नेट केफे

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
29 Jan 2015 - 3:37 pm

नेट केफे
ऑगस्ट महिन्यातील एक संध्याकाळ. ऑफिस मध्ये होतो . ८ वाजले असतील . फोन वाजलाच. घरी असलो कि प्रचंड तिटकारा येतो या फोन चा . म्हणजे . एकूणच नको वाटतं . सारखं ते मेसेज न कॉल . त्यातून स्वतःहून कोणाला फोन लाऊन त्यांची विचारपूस करावी . हा स्वभाव नाही . पण ऑफिस मध्ये असताना फोनला पर्याय नसतो . आणि कानाला कायम ब्ल्यूटूथ सेट लावलेलाच . नेहमीच्या सवयीप्रमाणे . नाव न वाचताच उचलला .
"कहा है ?" पलीकडून अगदी ओळखीचा आवाज .
"ऑफिस मे . क्यू क्या हुआ ? "
" कुछ हुआ नाही . नेट केफे आजा . सब है आज . "
"नही रे . ऑफिस से लेट होगा . भूक लगी है . घर जाऊंगा . "
यावर दोन मिनिटांची शांतता . मग एक दुसराच . थोडा जड आवाज येतो . आणि या वेळी मराठीत .
"तुझ्या आयचा घो . भोसडीच्या . . आम्ही काय हॉटेलात xx धुवायला जातो का बे मग? . भूक लागले ना ? ये इकड गप्प . च्यायला पोरीन्सारखी नाटकं करतो भेxxxx . "
"बघतो रे . काम खूप होतं आज . दमलोय खूप . "
परत काही वेळ शांतता . मग तिसराच आवाज . या वेळी कोकणीतून ६-७ सलग शिव्या . आणि "आता येतोस इथे कि वरात पाठवू" असा प्रश्न .
बरं येतो . पोचतो अर्ध्या तासात . .
समोरून एकाच वेळेला ३-४ जणांच्या शिव्या ऐकू आल्या . हिंदी आणि मराठीतून एकाचवेळी माझ्याबद्दल नुसता राग ओकत होते लोक . मी आपला फोन बंद केला .
तसंही क्लास सोडण्याची वेळ झालीच होती . बेळगावात एका नवीनच सुरु झालेल्या इंस्टीट्युट साठी एडमीन आणि नेट्वर्किंग शिकवत होतो . अतिशय आवडी आणि नवीन शिकायला मिळायचं. . आणि ४-५ वेगवेगळ्या batch घेऊन इतरांना शिकवायला मिळायचं . १२-१४ तास नोकरी . आणि सरळ घरी जाउन काही ना काही वाचत बसणे किंवा गेम खेळणे . हाच दिनक्रम गेले कित्येक महिने ठरलेला होता .
सगळं बंद करून निघेपर्यंत सहज १५-२० मिनिटे गेली . डोक्यात चक्रं सुरु झाली होती . सगळी मंडळी एकाच वेळी कशी काय जमली .

पहिला आवाज होता . ऋग्वेद देशपांडे . आई मराठी , वडील कन्नड . आणि वडिलांच्या दर दोन वर्षांनी होणाऱ्या बदली मुळे . ७-८ भाषा समजतात . पण बोलतो फक्त फक्त हिंदी . त्याचं मराठी ऐकून हसून हसून जीव जाण्यापेक्षा हिंदीतच बोलायचं असा ठराव पास झाला होता अक्ख्या वर्गात . आणि हिंदी तर पक्की "कव्वा बिर्यानी " टाईप . चांगली हिंदी यायची दोघानाही . पण . याचं एक लॉजिक होतं . . "देख बा . ३ साल हैद्राबाद मी ऐसीच हिंदी बोलेसो . मै येइच बोल्नेवला . और तुम लोग भी ऐसीच बोलनेका मेरेसाथ . ." एकदा मैत्री झाली कि कुठला भाषा काय फरक पडतो म्हणा .
११वीत असताना हा केंद्रीय विद्यालयातून . (CBSC वाले . स्वतःला आम्हा स्टेट सिल्याबास वाल्यांपेक्षा वरचढ समजणारे ) आलेला एक प्रचंड हुशार मुलगा माझ्या बाजूला बसला होता . म्हणजे . ठरवून नवतो बसलो . पण काही लोकांशी लिंक आपल्या आपण लागते . त्यातलाच हा . मी पहिल्याच दिवशी कॉलेजला लेट गेलो होतो . पण हे ठरवलं होतं पहिल्या बाकावर बसायचं नाही . पण आमच्या वर्गात एक अलिखित नियम होता . मुलं आणि एरवी अति सिन्सिअर असणाऱ्या मुली पण मागून बसायला सुरुवात करायचे . पहिला बेंच कायम रिकामा असायचा . शेवटी तिथेच बसलो . प्रोफेसर आले आणि सगळ्यांची ओळख परेड सुरु झाली . आणि तेवढ्यात एक जाड मुलगा धापा टाकत वर्गात घुसला . परमिशन घेणे इत्यादी प्रकार नाहीच . डायरेक्ट माझ्या बाजूलाच बसला . . आणि आल्या आल्या . . "इसकी मा कि आंख . सायकल पंक्चर हुंवि पैलेच दिन . नासिबीच फुटेसो साला" असं काही तरी बडबडला . त्यानंतर orientation च्या वेळी छोटीशी "वाद-विवाद स्पर्धा झाली" त्यात आम्ही दोघे एका टीम मध्ये होतो . तेव्हा त्याच्या शाळेमुळे आणि पुस्तकी अभ्यासामुळे आलेली हुशारी . आणि मी अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी सगळं वाचल्यामुळे आपोआप वाढलेली भाषेवरची पकड . शब्द फिरवून समोरच्याला अडकवण्याची कला . यामुळे . . कॉलेज मध्ये त्यावेळेस आमच्या समोर ' डिबेट ' ला यायची हिम्मत नवती कोणाची .
दोघात आणखी एका गोष्टीचं वेड होतं . गेम्स . तासंतास यावर गप्पा व्हायच्या .
बास. तेव्हा जी मैत्री जमली ती आजपर्यंत . दोघांनी मिळून . अकरावी आणि बारावी . या दोन वर्षातली सगळी मिळून फक्त ५-६ महिने क्लास बसलो असेन . बाकी सगळा वेळ . एक तर जिमखान्यात badminton , carom , किंवा त्याच्या घरी / सायबर कफे मध्ये गेम खेळण्यात घालवला . तरीही पास कसे होत होतो . हे देवालाच ठाऊक . कॉलेज मध्ये जे काही करायचं ते सगळं केलं . मारामारी सुद्धा . तसे आम्ही दोघेही काही पैलवान नाही . पण दोघेजण सोबत असलो कि काही फिकर नसायची . अश्याच एका घटनेत . एका मुलाशी ओळख झाली .
किंवा . त्याच्याकडून मार खाल्ला . "अजिंक्य मुरकुटे" फोन वरचा दुसरा आवाज . पक्का म.ए समितीचा कार्यकर्ता , . ६ फुट ४ इंच . आणि माझ्या तिप्पट रुंदी . एका छोट्या गैरसमजातून भांडण झालं . आणि याने दोन मुस्कटात मारल्या . आणि आम्ही आडवे . पण तरी कसाबसा उठून त्याच्या "मध्यावर" लाथ मारली होती . आणि तो झोपला . म्हणजे अक्षरशः बेशुद्ध . ६-७ वर्ष फुटबाल खेळल्यामुळे पायात ताकत होती . पण ती इतकी असेल याची कल्पना नसावी . पळालो तिथून .
मग अक्ख्या कॉलेज मध्ये तो आम्हाला आम्हाला शोधत असल्याची खबर होती . आमच्या हाडांची संख्या डबल करेन अशी धमकी होती त्याची . (रागात त्याने थोडा लॉजिक चा भाग सोडला होता . नंतर यावर आम्ही त्याचा जीव खाल्ला होता चिडवून चिडवून . ) पण वाचलो . का ? तर त्याच फोन वरचा तो कोकणी माणूस .
आकाश शानबाघ . हा आणि अजिंक्य म्हणजे आमच्या कॉलेज चे तगडे पैलवान . अजिंक्यने व्यायामातून कमावलेलं शरीर . तर हा नुसताच वाढलेला . दोघे चड्डी दोस्त . त्याला गाठलं . म्हणालो . आज्ज्याला शांत कर मरे . त्याने आम्हाला दुसराच कोणी तरी समजून मारलं . चान्स नाही दिला . आम्ही पण उत्तर दिलं . चुकून झालं रे . सांग त्याला . "
परीक्षेत केलेल्या मदतीच्या हा मनुष्य अजिंक्यला कधी कधी हवं ते करायला लाऊ शकत होता . तेच झालं .
कॉलेज मध्ये एकूण ८ डिविजन . प्रत्येकात १२० विद्यार्थी . तरीही . या एका घटनेमुळे . आकाश "ए" डिविजन , अजिंक्य "डी " डिविजन . आणि आम्ही "जी " डिविजन . असे वेगवेगळया क्लास मध्ये असून पण मैत्री झाली .
आमची हि चौकडी , गीतेचे अध्याय म्हणण्या पासून ते एथेलेटीक्स पर्यंत सगळ्या स्पर्धात पुढे होती .
त्यामुळे . क्लास न बसण्यासाठी काहीही कारण देऊ शकत होतो . आणि कधीच "ब्ल्याक लिस्ट"मध्ये नाव नाही आलं .
असो . तर . आज हि सगळी अशी एकत्र जमणार होती . बारावी संपली आणि सगळे वेगवेगळी कडे फेकले गेलो .
आकाश आणि अजिंक्य मेक इंजिनियर , ऋग्वेद इलेक्ट्रोनिक्स . आणि मी . कॉलेज सोडून . छोटे छोटे कोर्सेस करत आधी सायबर कॅफे चालवत होतो आणि नंतर पुण्याला नोकरी आणि मग इथे क्लास घेत होतो . . अधे मध्ये भेट व्हायचीच . पण ती ठरवून व्हायची . कधी कधी ६-७ महिने बाकीचे लोक जिवंत आहेत कि मेले याचा सुद्धा पत्ता नसायचा . पण म्हणून कधी कोणी रागावलं नाही . सगळ्यांना सगळ्यांची खबर असायची . भरपूर ट्रिप्स , ट्रेक्स झाले .
असंख्य आठवणी . पण कोणी कुठे काही झालं . तर एकाच गावात होतो . मीच काय तो मध्ये पुण्याला गेलो . पण तरी महिन्यातून एक दोनदा चक्कर असायचीच .
आणि प्रत्येक वेळी आमचा एकच अड्डा "नेट कॅफे". असं नाव का दिलं या हॉटेल ला तो मालकच जाणे .
एका अंडरग्राउंड पार्किंग च्या कोपऱ्यात असलेलं हे "हॉटेल" . पण हॉटेल भन्नाट होतं . पंजाबी , चायनीज . आणि महाराष्ट्रीयन डिशेस . आम्हाला परवडेबल किमतीत . सो आठवड्यात एकदा इथे मुक्काम असायचाच . .
नोकरी लागल्यापासून जरा कमी झालं होतं जाणं माझं . कारण ऑफिसच्या वेळा विचित्र . पण आज अगदी आग्रह का करताएत हे नवतं कळत . म्हटलं . बघू जाउन . एखाद दुसरं कोल्ड ड्रिंक घेऊन जाऊ घरी .
या कोल्ड ड्रिंक ने तर आमची ओळख वाढली होती हॉटेल मध्ये . आमच्या टेबल वर तो कधी पाणी आणत नाही . "ड्यू " च्या बाटल्या आणतो फक्त एका मागोमाग एक . आणि आम्ही ते पाण्यासारखं प्याय्चोही भरपूर . इतर काही प्यायची सवय अजून लागायची होती . एकदा तिथे खायला बसलो कि चौघांच्यात मिळून सहज १०-१२ ड्यू संपायचे .
…….
पोचलो शेवटी हॉटेलात . . सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे शिव्या दिल्याच सगळ्यांनी . टोमणे हि भरपूर होते. 'मोठे लोक झालेत . आमच्या बरोबर येत नाहीत आजकाल . ' इत्यादी इत्यादी
आधीच दमलो होतो . त्यातून हे टोमणे . राग आलाच थोडा . म्हणालो . हरामखोरानो . कोणाच्या मयताला जायचंय . एवढ्या गडबडीने बोलावलं मला . पुढच्या आठवड्यात आलो असतो तर चालणार नाहीये का.
सगळे चेष्टा मस्करी करत होते . नेहमीचा दंगा चालू होता . एकदम शांत झाले सगळे .
ऋग्वेद म्हणाला . "नही चलेगा . ये दोनो गोवा जारे . नेवी मी हुआ इनका प्लेसमेंट . मै कल औरंगाबाद जारु . सो . ये आखरी पार्टी अपनी . इसलिये बुलाया . जाना है तो जा तू . वैसे भी नाही मिलेंगे इसके बाद "
च्यायला . एकदम असा धक्का द्यायची गरज होती का .
"मग आज पर्यंत मला सांगितला का नाही कोणी ? मिस कॉल द्यायला पण जमत नाही का? ते जाऊदे . एक मेसेज टाकून ठेवायचा . सांगितलं का नही मला ? . "
या वेळी आकाश बोलला . "आदित्य . गेले ७ दिवस आम्ही तुला फोन करतोय . एक हि नाही उचल्लास तू . फोन दाखव तुझा . . "
असं म्हणत स्वतःच माझा फोन घेतला . म्हणे . हे बघ . . "४८ अनरेड मेसेज . वाटते का लाज काही . "
या २-३ वाक्यांनी सगळा माज उतरला होता . सगळा राग गेला होता . काही तरी विचित्र वाटत होतं. असं काही नवतं कि हे लोक परत कधी बोलणारच नाहीत . फोन , फेसबुक आहेतच . पण . काही तरी वेगळं वाटत होतं खरं . . इतक्या वर्षात आम्ही कधीच अश्या टोन मध्ये बोललो नवतो . कितीहि सिरियस विषय असला . तरी त्यात चेष्टा असायचीच . पण आज असं . . .
कोणीच काही बोललं नाही . तेवढ्यात तिथला एक वेटर आला . हा आमचा दोस्त झाला होता . आमच्या टेबल ला फक्त हाच शांत पणे सांभाळू शकत होता . नाऱ्या . वय वर्षे ६७ . वयाने मोठा . पण एकेरी बोलवावं इतका मस्त होता . रस्त्यात कुठे हि दिसलो . स्थळ काळ वेळ आणि सोबत , याचं काहीही भान न ठेवता . "अरे अजित साब (या नेपाळीना आदित्य का म्हणता येत नाही देव जाणे ) . थके लग रे . आते क्या साथ मे , एक एक कवाटर मारेंगे " अश्या वेळी सोबत आई असली . कि लागली वाट . जरी मी पीत नाही हे माहिती आहे . तरीही . त्या माणसाने तुला असं का विचारलं . कोण तो कुठला तो . एवढा वयस्कर माणूस . आणि इतक्या सहज कसा बोलतो तुझ्याशी . आणि तुला काही शिकवलं नाहीये का मी . काका आजोबा काही तरी म्हणायचं . इत्यादी इत्यादी इत्यादी . हे सगळं होई पर्यंत हा नाऱ्या तिथेच . पोटावर हात ठेऊन हसत थांबलेला .
असो .
तर . हा हातात 'चिकन ड्रम स्टिक ' घेऊन आला .
टेबल वर ठेवल्या ठेवल्या मी पुटपुटलो , अबे ये चिकन का लाया या चिडिया का . इतने छोटे पीस क्यू ? मुर्गी को भुका रखता है क्या बे . या उसका भी खाना तू हि खाता है ?
"खिक्क" ऋग्वेद हसला . सगळे हसत होते आता . जास्ती वेळ नाहीच राहू शकत सिरियस आम्ही . .
त्या रात्री आकाश आणि अजिंक्य गोव्याला ला गेले .
दुसऱ्या दिवशी . ऋग्वेद गेला औरंगाबादला . सोडायला गेलो होतो तेव्हा .
सहज म्हणालो . "च्यायला . . नेट केफेला जायला सोबत कोणी नाही आता "
पाणी आलंच होतं दोघांच्या डोळ्यातून जवळपास . तेवढ्यात . . म्हणाला . गेम भी नही खेल पाएगा . सेंटी मत कर अभी . निकाल इधर से . और लडकी के चक्कर मे मत पड . कही लफडा किया तो बचाने वाला कोई नही अभी तेरेको .
फोन करतू कल पोहोच के .
माहित होतं . तो हि फोन नाही करणार . आणि मी पण विसरेन .
झाला आता महिना . हरामखोर लोक . एक फोन नाही केला आज सकाळपर्यंत .
आत्ता मेसेज आलाय परत . .
"आदि . ९ सप्टेंबर . रात का खाना . नेट केफे . "

कथाअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Jan 2015 - 4:07 pm | पैसा

मस्त कथा! अप्रतिम! लिहीत जा रावसाहेब!

अद्द्या's picture

29 Jan 2015 - 9:47 pm | अद्द्या

धन्यवाद . . प्रयत्न नक्कीच करेन :)

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 4:47 pm | जेम्स बॉन्ड ००७

मस्तच..

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 4:48 pm | जेम्स बॉन्ड ००७

बाकी यारी जमवण्याच्या बाबतीत आणि ती पण अशी नमुनेदार, तुम्ही घेतलेलं नाव खुप मॅच करतं..

त्याबाबतीत खूप नशीबवान आहे मी . . खूप कमी मित्र आहेत . पण जीवाला जीव देणारे आहेत .

शिद's picture

29 Jan 2015 - 4:52 pm | शिद

मस्त लेख. आवडला.

पदम's picture

29 Jan 2015 - 5:27 pm | पदम

मैत्री असावी तर अशी. मस्त वाट्ल वाचुन.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 5:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

एक लंबर!!!

अनुप ढेरे's picture

29 Jan 2015 - 6:12 pm | अनुप ढेरे

वाह.. मस्तं... असेच इकडे तिकडे विखुरलेले दोस्तं आठवले.

राही's picture

29 Jan 2015 - 6:24 pm | राही

खूपच छान

सुबोध खरे's picture

29 Jan 2015 - 7:53 pm | सुबोध खरे

+१००

अजया's picture

29 Jan 2015 - 8:38 pm | अजया

झकास!

अद्द्या's picture

29 Jan 2015 - 9:48 pm | अद्द्या

धन्यवाद सगळ्यांचे :)

सस्नेह's picture

29 Jan 2015 - 10:24 pm | सस्नेह

सरळ आणि सहज कथन.
बाकी ते रावसाहेब नाव वाचून जरा डोक्यात घपला झाला ! *smile*

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 11:09 pm | मुक्त विहारि

झक्कास...

गुळाचा गणपती's picture

30 Jan 2015 - 1:41 am | गुळाचा गणपती

रावसाहेब, बेळगाव आणि देशपांडे (पु.ल.)

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 3:58 am | पिवळा डांबिस

सुरेख आहे कथा!
आवडली.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2015 - 4:12 am | श्रीरंग_जोशी

कथा आवडली.

पुलेशु.

नाखु's picture

30 Jan 2015 - 11:40 am | नाखु

"नेट" के मुक्तक

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त. एकेकाळी घट्ट मैत्री असणार्‍या आणि आता नोकरी-धंद्यानिमित्त्त दुरावलेल्या गृपची आठवण करुन दिलीत. सालं, गेले ४ वर्ष ठरवतोय सगळ्यांनी एकत्र भेटायचंं. शक्यचं झालेलं नाही. :(

उगा काहितरीच's picture

30 Jan 2015 - 11:46 am | उगा काहितरीच

मस्त !

विटेकर's picture

30 Jan 2015 - 11:50 am | विटेकर

चांगली आहे कथा !
शिव्यांचा वापर टाळता आला असता तर अधिक बरे ! असे मित्र एकत्र आल्यावर काय बोलत असतील याच साधारन अंदाज असू शकतो वाचकांना .
कथा वाचताना वाचक स्वतः ला त्यात पहात असतो तेव्हा काही अनावश्यक तपशील टाळता आले अस्ते .
तरीही उत्तम !

अद्द्या's picture

30 Jan 2015 - 3:44 pm | अद्द्या

काका . ओरिजिनल कथेच्या ८०% काढल्यात .
तरी तरी हा मुद्दा लक्षात ठेवेन :)

बॅटमॅन's picture

30 Jan 2015 - 2:28 pm | बॅटमॅन

एक लंंबर लिवलायसा की.

बोका-ए-आझम's picture

30 Jan 2015 - 2:48 pm | बोका-ए-आझम

ममद्या नंतर अजून एक मस्त व्यक्तिचित्र!

अद्द्या's picture

30 Jan 2015 - 3:46 pm | अद्द्या

बोका , बॅटमॅन , कॅप्टन, पिंडा काका . उगा

सगळ्यांचे आभार

कंजूस's picture

30 Jan 2015 - 6:38 pm | कंजूस

अगदी खेचतच नेता तुम्ही रावसाहेब.

आनंदराव's picture

30 Jan 2015 - 6:45 pm | आनंदराव

जुन्या आठवणी जाग्या झाल्या

बबन ताम्बे's picture

30 Jan 2015 - 7:12 pm | बबन ताम्बे

आवडले.

hitesh's picture

31 Jan 2015 - 2:27 am | hitesh

छान

समिर२०'s picture

31 Jan 2015 - 10:09 am | समिर२०

मस्तच..
जुन्या आठवणी जाग्या झाल्या