पाऊस आठवणींचा…

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 12:00 am

आज अचानक पाऊस आला,
सगळ्यांनाच भिजवून गेला…
एवढी कसली घाई होती बाबा,
हिवाळ्यातच पडून गेलास…

बरं येताना तू एकटा कधी येत नाहीस,
सोबत तिच्या आठवणीही घेऊन येतोस…

तू आपला पडून जातोस,
आणि मला मात्र कासाविस करतोस…

घरातच बसून मी बाहेर तुला पडताना पहात राहतो,
तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबात मला तिचाच चेहरा दिसत राहतो…

कधीतरी कडाडणाऱ्या विजेसोबत मी नक्षी आठवणींची विणत राहतो,
अश्याच कुठल्यातरी जुन्या पावसात मग मी देखील हरवून जातो…

तेव्हा देखील तू असाच यायचास कोणालाही न सांगता,
मग मी ही निघायचो तिच्याकडे कुठेही न थांबता…

मग आम्ही दोघंही भिजत राहायचो तू थांबेपर्यंत,
अरे! पहिल्या पावसात भिजायचा काय तो आनंद!

पण आता मात्र मी भिजत नाही दुरूनच पाहतो तुला,
मन मात्र भिजत राहत करून आठवणींचा झुला…

ती ही अशीच कुठेतरी पहात असेल ना रे तुला?
सांग मलाही कधीतरी माझी आठवण येते का रे तिला?

-आशिष

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Jan 2015 - 7:45 pm | पैसा

कविता आवडली!

शब्दबम्बाळ's picture

29 Jan 2015 - 8:05 pm | शब्दबम्बाळ

धन्यवाद! :)

प्रचेतस's picture

29 Jan 2015 - 8:13 pm | प्रचेतस

कविता आवडली.
पण हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला रेंगाळलेला / रेंगाळणारा पाऊस असे म्हणतात. लवकर आलेला नाही.

शब्दबम्बाळ's picture

29 Jan 2015 - 8:42 pm | शब्दबम्बाळ

आपल्या मताशी सहमत!! :)