मीटिंग संपली.
बाया लगबगीने घराकडे परतल्या.
“माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला.
मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती.
गेले .
चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?”
तेवढी मदत मी नक्कीच करू शकते.
तिने एक ‘कार्ड’ आणलं.
ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं.
नव-याला होतं पत्र.
त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं.
“पत्ता?” मी विचारलं.
“नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिलं.
“कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?”
मी विचारलं.
मावशी गप्पच.
“मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं.
तिने डोळे पुसले.
तिची लहानगी पोर बाजूला खेळत होती.
ती म्हणाली, “गावात कुणालाबी नाय ठावं आबाचा पत्त्या”.
प्रतिक्रिया
11 Mar 2015 - 5:05 pm | एक एकटा एकटाच
अगदी कमी शब्दात फार मोठी गोष्ट सांगितलीत तुम्ही.
11 Mar 2015 - 5:37 pm | नगरीनिरंजन
हम्म्म्म....
11 Mar 2015 - 5:56 pm | तिमा
नेहमीप्रमाणे शतशब्दकथा आवडली. तिचे २० ओळीचे पत्र देखील लिहा नं, तेही चटका लावणारंच असेल.
11 Mar 2015 - 9:26 pm | अत्रुप्त आत्मा
++++++१११११११
12 Mar 2015 - 11:21 am | सस्नेह
तिचं पत्र वाचण्याची उत्सुकता आहे. त्याविना कथा अधुरी वाटली.
11 Mar 2015 - 6:01 pm | ज्योति अळवणी
त्या विसेक ओळीत तिच्या जगण्याच् चित्र मला दिसल.... तुम्हाला तिच्या जगण्याच् चित्र दिसाव म्हणून बाकी काही न बोलता मावशीने एक पत्र लिहून घेतल... अप्रतिम गोष्ट
11 Mar 2015 - 6:09 pm | सूड
आवडली.
11 Mar 2015 - 6:35 pm | सौन्दर्य
मावशीच्या मौनात बोलणारी कथा. अप्रतिम.
11 Mar 2015 - 7:05 pm | राजो
अप्रतिम… तुमच्या शतशब्दकथांचे एक पुस्तक छापावे ही विनंती
11 Mar 2015 - 9:40 pm | यशोधरा
आई गं!! :((
12 Mar 2015 - 12:21 am | रुपी
नेहमीप्रमाणेच छान!
12 Mar 2015 - 9:35 am | बोका-ए-आझम
अशा मिनिमलिस्टिक कथा जास्त अंतर्मुख करतात!
12 Mar 2015 - 9:44 am | खटपट्या
आवडली !!
12 Mar 2015 - 9:56 am | पदम
ह्या छोट्या लेखातुन सुद्धा मन हेलावुन गेल.
12 Mar 2015 - 11:18 am | अद्द्या
:-/
12 Mar 2015 - 6:05 pm | कपिलमुनी
+_१
12 Mar 2015 - 7:07 pm | जे.पी.मॉर्गन
आवडली !
"त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं." व्वा!
जे.पी.
12 Mar 2015 - 7:15 pm | खेडूत
सुंदर मांडणी. अस्वस्थ करणारी...
ग्रामीण लोकांच्या असंख्य समस्या - तुम्ही त्या क्षेत्रात काम करत असल्याने जवळून पहात असाल.
त्या निरागस मुलांसाठी मात्र काहीतरी करायला हवं !
14 Mar 2015 - 6:30 am | मुक्त विहारि
मस्त..