दहशतवाद म्हणजे काय?

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 4:29 pm

तर दहशतवाद काय असतो हे समजुन घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. उदा. एक नवरा असतो आणि त्यांची एकुलती एक बायको असते. (सगळ्याची एकुलती एक बायको आणि एकुलता एक नवरा असतो, हा अपवाद असतात काही ज्याच्या काही उपशाखा असतात ज्या अनधिकृत असतात). तर असो. भावना म्हटले कि अवांतर आलेच. तर फेब्रुवारी आला आहे, प्रेमाचा महिना आहे, बायकोला कचेरीत काही काम नसते, नवऱ्याच्या सोबत घालवलेले काही प्रेमळ क्षण आठवून नवऱ्याशी काही प्रेमयुक्त गुंज मनीचे करण्यासाठी ती नवऱ्याच्या कचेरीत त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क न करता त्यांच्या कचेरीच्या दुरध्वनीवर संपर्क करते.

अनायासे नवऱ्याची जेवणाची वेळ झालेली असते. तर पलीकडे नवरा नुकतेच आपल्या सहकारी मंडळी बरोबर जेवण उरकून आलेला असतो व त्याच्या सहकर्मचारी मुळे बाईशी वार्तालाप चालू असतो इतक्यात तो फोन उचलतो. पण फोन उचलता उचलता त्यांच्या तोंडुन मुळे बाईनी आणलेल्या मुळ्याच्या भाजीची स्तुती करत असतो. "पण काही म्हणा हा मुळे म्याडम, तुमच्या हातच्या मुळ्याच्या भाजीला तोड नाही" असे म्हणत रिसीवर कानाला लावून २-३ वेळा हेलो, हेलो म्हणतो. पण समोरून फोन ठेवला गेलेला असतो.

दिवसभराचे काम धाम उरकून छान मनाने नवरा घरी जाण्यास निघतो. निघताना पत्नीस फोन करतो. पण त्याचा फोन कट करून बायको एक निरोप पाठवते कि मी सध्या व्यस्त आहे, तुम्हास नंतर फोन करते. असेल काही कामात असा विचार करून नवरा घरी निघतो. घरी येउन पाहतो तर घराचे कुलूप उघडलेले असते. नवरा साशंक मनाने घरात शिरतो तर बायको घरी आलेली असते. एक उग्र वासाने घर भरून निघालेले असते.

नवरा स्वगत करत "अरे नेहमी माझ्या पेक्षा हि उशिरा घरी येणारी हि आज लवकर घरी आणि तीही स्वयंपाक घरात". आज असे काही विशेष आहे का जे मी विसरलो आहे. घरात येऊनही याच्याशी स्मितहास्य नाही कि संबोधन नाही. एक विचित्र शांतता. नवरा अभ्यासासाठी निमुट बसलेल्या आपल्या मुलाकडे डोळ्याने प्रश्नाथर्क हावभाव करतो. मुलगाही आपले दोन्ही खांदे उडवून त्याच अंदाजात उत्तर देतो. एक विचित्र शांतता जसे काही वादळ येणार आहे. (नवऱ्याना घरातला किलबिलाट परवडतो पण शांतता हि त्यांना खूप मारक असते).

हातपाय धुवुन येइतोस्तर चहाचा कप समोर आदलेला असतो. आदळण्याचा आवाजाच्या तीव्रते वरून नवरा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. इथुन खरी दहशतवादाची प्राथमिकता सुरु होते. जेवणघरात कधी नव्हे इतका भांड्याचा आवाज येत असतो. नवरा अजूनही साशंक. कारण आपण असा काय गुन्हा केला आहे हे त्याचे त्याला अजून उमगले नसते आणि न उमगलेल्या गुन्ह्याची काय शिक्षा भोगावी लागणार आहे या प्रचंड दबावाखाली तो टीवी वरचे च्यानल चाळत असतो. पण अधूनमधून डोळे, मन पुर्णत्वे, ध्यास आणि कान हे सर्वं स्वयंपाक घराच्या दिशेने असते. याला दहशतवादाची कुटनीती म्हणतात. या मध्ये आपल्या भक्ष्याला एवढे मानसिक रित्या आपल्या खेळीत गुंतवून ठेवायचे कि त्याला पुढची रणनीती करण्यास काही वेळच मिळणार नाही.

एवढ्यात एक फोडणीचा खमंग सुगंध नवऱ्याला सुखावून जातो. तरी पण मघासचा तो उग्र वास अजूनही येत असतो. पण त्याबद्दल विचारण्याचे धाडस होत नसते. आता नवरा मनातल्या मनात म्हणतो काही तरी विशेष दिवस असेल आणि मी विसरलो असेल म्हणुन तर पंच पक्वान्नाचा बेत दिसतोय. जेवण झाले कि काढेन रुसवा तिचा. एव्हाना नवरा थोडा रीलॅक्स झालेला असतो. जेवणाची वेळ होते. पाने घेतली जातात. मुले आणि नवरा आपल्या जागी येउन बसतात. पक्वान्नाची भांडी स्थानापन्न होतात. नवरा आपले ताट स्वतःच्या हाताने घेणार इतक्यात बायको स्वतः त्याचे ताट वाढते.

तर पुढच्या दोन सेकंदात त्याच्या पुढ्यात मुळ्याचे पराठे, मुळ्याची पचडी, मुळ्याची कोशिंबीर आणि कधी न खालेली मुळ्याची खिचडीही असते. हे पदार्थ पाहून नवऱ्याचा पारा चढलेला असतो. "अग, एवढे सगळे मुळ्याचे पदार्थ एकत्र, आज काय मुळा डे आहे का? कोणी करते का असे जेवण?" समोरून शांतपणे एकच उत्तर येते, "नसेल जेवायचे तर नका जेवु, पण मग उद्या पासुन मुळे बाईकडेच खानावळी रहा." आता नवऱ्याला सगळा उलगडा झालेला असतो, पण आता त्याच्या हाती काही उरलेलं नसते.

उर्वरीत आयुष्य दोन वेळचे जेवण नीट मिळावे या उद्देशाने त्याने समोर वाढलेले अन्न गुपचुप खाण्यास सुरवात केलेली असते. पण मनात तो एक प्रकारे खुश असतो कि हे सर्वं भोगणारा मी एकटा नाही, तुम्हीही तेच खाणार आहात, असे स्वगत करत असतानाच बायको आणि मुलाच्या ताटात वाढल्या गेलेल्या गरमा गरम वेज बिर्याणीच्या सुगंधाने त्याचा घास घश्यातच अडकतो. पण त्या अडकलेल्या घशातून तो घास काय आवाज सुद्धा बाहेर काढू शकत नसतो. शेवटी आलिया भोगासी असावे सादर हे मनासी समजवून जेवण उरकतो. रात्री हिची समजूत काढूया या हिशोबाने पुढचे मनसुबे बांधले जातात पण गुन्हेगाराची झोपण्याची तरतूद मुळे अति खाल्यामुळे हॉल मध्ये करण्यात आलेली असते. शेवटी काही करू शकत नाही हे उमगल्यामुळे नवरा झोपी गेलेला असतो.

दुसरे दिवशी रोजच्या सारखी कामे सुरु होतात. नवरा हाफिसात येतो. हाफिसात येताना मुळे बाई दिसतात. तर नेहमी मुळे बाईना पाहुन नवऱ्याचा खुलणारा चेहरा आज भीतीने पांढरा फटक होतो. कसे बसे मुळे बाईना मुळातच आपण दिसणार नाही याची काळजी घेत आपल्या जागेवर बसत आपले मळमळीत झालेलं पोट घेऊन समोरून हास्य विखरत आलेल्या मुळे बाईना काहीतरी मुळमुळीत उत्तर देऊन कटवतो. तेवढ्यात त्याच्या टेबलावरचा दूरध्वनी वाजतो, पण एक चुकारही शब्द न काढता पहिला पलिकडचा अंदाज घेऊन नवरा वदतो " हेलो"

या तऱ्हेने आमची दहशतवादाची मुळाभाजी सुफळ स(भाजी) फळ संपुर्ण.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

5 Feb 2015 - 4:33 pm | स्पंदना

=))

अगागा गागा गा!!
मी म्हंटल सद्य परिस्थीतीवर काही भाष्य असेल तर येथे.....मुळा?? चक्क मुळा?
अग दहशतवाद म्हंटल्यावर जरा एखादा खिळा तरी आणायचास कहानीत...मुळा???
देवा...फिरले रे दिन....फीरले दीनांचे...

बाकी तूला  पासून नमस्कार!!

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 4:35 pm | प्रीत-मोहर

हेमा तुस्सी महान हो.
__/\__

दहशतवाद्याच्या मुळालाच हात घालणारा मूलगामी लेख आवडला.

मूलगामी नव्हे हो, मूळगामी किंवा मुळागामी म्हणा ना सरळ :)

हाडक्या's picture

5 Feb 2015 - 6:22 pm | हाडक्या

हात घालणारा मूलगामी लेख

हा हा हा .. मूळव्याधी लेख असे वाचले हो आधी.. :)))) . :)))))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2015 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा

अशेच म्हण्तो! पब्लिक..,"ल्येख गोड लागला,मुळा'पासून खाल्ला !" असं करणार बहुत्येक! ;-)

अस्मी's picture

5 Feb 2015 - 4:38 pm | अस्मी

आईग्गं...लैच्च भारी!!

सस्नेह's picture

5 Feb 2015 - 4:39 pm | सस्नेह

सध्या बाजारात सगळीकडे दहशत दिसते आहे =))

असा प्रेमळ रुसवा असलेला दहशतवाद नक्कीच नाही..

लिखान आवडले

पियुशा's picture

10 Feb 2015 - 5:03 pm | पियुशा

१ च नम्बर !

Mrunalini's picture

5 Feb 2015 - 4:44 pm | Mrunalini

मस्त हेमाबाई. :)

पैसा's picture

5 Feb 2015 - 4:47 pm | पैसा

लै भारी!

अजया's picture

5 Feb 2015 - 4:48 pm | अजया

झकास लेख
=))

मीता's picture

5 Feb 2015 - 4:48 pm | मीता

हसून मेले ...

ऋषिकेश's picture

5 Feb 2015 - 4:49 pm | ऋषिकेश

:)

जेपी's picture

5 Feb 2015 - 4:56 pm | जेपी

चांगलय.

सविता००१'s picture

5 Feb 2015 - 4:58 pm | सविता००१

छानच. ह.ह.पु.वा

पदम's picture

5 Feb 2015 - 5:02 pm | पदम

+१

मृत्युन्जय's picture

5 Feb 2015 - 5:04 pm | मृत्युन्जय

ख त रा. ज ब र द स्त

नित्य नुतन's picture

5 Feb 2015 - 5:13 pm | नित्य नुतन

मस्तच हेमे

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2015 - 5:59 pm | सानिकास्वप्निल

हेमाचा लेख आला म्हणजे धम्माल !!
=))

हा हा हा. नवर्‍याचे हाल करतेस की गं! ;)

भावना कल्लोळ's picture

5 Feb 2015 - 6:27 pm | भावना कल्लोळ

झाले हि रेवाक्का तर आली लगेच माझ्यावर …. अग, मी उदाहरण दिले स्वानुभव नाही काही… ;)

विशाखा पाटील's picture

5 Feb 2015 - 6:14 pm | विशाखा पाटील

कथन शैली छान! या कौटुंबिक दहशतवादातला एकएक प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला. :))

विवेकपटाईत's picture

5 Feb 2015 - 7:28 pm | विवेकपटाईत

हिवाळ्यात दिल्लीत मुळा भरपूर मिळतो आमची सौ ही मुळ्याच्या पालांचे पराठे सुद्धा खाऊ घालते. (गेल्या रविवारीच खाल्ले होते), एकच दुख:, इथे दिल्लीत मुळे आडनावाची कुठलीच बाई आफिसात नाही......*crazy* *CRAZY* :crazy:

मुक्त विहारि's picture

5 Feb 2015 - 7:34 pm | मुक्त विहारि

छान खुसखुशीत.

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2015 - 8:05 pm | प्रभाकर पेठकर

मुळे बाईंशी कांही ओळख/जवळीक नाही पण मुळ्याचे सर्व प्रकार भयंकर आवडतात. मुळ्याचे एव्हढे पदार्थ एकाच वेळी ताटात असते तर ती शिक्षा नाही माझ्यासाठी सण असता. असो. असते एकेकाचे नशिब.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2015 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरेरे, नुसती मुळ्याच्या भाजीची स्तुती केली म्हणून इतका छळ !

या जगात दहशतवात फारच वाढला आहे आणि आता तर तो पतिपत्नी संबंधाच्या मूळ्यावर... आपलं मुळावर... उठू लागलाय ! +D

बाकी लेख फक्कड चवदार झालाय... मुळेबाईंच्या मुळ्याच्या भाजी इतकाच *OK*

स्वाती दिनेश's picture

5 Feb 2015 - 9:31 pm | स्वाती दिनेश

चटकदार लेख आहे..
स्वाती

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2015 - 9:56 pm | श्रीगुरुजी

जबरदस्त विडंबन! खूप हसलो.

स्रुजा's picture

5 Feb 2015 - 11:51 pm | स्रुजा

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

सुबोध खरे's picture

6 Feb 2015 - 10:17 am | सुबोध खरे

+१००

ज्योति अळवणी's picture

6 Feb 2015 - 12:18 am | ज्योति अळवणी

एकूण रेसिपी मस्त जमुन आली आहे...

जुइ's picture

6 Feb 2015 - 12:24 am | जुइ

लेख आवडला!!!

श्रीरंग_जोशी's picture

6 Feb 2015 - 1:19 am | श्रीरंग_जोशी

भन्नाट जमलाय लेख.
मुळासकट आवडला

रमेश आठवले's picture

6 Feb 2015 - 1:44 am | रमेश आठवले

आज संध्याकाळी हे शीत युद्ध संपवण्यासाठी नवर्याने बरोबर हलावायाकडील गाजर हलवा घरी घेऊन जावा. त्यामुळे समेट होण्याची शक्यता आहे. हिंदी सिनेमात ' मा के हाथके मुली के परोठे और गाजर का हलवा लाजवाब ' असा या दोन पदार्थांचा एकत्रित उल्लेख नेहमी होत असतो .

खटपट्या's picture

6 Feb 2015 - 5:32 am | खटपट्या

थांबा आत्ता घरी फोन करतो...

कविता१९७८'s picture

6 Feb 2015 - 6:49 am | कविता१९७८

झक्कास लिखाण

सोत्रि's picture

6 Feb 2015 - 9:02 am | सोत्रि

खुसखुशीत! :)

- (दहशतवाद न अनुभवलेला) सोकाजी

स्नेहल महेश's picture

6 Feb 2015 - 10:53 am | स्नेहल महेश

:D :D :D :D

अनन्न्या's picture

6 Feb 2015 - 11:43 am | अनन्न्या

कालच लेकाला जगातील दहशतवाद संपेल का? यावर संवाद लिहून दिलाय! हा दहशतवाद अधूनमधून हवाच!!*lol*

आरोही's picture

6 Feb 2015 - 1:52 pm | आरोही

मस्त मस्त ग !!!अगदी डोळ्यासमोर आले दृश्य ...

कपिलमुनी's picture

6 Feb 2015 - 2:06 pm | कपिलमुनी

लेख फर्मास जमून आला आहे :)

भीडस्त's picture

6 Feb 2015 - 3:27 pm | भीडस्त

मुळापासून हसलो.

बाब्बौ, इतके पदार्थ एका वेळच्या जेवणात आणि वरुन बिर्यानीसुद्धा? वॉव.. असली बायको असताना कशाला त्या मुळेबाई हव्यात ? ;)

लेख विनोदी अन हलकाफुलका.

यशोधरा's picture

6 Feb 2015 - 7:42 pm | यशोधरा

>>पुढच्या दोन सेकंदात त्याच्या पुढ्यात मुळ्याचे पराठे, मुळ्याची पचडी, मुळ्याची कोशिंबीर आणि कधी न खालेली मुळ्याची खिचडीही >> =)) भारी!

मुळ्याच्या खिचडीची पाकृ टाका आता!

भावना, तुझ्या ह्या लेखाची लिंक आमच्या ऑफिसमध्ये एक इ फोरम आहे मराठीसाठी, तिथे कोणीतरी दिली आहे आणि बर्‍याच जणांना आवडला आहे तुझा लेख. :)

अभिनंदन!

स्वाती२'s picture

7 Feb 2015 - 6:36 pm | स्वाती२

मस्त! :)

उमा @ मिपा's picture

9 Feb 2015 - 1:48 pm | उमा @ मिपा

क्या बात है! हेमे, भन्नाट लिहिलंयस.

सुप्रिया's picture

9 Feb 2015 - 2:07 pm | सुप्रिया

मजा आली वाचायला.

जेपी's picture

9 Feb 2015 - 4:01 pm | जेपी

अवांतर-या विभागात अजुन हाफ शेंच्युरी निमीत्त सत्कार झाला नाही.कोणीतरी करेल का..?

पैसा's picture

9 Feb 2015 - 4:02 pm | पैसा

हाप शेंचुरीनिमित्त भावनाबै आणि मुळेबैंचा मुळे देऊन सत्कार करण्यात येत आहे.

टवाळ कार्टा's picture

9 Feb 2015 - 4:57 pm | टवाळ कार्टा

आणि हा पुस्प्गुच

bocay

एस's picture

9 Feb 2015 - 4:03 pm | एस

धन्य!

भा.क.मॅडम, आम्ही इतके दिवस हा लेख केवळ त्याच्या शीर्षकामुळे उघडला नव्हता. निदान मिपावरच्या प्रथेप्रमाणे चौकोनी कंस तरी लावायचे पुढेमागे! :-P

मस्त खुसखुशीत लेख. (अवांतर - हा 'खुसखुशीत' शब्द हल्ली बराच यायला लागलाय प्रतिसादांत! ;-) )

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Feb 2015 - 7:53 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त..

मुळात ऑफीसात मुळेबाई असणं हाच मुळ प्रॉब्लेम झाला.. त्याऐवजी लोखंडेबाई असत्या तर घरी काय अवस्था झाली असती :)
(कृ.ह.घ्या)

तरी काही प्रॉब्लेम झाला नसता. लोखंडेबाई असत्या तर नवरा ब्रह्मपदी नाचला असता.

(चणे खावे लोखंडाचे इ.इ.)

भावना कल्लोळ's picture

10 Feb 2015 - 2:40 pm | भावना कल्लोळ

माझा सत्कार केल्याबद्दल सर्वं मिपा बंधु आणि मिपा गर्ल्सचे मनापासून आभार, यशो… तुझ्या हाफिसात पण माझ्यातर्फे एक जाहीर आभार व्यक्त कर हो, आणि ज्यो ताई,समस्त मिपातर्फे मला सत्कारात भेटलेल्या मुळ्याची आज संध्याकाळी भाजी करण्यात येईल.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 12:37 pm | श्रीगुरुजी

या धाग्यावर अजून नाना/माईंचा प्रतिसाद कसा काय नाही आला?

लग्नात घास देताना माईंच्या 'ह्यां'चा उखाणा -

भाजीत भाजी मुळ्याची
..... ... ....ची

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 6:53 pm | कपिलमुनी

नाना गेले वरती
माई राहिल्या खालती *lol*

जेपी's picture

11 Feb 2015 - 7:01 pm | जेपी

माई मोड-
बीट पेरले,उगवले मुळे,
येड पेरले,उगवले 'हे'(खुळे) *wink*
-ऑफ

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2015 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा

कुठून बांधले हे माकड खुळे
माझें गाव रायगड..आणि यांचे धुळे! ;)

पळा आता...च्यामारी...धुळ्याची येतीलच धुळधाण करायला! =))

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:04 pm | श्रीगुरुजी

जिलबीचा रिटर्न घास देताना माईंचा उखाणा -

पराठ्यात पराठे मुळ्याचे
...............चे

झकासराव's picture

11 Feb 2015 - 4:15 pm | झकासराव

*lol*
जबरदस्त :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Feb 2015 - 12:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

"मुळा"वर उठणे ह्या शब्दाचा अर्थ आज नीट कळाला =))

विनोद१८'s picture

13 Feb 2015 - 9:42 pm | विनोद१८

मस्त रंगलाय हा लेख व पुढचे प्रतिसाद मजा आली. वाचून अगदी मनापासुन हसू आले बर्‍याच दिवसांनी. तुम्हाला धन्यवाद देतो ह्या मजेशीर व खुशखुशीत लेखासाठी व आमच्या नावाला मिपावर एव्हढी प्रसिद्धी दिल्याबद्दल. असेच लिहा.

*OK*

जेपी's picture

17 Dec 2015 - 5:15 pm | जेपी

लेख वर काढतो..

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Dec 2015 - 5:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

दिवसभराचे काम धाम उरकून छान मनाने नवरा घरी जाण्यास निघतो.

सहज चौकशी :-

कुठली कंपनी हो म्हणे तुमची??

सहज चौकशी समाप्त.

(उत्सुक) बाप्या

नाखु's picture

17 Dec 2015 - 5:26 pm | नाखु

या निमित्ताने गायबलेले मिपाकर दिसले.

हा लेख केवळ त्याच्या शीर्षकामुळे उघडला नव्हता.

जे पी धन्यवाद

प्रतिसाद मात्र नाखु