लागला. हा रस्ता मला माहिती नव्हता आणि नेहमी बसने प्रवास करत असल्याने भुषणलाही काही माहिती नव्हती. चुकलो तर GPS ने रस्ता शोधू अशा तयारीने त्या रस्त्यावर गाडी वळवली.

१२ किमी पर्यंत सिंगल लेन एकदम गुळगुळीत पण कोणतेही मार्किंग नसलेला रस्ता.. मार्किंग नसल्याने या रस्त्यावर गाडी चालवताना कमी वेगाने जावे लागत होते. रस्ता तसा नवीनच असल्याने रस्त्याच्या कडेची माती आणि डांबरी पट्टे यांच्याकडे लक्ष ठेवून थोडे अंतर पार केले आणि लगेचच रस्त्याचे काम सुरू आहे अशा पाट्यांनी आमचे स्वागत केले.

..आणि येथे काम सुरू होते म्हणजे पूर्वी रस्ता होता आणि आता त्याची डागडुजी वगैरे प्रकार नव्हता तर सरळ नवीन रस्ता बांधण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे दगडमातीच्या एका पट्ट्यामधून पर्यायी रस्ता काढला होता. असे तीन चार खराब पॅच आणि एकूण ६ / ८ किमीचे अंतर कूर्मगतीने पार करून आम्ही अहमदनगर शिर्डी रस्त्यावर चाके वळवली.

खराब रस्ता..

.

अहमदनगर शिर्डी हा मधून मधून सिंगल लेन रोड होता. सिंगल लेनवर गाडी चालवण्याची मजा वेगळीच असते. समोरून येणारी गाडी, आपण ओव्हरटेक करत असलेली गाडी आणि आपण अशी वेगवेगळी जजमेंट्स एकाच वेळी घ्यावी लागतात. एखादी कार आपल्याला ओव्हरटेक करून अचानक समोर येते, समोरून लाईट न लावता किंवा नेमका डावा लाईट लावून एखादा ट्रॅक्टर येतो असे अनेक प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे सिंगल लेन रस्त्यावर गाडी चालवताना सतत सावध राहिल्याने कंटाळा येत नाही त्यामुळे हा प्रवास थोड्या कमी वेगाने पार पडला पण मजा आली. :)

सिंगल रोड..

.

साईसिद्धी, साईकृपा, साईछाया, साईराम अशा अनेक हॉटेलांमुळे शिर्डी जवळ आल्याची जाणीच झाली. शिर्डीच्या अलीकडे २० किमी पासून थोडा खराब रस्ता सुरू झाला. त्याने शिर्डीपर्यंत सोबत केली.

एक हॉटेल शोधले, चेक इन केले आणि फ्रेश होवून जेवणासाठी बाहेर पडलो. २०० किमी अंतरावर पहिला दिवस संपला होता..

(क्रमशः)

प्रतिक्रिया

खेडूत's picture

8 Apr 2015 - 8:38 pm | खेडूत

क्या बात है !
पुन्हा चांगल्या लेखमालेची मेजवानी ……
इंदोर म्हणजे तब्येतीत खाणे आणि कपडे . भरपूर फोटो येउंदेत !

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Apr 2015 - 9:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

भले शाबास बंधो!!!! Welcome to the Black Horde!!! उत्तरोत्तर तुमची बुलेट अजुन सुसाट सुटावी ही शुभेच्छा!! लांब पल्ल्यातच मजा आहे बुलेटची!! एक जमाना था जेव्हा पुणे अकोला माझ्या सीबीझी वर मी साढ़े सहा तासात गेलो होतो!! धुरळा निस्ता!! पण बुलेट ती चीज नाही बुलेट ची मजा चाळीस पंचे चाळीस च्या स्पीड ने क्रूज करण्यात आहे!! माझे एक स्वप्न आहे "टीएलसी" वरच्या "ग्रेट इंडियन रोड ट्रिप" च्याच् रुट ने पन्नास देश क्लासिक तीनशे पन्नास वर फिरायचे!!

पुलेशु
पुभाप्र

५०० किमी अंतर साडे सहा तास..???? धन्य आहात..! __/\__

ग्रेट इंडियन रोड ट्रिप म्हणजे हाच रूट आहे का..? खल्ल्लास रूट आहे.

.

माझ्या ओळखीचा एक ग्रूप भारतातून टर्की ते लंडन असा गेला आहे सध्या. इस्तंबूल की कुठेतरी गाड्या बोटीने पाठवून हे लोक्स विमानाने गेले आणि तीन महिने युरोप पालथा घालणार आहेत. निव्वळ वेळ नाही म्हणून जाता आले नाही. :(

बुलेट ची मजा चाळीस पंचे चाळीस च्या स्पीड ने क्रूज करण्यात आहे!!

येस्स..!! पुरेपूर अनुभवलेली आहे. :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Apr 2015 - 6:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे म्हणजे जबरी!! जवळ जवळ ८० - ९० ची स्पीड तो पण तसल्या भयंकर रस्त्यातून :P

या बात! ही बुलेट पहायचं भाग्य लाभलं आहे हे आमचं भाग्य!

जुइ's picture

9 Apr 2015 - 4:58 am | जुइ

Motobyke प्रवासाची सुरवात देखील उत्त्म झाली आहे.

वाचतोय रे मोदका... तुझ्या या बुलेट सवारीच कौतुक वाटत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Apr 2015 - 7:17 am | कैलासवासी सोन्याबापु

"मोदका" वरुन आठवले

माईसाहेब कुठे आहेत सद्ध्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2015 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर प्रवास करतोय हं.
वाचतोय.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

9 Apr 2015 - 11:30 am | पिलीयन रायडर

आम्ही इंदोरात जाउन ५६ दुकान किंवा सराफा किंवा एकंदरीत काहीच न खाता परत आलेले करंटे लोक आहोत.
आणि तुम्ही महाहलकट लोक पुढच्या भागात खादाडीचे फोटो टाकालच.. त्यामुळे धागा उघडुन पहाणार नाही..

बाकी बुलेट मस्तच!!

मोदक's picture

9 Apr 2015 - 6:18 pm | मोदक

अरेरे.. :D

असंका's picture

9 Apr 2015 - 1:09 pm | असंका

काय धाडस का काय हो!!! _/\_

बाकी आता मजा येणार आहे हे नक्की!!! पु.भा.प्र. :-)

एस's picture

9 Apr 2015 - 1:38 pm | एस

मस्त सुरुवात.

दोघेजण एका दुचाकीवर अशा लॉन्ग रूटला नसावेत शक्यतो. त्यातही बुलेटच्या सीटची लांबी तितकी जास्त नसते. त्यामुळे सॅकसकट कसे मॅनेज केलंत याची उत्सुकता आहे.

दिपक.कुवेत's picture

9 Apr 2015 - 3:35 pm | दिपक.कुवेत

सुरवात....पुढिल भाग टाक पटापट. वाचण्यास उत्सुक!!

पॉइंट ब्लँक's picture

9 Apr 2015 - 3:39 pm | पॉइंट ब्लँक

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Apr 2015 - 4:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हौसेला मोल नसते हे खरं. जब्बर _/\_

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Apr 2015 - 4:21 pm | लॉरी टांगटूंगकर

झक्कास!!! पु.भा.ल.टा.

सविता००१'s picture

9 Apr 2015 - 4:40 pm | सविता००१

पटपट पुढचे भाग टाक रे...
आणि
बुलेटचे देशीलच पण शॉपिंगचे फोटो पण हवेतच्च.

मोहनराव's picture

9 Apr 2015 - 5:09 pm | मोहनराव

चला प्रवासाला मोदकबरोबर!! मस्त प्रवासवर्णन! पुलेशु!

मोदक's picture

9 Apr 2015 - 6:22 pm | मोदक

धन्यवाद मंडळी.!

दोघेजण एका दुचाकीवर अशा लॉन्ग रूटला नसावेत शक्यतो. त्यातही बुलेटच्या सीटची लांबी तितकी जास्त नसते. त्यामुळे सॅकसकट कसे मॅनेज केलंत याची उत्सुकता आहे.

दोघेजण एका दुचाकीवर अशा लॉन्ग रूटला नसावेतच्च्च्च असे मतपरिवर्तन झाले. सध्या इतकेच! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Apr 2015 - 6:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असं काही नाही. दोघातला दुसरा ही व्यक्ती जर दुसरी असेल तर काही हरकत नाही =))

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Apr 2015 - 6:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

ख्या ख्या ख्या

यसवायजी's picture

9 Apr 2015 - 7:20 pm | यसवायजी

@मोदक- मस्त!! वाचतोय..

@ कॅप्टन- :))

a

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2015 - 7:41 pm | टवाळ कार्टा

चायल...दोघांतली एक तरी मिळालि पाहिजे

खटपट्या's picture

9 Apr 2015 - 8:07 pm | खटपट्या

लय भारी आसण. तरीपण उड्णमांडी समोर कैच नै !!

आता हितं कुटं आली तुम्ची (का बुवाची) उडणमांडी???

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Apr 2015 - 6:46 pm | अनिरुद्ध.वैद्य

लांब लांबच्या सफरींना शुभेच्छा! क्लासिक ३५० चा कायमच हेवा वाटत आलाय!
आणि हो झकास प्रवासवर्णन

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Apr 2015 - 12:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त प्रवासवर्णन आणि पुभाप्र

उमा @ मिपा's picture

13 Apr 2015 - 12:58 pm | उमा @ मिपा

खूप मस्तय बुलेट!
झक्कास प्रवासवर्णन, पुभाप्र