दिल शाबूदाणा वडे

सुघोषा's picture
सुघोषा in पाककृती
3 Feb 2015 - 7:17 pm

मी मिसळपाव ची silent observer (मराठी शब्द??) आहे..
बर्याच पाककृती येत आहेत.. म्हंटल आपणही एखादी पाककृती इथे टकवावी.

शाबूदाणा वडा ……!!!!
नवर्याला खुष करण्याचा मार्ग पोटातून जातो . मग त्याला खुश करण्यासाठी
बनवले
****दिल शाबूदाणा वडे ****
असाही आत्ता फेब्रुवारी उजाडलाच आहे .♡♡♥♥

साहित्य :-

  1. शाबूदाणा १-१/२ वाटी भिजवलेला
  2. बटाटा १ उकडून
  3. शेंगादाण्याच कुट ४ चमचे
  4. मिरची २-३ आवडीनुसार
  5. मीठ चवीनुसार
  6. साखर अगदी थोडीशी
  7. दही २-३ चमचे

पाककृती:-
वरील सर्व पदार्थ एकत्र करून घेणे आणि दिल आकाराचे वडे करणे.


कढई मध्ये तेल तापवत ठेवणे.

तयार करून ठेवलेले वडे मंद आचेवर तळून घेणे.

चटणी साठी साहित्य :-
बरेच जण खोबऱ्याची चटणी करतात पण मी एकदा पुण्यात अशी चटणी शाबूदाणा वड्यासोबत खाल्ली
तेव्हापासून मग मी दह्याची अशीच चटणी बनवते .

  1. दही १ वाटी
  2. भाजलेले शेंगदाणे २ चमचे
  3. मीठ ,साखर चवीनुसार
  4. लाल तिखट १/२ चमचा किंवा आवडीनुसार हिरवी मिरची.
  5. जिरे १/२ चमचा optional आहे.

पाककृती:-
वरील सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सर ला फिरवणे. चटणी तयार.

मस्त खुशखुशीत आणि गरमागरम वडे चटणी सोबत सर्व करणे .

प्रतिक्रिया

बाय गॉड दिल गार्डन गार्डन हो गया.
आवडल...

(शाबु वडे प्रेमी अर्थात स्वत: केलेले)जेपी

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Feb 2015 - 7:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमची आई कच्ची पपई किसुन टाकत असे! मस्त चव लागे त्याची!!!!

दिपक.कुवेत's picture

3 Feb 2015 - 7:35 pm | दिपक.कुवेत

वडे पाहूनच खावेसे वाटत आहेत. अनायसा आज उपासहि आहेच. फोटू छान आलेत.

बरे आठवण करून दिलीत ,खूप दिवसात केलेच नाहीयेत साबुदाणा वडे,लवकर च करण्यात येतील .अशी चटणी पहिल्यांदा बघितली ती नक्कीच करणार ..फोटो छान!! दिल चा आकार आवडला ..

मितान's picture

3 Feb 2015 - 7:44 pm | मितान

सुरेखच दिसतायत वडे !

सुहास झेले's picture

3 Feb 2015 - 7:46 pm | सुहास झेले

आजच सा.खि. खाल्लीय (पणशीकर जिंदाबाद ;-) ) आता उद्या शाबुदाणा वडे तो बनता हैं :) :)

रेवती's picture

3 Feb 2015 - 7:46 pm | रेवती

भारी दिसतायत वडे!

यशोधरा's picture

3 Feb 2015 - 7:47 pm | यशोधरा

भारी दिसतायत वडे!

विवेकपटाईत's picture

3 Feb 2015 - 7:56 pm | विवेकपटाईत

खायला इच्छा होते, पण काय करणार आजकाल जास्त तळलेले पदार्थ सौ. करून घालत नाही. डोळ्यांनीच पोट भरून पाहून घेतल.

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2015 - 7:59 pm | प्रभाकर पेठकर

साबुदाणा वडे छानच दिसताहेत. ह्या मधे समप्रमाणात, शिजवलेले, वर्‍याचे तांदूळ घातल्यास वडे जास्त चांगले होतात.

वरीचे तांदूळ घालायची आयडीया आवडली. एक प्रश्न- वरीचे तांदूळ घातल्यास बटाट्याचे प्रमण कमी करायचे का?

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2015 - 1:33 am | प्रभाकर पेठकर

मी कधी बटाटा वगळून वडे केले नाहीत. मला वाटतं साबूदाणा, वरीचे तांदूळ ह्यांना 'धरून' ठेवण्यासाठी (अ‍ॅज अ बाईंडर) बटाटा आवश्यक आहे. पण एकदा प्रयत्न करून पाहीन आणि निरिक्षणे इथे नोंदवीन.

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2015 - 1:37 am | प्रभाकर पेठकर

शिवाय ह्यात जरा जास्त कोथिंबीर आणि ओल्या नारळाचे बारीक तुकडे (काड्यापेटीच्या काडी सारखे, साधारण १ सेंटीमीटर आकाराचे) घातल्यास मजा येते.

मस्त टिप्स. करून पाहण्यात येईल.

दिल साबुदाणा वडे भारी दिसताहेत. भूक चाळवली गेली.

'असे काही खरंच खायला मिळणार असेल तर उपास करण्याला अर्थ आहे.
नुसतेच फोटो पाहत बसावे लागले तर उपासमारसुद्धा व्यर्थ आहे!'
(सौजन्य - कवी फूर्यवांत मोकले.) :-)

स्वाती२'s picture

5 Feb 2015 - 7:54 am | स्वाती२

धन्यवाद.ट्राय करुन बघेन.

आयुर्हित's picture

11 Feb 2015 - 1:55 pm | आयुर्हित

एक नवीन प्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद.

सविता००१'s picture

3 Feb 2015 - 8:28 pm | सविता००१

मस्त फोटो आणि पाकृ.

भाते's picture

3 Feb 2015 - 8:44 pm | भाते

मिपाच्या भाषेत, वाचनमात्र.

पाकृ आणि फोटो, दोन्ही आवडले. छान!

आता केवळ वाचनमात्र न रहाता वरचेवर (लेख आणि प्रतिसाद, दोन्ही मधुन) मिपावर येत रहा.

प्रचेतस's picture

3 Feb 2015 - 9:04 pm | प्रचेतस

मस्त.

बाकी शाबुदाणा हा शब्द 'साबुदाणा' असा बदलता येतोय का ते पहा.

वडे पाहून नाशिकच्या भद्रकालीवरच्या सायंताराची आठवण झाली.
इतके भारी वडे आजपर्यंत कुठेच खाल्ले नाहित.

क्या बात ! अगदी हेच म्हणायला आले होते. कुणी नाशिकच्या सायंतारा चा उल्लेख करेल असं वाटलं नव्हतं.

बाकी सुघोषा आम्ही पण अशीच चटणी करतो आणि त्याला लाडाने तडजोड चटणी म्हणतो :)नवीन आकार आवडला वड्यांचा

नाशिकची तीन/चार खाद्य ठिकाणे आमची फेव्हरीट.
पंचवटीमधली काळ्या मसाल्याचा रस्सा असलेली अंबिका मिसळ, शालिमारवरची शौकीनची झटका पाणीपुरी )त्याच्याकडची भेळ मात्र बकवास), भद्रकालीवरचा राऊतचा डबल जीरा मसाला सोडा आणि सायंतारा साबुदाणा वडा.

शालिमार !! आहाहाहा.. पंचवटी विसरू नका :) नाशिक च्या खूप छान आठवणी या सगळ्या ठिकाणांमुळे अजून छान झाल्या. वा! तुम्च्या मुळे आज मस्त नॉस्टाल्जिक झाले.

रामदास's picture

4 Feb 2015 - 11:06 am | रामदास

बुधाची र्‍हायली का ?

बुधाकडचे खव्याचे गुलाबजाम पण :D

प्रचेतस's picture

4 Feb 2015 - 12:06 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
बुधाची जिलबी विसरलोच होतो.
त्याबरोबर पांडे मिठाईवाल्याची मलई बर्फी आणि रविवार कारंजावरचं अननस सरबत.

अजया's picture

4 Feb 2015 - 2:11 pm | अजया

सायंतारा!मस्त मस्त!

बोका-ए-आझम's picture

4 Feb 2015 - 8:36 pm | बोका-ए-आझम

ए असं नाही करायचं. फोटो वगैरे टाकायचे त्याचे. किमान पदार्थाचे तरी. रच्याकने रविवार कारंज्याजवळ (नाशिकच्या भाषेत RK) एक चिवडेवाला बसायचा. अफलातून चिवडा बनवायचा.

प्रचेतस's picture

4 Feb 2015 - 9:32 pm | प्रचेतस

अहो तिथे तीन तीन चिवडेवाले आहेत.
कोंडाजी, मकाजी आणि माधवजी.
कोंडाजी हाइप होऊन होऊन रद्दी झालाय आता.
माधवजीचा तळलेला कांदा चिवडा छान असतो पण सर्वाधिक मजा भद्रकालीवर मकाजीकडे येते.
तिथे बैठक मारून कांदा कोथिंबीर घालून वर निंबू मारके मस्तपैकी चिवडा हणायचा.

बाकी फोटो काढण्यात वेळ कोण घालवणार? डिश आली की ताव मारायचा.

कोंडाजी फार आवडायचा लहानपणी, आता रद्दी झाला म्हणता ? असंच असतं फार नाव असलेले लोकं कधी कधी निराश च करतात.

नाशिक स्टांड च्या समोर एक द्राक्षवाल असायचा, आहे का हो अजून?

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 8:40 am | प्रचेतस

द्राक्षवाले तसे बरेच आहेत एसटीएसटी स्ट्यांडसमोर.

हां, हीच ती नावे आठवत नव्हती. लहान असताना हे चिवडे आवडावेत असं वय नव्हतं आणि नंतर कुठं मिळाला नाही नाशिकचा चिवडा. गुलाबी रंगाच्या कागदावर काळी छपाई असलेले चिवडेवाल्याचे नाव, गुजराथी वर्तमानपत्रावर किती किलो हवा तो चिवडा बांधून त्यावर हा गुलाबी कागद दोर्‍याने बांधून द्यायचे. स्रुजा म्हणते तशी द्राक्षे मात्र आठवतात. लहान मण्यांसारखी द्राक्षे भरपूर खाल्ली. मला वाटतं २ रु. किलो असावित त्यावेळी. शिवाय रामनवमीचा सोहळा पाहण्यासाठी काळाराम मंदिरात गेलेले आठवतेय.

येस्स काळाराम आणि गोराराम :) गोदावरीचा घाट आणि सोमेश्वर जवळ्च्या पेरू च्या बागा ..क्या बात !

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 8:46 am | प्रचेतस

अगदी अगदी.
गुजराती वर्तमानपत्र आणि वरचा गुलाबी कागद अजूनही आठवतात. आता मात्र सर्वांचीच जागा प्लास्टिक प्याकिंगने घेतलीय.

मी नाशिक ची आणि आता या सगळ्या गोष्टीना फार miss करतेय हो ....

स्वाती२'s picture

3 Feb 2015 - 9:32 pm | स्वाती२

मस्त दिसतायत!
चटणीची कृती आवडली. करुन बघेन.

काकाकाकू's picture

3 Feb 2015 - 10:17 pm | काकाकाकू

यात थोडे आले किसुन घातले तर अजुनच छान स्वाद येतो.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2015 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा

शेवट्चा फोटू पहायला फारच छाण दिसत आहे! *OK*
अर्थात आंम्ही आता ,असंही ह्यांचं केवळ दर्शनच घेऊ शकतो म्हणा! ;)

पैसा's picture

4 Feb 2015 - 7:45 pm | पैसा

तुम्हाला साबुदाणा खिचडी अवडत नै ते माहीत आहे. साबुदाणा वड्यांनी काय घोडं मारलनीत?
*crazy* *secret*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Feb 2015 - 8:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

साबुदाणा वड्यात घोडे असतात ओ....!! आपलं साबुदाणे असतात....!! रोज रोज खायला लागुन गुरुजी वैतागतात =))

(रेफ्रन्सः गुरुजिंचं भावं विश्वं)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2015 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा

@साबुदाणा वड्यांनी काय घोडं मारलनीत?>>> llllllllluuuuuu :-/ घोडं साबुदाणेच्च मारत असतात..
मग त्याचे वडे केलेत काय? आणि खिचडी काय? आणि अजुन काहि काय? http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

रेस बदलंली,तरी घोडा तोच्च! .., मग काय उपेग? :-/
म्हनुनशान आम्मी म्हन्तो तेच बरोब्बरः- साबुदाणं रबरं-सदृषं श्वेतवर्णम च्युईंगम। http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

सानिकास्वप्निल's picture

3 Feb 2015 - 11:14 pm | सानिकास्वप्निल

मस्तं दिसत आहेत वडे आणि आम्ही पण अशीच चटणी करतो फक्त त्यात ओले खोबरे ही घालतो.
:)

रुपी's picture

4 Feb 2015 - 3:07 am | रुपी

मागच्याच आठवड्यात केले होते. अशीच चटणी मी दही घुसळून त्यात दाण्यांची चटणी एकत्र करुन करते.

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2015 - 4:28 am | श्रीरंग_जोशी

दिल शेप साबुदाणा वडे पाहून माझा दिल खुष झाला. तपशीलवार वर्णन व सादरीकरण आवडले.

पण त्याच वेळी 'शाबूदाणा' असे वाचून माझा दिल तुटला ;-) .

बादवे silent observer ला वाचनमात्र मिपाकर असे म्हंटले जाते.

पुलेशु.

विजय पिंपळापुरे's picture

4 Feb 2015 - 12:13 pm | विजय पिंपळापुरे

सुघोषाचा रेसीपी मधे काकडी खिसुन घातली तरी पण छान लागाते

स्वाती दिनेश's picture

4 Feb 2015 - 3:47 pm | स्वाती दिनेश

वडे एकदम दिलखूष आहेत,
स्वाती

गवि's picture

4 Feb 2015 - 4:15 pm | गवि

वा वा.. उत्तम.

इतके सोपे असतात माहीत नव्हतं..

वर साबुदाणा वडा मिळणार्‍या ठिकाणांचे उल्लेख आलेत.

मुंपु एक्सप्रेसवेवर खालापूर टोलनाक्याजवळ मुंबईकडे येतानाच्या फूडमॉलनजीक श्री दत्त स्नॅक्स. साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Feb 2015 - 8:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हा तोचं ना हो ज्याच्याकडे गोड आणि तिखट अश्या दोन्ही प्रकारात साबुदाणावडे मिळतात तो?

गोड= हिरवी मिरची नावापुरती आणि गोडसर चवं
तिखट= लाल तिखट घातलेला

झक्कास असतात दोन्ही वडे.

कपिलमुनी's picture

4 Feb 2015 - 4:42 pm | कपिलमुनी

दिल गार्डन गार्डन हो गया !

पैसा's picture

4 Feb 2015 - 5:34 pm | पैसा

मस्तच पाकृ आणि फोटो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2015 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास वडे ! मिपावर येत राहा,लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

भावना कल्लोळ's picture

4 Feb 2015 - 6:39 pm | भावना कल्लोळ

साबुदाणा म्हंटले कि आमच्या डोळ्यासमोर येते ते गिरगाव इथले फडके मंदिर येथले प्रकाश. पियुष आणि वड्याची प्रा.कृ पाहून तिथे जाणे लवकरच केले पाहिजे. बाकी वड्याचा आकार आवडला आणि चटणी हि.

सुघोषा's picture

4 Feb 2015 - 6:54 pm | सुघोषा

प्रतिक्रिया आणि प्रोत्साहन बद्दल धन्यवाद !!!!

निवेदिता-ताई's picture

4 Feb 2015 - 7:06 pm | निवेदिता-ताई

मस्त... साबुवडा फार आवडतो...
चट्णी आम्ही अशीच बनवतो .. दह्यातली.(सायीचे दही असेल तर उत्तमच.).

समिधा's picture

5 Feb 2015 - 2:55 am | समिधा

मस्तच
चटणी अशीच बनवतो फक्त मिक्सर मधुन न काढता दाण्याच्या कुटात सगळ मिसळून करतात. ह्याला आमच्या इकडे उठवळ चटणी म्हणतात. (काही वाटण घाटण नाही आणि वाटीत पण आपल्या पुरेशी करुन घेता येते म्हणून)

अर्धवटराव's picture

5 Feb 2015 - 9:52 pm | अर्धवटराव

मिपा सुधरलं का काय... संपादकांचा एव्हढा धाक यापुर्वी बघितला नव्हता. 'दिल'वड्यावर एकही प्रतिक्रिया नाहि?

बाकि साबुदाणा वडा म्हणजे आपला जीव कि प्राण. पाकृ मस्तच दिसतेय :)

उद्या चतुर्थी आहे . त्या मुळे नक्की करून बघणार .
बाकी चटणी अशीच करते मी

mayurpankhie's picture

8 Feb 2015 - 11:36 am | mayurpankhie

साबुदाणा वडे मस्त झालेत. मी एकदा करायचा प्रयत्न केला होता पण नीट झाले नव्हते. बहुतेक मी बटाटा कमी घातला होता. तुमचे मात्र tasty दिसतायेत

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 1:23 pm | मदनबाण

आह्ह... कुरकुरीत दिसत आहेत अगदी ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

शिव कन्या's picture

3 Nov 2015 - 5:25 pm | शिव कन्या

भारी. आवडेश.

बोका-ए-आझम's picture

3 Nov 2015 - 5:46 pm | बोका-ए-आझम

बाणभौंचा प्रतिसाद ११ फेब्रुवारीचा (११/२) आणि शिव कन्या तैंचा प्रतिसाद almost उलटे आकडे झाल्यावर - ३ नोव्हेंबरला - ३/११ या दिवशी!

भेटेन नऊ महिन्यानी ही आमच्या गावच्या कविवर्याची कविता आठवली

निरुपद्रवी

वेल्लाभट's picture

4 Nov 2015 - 12:45 pm | वेल्लाभट

सायलेंटली ऑब्झर्व करून करून मिपाचं चांगलंच अध्ययन केलंत :)
पण आता अशाच एक एक रेसिपी टाकत चला की
मस्त फोटो... दिलाचा आकार देण्याची कल्पना आवडली...
खमंग. आता खायलाच हवेत.