सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
5 Mar 2015 - 11:11 am

खोल मी आहे किती पाहून घेतो
मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो

सावल्यांनी पोळलो आहे कधी मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो

बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो

मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो

तू किती भिनलीस माझ्या आत राणी-
ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो

डॉ.सुनील अहिरराव

गझल

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

5 Mar 2015 - 12:15 pm | एक एकटा एकटाच

मस्त

सौन्दर्य's picture

5 Mar 2015 - 8:15 pm | सौन्दर्य

कविता छान, फक्त शेवटच्या दोन ओळींचा भावानुवाद समजावलात तर बरे.

चाणक्य's picture

5 Mar 2015 - 9:38 pm | चाणक्य

मस्त गझल. एकदम कडक....आवडली

कानडाऊ योगेशु's picture

5 Mar 2015 - 11:23 pm | कानडाऊ योगेशु

मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो

एकदम कातिल शेर.

चुकलामाकला's picture

6 Mar 2015 - 2:32 pm | चुकलामाकला

+ १

सांजसंध्या's picture

7 Mar 2015 - 12:03 pm | सांजसंध्या

अनुमोदन

मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो

सुरेख.

खटासि खट's picture

5 Mar 2015 - 11:57 pm | खटासि खट

चांगलाच प्रयत्न आहे.

सावल्यांनी पोळलो आहे कधी
ऊनही आता जरा फुंकून घेतो

या शेरातली पहिली ओळ "इथे सावल्यांनी पोळलो" यात कल्पनाचमत्कृती विरोधाभास अलंकार दर्शवते. पण मग दुस-या ओळीला त्या अपेक्षेने ऊन फुंकून पिणे यात तो कंटीन्यू नाही होत.

गालगागा सांभाळून
उन्हाने पोळलो म्हणून सावली फुंकून पितो असं जमलं असतं.

तिमा's picture

6 Mar 2015 - 10:40 am | तिमा

सहमत. +१

रुपी's picture

6 Mar 2015 - 2:08 am | रुपी

छान!

शब्दबम्बाळ's picture

6 Mar 2015 - 4:03 am | शब्दबम्बाळ

एकाहून एक सरस कविता येऊ लागल्यात!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Mar 2015 - 3:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त!

@अमोल परब,सौंदर्य,चाणक्य, कानडाऊ योगेशु,चुकलामाकला,यशोधरा,खटासिखट,तिमा,रुपी.शब्दबम्बाळ,मिसळलेला काव्यप्रेमी
सर्व मित्रांचे मनापासून आभार !
आदरणीय खटासिखट, मी आपाल्या मताशी सहमत आहे. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद.