तिची ओळख

अभिशेखि's picture
अभिशेखि in जनातलं, मनातलं
22 Apr 2015 - 4:11 pm

“वैनी , नमस्कार.!!!” म्हणत ५-१० कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येउन स्थिरावला. वहिनींनी सुद्धा हसून नमस्कार केला. “दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका” असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकीटाचं शेवटचं बटन लावून त्यांनी हात पुढे केला. वाहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. “बाहेर कार्यकर्ते…. ” वाहिनीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते. दोन क्षण वाहिनी बेडवर बसल्या, आणि कालची संध्याकाळ त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली.
महाराष्ट्रातल्या अग्रगण्य ‘management college’ च्या माजी विद्यार्थ्यांचा भेट सोहळा. पंचतारांकित वातावरण, जवळपास १० वर्षानंतर भेटताना असलेलं कुतूहल, उत्सुकता आणि आपण साधलेल्या आर्थिक आणि भौतिक प्रगतीच्या गप्पा आणि तयार केलेल्या स्वताच्या ओळखीचं कौतुक. अशी भरगच्च संध्याकाळ. काल आपल्या ‘batchmates’ना भेटताना, त्यांचे ‘visiting cards’ घेताना वहिनींना जाणवलं, आपणही काही वर्षांपूर्वी ह्यांच्यातलेच होतो मग आपली ओळख हरवलीये का? आणि त्यांना जाणवलं, आपण इथे आलो तेव्हाही ‘कुणाचीतरी मुलगी’ होतो आणि आज ‘कुणाचीतरी बायको’ आहोत. मुलगी ते वाहिनी या प्रवासात आपल्यातली ‘ती’ कुठेतरी हरवलीये.
ह्याला सुरुवात कदाचित त्या दिवसापासून झाली असावी. त्यांना लक्ख्पणे तो दिवस आठवला. गणपतराव देशमुख म्हणजे तिचे डॅडी. त्या दिवशी विधानसभेत ‘स्त्री सबलीकरण’ या विषयावर घणाघाती भाषण देऊन आले होते. ती सुद्धा कमालीची खुश होती. लवकरच नामांकित कंपनीत नोकरीचं स्वप्न तिने पाहिलेलं. त्याच दिवशी गणपतरावांनी तिच्या समोर लग्नाचा विषय काढला आणि तिच्या आयुष्यात दादांची एन्ट्री झाली. युवराजदादा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राट शंकरराव मोहित्यांचे सुपुत्र. कर्तृत्व शून्य असलं तरी वडिलांची पुण्याई आणि पैसा यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल होतं.

गणपतारावांसाठी हे लग्न म्हणजे एक राजकीय सोय होती. विधानसभेतून लोकसभेत जाण्याच्या तयारीसाठीची सोय. तिने विरोध केला पण पप्पांपुढे तो टिकला नाही. कुणाला किती स्वातंत्र्य कसं द्यावं हे घरातला कर्ता ‘पुरुष’ या नात्याने गणपतरावांनीच ठरवलं. आता तिची ओळख बदलली. ती वैनी झाली. ‘दादांची बायको’ म्हणून तिला लोक ओळखायला लागले. महिला दिनाच्या समारंभात दादांच्या बाजूला बसून ती स्त्री स्वातंत्र्यावर दोन शब्द दरवर्षी बोलायची. नव्या ओळखीला ती सरावली होती. तिची विरोधाची धार बोथट झाली होती

पण कालच्या त्या सोहळ्याने तिला हलवून हलवून जागं केलं. कुठल्यातरी निश्चयाने ती उठली आणि बेडरूममधलं आपलं कपाट उघडलं. पार आत ठेवलेली एक बॅग काढली. तिच्यावरची धूळ झटकली. जणू त्या बॅगेत ती स्वतालाच पाहात होती. त्यामध्ये होत्या तिच्या ‘achievements’. एक गोल्ड मेडल, ‘Best Leader ‘ची ट्रॉफी आणि सगळ्यात आत तिचं ‘degree certificate ‘. गोल्डन इम्बोसिंग केलेल्या नावावरून तिने हात फिरवला आणि मनाशी एक निश्चय केला.
आता तिला स्वतःचा प्रवास स्वतः करायचा होता. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची होती. कुणाच्याही विरोधाला न जुमानता. दोन वर्षाच्या M B A मध्ये शिकवलेल्या बऱ्याचशा गोष्टी आता तिला ‘apply’ करायला लागणार होत्या. कुठल्याशा निर्धाराने तिने लॅपटाॅप काढला आणि रेझ्युमे बनवायला घेतला. घरातल्या विरोधाचं ‘SWOT Analysis ‘ ही तिची पुढची स्टेप असणार होती. मुलगी आणि वाहिनी या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख तयार करण्याच्या मार्गावर तिचा प्रवास सुरु झाला होता.
-अभिषेक राऊत

कथालेख

प्रतिक्रिया

जल्ला ह्यो mba लोकांनवर तुमचा लय जिव दिसता..

(MBA)जेपी

अभिशेखि's picture

22 Apr 2015 - 4:24 pm | अभिशेखि

हाहाहा व्हय!!!

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 4:39 pm | स्पंदना

दोनदा वर जाऊन लेख कुणी लिहिलाय ते पाहिलं.

मस्त! __/\__!!

कर्त्या माणसाचा उल्लेख आवडला.

सस्नेह's picture

22 Apr 2015 - 4:42 pm | सस्नेह

ही 'ती' आणि तिकडे प्रियंकातैंची 'ती' एकमेकींच्या कोण बरे लागतात ?
(गोंधळलेली) स्नेहांकिता

जेपी's picture

22 Apr 2015 - 4:50 pm | जेपी

बहिणी हायती.
लहान असताना जत्रेत हरवल्या.पुडच काय सांगायची गरज नाय..

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 5:03 pm | स्पंदना

मी एक पायरी पुढे जाऊन प्रियंका ताई आणि अभिदादा एक्मेकाचे कोण लागतात विचारणार होते.

अभिशेखि's picture

22 Apr 2015 - 5:09 pm | अभिशेखि

आमि दोगं बी वडगावच्या जत्रेत हरव्लतो. मी पाटलाच्या घरी गेलो आनी प्रियांकाताई ग्रामशेविकेच्या :)

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 5:12 pm | स्पंदना

पॉइंट ब्लँक's picture

22 Apr 2015 - 5:48 pm | पॉइंट ब्लँक

तिची ओळख झाली, तिचा प्रवास समजला. आत पुढे "तिचे साम्राज्य" ह्या लेखाची अत्यंत उत्कटतेने वाट पाहत आहे!

एस's picture

22 Apr 2015 - 8:26 pm | एस

लेख आवडला. काही दिवसांपूर्वी अशाच एका 'घराण्या'तल्या हुशार एमबीए मुलीची हीच भीती समजाऊन घेताना फारच वाईट वाटलं होतं. तिचे व तिच्या पालकांचे समुपदेशन करणे फारच जड गेले.