माझे "Marathi Dictionary For Learners" अ‍ॅंड्रॉईड अ‍ॅप

कौशिक लेले's picture
कौशिक लेले in काथ्याकूट
1 Feb 2015 - 12:56 pm
गाभा: 

नमस्कार "मिपा"करहो !
माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याचा उपक्रम आणि "नवीन मराठी शब्द" या उपक्रमांना आपण मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलात. म्हणूनच मराठी भाषेसाठीच्या माझ्या नव्या उपक्रमाबद्दल सांगण्यास मी खूप उत्सुक आहे.

मी एक नवीन Android App बनवले आहे. "Marathi Dictionary For Learners" या नावाने. हे अ‍ॅप गूगल प्ले वर उपलब्ध आहे. ते पुढील लिंकवरून डाऊनलोड करू शकाल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.learnmarathi.dictionary

नवीन मराठी डिक्शनरी कशासाठी ?
English-To-Marathi असे अनेक शब्दकोश छापील स्वरूपात, वेबसाईट किंवा अ‍ॅप च्या माध्यमातून उपलब्ध असताना अजून एका अ‍ॅप चे काय प्रयोजन हा प्रश्न कोणालाही पडू शकतो.
उपलब्ध डिक्शनऱ्या या मराठी भाषकांना इंग्रजी शिकण्यासाठी उपयोगी येतील अश्या पद्धतीने बनवल्या आहेत. परंतु मराठी शिकणाऱ्या व्यक्तीला इंग्रजी शब्दापेक्षा मराठी शब्दाची अधिक माहिती आवश्यक असते.
उदा. “Door” या शब्दासाठी "दार" आणि "दरवाजा" हे दोन शब्द दिलेले असतील. पण नुसते हे शब्द कळणे मराठीशिक्याला पुरेसे नाही. त्याला हे कळले पाहिजे की "दार" हा नपुसकलिंगी शब्द आहे तर "दरवाजा" हा पुल्लिंगी शब्द आहे. नाहीतर "ते दार उघडले" आणि "तो दरवाजा उघडला" यातली क्रियापद रूपे तो कशी तयार करू शकेल?

तसेच मराठीत बहुवचनेही वेगवेगळ्या प्रकारे होतात. उदा. "माळ" आणि "चाळ" हे दोन्ही स्त्रीलिंगी शब्द आहेत. उच्चारात अगदी सारखे. पण "माळ" चे बहुवचन "माळा" होते पण "चाळ" चे बहुवचन "चाळी" होते.
एखाद्या नवशिक्याने "माळ" चे अनेकवचन "माळी" केलं किंवा "चाळ" चं अनेकवचन "चाळा" केलं तर अर्थाचा अनर्थ व्हायचा ना.
माझ्याकडे १० माळी (माळा!) आहेत.
तू माझ्या चाळा (चाळी !) बघितल्या का ?

मराठीत आपण अव्यये,इतर शब्द थेट नामाला न जोडता त्याच्या सामान्यरूपाला जोडतो.
उदा. आपण "चाळची किंमत", "माळची किंमत" असं म्हणत नाही तर "चाळीची किंमत", "माळेची किंमत" असं म्हणतो.
म्हणजे शब्द वापरताना "चाळ" चं "चाळी" झालं पण "माळ" चं मात्र "माळे" झालं. हे सुद्धा नवशिक्याला कसं कळणार ?

जर्मन भाषेत पण लिंग आणि बहुवचन याबाबतीत मराठी प्रमाणेच अनियमितता आहे, वैविध्य आहे. पण जर्मन शब्दकोषात शब्द दिला कि त्याबरोबर त्याचे लिंग आणि बहुवचन देण्याची पद्धत असल्याने जर्मनशिक्याला ती माहिती तिथेच उपलब्ध होते. मराठी शब्दकोशात हे आढळत नाही. ही दरी सांधण्याचा थोडा प्रयत्न मी करत आहे.
म्हणून हा परिपूर्ण शब्द कोश नाही तर फक्त नामांवर आधारित आहे. प्रत्येच नामाचे लिंग, अनेकवचन, सामान्यरूप आणि अव्ययासहित एक उदाहरण दिलेले आहे.

सध्या या कोशात ११०५ इंग्रजी शब्द आणि १२३३ मराठी शब्द आहेत. अजून कितीतरी शब्दांची भर मी येत्या काही महिन्यांत घालणार आहे. तरीही कदाचित आपण शोधाल तो शब्द तो अजून अ‍ॅड झालेला नसेल म्हणून "platform", "action","collection" हे इंग्रजी शब्द आणि “आदेश”, “आवाहन” , “सावली” हे मराठी शब्द शोधून पहा म्हणजे आपल्याला अ‍ॅपची कल्पना येईल.

तरी आपण हे अॅप वापरून आपला प्रतिसाद द्यावा. आपल्या टिका/सूचना/प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

धन्यवाद,
कौशिक लेले
learnmarathifast@gmail.com

आधीचे उपक्रम:-

प्रतिक्रिया

खेडूत's picture

1 Feb 2015 - 1:02 pm | खेडूत

अरे वा!
आता उतरवून घेतो.
शब्द अ‍ॅडवायला आवडेलच .

कौशिक लेले's picture

1 Feb 2015 - 7:28 pm | कौशिक लेले

धन्यवाद. कसं वाटतंय ते कळवा.

बॅटमॅन's picture

1 Feb 2015 - 3:39 pm | बॅटमॅन

लेलेसाहेब, तुमचे प्रयत्न खरोखर लैच काबिले तारीफ आहेत. अशा प्रयत्नांनी मराठीचा जालवावर आणि एकूणच उपस्थिती वृद्धिंगत होईल यात शंका नाही.

कौशिक लेले's picture

1 Feb 2015 - 7:29 pm | कौशिक लेले

खूप खूप आभार. आपल्या ओळखीचे कोणी मराठी शिकत असेल तर त्याला या बद्दल कृपया सांगा.

काव्यान्जलि's picture

1 Feb 2015 - 9:28 pm | काव्यान्जलि

आपल्या प्रयत्नांना खूप शुभेच्छ्या . डाउनलोड करून नक्की सांगेन ..

कौशिक लेले's picture

6 Feb 2015 - 10:55 am | कौशिक लेले

धन्यवाद. नक्की सांगा

खटपट्या's picture

1 Feb 2015 - 10:30 pm | खटपट्या

या उपक्रमाबद्द्ल धन्यवाद,
आताच डाउनलोड करुन इन्स्टॉल केली. पण रीजल्ट येत नाहीये..
उदा. मदर असा ईंग्रजीमधे शब्द टाईप केला आणी सर्च मराठी वर्ड हे बटण दाबले. पण काहीच होत नाहीये.

कौशिक लेले's picture

6 Feb 2015 - 10:58 am | कौशिक लेले

इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधायचा असेल तर "Search English Word" हे बटण दाबावं लागेल.
ही बटणे अनेकांना "confusing" वाटत आहे. त्या बटणांची लेबले बदलावी लागतील. "English-> Marathi", "Marathi-> Marathi details" असं काहितरी.

सध्या या कोशात ११०५ इंग्रजी शब्द आणि १२३३ मराठी शब्द आहेत. अजून कितीतरी शब्दांची भर मी येत्या काही महिन्यांत घालणार आहे. तरीही कदाचित आपण शोधाल तो शब्द तो अजून अ‍ॅड झालेला नसेल म्हणून "platform", "action","collection" हे इंग्रजी शब्द आणि “आदेश”, “आवाहन” , “सावली” हे मराठी शब्द शोधून पहा म्हणजे आपल्याला अ‍ॅपची कल्पना येईल.

बोका-ए-आझम's picture

2 Feb 2015 - 9:11 am | बोका-ए-आझम

फारच छान!

कौशिक लेले's picture

6 Feb 2015 - 10:59 am | कौशिक लेले

धन्यवाद. काही सूचना असतील तर जरूर सांगा.

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2015 - 10:21 am | विशाल कुलकर्णी

वाह, खुपच छान !घेतो जोडून :)

कौशिक लेले's picture

6 Feb 2015 - 10:59 am | कौशिक लेले

धन्यवाद. काही सूचना असतील तर जरूर सांगा.

एक एकटा एकटाच's picture

22 Aug 2015 - 11:02 am | एक एकटा एकटाच

मस्त

डाउनलोड केलय

मी साशंक आहे तुमच्या अॅपबद्दल.
मला विंडोजला मिळणार नाहीये परंतू मुलभूत प्रश्न असा आहे शब्दकोशाच्या दोन लाख वगैरे अथवा अगदी रूट वर्डस वीस हजारच्या समोर एक दोन हजार शब्दांचे अॅप कसे काय टक्कर देणार?किती एमबीचे आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2015 - 5:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपक्रम !

इन्टॉल केले आहे, जरूर वापर करून बघण्यात येईल.