आर आर पाटील

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
16 Feb 2015 - 7:08 pm

R R Patil

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर अर्थात आबा पाटील यांचे आज निधन झाले. वाचल्याप्रमाणे, गेले तीन महीने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी केल्या गेल्या, करण्याचा प्रयत्न झाला. त्यात सुरवातीच्या काळातील संत गाडगेमहाराज अभियान असोत अथवा नक्षलवादग्रस्त भागात अनेक चांगली कामे तयार करून विश्वास संपादन करणे असोत अथवा डान्सबारबालांवरील बंदी असोत... काही वेळेस ते जनतेच्या टिकेचे धनी देखील झाले, विशेष करून २६/११ च्या हल्ल्यानंतरचे त्यांचे एक(च) पण अनाठायी वक्तव्य... पण तळागाळातून वर आलेला एक राजकारणी हे त्यांचे वैशिष्ठ्य होते आणि सध्याच्या राजकारण्यांनी धडे मिळून (आणि गिरवून) शहाणे होण्याच्या काळात ते नक्कीच चांगले नेतृत्व होऊ शकले असते.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत आणि कुटूंबियांना (पत्नी, मुले आणि आई) या काळात धीर लाभोत ही प्रार्थना...

राजकारणप्रतिसाद

प्रतिक्रिया

आर आर सारखा प्रामाणिक माणुस होणे नाही,कायदेशिर कामाला हा माणुस कधी नाही म्हणला नाही आणी बेकायदेशिरला कधी जवळ उभे केले नाही.महाराष्ट्राच्या राजकाराण व समाजकारणातली संवेदना आज हरपली.

त्रिवेणी's picture

16 Feb 2015 - 8:29 pm | त्रिवेणी

नाही बोलवत काही.
देव चांगल्या माणसांनाच का ईतक्या लवकर नेतो.

मदनबाण's picture

16 Feb 2015 - 9:05 pm | मदनबाण

आबांना श्रद्धांजली !
गोपिनाथ मुंडे यांच्या प्रमाणेच मोठा जनसंपर्क असणारा हा महाराष्ट्रातला नेता हरपला.
आबांच्या कुटूंबियांना धीर मिळो...

मित्रहो's picture

16 Feb 2015 - 10:34 pm | मित्रहो

आबा पाटलांना श्रद्धांजली

गवि's picture

16 Feb 2015 - 11:17 pm | गवि

..शत्रूंनीदेखील कधी भ्रष्टाचार किंवा अनैतिकतेचा आरोप त्यांच्यावर केला नसावा.

.दुर्मिळ स्वच्छ हाताची राजकारणातली व्यक्ती.

आदरांजली.

..अनेकांनी गुटखा सोडण्यासाठी त्यांच्या उदाहरणाकडे पहावे.

ईंद्रनिल's picture

16 Feb 2015 - 11:58 pm | ईंद्रनिल

राजकारणी व्यक्तीबद्दल सहसा चांगल बोललं जात नाही आणि जे बोलतात ते स्तुतीपाठक काम करवुन घेण्याच्या अपेक्षेने बोलत असतात.पण मी एक सामान्य माणुस असुन जेव्हा आबांना भेटायला त्यांच्या घरी गेलेलो तेव्हा एका गृहमंत्र्यांच चार खोल्यांच साधं घर पाहुन अचंबित झालो( अचंबित व्हायच कारण सर्वांना ठाउक आहे),कसलिहि आडकाठी किंवा मज्जाव तेथे न्हवता.मी तेथे पाहिलेली गोष्ट म्हणजे गृहमंत्र्यांकडे लोक लाईटची बिल (हजार रुपयाच बिल) कमी करवुन घेणे,पोराला शाळेत प्रवेश घेणे यासारखी काम सांगत होती आणि हा माणुस कपाळाला आठी न घालता न बोलता एकेक काम हातावेगळं करत होता. साधं नगरसेवकाच घर किंवा त्याला भेटणे हा अनुभव असलेल्यांना मला काय सांगायचय ते कळाल असेल.

आबा भावपुर्ण श्रद्धांजली !

पिंपातला उंदीर's picture

17 Feb 2015 - 9:26 am | पिंपातला उंदीर

महाराष्ट्रान अशात काही नेत्यांचे अकाली आणि धक्कादायक मृत्यू पाहिले . कुणाचही अस जाण वाईटच . पण त्या नेत्यांचा भ्रष्टाचार , वैयक्तिक आयुष्यातला बदफैलीपणा आणि इतर वाईट गोष्टींमुळे त्यांच्या मृत्यू बद्दल मनापासून हळ्हळ वाटली नाही . पण आबांच्या मृत्यूमुळे खरच मनापासून वाईट वाटलं . शरद पवारांनी एका आठवणीत सांगितलं कि ते जेंव्हा सभा घेण्यासाठी तासगाव ला जात तेंव्हा आबांची आई , पत्नी आणि मुल व्यासपीठावर पुढ पुढ करण्यापेक्षा समोर प्रेक्षकांमध्ये जमिनीवर बसलेली असत . त्यांचा भाऊ पोलिस उप निरीक्षक होता . पण गृहमंत्री असून पण आबांनी त्याला कधीही बढती दिली नाही . आबांचा मृतदेह मुंबईत अंत्यदर्शनासाठी ठेवला होता तेंव्हा त्यांच्या कुटुंबाची मुंबई मध्ये उतरण्याची पण काही व्यवस्था नव्हती . आमच्या गावातल्या टपर्या नगरसेवकांचे पण पुण्या मुंबईला flat असतात पण आबा नी अस काही न करण्यात धन्यता मानली . या अशा निरलस नेत्याला का इतक्या लवकर मृत्यू यावा ? देवावर विश्वास असता तर नक्कीच त्याला हा प्रश्न विचारला असता . आबा ना मनापासून श्रद्धांजली .

सुनील's picture

17 Feb 2015 - 9:28 am | सुनील

सदर विषयावर दोन धागे निघाले आहेत, हे ध्यानात आले नाही.

http://misalpav.com/comment/665854#comment-665854

धर्मराजमुटके's picture

17 Feb 2015 - 9:38 am | धर्मराजमुटके

गेल्या तीन दशकांपासून राजकारणामध्ये आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे चर्चेत राहिलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील म्हणजेच आबा यांचे सोमवारी दिनांक १६ फेब्रूवारी २०१५ रोजी मुंबईत निधन झाले. आबांच्या चुकीच्या हिंदी वक्तव्यांमुळे बर्‍याच वेळा वादंग माजले पण माणूस मनाचा सच्चा होता एवढे नक्की.
त्यांना मनापासून श्रद्धांजली !

महाराष्ट्राचं दुर्दैव!!!

आबांच्या स्मृती चिरकाल रहातील....!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Feb 2015 - 9:40 am | माईसाहेब कुरसूंदीकर

श्रद्धांजली.राष्ट्रवादीत (शरद बरोबर) असूनही स्वच्छ प्रतिमेचा एक नेता.
१९९९ साली पाटील ह्यांनी कॉन्ग्रेस पक्ष सोडून चूक केली असे सारखे वाटायचे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2015 - 9:41 am | डॉ सुहास म्हात्रे

श्रद्धांजली.

गवि's picture

17 Feb 2015 - 9:42 am | गवि

..शत्रूंनीदेखील कधी भ्रष्टाचार किंवा अनैतिकतेचा आरोप त्यांच्यावर केला नसावा.

.दुर्मिळ स्वच्छ हाताची राजकारणातली व्यक्ती.

आदरांजली.

..अनेकांनी गुटखा सोडण्यासाठी त्यांच्या उदाहरणाकडे पहावे.

चिकित्सक's picture

17 Feb 2015 - 9:43 am | चिकित्सक

महाराष्ट्राच्या माजी गृह मंत्रीना श्रद्धांजली.

"बड़े बड़े शहरों में छोटी घटनाएँ होती रहती हैं "

सचिन कुलकर्णी's picture

17 Feb 2015 - 9:45 am | सचिन कुलकर्णी

NCP तला एक Non Corrupt नेता. आदरांजली..

सौंदाळा's picture

17 Feb 2015 - 9:47 am | सौंदाळा

श्रद्धांजली.
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, डान्सबारबंदी, गुटखाबंदी असे स्वागतार्ह निर्णय आबांनी घेतले

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2015 - 9:48 am | अत्रुप्त आत्मा

श्रद्धांजली. __/\__

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2015 - 9:50 am | श्रीरंग_जोशी

आर आर पाटील यांना विनम्र श्रद्धांजली.

कलंत्री's picture

17 Feb 2015 - 9:51 am | कलंत्री

विनम्र अभिवादन. आबा हे कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते. विशेष प्रतिभावंत लोकांनी असे अकाली जाणे ही समाजाची खरी हानीच असते.

आबांना विनम्र श्रद्धांजली.

एक मंत्री म्हणून त्यांची प्रशासनावर जितकी पकड असायला हवी होती तितकी नव्हती असे वाटते, तरीही इतर अनेक राजकारण्यांपेक्षा त्यांची प्रतिमा अधिक स्वच्छ आणि उजळ होती, ह्यात शंका नाही.

एक खंत वाटते ती ही की, त्यांच्या हिंदीच्या अपुर्‍या ज्ञानामुळे उच्चारलेले वाक्य, (जे हिंदी माध्यमांनी लक्ष्य केले हे साहजिकच) परंतु, किमान मराठी माध्यमांनी (आणि विशेषतः मराठी जनतेने) समजऊन घ्यायला हवे होते. ते दुर्दैवाने झाले नाही. आम्हीही हिंदी माध्यमांची री ओढीत आबांची हुर्यो उडवण्यात धन्यता मानली. असो.

विकास's picture

17 Feb 2015 - 10:00 am | विकास

आजचा लोकसत्तेचा विशेष अग्रलेख अवश्य वाचावात... आद्य आम आदमी

वाईट इतकेच वाटले, की माणसाचे चांगले गुण हे त्याच्या मृत्युलेखात लिहीपर्यंत लपवून का ठेवले जातात? त्याच्या जीतेपणी कधीच का जाहीर कळत नाहीत?

या बातमीवर अजून एक धागा निघाला हे नंतर समजले... असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2015 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आबांना भावपूर्ण श्रद्धांजली. साधा माणुस. राजकारणात अशी साधी माणसं दिसणं आता दुर्मिळ झालं आहे.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

17 Feb 2015 - 10:19 am | नाखु

सकाळमधील हिवरे बाजारच्या श्री पोपटराव पवारांचे खालील शब्द आबांचे मोठेपण आणि साधेपण नेमक्या शब्दात व्यक्त होते

विधानसभेच्या 2004च्या निवडणुकीत माझ्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडावा, अशी आबांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मला फोन केला व तासगावला येण्याची विनंती केली. माझी द्विधा अवस्था झाली. जावे की न जावे? कारण सामाजिक काम करताना सक्रिय राजकारणापासून कटाक्षाने लांब राहण्याचे मी ठरविले होते. माझे मौन ओळखून आबा म्हणाले, ""पोपटराव, मला तुमची भूमिका माहिती आहे. अडचण वाटत असेल, तर बघा; पण एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्ते प्रचार सुरू करण्याची माझी इच्छा आहे.‘‘ त्यांचा हेतू लक्षात घेऊन मी तासगावला गेलो. सोबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर होत्या. त्याच वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी "माझा तिसरा मुलगा‘ म्हणून आबांचा पत्रकाद्वारे गौरव केला होता.
सुधीर's picture

17 Feb 2015 - 10:43 am | सुधीर

ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा असलेला चांगला नेता गेला.

प्रसाद१९७१'s picture

17 Feb 2015 - 10:56 am | प्रसाद१९७१

प्रामाणिक माणसांना सत्ता मिळाली तर त्यांनी फक्त स्वता स्वच्छ राहुन उपयोग नाही, आजुबाजुच्यांना पण जबरदस्तीने स्वच्छ रहायला लावले तर त्या सत्तेचा उपयोग. कमीतकमी आजुबाजुला घडणार्‍या उघड भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवणे तरी गरजेचे होते. राष्ट्रवादी सोडुन जर आम आदमी पक्षाचे काम केले असते तर मुख्यमंत्री होऊ शकले असते.

पगला गजोधर's picture

17 Feb 2015 - 12:19 pm | पगला गजोधर

डान्सबार बंद करणाऱ्या निर्णयाचा चाहता.

प्यारे१'s picture

18 Feb 2015 - 1:18 am | प्यारे१

आर आर पाटीलना भावपूर्ण श्रद्धांजली.

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 1:26 am | पिवळा डांबिस

आर आर आबांना श्रद्धांजली.
मे हिज सोल रेस्ट इन पीस...