"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अ‍ॅंड फ्री !!" माझा उपक्रम

कौशिक लेले's picture
कौशिक लेले in काथ्याकूट
4 Oct 2013 - 12:22 pm
गाभा: 

नमस्कार. मी कौशिक लेले,
मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/
या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'one-stop-shop' असा हा ब्लॉग आहे.
Learn Marathi from English मध्ये ११८ धडे आहेत.
Learn Marathi from Hindi मध्ये ९१ धडे आहेत.
मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या १५ ० च्या आसपास साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
YouTube Channel Kaushik Lele

मी स्वतः माझा छंद म्हणून तमिळ आणि गुजराती पुस्तकावरून शिकलो. त्यावेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेट वर मराठी शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो, अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे असं आपण म्हणतो पण मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं.

इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट नेट वरच शोधली जाते. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे मला वाटले. मला स्वतःला भाषा शिकणे-शिकवणे आवडते आणि मी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने स्वतः हे काम करायचं ठरवलं. मी ज्या पद्धतीने तमिळ आणि गुजराती शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी शिकवायचं ठरवलं.
त्याप्रमाणे मागच्या वर्षी Learn Marathi from English ब्लॉग ची सुरुवात झाली. एका महिन्यातच ३० च्या वर लेसन्स लिहिले. फेसबुकवर याबद्दल लोकांना कळवले. अपेक्षेप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. काही जणांनी मेल पाठवून ब्लॉग उपयुक्त वाटतोय हे सांगितल्यावर हुरूप आणखी वाढला. आणि गेल्या दीड वर्षात खूपच प्रगती झाली.

Learn Marathi from English/hindi ब्लॉग वापरून काही भारतीय तर काही परदेशीय व्यक्तीही मराठी शिकत आहेत.

परंतु या उपक्रमाची माहिती अजून मोठया प्रमाणावर मराठी शिकू इच्छिणार्यंपर्यंत पोचणे गरजेचे आहे. अधिकाधिक मराठी व्यक्तींना या बाबत समजले तर ते इतर अमराठी आणि मराठी शिकू इच्छिणाऱ्यांना हा ब्लॉग वाचण्याबद्दल सांगू शकतात.

तरी माझा अल्पसा प्रयत्न आपल्यासमोर मी मांडला. आपण दोन्ही ब्लॉगना भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया/सूचना कळवाव्यात ही नम्र विनंती.

धन्यवाद.
कौशिक लेले

प्रतिक्रिया

गवि's picture

4 Oct 2013 - 12:27 pm | गवि

उत्तम उपक्रम. आपल्या कष्टांचे कौतुक आहे.

शुभेच्छा.

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:03 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

*clapping* अतिशय उत्तम पध्दतीने तुम्ही दोन्ही ब्लॉग्सवर मराठी शिकवणी सुरू केली आहे. मी नक्कीच माझ्या फेबुवर ह्या लिंक्स देईन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा :)

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:04 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
--कौशिक लेले

अनिरुद्ध प's picture

4 Oct 2013 - 1:18 pm | अनिरुद्ध प

माझ्या मते हा ब्लोग ईतर भाषिकान्व्यतिरिक्त मराठी भाषिकान्साठी सुद्धा उपयुक्त ठरावा,कारण आताची नवी पिढी ही बहुतेक आन्तरराष्ट्रीय भाषात शिकते आहे. शुभेच्छा.

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:06 pm | कौशिक लेले

धन्यवाद. हो. आपण म्हणता त्यात तथ्य आहे.

आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

नन्दादीप's picture

4 Oct 2013 - 2:51 pm | नन्दादीप

स्त्युत्य उपक्रम....

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:34 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

अभ्या..'s picture

4 Oct 2013 - 2:52 pm | अभ्या..

छान आहे उपक्रम. जमेल तशी प्रसिध्दी आणि वापर पण केला जाईल.
शुभेच्छा आणि धन्यवाद आहेतच शिवाय आपल्या कष्टांचे कौतुक पण. :)

आणि ब्लॉगवरचा पहिलाच धडा लै म्हन्जे लैच आवडण्यात आलेला आहे. ;)

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:18 pm | कौशिक लेले

माझा ब्लॉग वापरून मराठी शिकणऱ्यांना मी मराठी शिकण्याचं कारण विचारायचो. अनेकांचं कारण होतं की त्यांचे प्रियकर/प्रेयसी मराठी आहेत. यात काही परदेशी व्यक्ती ही आहेत.
त्यामुळे हे ब्लॉग संपवताना शेवटचा पाठ म्हणून हा विषय घेतला.
ब्लॉगभर असलेल्या रूक्ष व्यकरण चर्चेवर हा गोड उतारा

दोन्ही ब्लॉग पाहिले. जबराट आवडले. काही उत्साही अन्यभाषिक लोकांना हे फॉर्वर्डण्यात येत आहे होऽऽऽ!!!!!

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:20 pm | कौशिक लेले

धन्यवाद.
आपली "दोन्ही ब्लॉग पाहिले. जबराट आवडले" ही प्रतिक्रिया ही जबराट आवडली

आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

पैसा's picture

4 Oct 2013 - 5:57 pm | पैसा

अभिनंदन आणि असेच मराठीच्या प्रसारासाठी उत्तमोत्तम प्रकल्प तुम्हाला सुचू देत ही शुभेच्छा!

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:21 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

धन्या's picture

4 Oct 2013 - 6:48 pm | धन्या

छान उपक्रम. धडे अगदी "रीयालिस्टीक" आहेत. :)

पाषाणभेद's picture

5 Oct 2013 - 1:52 am | पाषाणभेद

एकदम एकदम. पोलीस ५० रूपयात अ‍ॅडजेस्टही करतो आहे!

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:23 pm | कौशिक लेले

हा हा हा हा !!

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:22 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2013 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला उपक्रम शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:23 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

सव्यसाची's picture

4 Oct 2013 - 7:43 pm | सव्यसाची

अतिशय उत्तम उपक्रम..

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:34 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

एस's picture

5 Oct 2013 - 1:53 am | एस

मनापासून शुभेच्छा.

मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो, अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे असं आपण म्हणतो पण मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं.

हे मला व माझ्या मित्राला जेव्हा आम्ही एका बदनाम वस्तीतील अभागी 'माणसां'ना शिकवायला जायचो तेव्हा खूपच प्रकर्षाने जाणवले होते.

पण इथेच थांबू नका. मुद्रित माध्यमातही हे जरूर आणा.

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:33 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

एकदा हे ब्लॉग्स परिपूर्ण आणि निर्दोष असल्याची खात्री पटली की मुद्रित माध्यमात आणता येईल. थोडा काळ गेला आणि अनेकांकडून वापर झाला की या बद्दल खात्री होईल

किलमाऊस्की's picture

5 Oct 2013 - 6:41 am | किलमाऊस्की

दोन्ही ब्लॉग आवडले. मनःपूर्वक शुभेच्छा! चेपुवर शेअर करत आहे.

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:30 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
चेपु काय प्रकार आहे ? मि.पा. वर नविन असल्याने इथल्या विशेष बोलीची अजून ओळख व्ह्यायची आहे :)

किलमाऊस्की's picture

6 Oct 2013 - 7:54 am | किलमाऊस्की

चेपु - चेहरा पुस्तिका - फेसबुक :-P

मुक्त विहारि's picture

5 Oct 2013 - 6:57 am | मुक्त विहारि

अतिशय छान उपक्रम..

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:29 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

अरे वा!! माझ्या मुलाला आता तुमच्या ब्लॉगवरून मराठी शिकवत जाईन. धन्यवाद.

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:28 pm | कौशिक लेले

आपण तर मराठी असणार नं ? मग आपल्याला मराठी शिकवण्यासाठी ब्लॉग का बरं उपयोगी वाटतोय ? Just curios :)

चौकटराजा's picture

5 Oct 2013 - 8:47 am | चौकटराजा

आपल्या या उपक्रमाबद्द्ल आभारी आहे. आपल्याला काही विद्यार्थी मराठी शिकण्यासाठी सुचवीत आहे.
माधुरी दीक्षित
सचिन तेंडूलकर
महेश कोठारे
मिलिंद सोमण

रच्याकने, संमंचे ह्या उपक्रमाची दखल विभागात नोंद घेतल्याबद्दल अनेक आभार...

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:25 pm | कौशिक लेले

हा हा हा हा. आपल्याला त्यांचे ई-पत्ते महिती असल्यास त्यांना जरूर कळवा

कौशिक लेले's picture

5 Oct 2013 - 10:09 pm | कौशिक लेले

ज्या ज्या सदस्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
आपल्याला शक्य असेल आणि योग्य वाटेल त्या मर्गाने या ब्लॉग्स बद्दल संगावे. ही नम्र विनंती.

मि.पा. ने या उपक्रमाची विशेष दखल घेतल्याबद्दल मनापसून आभारी आहे

प्यारे१'s picture

5 Oct 2013 - 11:59 pm | प्यारे१

कौशिकचे अमराठींना मराठी शिकवण्याबद्दल कौतुक!

कौशिक लेले's picture

6 Oct 2013 - 11:25 am | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

सर्वसाक्षी's picture

6 Oct 2013 - 8:51 am | सर्वसाक्षी

मराठी बोलु पाहणार्‍या माझ्या सर्व अमराठी सहकार्‍यांना हे दुवे अवश्य पाठवतो.
धन्यवाद

कौशिक लेले's picture

6 Oct 2013 - 11:27 am | कौशिक लेले

अरे वा अशाच सहकार्याची गरज आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2013 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

अतिशत स्तुत्य उपक्रम !

मराठी शिकू इच्छिणार्‍या ओळखीच्या सर्व लोकांपर्यंत हे दुवे जरूर पोचविले जातील.

तुम्ही मराठी भाषेची खरंच खास सेवा केली आहे.... अनेक धन्यवाद !

कौशिक लेले's picture

6 Oct 2013 - 1:14 pm | कौशिक लेले

अरे वा अशाच सहकार्याची गरज आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2013 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

अतिशत स्तुत्य उपक्रम !

मराठी शिकू इच्छिणार्‍या ओळखीच्या सर्व लोकांपर्यंत हे दुवे जरूर पोचविले जातील.

तुम्ही मराठी भाषेची खरंच खास सेवा केली आहे.... अनेक धन्यवाद !

आज १४ ऑडियो-व्हिडियो क्लिप्स यूट्यूब वर अपलोड केल्या. आता क्लिप्स ची संख्या १५५ झाली आहे. आता इंग्रजी आणि हिन्दी ब्लॉग वरील Glossary type पाठ वगळता प्रत्येक पाठासाठी एकेक ऑडियो-व्हिडियो क्लिप आहे.
या बरोबर दोन्ही ब्लॉग्स च्या पाठांचं लेखन आणि ध्वनिमुद्रण पूर्ण झाले.

वेळेचा आणी ज्ञानाचा छान सदुपयोग करत आहात गुरुजी .मराठीमध्ये बोलले पाहिजे असे सांगणाऱ्यांनी मात्र आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत धाडणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा .

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 1:35 pm | कौशिक लेले

आपलं बोलणं खरं आहे.
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

वेळेचा आणी ज्ञानाचा छान सदुपयोग करत आहात गुरुजी .मराठीमध्ये बोलले पाहिजे असे सांगणाऱ्यांनी मात्र आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत धाडणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा .

सुंदर उपक्रम ! अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा ! :)

सुधीर's picture

7 Oct 2013 - 11:59 am | सुधीर

अगदी असेच म्हणतो.

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 1:36 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे ही नेहमी स्वागत असेल.

निनाद's picture

7 Oct 2013 - 9:37 am | निनाद

झकार काम केले आहे!

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 1:37 pm | कौशिक लेले

धन्यवाद निनाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

नानबा's picture

7 Oct 2013 - 9:49 am | नानबा

चेपुवरल्या सगळ्या अमराठी मुंबईकर मित्रांना लिंक पाठविल्या गेली आहे...
आमच्याकडून इतकाच खारीचा वाटा.. :)
तुम्हांला मनापासून शुभेच्छा..

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 1:46 pm | कौशिक लेले

अरे वा अशाच सहकार्याची गरज आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
तुमच्या मित्रांकडून काही प्रतिक्रिया आल्यास मला जरूर कळवा.

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Oct 2013 - 9:54 am | लॉरी टांगटूंगकर

झकास काम केलेल आहे,
मराठी सन्दर्भात धागा आहे तर इथेच एक प्रश्न विचारतो,

वस्तूंसाठी स्त्री लिंग आणि पुल्लिंग ठरवणारा एखादा नियम आहे का??
(म्हणजे तो चहा, ती चहा का नाही? किंवा तो दगड या प्रमाणे) . कन्नड लोकांना हा मोठा प्रॉब्लेम येतो..

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 2:05 pm | कौशिक लेले

धन्यवाद
दुर्दैवाने मराठीत लिंगनिश्चिती अनियमित आहे. इतकच काय नामा चे सामान्यरूप बनवण्याचे नियम ही अनियमित आहेत.

To Learn Marathi language grammar rules about Gender, Plurals and सामान्यरूप of noun plese refer
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/2012/05/working-with-nouns-gender-plurals.html

मी माझ्या फेबुवर ह्या लिंक्स देईन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 2:08 pm | कौशिक लेले

अरे वा अशाच सहकार्याची गरज आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
तुमच्या मित्रांकडून काही प्रतिक्रिया आल्यास मला जरूर कळवा.

स्वाती दिनेश's picture

7 Oct 2013 - 12:37 pm | स्वाती दिनेश

अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 2:10 pm | कौशिक लेले

धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2013 - 3:26 pm | दिपक.कुवेत

फक्त एक शंका.....
"आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
कौशिक लेले"

हि आपली सहि आहे का?

चौकटराजा's picture

7 Oct 2013 - 5:25 pm | चौकटराजा

कौशिक लेले आपल्या 'निश' चे आते चुलत भाउ आहेत.

कौशिक लेले's picture

7 Oct 2013 - 7:08 pm | कौशिक लेले

नाही ती मझी सही नाही. पण बहुतेक सर्वांना मला हेच सांगायचे आहे. :)

विकास's picture

7 Oct 2013 - 3:50 pm | विकास

आपण जवळपास दिडवर्षे सातत्याने या ब्लॉगवर लिहीत आहात हे दिसले. ते नक्कीच स्तुत्य आहे. आपल्या या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा अधिक उपयोग होण्यासाठी खाली काही सुचवत आहे:

ब्लॉगचा एक बेसिक प्रॉब्लेम असा असतो की ताजे लिहीलेले वर असते आणि सुरवातीचे कालानुरूप (क्रोनोलॉजी या अर्थाने) नकळत पण आत आत लपले जाते. त्यामुळे मुलूभूत गोष्टींच्या संदर्भात (मुळाक्षरे, व्याकरण, जोडाक्षरे वगैरे सुरवातीच्या ब्लॉग एंट्रीज) जर आपण ब्लॉग एंट्रीच्या ऐवजी "पेज" तयार केले तर ते कायमस्वरूपी दिसू शकेल.

शुभेच्छा!

कौशिक लेले's picture

8 Oct 2013 - 11:47 am | कौशिक लेले

ब्लॉग वर पोस्ट्स या कालानुरूप दाखवल्या जातात हे आपले म्हणणे बरोबर आहे. आणि मला माझ्या ब्लॉगवर हेच अपेक्षित आहे. पहिली पोस्ट हा पहिला पाठ आहे तर शेवटची पोस्ट हा शेवटचा पाठ. त्यामुळे विद्यार्थ्याने पहिल्या पाठापासून क्रमश वाचल्यास त्याचा गोंधळ होणार नाही.

ब्लॉग वर गूगल सर्च चा पर्याय ही दिला आहे. जेणे करून एखादा टॉपिक थेट शोधता येईल

ऋषिकेश's picture

7 Oct 2013 - 5:23 pm | ऋषिकेश

स्तुस्त्य उपक्रमास शुभेच्छा व अभिनंदन!

कंटेन्ट अजून बघितला नाही, तो बघुन मत देता येईल. तुर्तास श्री विकास यांच्या मताला अनुमोदन देतो. एखादे 'लेंडिंग पेज' तयार करावे जिथे व्यवस्थित अनुक्रमणिका असेल, शिवाय उजव्या कॉलममध्ये चाप्टर्सची अनुक्रमणिका देता आली तर अधिक सोपे जाईल.

कौशिक लेले's picture

8 Oct 2013 - 12:03 pm | कौशिक लेले

"लँडिंग पेज" ची सूचना चांगली आहे. वर म्हटल्या प्रमाणे ब्लॉग वर पोस्ट्स या कालानुरूप दाखवल्या जातात आणि मला माझ्या ब्लॉगवर हेच अपेक्षित आहे. पहिली पोस्ट हा पहिला पाठ आहे तर शेवटची पोस्ट हा शेवटचा पाठ.
त्यामुळे ब्लॉगपेज वर उजव्या बाजूला दाखवली जाणारी "ब्लॉग अर्काईव" लिस्ट ही एका अर्थाने अनुक्रमणि़काच आहे. अणि ती सुद्धा कायम दिसणारी; फक्त एका पानावर नाही.
म्हणूनच प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला आणि शेवटी मी हे लिहिले आहे :-
***************************************************************
Note :- Right hand side of the blog shows "Blog Archive". Expand it fully to see whole list of posts to Learn Marathi. Learn Marathi grammar and many aspects Marathi language online.
***************************************************************

सुमीत भातखंडे's picture

7 Oct 2013 - 8:25 pm | सुमीत भातखंडे

छान उपक्रम.
शुभेच्छा आणि अभिनंदन!

कौशिक लेले's picture

8 Oct 2013 - 12:08 pm | कौशिक लेले

मनापासून आभार !!

कौशिक लेले's picture

7 Nov 2013 - 4:02 pm | कौशिक लेले

मित्रहो, गेल्या महिनाभरात, दिवाळीच्या सुट्टीत कोणाला या ब्लॉग्स ना भेट द्यायला वेळ मिळाला का ? आपल्या ओळखीचे कोणी हे ब्लॉग्स वापरतंय का ? काही प्रतिक्रिया ?

आपल्यापैकी काही जणांच्या वाचनात आले असेल कदाचित. २१ मार्च च्या लोकसत्ता च्या व्हिवा पुरवणीत माझ्या या उपक्रमा बद्दल एक लेख आला होता. यातली कुठलीही एक लिंक बघू शकता.
http://www.loksatta.com/viva-news/kaushik-lele-initiative-for-learning-m...

https://www.facebook.com/LoksattaLive/photos/a.326857957366841.94691.301...

http://epaper.loksatta.com/245816/indian-express/21-03-2014#page/32/1

वर 'गवि' म्हणतात तसे उत्तम उपक्रम. आपल्या कष्टांचे कौतुक आहे.

आज २० ते २५ % मराठी पालकांची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ लागली आहेत. इंग्रजी माध्यमातील बहुतेक मुले मराठी वाचनात गोंधळतात आणि शब्दसंचय सुद्धा अंमळ कमी पडतो. त्या शिवाय परदेशस्थ स्थाईक पालकांची मुल आहेतच या बाबत केवळ पाश्चात्य देशात स्थायिक मराठी लोकांचा नव्हेतर मॉरीशस आणि इज्राएल मधील मराठी लोकांचाही विचार व्हावा असे वाटते. त्या शिवाय कौशिक म्हणतात तसे कुटूंबीय(पालकांपैकी) एक मेंबर मराठी असलेल्यांचे पाल्य. पालक अमराठी आहेत पण मुले महाराष्ट्रात शिकतात मराठी शिकावे लागते असाही मोठा खूप मोठा गट आहे. या दृष्टीने इंग्रजी आणि हिंन्दीतून मराठी भाषा शिकणे हवेच पण सोबत असेच भविष्यात इतर भारतीय भाषा तसेच उर्दू हिब्रू इत्यादी भाषातूनही मराठी शिकता यावयास हवी असे वाटते.

आता पर्यंत मराठीमित्र डॉट कॉम हे एकच मराठी संकेतस्थळ माहित होते त्यात आपल्या ब्लॉग सपोर्टची चांगली भर पडली आहे ही आनंदाची बाब आहे. ऑडीओ आणि व्हिडीओ सपोर्ट आपण लोक देतच आहात त्या सोबतच पॉवरपाँईटचे आपले स्वतःचे फायदे असतात पॉवरपाँईट सपोर्टही उपलब्ध असावा असे वाटते. लहानमुलांकरताच्या कार्टून्स ना सबटायटल्स देऊन त्याचाही वापर करता येईल त्याच पद्धतीने मराठी गाण्यांसोबत सब टायटल्स आणि गाण्यांमधल्या शब्दांचे छोटे छोटे शब्द कोश या बद्दल विचार करता आल्यास त्यात इकॉनॉमीक मॉडेलही बनवता येईल असे वाटते. अगदीच जाहीरातींचा अतीरेक न करता इकॉनॉमीक व्हाएबिलिटी करता अशा मराठी संकेतस्थळांनी किमान स्वरूपात जाहीरातींच उत्पन्न मिळवण निश्चीतपणे गरजेच आहे.

आपल ब्लॉगवरील काम मोफत आहे तरि सुद्धा कॉपीराईटेड आहे. कॉपीराईटेड असण्यास हरकत नाही उत्पन्न मिळून सस्टेनेबिलीटी राहत असेल तर चांगली गोष्ट आहे पण सोबतच विकिपीडियाच्या विकिबुक्स या बंधूप्रकल्पातून मुक्त स्रोतातून सुद्धा असे काम होण्याची गरज आहे. इंग्रजी विकिबुक्सवर मराठी प्रकल्प उपलब्ध आहे त्यात अंशतः काम केल्यास जगातील बाकी अनेक भाषातून स्वयंसेवी पद्धतीने अनुवाद केले जाऊ शकतात जे कदाचित आपल्या मर्यादीत स्रोतात शक्य होणे कठीण असू शकेल. एनि वे मी त्या पानावर आपल्या ब्लॉगचा दुवा शेअर केला आहे.

मराठी विकिपीडियावर याच उद्देशाने एक साहाय्य पान विकिपीडिया:Marathi_language_support_tools उपलब्ध केलेले आहे.

बाकी आपल्या उपक्रमास शुभेच्छा आहेतच.

कौशिक लेले's picture

8 Apr 2014 - 12:51 pm | कौशिक लेले

विकिपिडिआ वर दुवा देण्याबद्दल आपला आभारी आहे.

माहितगार's picture

6 Apr 2014 - 2:02 pm | माहितगार

कोण असतं ?
(hM. tumachyA gharI koN asatM ? )

असतं या अनुस्वाराचा आणि asatM या ट्रांसलिटरेशन्स नवागतांना देण्या बाबत मी बर्‍यापैकी साशंक आहे.

कौशिक लेले's picture

8 Apr 2014 - 12:57 pm | कौशिक लेले

अनुस्वाराचा उच्चाराचे वेगवेगळे प्रकार मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच समजावून सांगितले आहेत.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/2012/05/pronunciation-of-anu...
वरील उदाहरणासाठी "Rule 8) Use of अनुस्वार to indicate change in pronunciation in colloquial language." इथे ते समजावून सांगितले आहे. आणि यूट्यूब वर व्हिडिओही टाकला आहे.
त्यामुळे शिकणार्‍याचा गोंधळ होऊ नये.

रुद्राष्टकात "नमामि शमीशान निर्वाण रुपम, विभुम व्यापकम ब्रह्म वेद स्वरुपम" ते रुपम आहे की रुपन?
विभुम की विभुन? वगैरे
खरं तर संस्कृतचे काहीतरी नियम आहेत पण ते माहीत नसल्याने स्तोत्र म्हणण्यात गोची होते.
___________

यूट्यूबचा दुवा पाहीला. माहीतीपूर्ण आहे. ते नियम लावून म्हणेन एकदा.

सिद्धेश सुभाश महाजन's picture

8 Apr 2014 - 1:15 pm | सिद्धेश सुभाश महाजन

लर्न एन्ग्लिश फ्रोम मराठी अशी माहिती/ब्लोग पण येवुदे.

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2014 - 12:11 am | अप्पा जोगळेकर

कौशिक लेले यांचे अभिनंदन. हा एक अति हुशार माणूस आहे. कॉलेजात काय्म अव्वल होता.ंमराठी सेवेसाठी शुभेच्छा.

कौशिक लेले's picture

10 Apr 2014 - 11:11 am | कौशिक लेले

धन्यवाद सौरभ्/अप्पा ! बापरे फारच स्तुती होत्ये !! :)

nasatiuthathev's picture

11 Apr 2014 - 10:52 pm | nasatiuthathev

स्तुत्य उपक्रम ....

.......................................................

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Apr 2014 - 12:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्तुत्य उपक्रम आहे. स्वतच्या वेळात वेळ काढुन असं चांगलं काम करणारी लोकं खुप कमी असतात, तुम्ही ते करताय त्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन. पुढच्या कामासाठी ऑल दी बेस्ट :)

आता तेवढं नाव कौ'शिकलेले' ऐवजी कौ"शिकविणारे" करता येतय का बघा :) :)... (ह.घ्या.)

कौशिक लेले's picture

13 Apr 2014 - 7:19 pm | कौशिक लेले

कौ'शिकलेले' ऐवजी कौ"शिकविणारे" :) वा !! तुमचे निरिक्षण आणि विनोदबुद्धी ला मनापासून दाद !!

शुचि's picture

14 Apr 2014 - 10:39 pm | शुचि

हाहाहा भारी कोटी!!

सुवर्णमयी's picture

14 Apr 2014 - 11:20 pm | सुवर्णमयी

छान उपक्रम. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवयला हवा हा उपक्रम
शुभेच्छा

कौशिक लेले's picture

11 Jun 2016 - 10:51 am | कौशिक लेले

मागच्या वर्षी महाराष्ट्र टाईम्स (मटा) मध्ये या बद्दल एक लेख आला होता
आपण ऑनलाईन बघू शकता
http://epaperbeta.timesofindia.com//Article.aspx?eid=31829&articlexml=01...
OR
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/47110323.cms