मिक्स व्हेज ग्रील्ड सँडवीच

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
14 Apr 2015 - 5:40 pm

san 1

मंडळी,

कधीतरी असं होतं का कि फ्रिज उघडला की आणलेल्या सगळ्या भाज्या थोडया थोडया उरलेल्या दिसतात. मग त्या तशाच टाकून देणंहि जीवावर येतं आणि त्याची भाजी करायची म्हटली तरी पुरवठयास येत नाहि.

असं जेव्हा होत तेव्हा घ्या सगळ्या भाज्या, द्या फोडणीचा तडका, भरा ब्रेड मधे आणि करा ग्रील्ड सँडवीच.....थांबा थांबा डीट्टेलवार सांगतोच कसं!

साहित्यः
१. उभे चीरलेले कांदे - २
२. उभ्या चीरलेल्या रंगीत सीमला मिरच्या - प्रत्येकि १ मध्यम
३. गाजराच्या काडया - १
४. वाफवलेले कॉर्न - १ वाटि
५. पातळ चीरलेला जांभळा कोबी (नसला तरी वांधा नाय)
६. पनीर - १/२ वाटि (एच्छिक)
७. तेल - २ चमचे
८. टोमॅटो केचप - ३ ते ४ मोठे चमचे
९. चीली फ्लेक्स - १ चमचा (नसतील तर १/२ चमचा तिखट)
१०. ओरॅगॅनो किंवा मिक्स हर्ब्स - १ चमचा
११. चवीनुसार मीठ
१२. आपापल्या आवडिचा ब्रेड

san 2

कॄती:

भाज्या क्रंचीच ठेवायच्या आहेत म्हणून पार मउ होईस्त शीजवू नका.

१. मंद आचेवर नॉन स्टिक कढईत/वोक/पॅन मधे तेल तापलं कि उभा चिरलेला कांदा घाला. कांदा परतला कि अनुक्रमे गाजर, सीमला मिरच्या, कॉर्न घालून परता.

san 3 san 4 san 5

२. आता त्यात टोमॅटो केचप, चीली फ्लेक्स, ओरॅगॅनो किंवा मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. कुस्करलेलं पनीर अ‍ॅड करा.

san 6 san 7

३. भाजी पुर्ण गार झाली कि जांभळा कोबी मिक्स करा. भाज्या केचप मधे व्यवस्थीत कोट होण्यासाठि दोन चमचे किंवा फोर्कनी भाज्या खालीवर मिक्स करा.

san 8

४. स्टफिंग गार होतेय तो पर्यंत ग्रीलर प्रीहिट होण्यास ठेवा. ब्रेड स्लाईस मधे स्ट्फिंग भरा. आवडत असल्यास चीजने टॉपअप करा (स्लाईस किंवा किसलेलं). ब्रेड स्लाईसला वरुन बटर लावून ग्रील्ड करा

san 9 san 10

५. गर्मागरम मिक्स व्हेज सँडवीच चा आस्वाद घ्या

san 10

टिपः नॉन व्हेज वाले ह्यात उरलेले चिकन टिक्क्याचे तुकडे, सुखा कोलंबी मसाला अ‍ॅड करु शकतात. चवीबद्दल खात्री देत नाहि पण एकदा प्रयोग करुन बघायला काय हरकत आहे?

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 5:52 pm | कविता१९७८

मस्तच

पाकृ आवडली. फोटू छान आलेत. चिरलेल्या भाज्या रंगीबेरंगी दिसतायत व सँडविच आवडले.
माझ्याकडेही आज हीच स्थीती होती. ग्रोसरीत जायलाच हवे आहे पण थोडा पालक शिल्लक होता, पराठे करायचा कंटाळा आला होता म्हणून बारीक चिरलेला पालक, फ्रोजन कॉर्न, थोडा कांदा बारीक चिरून, व चीज. असे होल व्हीट ब्रेडवर बटर लावून पसरले. वरून मीरपूड, चाट मसाला घातला. ग्रील केले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 6:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जांभळा कोबी कुठे मिळतो भारतामधे? पहिल्यांदाचं ऐकतोय. बाकी मस्तं जमलयं......!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

रिलायन्सफ्रेश मध्ये मिळायला हरकत नाही.

यशोधरा's picture

15 Apr 2015 - 11:28 am | यशोधरा

मंडईमध्ये. डेक्कनच्या पोऑच्या जवळच्या छोट्या मंडईमध्ये. चितळे़ंच्या दुकानाखालच्या भाज्यांच्या ठेल्यावर. मॉडेल कॉलनी आणि परिहार चौकातल्या भाज्यांच्या दुकानांत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2015 - 12:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वोक्के. कधी पाहिला नव्हता किंवा ऐकलं पण नव्हतं. (मातोश्रींचे स्वगत= मंडईचं तोंड बघायचं नाही, पालक आणि मेथीमधला फरक कळतो का तुला?) =))

यशोधरा's picture

15 Apr 2015 - 12:40 pm | यशोधरा

मग? कळतो की नाही? =))

मंडईत नका जाउ फार तर पण परिहर चौकातल्या वा कधीतरी मॉडेल कॉलनी वा डेक्कन परिसरात गेलात तर हिरवळीचं दर्शन होईल ना भाऊ! ;) एक दगडमें दो पंछी तसं एक फेरीमें भाजी और हिरवळ!

वरच्या यादीत शिवाजी मार्केटचं नाव र्‍हायलं, म्हंजे कँपातली मंडई. इथे हिरवळ नसते मात्र, नायतर कँपाचं नाव वाचून जाल लग्गेच :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2015 - 12:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कळतो हो कळतो. चांगला स्वयंपाक करतो मी. सजावट आणि पोळीचा आकार नाही जमतं पण चव जमते. =))

हिरवळ नसेल तर प्राधिकरणातुन पुण्यातल्या मंडईमधे खरेदीला जायचा प्लान कॅणसल!! ;)

यशोधरा's picture

15 Apr 2015 - 12:48 pm | यशोधरा

LOL!

प्रचेतस's picture

14 Apr 2015 - 6:10 pm | प्रचेतस

जबराट रे.

सस्नेह's picture

14 Apr 2015 - 6:17 pm | सस्नेह

याला रेनबो सँडविच का म्हणू नये ?
(पावप्रिय) स्नेहांकिता

स्पंदना's picture

14 Apr 2015 - 6:21 pm | स्पंदना

सुरेख!!
कोणी बनवुन देइल का? :( बर नाही आहे. :(

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 6:27 pm | पिलीयन रायडर

वा! मस्तच!!!

अजुन एक प्रकार बॉम्बे मसाला नावाने जो मिळ्तो
बटाट्याची खमंग भाजी करुन घ्यायची
मायोनीज + चीज + बारिक चिरलेला कांदा + बा.चि ढोबळी मिर्ची + मिरपुड
ह्या दोन्ही गोष्टी ब्रेडच्या आत भरुन ग्रिल करायचं!!! एक नंबर लागतं..

हौशी लोकांनी कल्याणी नगर मध्ये सेरेब्रम आयटी पार्क (गोल्ड सिनेमाच्या मागे) समोर एक सॅण्डविचवाला आहे, तिथे जाऊन खावे..

आठवणीने सुद्धा भुक लागली!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 6:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो हातगाडीवाला ना? सेरेब्रम टॉवर सिक्स च्या जवळचा?

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2015 - 6:50 pm | पिलीयन रायडर

हो हो... लाइनीने खुप गाडे आहेत. तिथे मिळते हे सॅण्डविच. साधारण २५-३० रुपयाला होते १ वर्षापुर्वी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 7:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजुनही भारी आहे ते. कधीतरी मुद्दाम जाउन खातो आम्ही मित्र मित्र.

अमित मुंबईचा's picture

15 Apr 2015 - 11:14 am | अमित मुंबईचा

मुंबईत ताडदेव ला ए सी मार्केट खाली मामाजीज कडे सुद्धा असंच सँडविच मिळत.

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 2:54 pm | दिपक.कुवेत

पण समहाउ मला तो मसाला टोस्ट प्रकार नाहि आवडत. बटाट्याची भाजी हि फक्त डोश्यातच चांगली लागते असं माझं मत. त्यापेक्षा ब्रेडला हिरवी चटणी लावून काकडि, कांदा, बटाटा, सीमला मिरची, उकडलेलं बीट आणि वरुन भरपुर किसलेलं चीज घालून कच्चं किंवा टोस्ट सँडवीच जास्त आवडत. मुंबईला केसी कॉलेज च्या पाठिमागे आमचा ठरलेला सँडवीचवाला असायचा (LIC ऑफिसच्या बाहेर स्टॉल असायचा). सँडवीच खाउन झालं कि लगेच आलं घातलेला चहा ठरलेला. चाट खाउन झालं कि कशी सुखी पुरी किंवा कुरमुरे मिळतात तसं हे सँडवीच खाउन झालं कि तो साध्या ब्रेडला बटर लावून उकडलेला बटाटा घालायचा व वरुन मीठ/मीरपूड आणि थोडा चाट मसाला घालून द्यायचा. ते हि फार अप्रतिम लागतं. हौशी लोक त्यातहि थोडासा सॉस आणि बारीक शेव टाकून खायची. आह.....सगळ्या आठवणी परत ताज्या झाल्या.

मितान's picture

16 Apr 2015 - 5:24 pm | मितान

बटाट्याची भाजी हि फक्त डोश्यातच चांगली लागते असं माझं मत. >>> +१

मला कोणत्याही प्रकारातला बटाटा सँडविचमध्ये आवडत नाही. तुमच्या या सँडविचमध्ये तो नसल्याने १०० पैकी १०० गुण ! :)

करणार हे सँडविच !!

सूड's picture

14 Apr 2015 - 6:42 pm | सूड

रेशिपी आवडली.

भाते's picture

14 Apr 2015 - 7:58 pm | भाते

नेहेमीप्रमाणे फोटो आणि पाकृ दोन्ही मस्त! बाकी, तो जांभळा कोबी शोधावा लागेल.

अवांतर: व्यस्त कामातुन वेळ काढुन अधुन मधुन मिपावर येत जा. :)

अति - अवांतर: आयडी बदलुन दिपक.कुवेत ऐवजी 'दीपक.पनीर' घ्यायला हरकत नाही. :) :)

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 3:00 pm | दिपक.कुवेत

हल्ली मिपा वर फार कमी वेळ यायला जमतं. प्रतिक्रिया तर दुरचं.

आदूबाळ's picture

14 Apr 2015 - 8:36 pm | आदूबाळ

दिपकभाऊ, ग्रिल्ड सँडविच डब्यात भरून नेलं आणि चार तासांनी खाल्लं तरी त्याचा कुरकुरीतपणा टिकेल अशी काही आयड्या आहे का हो?

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 3:09 pm | दिपक.कुवेत

काहि पदार्थ हे गरमागरमच खायचे असतात...ते म्हणतात ना..."right from frying pan to the plate" अगदि तसं. सँडवीच कसहि नेलं तरी ते काहि वेळाने सॉगीच होतं सो टोस्टर/ग्रीलर मधून काढलसं कि लगेच खायचा आनंद घे.

ह्या गोष्टिवरुन एक आठवलं कि आमच्या ऑफस मधे हो गोवन लोकं जेव्हा अ‍ॅल्युमिनीयम फॉईल मधे गुंडाळुन फिश आणतात आणि गरम करुन खातात तेव्हा अक्षःरश किव येते. फिश ईतकं सॉगी होतं कि विचारता सोय नाहि.

आदूबाळ's picture

16 Apr 2015 - 11:58 am | आदूबाळ

:( वैताग आहे...

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 2:18 pm | दिपक.कुवेत

सँडवीच न्यायचा कि गोवन फिश चा?

अदूदादू, घरून स्यान्डविच ग्रीलर हापिसात न्यायचा व लंचटैमाला वापरायचा. कशी वाटली आयड्या?

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 6:08 pm | दिपक.कुवेत

कच्चं नेलेलं सँडवीच उबेमुळे सॉगी होतं.....त्यापेक्षा सगळं साहित्य नेउन तिथेच बनवणं जास्त फायदेशीर....एक आयडिया सुचली आहे...ऑफिसात कँन्टिन असेल तर मालकाबरोबर बोलणी कर, एक टोस्टर नेउन ठेव, हि सँडवीच ची कल्पना सुचव/शेअर कर आणि मिळणारा नफा घ्या अर्धा / अर्धा...हाकानाका. अरे असं गर्मागरम पोटभरीचं सँडवीच ऑफिस मधे मिळणार असेल तर कलीग तुटुन पडतील...सँडवीच वर!! बघ विचार करुन

आदूबाळ's picture

17 Apr 2015 - 1:50 am | आदूबाळ

आयड्या भारी आहे!

वैताग मलूल सॅंडविचचा आहे. माशांशी माझं काय काम?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 8:53 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/sandwich-smiley-emoticon.gif

दिपकभौ झिंदाबाद! मिपाबल्लवाचार्य http://www.sherv.net/cm/emoticons/cook/italian-chef.gifमहासंमेल्लन झालच पाहिजे... http://www.sherv.net/cm/emoticons/eating/lemon-smiley-emoticon.gif
आत्मू चराळ... http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-sandwich.gif
अखिलखादाडकंपूकर...पुणे.पिं.चिं.चराळकमिटी

पियुशा's picture

14 Apr 2015 - 9:11 pm | पियुशा

वाह ! क्या बनाया हे , मीयां आप जो भी बनाते पूरी ईमानदारी औऱ मेहनत से बनाते सुभानल्ला !

भाते , तुमचया विनंतीला मानून पाकृ मंगळवारी आली.
दिपक,मराठी पेपर दिसतो आहे एक फोटोत.आवडली पाकृ नेहमीप्रमाणेच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Apr 2015 - 1:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

कंजूस काका,
तो ९ एप्रिल २०१५ चा लोकसत्ता आहे.

बाकी गील्ड सँडवीच करण्या आधी टोस्टर दुरुस्त करुन घ्यावा लागणार आहे.

पैजारबुवा,

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 3:11 pm | दिपक.कुवेत

"लोकसत्ता" येतो ईथे. ई-पेपेर वाचण्यापेक्षा मला असाच वाचायला आवडतो.

भाते's picture

15 Apr 2015 - 8:53 pm | भाते

कुवेतमध्ये सुध्दा तु छापिल लोकसत्ता वाचतोस हे वाचुन डोळे पाणावले.

रुपी's picture

15 Apr 2015 - 12:18 am | रुपी

तोंपासु!

माझी वहिनी ब्रेडला आतून कोथिंबीर चटणी + केचप लावून घेते. त्याने ग्रील्ड सँडवीच (माझ्या मते) जास्त छान लागतात.

सानिकास्वप्निल's picture

15 Apr 2015 - 1:32 am | सानिकास्वप्निल

ह्यात पण पनीर आहेच का :)
छात दिसतय ग्रील्ड सँडविच, फोटो ही छान आहे.

ह्यात पण पनीर आहेच का :)

आता दिपकने पनीर घालून केलेले उकडीचे मोदक पाह्यले की मी डोळे मिटायला मोकळा!! ;)

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 3:32 pm | दिपक.कुवेत

ईतक्यात डोळे मिटुस....अजुन तुला बरच्चं काहि पहायचयं/अनुभवाचयं....त्यासाठि मी पनीरचाहि त्याग करायला तयार आहे....

भाते's picture

15 Apr 2015 - 8:51 pm | भाते

पनीर घालून केलेले उकडीचे मोदक!
सूड, दिपकला अशी भन्नाट पाकृ सुचवल्यापध्दल धन्यवाद!
मिपावर केवळ दिपकच अशी पाकृ तयार करू शकतो. (दिपक कुठल्याही पदार्थात पनीर घालु शकतो.) :)

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 2:20 pm | दिपक.कुवेत

पण भात्या ज्या ज्या पदार्थात पनीर घालतो तो खाण्यालायक असतो कि नाहि? तुच सांग आता...

मधुरा देशपांडे's picture

15 Apr 2015 - 1:36 am | मधुरा देशपांडे

वाह. भारी दिसतंय.
बाकी पाकृ वाचताना पहिल्या वाक्यापासुन 'कुस्करलेलं पनीर अ‍ॅड करा' याच वाक्याची वाट बघत होते. ;)

सविता००१'s picture

15 Apr 2015 - 10:44 am | सविता००१

मी पण असंच करते म्हणून जळजळ झाली नाही रे दीपक. नाहीतर तुझे पाकृ चे फोटो पाहूनच मरायला होतं.

उमा @ मिपा's picture

15 Apr 2015 - 11:04 am | उमा @ मिपा

अप्रतिम फोटो आणि पाकृ!

Prau11's picture

15 Apr 2015 - 11:28 am | Prau11

Khoop chan pakkruti ahe

Prau11's picture

15 Apr 2015 - 11:30 am | Prau11

Me navin user ahe, I was unable to type in Marathi. Please advise, what to do for Marathi typing here.

मोहनराव's picture

16 Apr 2015 - 1:22 pm | मोहनराव

PLease help me. karan me type kelele marathit disat nahiye.

अक्षया's picture

15 Apr 2015 - 12:07 pm | अक्षया

मस्तच !

सँडविच मस्त आहे! फोटोही भारी एकदम!

जांभळा कोबी पार्ल्यात मिळतो.

त्रिवेणी's picture

16 Apr 2015 - 9:11 am | त्रिवेणी

जांभळा कोबी स्टार बझार मध्ये पण मिळेल.
आणि अशी रेसिपी टाकुन लोकांना त्रास दिलाच पाहिजे का?

उमा @ मिपा's picture

16 Apr 2015 - 9:58 am | उमा @ मिपा

काल केलं होतं हे सँडविच. मस्त झालं होतं.

मदनबाण's picture

16 Apr 2015 - 10:00 am | मदनबाण

खल्लास्स्स्स्स्स....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai

बाकी सुटसुटीत आणी पोटभरीचा पदार्थ.

मोहनराव's picture

16 Apr 2015 - 1:24 pm | मोहनराव

वा छानच! सोपी पाककॄती!

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 2:22 pm | दिपक.कुवेत

एकच मंत्रः खा आणि खिलवा....

आता मी पण एखादी पनीरची पाकृ करावी म्हणतो. ;)

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2015 - 6:10 pm | दिपक.कुवेत

वाट कसली बघतोयेस? मी येईन हो खायला....ते आपलं मदतीला :)

अनन्त अवधुत's picture

17 Apr 2015 - 1:32 am | अनन्त अवधुत

मस्त रेसिपी आहे.
कालच हे सँडवीच खाल्ले. आवडले.
लेकराच्या डब्यात द्यायचे असल्याने चिली फ्लेक्सला आळा घातला.
पोरीला पण आवडले , कारण एखादा पदार्थ नाही आवडला तर ,"हे घे, मी तुझ्यासाठी शाळेतून आणले आहे :) " ह्या वाक्यासकट डबा शाळेतून तसाच परत येतो

मी सुद्धा सँडवीच 2-३ तासाने खाल्ले, पण सँडवीच सॉगी झाले नव्हते.

माझीही शॅम्पेन's picture

19 Jul 2015 - 9:34 pm | माझीही शॅम्पेन

अगदी जोरदार भूक लागली असताना असे धागे उघडणे म्हणजे महा-पातक ...
दीपक - इतके चांगले पदार्थ आणि फोटो आयला कुठे फेडशिल ही पाप :)