चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
27 Feb 2015 - 1:38 pm

चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला
गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला

भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची;
वा-याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती...
वेगळच जगण अनुभवायचय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

Born clerk... died clerk सगळेच असतात;
वेगळा option click फ़क्त थोडेच करतात;
त्या थोड्यांमद्धे रहायचय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

White color job आपला फंडा नाय...
कोप-यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय..
एक वेगळ आयुष्य जगायचय मला...
काय अन् कस कोणी सुचवतय का ज़रा?

I.A.S., I. P.S. किंवा एखादा BUSINESS,
10 वि, 12 वि च्या result मूळे आई बाबा expects...
यासर्व अपेक्षांपासून दूर जायचय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

झटपट यश... भरपूर प्रसिद्धि...
'डी' gang ची सर्वानाच भिती...
करू का try थोड? चाकोरीच्या बाहेर येण...
Visky अन् rum च्या सोबतित धुंद होण...

कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला..
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

नकोच जगुस चाकोरीबद्ध...
आयुष्य जगावच धुंद धुंद...
चल तुला करवते एक वेगळी सैर;
चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर!

धुंद निसर्ग धुंद नशा...
Canvasवर उतरवून रंग.. बदलून टाक दिशा.
निशब्द गुंफा, बोलकी स्कल्पचर्स...
Archaeology मधे आहेत चाकोरी बाहेरची features...
जगाचा प्रवास कर; प्रवासाचा picture कर...
दिसणा-या प्रत्येक आश्चर्याचा
मनापासून आदर कर...
हे सुद्धा वेगळच आहे; चाकोरी बाहेरचच् आहे...
तू वेगळा विचार करतोयस; यातच आयुष्याच गमक आहे.

कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...

माझ्यात सामावलेल्य़ा तुझ्या प्रतिबिम्बाला हलवणार नाही...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याला
गालबोट लावणार नाही!!!

संस्कृती

प्रतिक्रिया

एस's picture

27 Feb 2015 - 1:42 pm | एस

मिपावरच्या नवकवितेला
कुठलेच बोट लावणार नाही

सूड's picture

27 Feb 2015 - 3:28 pm | सूड

मी पण मी पण!!

टवाळ कार्टा's picture

27 Feb 2015 - 4:46 pm | टवाळ कार्टा

मग काय लावणार :)

संपादक असतो तर कात्री लावली असती. आता नाहीये तर तुम्हीच सांगा, काय लावू?

टवाळ कार्टा's picture

27 Feb 2015 - 5:57 pm | टवाळ कार्टा

अश्लिलता ही पहाणार्याच्या नजरेत असते :P
मी बोटाच्या ऐवजी "नखाबद्दल" बोलत होतो :)

जेपी's picture

27 Feb 2015 - 6:24 pm | जेपी

अश्लील>>>
या निमीत्त बोकिलांच्या शाळेतील झेंडेसर आठवुन राहिले..

चला अश्लील करुन येतो... =))

जेपी's picture

27 Feb 2015 - 5:40 pm | जेपी

मग काय लावणार>>
ओठ *mosking*

वेल्लाभट's picture

27 Feb 2015 - 2:33 pm | वेल्लाभट

भाव पोचलेत पण काव्य गडबडलंय कुठेतरी

चांगला प्रयत्न.

संदीप डांगे's picture

27 Feb 2015 - 3:33 pm | संदीप डांगे

चाकोरीबाहेर जगू पाहणारांच्या जगण्याचीही एक चाकोरीबद्ध पद्धत होऊनच जाते.

आदूबाळ's picture

27 Feb 2015 - 4:35 pm | आदूबाळ

कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...

चाकोरीबाहेर तिमिर आहे तर जायचंच कशाला मुळात तिथे कडमडायला?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 4:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

चल तुला करवते एक वेगळी सैर;
चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर!

हे पाहिलंत का? अहो त्यांचं उजाडणारं तिमीर वेगळया ग्रहावरचं तिमिर असावं :)

असंका's picture

27 Feb 2015 - 4:49 pm | असंका

:-))

(काय दृष्टी आहे!!)

चौकटराजा's picture

28 Feb 2015 - 2:12 pm | चौकटराजा

मी इथे नवा होतो तेंव्हा कविच्या कल्पनेचा पतंग कितीही उडाला तरी वास्तवाची दोरी त्याला चुकविता येत नाही अशा अर्थाचे
काही विचार इथे मांडताच मला बर्‍याच जणानी घेरले होते. आज त्याची आठवण झाली. बाय द वे त्यांच्यातील काही आजही
मिपाचे सदस्य आहेत. ते आजही म्हणतील 'हो तिमीरही प्रकाशरूप असतो .. निदान तो कविला तरी तसा दिसला .. त्याला तुमचे चिकित्सक ऑब्जेक्शन काय म्हणून ? एका शब्दप्रभूचे ते सगळे पंखे होते म्हणा !

साहेब काय मंजे कायच कळ्ळं नाय...जरा लिंक तरी द्या!!

स्वप्नांची राणी's picture

28 Feb 2015 - 9:06 pm | स्वप्नांची राणी

अच्छा...? तरिच... Visky पण मग तिथेच मिळत असावी...

अजया's picture

27 Feb 2015 - 5:50 pm | अजया

आईग्गं =))

अजया's picture

27 Feb 2015 - 5:54 pm | अजया

मी काय म्हणते ताई,जरा विश्रांती घेत जा ना मधुन मधुन.दिसामाजी काहीतरी ते टंकावे असा काही नियम नाही इथे.

असं नाही लिहायचं . त्यांन्ना वाईट वाटत.
आधीच्या कविता- धाग्यावर तसं सांगितलं आहे त्यान्नी .

छान आहे कविता ... बरं का .

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो, दोष त्यांचा नाहीच्च मुळ्ळी...

दिसामाजी काहीतरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचीत जावे ॥

असं समर्थ म्हणून गेले आहेत, त्याचं त्या पालन करताहेत. बघा, बघा, अश्या प्रयोगाव्दारे फायदा होतो असा पुरावा आहे...

पॅम बेकर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने म्हणे एक प्रयोग केला. त्यात तिने मानसिक रोग्यांना रोज काही ना काही लिहायला लावले आणि असे दिसून आले की त्या रोग्यांची रोगप्रतिकारशक्ती एकदम वाढली.

पण माझ्या मते हा संशोधन प्रकल्प अर्धवट राहीला आहे. कारण, त्यात ते लेखन रोज वाचणार्‍यांची काय हालत होईल याचे निरिक्षण केलेले नाही... (उदा. असले वाचून वाचकांची रोगप्रतिकारशक्ती किंवा इतर काही एकदम कमी होईल किंवा कसे ???)

बघा, हा प्रयोगाचा दुसरा भाग करून विश्वविख्यात शास्त्रज्ञ बनायची मोठी संधी मिपाकरांकडे चालून आली आहे. +D

विशाखा पाटील's picture

27 Feb 2015 - 7:15 pm | विशाखा पाटील

अस्स होय! मग ज्योती आळवणी ताई पण पॅम बेकरच्याच शिष्य दिसतात. या रोज वाचकांना प्रतिसाद लिहायला लावतात ना.
@ ज्योति आळवणी, मला तुमच्या कविता खूप आवडतात. तुम्ही रोज एक कविता टाकतच चला. तुम्हाला व्यनी केला तर चालेल का?

चाकोरीबद्ध कविता नसली तरी आवडली.

पैदास सीझनेबल आहे की वर्षभर चालूच राहणार? :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 7:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कविता खुप खुप आवडली. मराठी भाषेचा र्‍हास रोखण्यासाठी अश्याच नवकाव्याची आवश्यकता आहे. आपणास अश्या कविता लिहिण्याची प्रेरणा, स्फुर्ती आणि भरघोस उत्साह देवानी जरुर द्यावा. मिपावरच्या ह्या टवाळ आणि अच्रत मेल्या लोकांच्या तिमिरामधे तुमच्या कविता तेजकिरणे टाकित आहेत. अनेक वाचनमात्र असणार्‍या आयडी/ आयडेंटीटीज तुमच्या कवितांमधल्या अमोघ ताकदीमुळे प्रतिसाद लिहिते होत आहेत. महिनाभर ते असेच लिहित राहिले तर त्यांनाही तुमच्याकडुन प्रेरणा मिळेल. तेही आपलं दर्जेदार साहित्य इथे लिहितील. वैश्विक मराठी दिनानिमित्त एक नवमिपाकर म्हणुन मी तुमच्याकडे एवढी मागणी करतो. बाकी लिहित रहाचं. आपलं लिखाण फक्त कविता पातळीवरचं नं ठेवता लेख, अनुभव वगैरे वगैरे गोष्टींमार्फतही येतील अशी आशा मी बाळगतो. इथे लेटेष्ट लिखाणचं लिहिलं पाहिजे असं नाही. तुमच्या कडे चार-पाच वर्षापुर्वी लिहिलेले लेख, कविता वगैरे असतील तर जरुर टाका. इथल्या लेखनभुकाड्या (नवं लेखन वाचायसाठी उत्सुक) लोकांची भुक अफाट आहे. ते आपल्या लेखांच मनापासुन स्वागत करतीलचं.

(नवमिपाकरांचा प्रवक्ता) कॅ.जॅ.स्पॅ.

डोळ्यापुढे तिमिर पसरला आणि चुकीचा प्रतिसाद दिला गेला तर त्याला जबाबदार कोण?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 7:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काव्यजनक...!!!

बाकी नुसता तिमिर दिसत नाही हल्ली. त्यामधे बारिक बारिक काजवे पण असतात. ते पण एवढे की तिमिराची एखादी लकेर दिसते त्यामधुन =))

ज्योति अळवणी's picture

27 Feb 2015 - 7:13 pm | ज्योति अळवणी

बहुतेक मीपा कराना नविन लिखाणापेक्षा व्यक्तींची allergy आहे; असे मला वाटते. योग्य शब्दात अपमान करणे ही पुणेकरांची खासियत आहे हे ऐकून होते... आता अनुभवले. धन्यवाद. एकदा या साईट वर नाव नोदवल्यानंतर मी काही add करावे की नाही हे सं.म. आणि मी यांच्यातील प्रश्न आहे; असे माझे मत आहे. बाकी... अनाहूत सल्ले आणि ओशट कमेंट्स यासाठीदेखिल आभारी आहे.

आपल्या सर्वांचे म्हणणे बरोबर आहे... काहीही न add करता फ़क्त इथे नेमस्त लिहिणा-यांचे लेखन वाचावे हेच योग्य.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 7:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्याच्यापे़क्षा जर का प्रतिसाद देण्यामधे आणि त्यातुन घडणार्‍या गमतीजमतीचा भाग जर का झालात तर कसं? जेवढ्या मिळुन मिसळुन वागाल तेवढ्या लवकर मिपा परिवाराचा भाग व्हाल. लोकही तुम्हाला ओळखायला लागतील त्या निमित्ताने. लिहित रहा. धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 7:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला एक व्यनि केलाय तो जरुर वाचा. प्रतिसाद अपेक्षित आहे. धन्यवाद.

विशाखा पाटील's picture

27 Feb 2015 - 7:30 pm | विशाखा पाटील

१. कोणी लिहिलंय यापेक्षा काय लिहिलंय, हे महत्वाचं असत.
२. पुणेकरांचा इथे काय संबंध? इथे माझ्यासह अनेक जण मुळचे पुणेकर नाहीत.
३. टाकले (add) केले की ते वाचकांसाठी खुले होते. त्यावर प्रतिसाद येणारच.
४. तुमचा इतरांचे लेखन वाचण्याचा निर्णय आवडला.
५. 'नेमस्त' म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते कळले नाही.

मधुरा देशपांडे's picture

27 Feb 2015 - 7:33 pm | मधुरा देशपांडे

प्रत्येक मुद्द्याला सहमती.

पलाश's picture

27 Feb 2015 - 8:04 pm | पलाश

सहमत.

सविता००१'s picture

28 Feb 2015 - 2:01 pm | सविता००१

अत्यंत सहमत.
तुम्हाला न आवडलेल्या प्रतिक्रिया फक्त पुणेकरांनी दिल्यात असा जावईशोध लावल्याबद्द्ल अभिनंदन बरंका!

शेवटचा प्रश्न अगदी नैसर्गिक आहे.लेखिका/ कवयित्री बाईंनी कृपया समजून सांगावे...

माफ करा ज्योतीताई, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता पण आधीही अनेकजणांनी सुचवल्याप्रमाणे दोन लेख, कवितांमध्ये थोडा वेळ घ्या! तुमचे लेख, कविता जरूर प्रकाशित करा पण अठवड्याला एक याप्रमाणे! हे मी सुचवतीये, अन्यथा मिपावर तसे काही बंधन नाही. रागावून वाचनमात्र राहू नका.

यसवायजी's picture

28 Feb 2015 - 2:55 pm | यसवायजी

ओशट म्हन्जे काय?

मोहनराव's picture

27 Feb 2015 - 7:40 pm | मोहनराव

चान चान!!

चित्रगुप्त's picture

27 Feb 2015 - 8:33 pm | चित्रगुप्त

चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला

.... म्हणून आम्ही जे जे काही उद्योग केलेत, त्यातले काही इथे वाचा:
मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
http://www.misalpav.com/node/18587

आणखी काही:
http://www.misalpav.com/user/9160/authored

असंका's picture

27 Feb 2015 - 9:44 pm | असंका

सुरेख!!

_/\_

जेपी's picture

27 Feb 2015 - 8:33 pm | जेपी

ज्योती ताई ,
तुम्ही संजय कोकरे सायबांच्या संघटनेत सामील व्हा.
या जुन्या लोकांना नवमिपाकरांच काय कौतीक नाय!!!

(नमिसंअ)जेपी

टवाळ कार्टा's picture

27 Feb 2015 - 10:11 pm | टवाळ कार्टा

बाकी अनाहिता एका अबलेच्या लेखावर वस्सकन खौचट प्रतिसाद देताना पाहून एक मिपकर म्हणुन शरम वगैरे वगैरे...

खटपट्या's picture

27 Feb 2015 - 11:31 pm | खटपट्या

कीती छान लिवता वो तुमी....
बाकी कोणी काही म्हणोत, अल्पावधीत मी तुमचा फॅन झालो आहे.

कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला..

इथेच, हीच जागा बरोबर आहे. सगळं discuss होणार....

संदीप डांगे's picture

28 Feb 2015 - 10:47 am | संदीप डांगे

आणि डिस्कस थ्रो पण चांगला रंगणार... :-)

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2015 - 11:32 pm | पिवळा डांबिस

एक मार्ग सुचवतो बघा, चाकोरीबाहेर जगण्याचा,
धृव-हवामान तज्ञ होऊन, अंटार्क्टिकावर रहाण्याचा...
शांत सन्नाटा चोहिकडे, मग कवितांनाही खळ नाही,
मज्जाच की हो सर्वत्र, कारण पेंग्विनना मराठी येत नाही....
:)

पैसा's picture

28 Feb 2015 - 12:01 am | पैसा

काय ह्यां!!!

*ROFL*

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2015 - 11:45 am | पिवळा डांबिस

आमी काय केलां?
नवोदित आसतलां म्हणान प्रोत्साहन दिला...
आणाहितं आसतलां म्हणान पुरुषसुलभ दुर्लक्षही करून बघितलां...
पण हे भंकस जिलब्यो संपतीत तर शपथ!!!
प्रशासकांक तर काय मार्ग सुचलेलो दिसणां नाय,
मगे आम्ही एक मार्ग सुचवलो!!!! :)
काय, चुकलां काय?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2015 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा

@कारण पेंग्विनना मराठी येत नाही....>>> :-D पण सदर आय डी जर तिकडे गेला, तर त्यांनाही मरा ठि येइल!

करेक्ट. आणखी तिथे सहा महीने तिमिर असतंच. एक्का काका म्हणतात तसं ते चमकतही असेल.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2015 - 1:15 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्हा ह्ह्ह्हा ह्ह्ह्हा =))

संदीप डांगे's picture

28 Feb 2015 - 1:35 pm | संदीप डांगे

चमकणारे तिमिर...? छ्या बॉ... नाही येत डोळ्यासमोर..

कवयिट्रीची विजुलायझेशन क्यापाषिटी भन्नाट हाय..

कॉलींग चित्रगुप्त... काहीतरी मदत करा......

संदीप डांगे's picture

28 Feb 2015 - 1:38 pm | संदीप डांगे

lightning dark

आम्ही पाचगणीला गेलो होतो त्यावेळची आठवण झाली धाब्यावर पोहे खाताखाता थोडे चिमण्यांसाठी अंगणात टाकले चिमण्यांच्या डोक्यावरचे तुरे पाहून आश्चर्य वाटले. तिकडचा एक माणूस म्हणाला चिमण्या नाहीत या. हे आहेत कैप्टनजैकस्काइलार्क.

नाखु's picture

28 Feb 2015 - 2:54 pm | नाखु

नवौन्मेषी साहित्यकांना भाकड प्रतिसादप्रभूंचा आणि मिपा लेखकूंचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या प्रतिसादप्रभूंचा, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर घराच्या उंबर्यापासून उसगावापर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) सवंग लोकप्रियतेची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे काढे नवौन्मेषी साहित्यकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही नवौन्मेषी साहित्यकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना दोन साहित्यप्रसवात (हो साहित्यच उगा गैरसमज नको) योग्य अंतर ठेवायला सांगतो , दुसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना अर्थपूर्ण आणी अ-पाल्हाळीक लिहायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना प्रतिसादावर चिंतन आणि जमले तरच मनन करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे नवौन्मेषी साहित्यक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने नवौन्मेषी साहित्यकांना ते वापरायचा प्रयत्न केल्यास नवौन्मेषी साहित्यकंची उर्मी आणि उर्जा दबली जाते. (त्या दबलेल्या साहित्याचा सर्वांनाच त्रास होतो ते वेगळे)
त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली क्षुब्ध नवकविता टंकली पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. साहित्य स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. नवौन्मेषी साहित्यकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त नवौन्मेषी साहित्यक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. नवौन्मेषी साहित्यक स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त नवौन्मेषी साहित्यकाचे धाग्यावरून उठा. तुम्ही साहित्यकाचे धाग्यावरून उठलात तर नवौन्मेषी साहित्यक स्वतःच स्वतःचा (बहिर्गमनाचा) मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.
सोप्पी सुचवणी
चिट(क्)वणीस भसभसा
रताड
साहित्याचा
रमार
साठा
नवौन्मेषी साहित्यकांच्या हिताची आभासी काळजी घेणारी एक्मेव संघटना

संदीप डांगे's picture

28 Feb 2015 - 3:24 pm | संदीप डांगे

_/\_

जेपी's picture

28 Feb 2015 - 3:34 pm | जेपी

_/\_

शब्दबम्बाळ's picture

28 Feb 2015 - 5:32 pm | शब्दबम्बाळ

काही लोकांनी लिहिलेल्या उत्तम साहित्यावर केवळ ५-१० प्रोत्साहनाच्या प्रतिक्रिया दिसतात पण काही प्रमाणात हुकलेल्या(आपापल्या मतांनुसार) कवितांवर मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पडतो! काही लोक लिखाणात सुधारणा होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात हे सोडले तर बर्याच अंशी, साहित्यावर हर प्रकारे माराच होत असतो. थोडाफार विनोद असावा पण इतका कि त्यामुळे लेखक/कवीने खजील होऊन लिखाणच बंद करावे असे इथे कोणाचे मत नसेल…

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2015 - 1:14 pm | पिवळा डांबिस

थोडाफार विनोद असावा पण इतका कि त्यामुळे लेखक/कवीने खजील होऊन लिखाणच बंद करावे असे इथे कोणाचे मत नसेल…

अजाबात न्हायी, तसं मत अजाबात न्हायी...
पण मिपाच्या मेंबरानं सवताचं लिखान आसं रतीब घातल्यासारकं घालन्याबरोबरच इतरांचंपन कायतरी वाचावं, त्यावर आपलं कायतरी आधिक-उनं मत द्यावं आशीबी अपेक्षा आसतेय ना मालक?
त्ये नाय आन काय नाय वगीच आपलं येकापाठोपाट येक जिल्बी काढीत रायलं आनि ती बी आळ(व)नि तर मंग पब्लिक पन कावनार नाय तर काय! बाकीच्या सौस्थळांचं काय आसंल त्ये आसो पन मिपाकर च्यामारी हितं खुद्द मिपाच्या मालकांशी राडा घेत्यात त्ये काय हेंच्यासाटी फकस्त टाळ्या मारनार काय!!! :)

संदीप डांगे's picture

1 Mar 2015 - 1:24 pm | संदीप डांगे

१००% हाणु'मोदन :-)

चौकटराजा's picture

28 Feb 2015 - 5:47 pm | चौकटराजा

हा इशारा देखील शिग्रेट फुकल्यास आयुष्यास मुकल्यास तुपला तू जबाबदार अशा सारखा वैधानिक आहे की काय ?

पैसा's picture

28 Feb 2015 - 6:09 pm | पैसा

_/\_

वारले वाचुन.पुढच्या जन्मी भसाभसाची मेंबर्शीप द्या बरं का _/\_

शिव कन्या's picture

28 Feb 2015 - 5:20 pm | शिव कन्या

कवितेत मांडलेली मन:स्थिती हरेक तरुणाईची असते...पण पुढे व्यवहार इतका येतो, कि वेगळे काय अन कसे जगायचे हा प्रश्न छळत राहतो.

कंजूस's picture

28 Feb 2015 - 7:39 pm | कंजूस

दुखणाइत हा जळे दिवा।
खोकत खोकत काजळ ओकत।
दुखणाइत हा जळे दिवा ॥

कोणाची बरं ही कविता ?

पाषाणभेद's picture

1 Mar 2015 - 12:56 pm | पाषाणभेद

चला जुने दिवस परत आले म्हणायचे. मध्यंतरीच्या काळात काही मजा येत नव्हती.