चायनीज भेळ

hitesh's picture
hitesh in पाककृती
24 Jan 2015 - 4:16 pm

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
पाव किलो कोबी

चायनीज शेव - मला वाटले होते हे मैद्याचे असेल. पण पाकिटावर चक्क तांदळाची चकली असे लिहिले आहे.

चटणीसाठी - लाल टोम्याटोचा कीस , कांद्याचा कीस , शेजवान चटणी , टोम्याटो सॉस , थोडे तेल , मीठ , लाल तिखट

क्रमवार पाककृती: 
आधी चटणी करुन घ्यावी. चार चमचे तेल गरम करुन त्यात कांद्याचा कीस , टोम्याटोचा कीस , शेजवान चटणी , सॉस , तिखट व मीठ घालुन परतावे. लालभडक मस्त चटणी तयार होते.

नुसतीच शेजवान चटणी च सॉस मिसळुनही दाट व तिखट चटणी होऊ शकेल.

कोबी किसून घ्यावा. त्यात चायनेज शेव व चटणी मिसळावी. चायनीज भेळ तयार.

.
..

.

******

काही बदल केले ..

१. कोबी बारीक चिरला.

२. तेलात फक्त शेजवान चटणी व सॉस घाल्य्न परतून चटणी केली.

३. शेव व कोबी मिश्रणात चटणीबरोबर तिखट पूड व मीठ घातले.

४. डाळिंबाचे दाणे व सिमला मिर्ची बारीक करुन घातली.

हा प्रकार सर्वात आधी मी पाच वर्षापुर्वी खाल्ला होता. परेल व एल्फिस्टन जोडणार्‍या ब्रिजवर एक माणुस पाच रुपये प्लेट विकायचा. तेंव्हा खूप गंमत वाटली होती.

हल्ली साध्या भेळपेक्षा याचीच दुकाने दिसतात.
खूप ठिकाणी खाल्ले. पण चटणीचा फॉर्मुला अजुन समजलेला नाही. ही चटणी मी मनानेच करुन पाहिली.

अगदी मस्त

प्रतिक्रिया

hitesh's picture

24 Jan 2015 - 4:34 pm | hitesh
पैसा's picture

24 Jan 2015 - 5:58 pm | पैसा

कोबी असल्यने हेल्दी पाकृ दिसतेय.

http://www.vegrecipesofindia.com/schezwan-sauce-recipe/ ही रेशिपी बघा.

आदूबाळ's picture

24 Jan 2015 - 6:48 pm | आदूबाळ

इंट्रस्टिंग पाकृ...

मितान's picture

24 Jan 2015 - 10:01 pm | मितान

ही असते तर चायनीज भेळ !
चांगली दिसतेय..

सानिकास्वप्निल's picture

24 Jan 2015 - 10:20 pm | सानिकास्वप्निल

शेझवान सॉसची पाकृ मागे गणपाभाऊंनी दिली होती ...इथे बघा

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2015 - 11:11 pm | टवाळ कार्टा

शेजारच्या बिर्याणी खाणार्याला चायनीज आवडते हे माहीतच आहे सगळ्यांना :)

त्रिवेणी's picture

25 Jan 2015 - 12:41 pm | त्रिवेणी

करुन बघेन. जास्त खटपट नाही रेसिपीत.

समंजस's picture

27 Jan 2015 - 6:59 pm | समंजस

मस्त....

[अवांतर : रस्ताच्या कडेला चायनीज भेळ विकणार्‍यांकडून विकत घेउन खाण्यापेक्षा, एखाद्या चाइनिज ढाब्यावर जेवणाची ऑर्डर देउन वाट बघत असताना फुकट मिळणार्‍या 'टाईमपास' चा आस्वाद घेणे केव्हाही चांगले :) ]

सप्तरंगी's picture

17 Jun 2015 - 6:03 pm | सप्तरंगी

चायनीज शेव कुठून पैदा केली, ते पण सांगा न! जमल्यास पाकिटाचा फोटो टाका.

उगा काहितरीच's picture

17 Jun 2015 - 7:36 pm | उगा काहितरीच

तुम्ही चक्क या विभागात !

विवेकपटाईत's picture

17 Jun 2015 - 7:49 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली. करून बघेन

पद्मावति's picture

17 Jun 2015 - 9:21 pm | पद्मावति

नक्की करून बघण्यासारखी आहे. आणि चायनीज शेव ही तुम्ही म्हणता तशी तांदुळाची असेल तर मग हेल्दी पण आहे.

द-बाहुबली's picture

18 Jun 2015 - 12:09 am | द-बाहुबली

दर शुक्रवारी प्रेम रेस्टराँ अन बार(अर्थातच कर्वे रोड पुणे) येथे ही भेळ काँप्लीमेंटरी स्नॅक्स म्हणून खायला मिळते. चवदार प्रकार आहे.