माझंही एक चित्रं..

स्मिता's picture
स्मिता in जनातलं, मनातलं
12 Aug 2008 - 12:35 pm

मिपाकर मंडळी..नमस्कार!

ईथे बरीच चित्र बघितली, माझंही एक चित्रं टाकत आहे.. (नविन "कलादालन" काही सापडलं नाही बुवा)

या चित्राचं एक मोठ्ठं पेंटिंग बघितलं आणि बसल्या जागी पेनने हे चित्र काढलेलं आहे.
घरच्यांकडुन नेहामीच खरपुस समिक्षा व्ह्यायची चित्रांची, तेव्हा तुमच्याकडुन पण खरया आणि सुचक समिक्षेची अपेक्षा करते.
:)

कलाप्रतिभा

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

12 Aug 2008 - 3:07 pm | अनिल हटेला

स्मिता देवी !!!

गूड वर्क !!

( त्या सुन्दरीचा पाय जमिनीवरच आहे की अधान्तरी?)

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

RAVI KHAIRE's picture

12 Aug 2008 - 5:01 pm | RAVI KHAIRE

PAI JAMINIVARCH AHE

मनस्वी's picture

12 Aug 2008 - 3:09 pm | मनस्वी

छान चित्र स्मिता. अजून येउदेत.
अवांतर : गरुडाने ओढणीच पकडलीये तर सोडून देउन गरुडाचा पोपट तरी करायचा!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

टारझन's picture

12 Aug 2008 - 4:14 pm | टारझन

अवांतर पोपट =))

चित्र पेनाने काढलंय .. हेच जबरा काम.. पेनाने शेडिंग देणे अवघड आहे. मी पण विना खुड लब्बर खरडतो....
आमची खरड या ईथे

गूड वर्क ... किप ईट अप... वुड लाईक टू सी मोर (गरूड झाला ना आता)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मदनबाण's picture

12 Aug 2008 - 3:12 pm | मदनबाण

व्वा,,चित्र छान जमलय..अजुन पाहायला आवडतील...

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

पावसाची परी's picture

12 Aug 2008 - 3:16 pm | पावसाची परी

अग स्मिता पेनाने काढलय्स?कमाल आहे......
अगदि सुन्दर्........तिची साडी तर खुप छान काढलियस

ऋचा's picture

12 Aug 2008 - 3:16 pm | ऋचा

खुप छान आलय चित्र.
पण ती जमिनीवर उभी आहे आणि ओढणी गरुडाच्या हातात आहे (की गरुडाच्या हातातली ओढणी ती ओढत आहे???)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री's picture

12 Aug 2008 - 3:17 pm | आनंदयात्री

पण गरुडाचा चेहरा कोंबड्यासारखा अन अंग मोरासारखे वाटतेय !
बाकी स्त्री उत्तम आलीये हो, केशसांभार तर मस्तच. (फक्त पाय ४ वाटतात कधी कधी)

असो, टवाळी राहुद्या बाजुला, नुसत्या पेनाने काढलेले चित्र छानच जमलेय. अहो आम्हाला डोंगर, बल्ब अन ४४४ वाले पक्षी सोडुन दुसरे काय जमत आवडले.
चित्र आवडले.

छोटा डॉन's picture

12 Aug 2008 - 3:26 pm | छोटा डॉन

टवाळी राहुद्या बाजुला, नुसत्या पेनाने काढलेले चित्र छानच जमलेय. अहो आम्हाला डोंगर, बल्ब अन ४४४ वाले पक्षी सोडुन दुसरे काय जमते ?
छान आहे चित्र ...

(फक्त पाय ४ वाटतात कधी कधी)

आसयं होय, असेल बाबा.
पण मला एक समजले नाही की एवढी छोटी गोष्ट सांगायला आंद्याने " २ वेळा प्रतिसाद" का टाकला ???
एकात भागले असते की !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

12 Aug 2008 - 3:31 pm | आनंदयात्री

दोनदा कुठे टंकला रे शिंच्या ??
डोळे आहेत का मल्टीप्लेक्सर ??

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2008 - 3:23 pm | प्रकाश घाटपांडे

काही मान्स शिशि नी बी काढत्यात. पन ते मंग ख्वडता येत आस्तयं. पेनान काल्ढ कि मंग ख्वडता येत न्हाई. कंच पेन वापारलं बॉल पेन कि शाईवालं पेन?
(विचित्रकार)
प्रकाश घाटपांडे

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2008 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्कृष्ट चित्र. खूप आवडले.

बिपिन.

विसोबा खेचर's picture

12 Aug 2008 - 3:42 pm | विसोबा खेचर

एकंदरीत चित्र अन् गरूड जबरा आलाय, परंतु बाईचा चेहेरा आणि दंड आवडला नाही. चेहेरा जरा पसरट वाटतो आहे अन् दंडही प्रपोर्शनमध्ये आलेला नाहीये!

असो, अजूनही चित्रे येऊ द्यात अन् पुढील चित्रकलेकरता शुभेच्छा...

तात्या.

राघव१'s picture

12 Aug 2008 - 4:04 pm | राघव१

छान निघालंय. पेनानं काढलंय म्हटल्यावर कौतुक आलेच पाहिजे :)
पण त्यामुळेच बर्‍याच ठिकाणी जी सफाई येवू शकली असती ती आणता आलेली नाही, कारण एकदा रेखाटलेले मिटवता येत नाही. सफाई कमी पडल्यामुळे ते एखाद्या कॉमिकबुकातले चित्र वाटायला लागलंय (रागावू नका हं!). ;;)
आता शक्य असेल तर हेच चित्र पेन्सिलीने काढून मग टाका इथं, म्हणजे त्याला खरा न्याय मिळेल! काय?

राघव

त्या सुन्दरीचा पाय जमिनीवरच आहे की अधान्तरी?
- सुन्दरीला गरुड उचलुन घेउन चालला आहे(ओढणीला पकडले आहे), त्यामुळे सुन्दरी अधांतरी आहे..माझ्या चित्रात खाली डोंगर , नदी होते पण चित्र लांब झाले त्यामुळे आणि मी जेव्हा चित्राचा फोटो काढला तेव्हा खालचा भाग नाही आला त्यात!

पण गरुडाचा चेहरा कोंबड्यासारखा अन अंग मोरासारखे वाटतेय !
=)) हो... मलापण तसचं वाटतयं..

कंच पेन वापारलं बॉल पेन कि शाईवालं पेन?
अजिबातचं साहित्य नव्हतं माझ्याकडे, मी बॉलपेन वापरलं. आणि कागद पण नव्हता, मग कसलातरी जाहिरातीचा कागद वापरला.. (चिकटपट्टीने जोडावापण लागला दुसरा कागद..)

एकंदरीत चित्र अन् गरूड जबरा आलाय, परंतु बाईचा चेहेरा आणि दंड आवडला नाही. चेहेरा जरा पसरट वाटतो आहे अन् दंडही प्रपोर्शनमध्ये आलेला नाहीये!
:? हो, पण चित्रात ते बेमालुमपणे झाकुन गेलयं..तुम्ही बरोबरं हेरलं.

सफाई कमी पडल्यामुळे ते एखाद्या कॉमिकबुकातले चित्र वाटायला लागलंय (रागावू नका हं!).
बस्स का रावं??.. :| ..
आम्ही रागवतं नाहीचं मुळी... :)

आनंदयात्री's picture

12 Aug 2008 - 4:28 pm | आनंदयात्री

>>आम्ही रागवतं नाहीचं मुळी...

आवडलं .. अजुन येउ द्या चित्रं !

अनिल हटेला's picture

12 Aug 2008 - 4:36 pm | अनिल हटेला

अगदी बरोब्बर !!!!

अजुनही येउ देत ,

चित्र !!!!!!!!!!!!!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

स्मिता's picture

12 Aug 2008 - 4:44 pm | स्मिता

आम्ही तशी पेन्शिल .. बरीच दौडवली असल्या कारणाने पडत्या फलाची आज्ञा मानुन आणखी एक चित्र टाकते आहे...

अनिल हटेला's picture

12 Aug 2008 - 4:48 pm | अनिल हटेला

क्या बात है !!!

मस्त च !!!!!!!!!!!!!!

लढ बेटे !!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनस्वी's picture

12 Aug 2008 - 4:52 pm | मनस्वी

सुं द र
पण कागद कमी पडल्याने पंख आखडते घेतल्यासारखे वाटताएत.
हा पक्षी नक्की कोणता?

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Class: Aves
Order: Anseriformes
Family: Anatidae

Identification 43-48 cm. Chestnut-brown diving duck with long tail, often cocked vertically. Male has white head, black cap and blue bill, swollen at base. Female has pale face with dark cap and cheek-stripe and blackish, less swollen bill. Similar spp. Ruddy Duck O. jamaicensis is smaller with brighter chestnut plumage. Male has more extensive black cap and dark hindneck and female has narrower facial band and browner cap. Both sexes lack swollen base to bill. Hybrid identification can be very problematic. Voice Low rattling noise uttered during display. Otherwise generally silent.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनस्वी's picture

12 Aug 2008 - 5:03 pm | मनस्वी

भाषांतर करून का नाही लिहिलस?
पायांवरून बदकच वाटलेलं.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

स्मिता's picture

12 Aug 2008 - 4:52 pm | स्मिता

;;)

अजिंक्य's picture

12 Aug 2008 - 4:58 pm | अजिंक्य

तसा मी काही चित्रकलेचा जाणकार नाही, पण छान चित्र बघितल्यावर कळतं(!).
हे चित्र तर छानच आलंय, पण, काही शंका -
१) एका पक्ष्याचा एकच पाय का दाखवलाय? (दुसरा झाकला गेलाय की काय? पण तशी काही गरज वाटत नाही...)
२) एक पक्षी जमिनीवर आणि दुसरा उडताना दाखवलाय का? (की दोघेही उडतायत?)

(शंकेखोर वृत्तीबद्दल राग मानू नये. असंच आपलं मनात आलं, ते लिहिलं...
पण हे मात्र खरं, की हे चित्र खूप छान आलंय. आपल्याला काही जमणार नाही बॉ!)
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

स्मिता's picture

12 Aug 2008 - 5:12 pm | स्मिता

टारझनदादा,, माहितीबद्दल धन्यवाद..
मी तर असचं, कॅलेंडरवरचं बघुन काढलं आहे हे चित्र.

काही शंका -
१) एका पक्ष्याचा एकच पाय का दाखवलाय? (दुसरा झाकला गेलाय की काय? पण तशी काही गरज वाटत नाही...)

- झाकला गेलाय असचं वाटतयं...

२) एक पक्षी जमिनीवर आणि दुसरा उडताना दाखवलाय का? (की दोघेही उडतायत?)
- हे पेन्सिल शेडिंग आहे म्हणुन समजतं नाहिये, पण खाली पाणी आहे आणि पक्षी पाण्यावरुन उडत आहेत.

प्राजु's picture

12 Aug 2008 - 8:40 pm | प्राजु

स्मिता,
मला तुझी दोन्ही चित्र आवडली... वरचे तर सुंदर आले आहेच पण खालचे तर अप्रतिम आले आहे...
आणखीही असतील तर चढव ना..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

12 Aug 2008 - 10:05 pm | यशोधरा

छान काढली आहेस दोन्हीही चित्रे स्मिता, खूप आवडली...

कशिद's picture

12 Aug 2008 - 11:27 pm | कशिद

पहिले चित्र खर्च खुप सुन्दर आहे .

चित्रकरला ममेहंदी कध्याच्या कलेत पारंगत आहे हे नकी

(कला प्रेमी )काशिद

अरुण वडुलेकर's picture

13 Aug 2008 - 11:11 am | अरुण वडुलेकर

अप्रतिम. खूप आवडलं
बसल्या जागी पेनने हे चित्र काढलेलं आहे.
हे विशेष.
अशी आनखीही रेखाटने येऊ द्या.
शुभेच्छा.

परिस's picture

20 Aug 2008 - 5:05 pm | परिस

खरच खुप सुन्दर .....म्हनजे नुसत्य पेनाने हा आविश्कार ..लै भारी..!!!