नेता व्हायचंय एका रात्रीत ?

संजुदा's picture
संजुदा in जे न देखे रवी...
26 Apr 2015 - 11:04 pm

नेता व्हायचंय एका रात्रीत ?

पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या समाजसेवेनंतर
नेते तयार होत असत.

आता जमाना बदललाय.

जीवन गतिमान झालंय.

डिजिटल युग आलंय.

आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत.

तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे.

नेता व्हायचंय एका रात्रीत ?

दाखवून टाक झलक

चौकाचौकात लाव पोरा

शुभेच्छांचे फलक

घरादारात गल्लीबोळात

जरी नसेल तुला स्थान

फलकावरती लिहून टाक

युवकांचे आशास्थान

वडील नेहमीच ओरडत असतात

दाखव काही तरी कर्तृत्व

हरकत काय रे लिहायला

शहराचं खंबीर नेतृत्व ?

वाढेल वलय नेतृत्वाचे

मिळेल तिथे खाता खाता

होऊन जाशील बेट्या एक दिवस
तूच आमचा भाग्यविधाता

हास्यकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Apr 2015 - 11:06 pm | प्रचेतस

अतिशय सहज सुंदर कविता.
साध्या साध्या शब्दांतून आजच्या जळजळीत वास्तवावर छान कोरडे ओढले आहेत.

येऊ दया अशाच काही ज्वलंत कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा

अतिशय सहज सुंदर कविता.
साध्या साध्या शब्दांतून आजच्या जळजळीत वास्तवावर छान कोरडे ओढले आहेत.

येऊ दया अशाच काही ज्वलंत कविता.

>>> +++१११ मणोमण सहमत.. कीत्ती - आतून दिलेला प्रतिसाद आहे हाही! (ह्ही! ह्ही!)

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 6:21 am | श्रीरंग_जोशी

वल्ली यांच्या प्रतिक्रियेशी सहमत.
यावरून आठवले - डिजिटल.

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 10:19 pm | सौन्दर्य

अगदी छान कविता आणि अगदी सद्य परिस्थती.

संजुदा's picture

28 Apr 2015 - 7:00 am | संजुदा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !

संजुदा's picture

28 Apr 2015 - 7:00 am | संजुदा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !

संजुदा's picture

28 Apr 2015 - 7:00 am | संजुदा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !