मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिल शाबूदाणा वडे

सुघोषा · · पाककृती
मी मिसळपाव ची silent observer (मराठी शब्द??) आहे.. बर्याच पाककृती येत आहेत.. म्हंटल आपणही एखादी पाककृती इथे टकवावी. शाबूदाणा वडा ……!!!! नवर्याला खुष करण्याचा मार्ग पोटातून जातो . मग त्याला खुश करण्यासाठी बनवले ****दिल शाबूदाणा वडे **** असाही आत्ता फेब्रुवारी उजाडलाच आहे .♡♡♥♥ साहित्य :-
  1. शाबूदाणा १-१/२ वाटी भिजवलेला
  2. बटाटा १ उकडून
  3. शेंगादाण्याच कुट ४ चमचे
  4. मिरची २-३ आवडीनुसार
  5. मीठ चवीनुसार
  6. साखर अगदी थोडीशी
  7. दही २-३ चमचे
पाककृती:- वरील सर्व पदार्थ एकत्र करून घेणे आणि दिल आकाराचे वडे करणे. कढई मध्ये तेल तापवत ठेवणे. तयार करून ठेवलेले वडे मंद आचेवर तळून घेणे. चटणी साठी साहित्य :- बरेच जण खोबऱ्याची चटणी करतात पण मी एकदा पुण्यात अशी चटणी शाबूदाणा वड्यासोबत खाल्ली तेव्हापासून मग मी दह्याची अशीच चटणी बनवते .
  1. दही १ वाटी
  2. भाजलेले शेंगदाणे २ चमचे
  3. मीठ ,साखर चवीनुसार
  4. लाल तिखट १/२ चमचा किंवा आवडीनुसार हिरवी मिरची.
  5. जिरे १/२ चमचा optional आहे.
पाककृती:- वरील सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सर ला फिरवणे. चटणी तयार. मस्त खुशखुशीत आणि गरमागरम वडे चटणी सोबत सर्व करणे .

वाचन 29690 प्रतिक्रिया 0