मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिक्स व्हेज ग्रील्ड सँडवीच

दिपक.कुवेत · · पाककृती
san 1 मंडळी, कधीतरी असं होतं का कि फ्रिज उघडला की आणलेल्या सगळ्या भाज्या थोडया थोडया उरलेल्या दिसतात. मग त्या तशाच टाकून देणंहि जीवावर येतं आणि त्याची भाजी करायची म्हटली तरी पुरवठयास येत नाहि. असं जेव्हा होत तेव्हा घ्या सगळ्या भाज्या, द्या फोडणीचा तडका, भरा ब्रेड मधे आणि करा ग्रील्ड सँडवीच.....थांबा थांबा डीट्टेलवार सांगतोच कसं! साहित्यः १. उभे चीरलेले कांदे - २ २. उभ्या चीरलेल्या रंगीत सीमला मिरच्या - प्रत्येकि १ मध्यम ३. गाजराच्या काडया - १ ४. वाफवलेले कॉर्न - १ वाटि ५. पातळ चीरलेला जांभळा कोबी (नसला तरी वांधा नाय) ६. पनीर - १/२ वाटि (एच्छिक) ७. तेल - २ चमचे ८. टोमॅटो केचप - ३ ते ४ मोठे चमचे ९. चीली फ्लेक्स - १ चमचा (नसतील तर १/२ चमचा तिखट) १०. ओरॅगॅनो किंवा मिक्स हर्ब्स - १ चमचा ११. चवीनुसार मीठ १२. आपापल्या आवडिचा ब्रेड san 2 कॄती: भाज्या क्रंचीच ठेवायच्या आहेत म्हणून पार मउ होईस्त शीजवू नका. १. मंद आचेवर नॉन स्टिक कढईत/वोक/पॅन मधे तेल तापलं कि उभा चिरलेला कांदा घाला. कांदा परतला कि अनुक्रमे गाजर, सीमला मिरच्या, कॉर्न घालून परता. san 3 san 4 san 5 २. आता त्यात टोमॅटो केचप, चीली फ्लेक्स, ओरॅगॅनो किंवा मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. कुस्करलेलं पनीर अ‍ॅड करा. san 6 san 7 ३. भाजी पुर्ण गार झाली कि जांभळा कोबी मिक्स करा. भाज्या केचप मधे व्यवस्थीत कोट होण्यासाठि दोन चमचे किंवा फोर्कनी भाज्या खालीवर मिक्स करा. san 8 ४. स्टफिंग गार होतेय तो पर्यंत ग्रीलर प्रीहिट होण्यास ठेवा. ब्रेड स्लाईस मधे स्ट्फिंग भरा. आवडत असल्यास चीजने टॉपअप करा (स्लाईस किंवा किसलेलं). ब्रेड स्लाईसला वरुन बटर लावून ग्रील्ड करा san 9 san 10 ५. गर्मागरम मिक्स व्हेज सँडवीच चा आस्वाद घ्या san 10 टिपः नॉन व्हेज वाले ह्यात उरलेले चिकन टिक्क्याचे तुकडे, सुखा कोलंबी मसाला अ‍ॅड करु शकतात. चवीबद्दल खात्री देत नाहि पण एकदा प्रयोग करुन बघायला काय हरकत आहे?

वाचन 31910 प्रतिक्रिया 0