हृदयाचा फोन

महेश अशोक खरे's picture
महेश अशोक खरे in जे न देखे रवी...
27 Jan 2015 - 1:55 pm

व्हॉटस् ऍपवर एक हिंदी मुक्तकाव्य आलं होतं. आवडलं. वाटलं, हे मराठीत असेल तर छान होईल.
म्हणून एक प्रयत्न केला.

मूळ मजकूर

आज सुबह मेरे पास दिल का
फोन आया |
कहने लगा,
बॉस,
मै तुम्हारे लिये, बिना रुके,
चोबिस घंटे चलता हु |
परन्तु तुम मेरे लिए
एक घंटा भी नही चलते |
कबतक ऐसा चलेगा |
अगर मै रुक गया तो तुम गए |
और अगर तुम रुके तो मै गया |
क्यों न ऐसा करे कि
साथ साथ चलें और साथ साथ रहें |
जीवनभर बॉस,
अभी भी वक्त है |
कल से तुम सिर्फ एक घंटा मेरे लिए चलो |
मेरा वायदा है कि मै बिना किसी
रुकावट के २४ घंटे चलता रहूँगा |

तुम्हारा अपना दिल

माझा प्रयत्न

हृदयाचा फोन
भल्या सकाळी हृदयाचा माझ्या फोन आला
गूज त्याच्या मनीचे ते सांगू लागले मला
‘‘मालक, तुमच्यासाठी दिनरात चालतो मी
पण माझ्यासाठी एक तासही चालत नाही तुम्ही
किती काळ असं चालायचं?
एकाच बाजूने सांधायचं?
थांबलो पळभर मी जरी, तर थांबाल तुम्ही
थांबलात तुम्ही तरी, अडखळेन, थांबेन मी
त्यापेक्षा करुया दोघे असे काही
थांबायची वेळच यायची नाही
एकत्र चालूया दोघेही अन्
एकत्र जगुया आनंदाने जीवन
उलटून गेली नाही अजून वेळ
संपत आला नाही अजून खेळ
उद्या सकाळी अनशेपोटी चाल तू एक तास
वर्षे, महिने, दिवसही चालेन तुजसाठी तासनतास’’

फक्त तुझंच हृदय

भावकविताकविता

प्रतिक्रिया

खमक्या's picture

27 Jan 2015 - 2:34 pm | खमक्या

छान आहे.
मिपावर स्वागत.

महेश अशोक खरे's picture

27 Jan 2015 - 5:11 pm | महेश अशोक खरे

खमक्याभाऊ धन्यवाद !

ज्याला मिळत नाही कधी पाठीवर कौतुकाची थाप
त्याने गेल्या जन्मी नक्की केले कोणतेतरी घोर पाप

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2015 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा

@हृदयाचा फोन
भल्या सकाळी हृदयाचा माझ्या फोन आला>>> =)))))

कॉलिंग सतिश गावडे .. =))

विवेकपटाईत's picture

27 Jan 2015 - 7:44 pm | विवेकपटाईत

रोज तास भर चालणे होतेच तरी सुद्धा बास बास दगा देतो, या बासचे काही एक कळत नाही....*crazy* *CRAZY* :crazy:

सौन्दर्य's picture

27 Jan 2015 - 8:33 pm | सौन्दर्य

सुंदर रुपांतर.