कथा-कॉलेज कट्टा भाग ३

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
16 Jan 2015 - 8:00 pm

मागील भाग
कथा-कॉलेज कट्टा भाग १
कथा-कॉलेज कट्टा भाग 2

या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे.

दुसरा दिवस उजाडला.पहिले लेक्चर होते ते मॅन्युफॅक्चरींग प्रोसेसचं म्हणजेच म्हात्रे सरांचं.त्या दिवशी ज्ञानेश्वर आणि अभिला यायला जरा उशीर झाला.त्यांची आवडती जागा म्हणजेच मधल्या रांगेतला तो तीन नंबरचा बाकावर आधीच अखिल बसला होता.पण आज त्याच्याशेजारी प्राची नव्हती कदाचित ती अजुन आली नव्हती.ज्ञानेश्वर पटकन अखिलच्या शेजारी बसला.मग त्यांच्या पुढच्या मोकळ्या बाकावर एकट्या अभिला बसणे भाग होते.पंधरा मिनिट झाले इतक्यात आपल्या हाय हिल्सच्या सँडलचा हाय आवाज करत प्राची तिथे अवतरली.
"मॅडम जरा आपल्या सँडलचा व्हॉल्युम कमी करा.माहितीये की तुम्ही छान सँडेल घातल्यात." म्हात्रे सरांनी कमेंट केली.या वाक्याने सगळ्या वर्गात एकच हशा पिकला.मुलांनाही बडबड करण्यासाठी काही ना काही कारण पाहिजे होते.मग सरांनी मुलांना शांत केले.आपली जागा नॅनोने म्हणजेच ज्ञानेश्वरने आधीच बुक केलीये हे पाहुन ती अभिजवळ बसली.तिला पाहताच अभि बाकाच्या एकदम कडेला सरकला.ते पाहुन प्राची गालातल्या गालात हसली.
तेवढ्यात सरांनी काही नोट्स लिहुन घ्यायला सांगितले आणि मुले शांतपणे लिहु लागली.पाच मिनिट झाली तेव्हा अभिचा पेन बंद पडला.
" नॅनो पेन आहे का रे?" हळुच मागे पाहत अभिने विचारले पण नॅनोने नकारार्थी मान हलवली.
"हा घे माझ्याकडे आहे." प्राची म्हणाली.पण त्यावर अभिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
"काय अभि,शाईपेन वापरणे बंद केलेस की काय?" या वाक्याने मात्र अभि तिच्याकडे पाहु लागला.
"तुला माहितिये अभि,मी जेव्हा लहान होते ना तेव्हा ना मी मुलांसारखं झाडावर चढायचे.उन्हाळ्यात कैर्या खायच म्हटलं की मी सगळ्यात आधी तयार.आमच्या शेजारी माझा एक मित्र राहायचा.माझा खुप छान मित्र होता तो.आमच्यात तर स्पर्धाच लागायची की कोण आंब्याच्या झाडावर सगळ्यात उंच जातं ते.एक दिवस असंच मी त्याला घेऊन झाडावर जायचं ठरवलं पण तो यायलाच तयार नव्हता.मग मी त्याला खुपच आग्रह केला तेव्हा तो तयार झाला.झाडावर कुठे कैर्या दिसतात का ते पाहत आम्ही वरवर जात होतो.आणि अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला.जागेवरच त्याने आपला प्राण सोडला.मला खुप वाइट वाटायचं त्याच्या मृत्युला मी स्वतःलाच जबाबदार समजायचे.पण माणसाचा जन्म आणि मृत्यु कसा आणि कुठे होणार हे विधिलिखित असतं.आपण तर फक्त एक जरीया असतो.मला माहितिये की प्रियांकाच्या अपघातासाठी तु स्वतःला जबाबदार धरत आहेस,पण तु हे जाणुन बुजुन नाही केलंय ना.प्लीज यातुन बाहेर ये.आपल्याला अजुन खुप जगायचंय. तिने अभिचा हात आपल्या हातात घेतला आणि अभिला धीर द्यायचा प्रयत्न केला.तिच्या या समजुतदारपणाने अभिच्या चेहर्यावर हसु उमटले.
"अभि आणि प्राची,लिहुन घेताय ना?" म्हात्रे सरांनी दोघांकडे कटाक्ष टाकला.
आता प्राचीही अभिची चांगली मैत्रिण झाली होती.अभि तिच्यासोबत भरपुर गप्पा मारायचा.पण अभिने तिला कधी आपल्या भुतकाळातील आठवणी सांगितल्या नाहीत.आत्तापर्यंत त्यांचा ग्रुप खुपच मोठा झाला होता.शेवटचा कॅप राऊंड होईपर्यंत बरेच मुले अभिच्या वर्गात आले होते.निगडीचा आणि मुळचा मांडवाचा आदित्य जो अतिशय भिडस्त होता,सुरजच्या गावाचा म्हणजेच नांदेडचा असणारा कपिल की जो एकदम बालिशपणा करायचा,राजगुरुनगरचा राजेश की ज्याला कॉलेज म्हणजे टाईमपास करायचं ठिकाण वाटायचं.आणि अजुन एक होता की जो JCB मध्ये काम करुन कॉलेज करायचा तो म्हणजे राहुल.जो डिप्लोमानंतर जॉब करत करत शिकतही होता.
प्राची आणि अखिलही याच ग्रुपमध्ये असायचे.कारण या नव्या मुलांमध्ये बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं होतं ते म्हणजे समंजसपणा.
असंच एकदा सगळे कँटीनमध्ये अभिचा ग्रुप गप्पा मारत बसला होता.कॉलेज आता फक्त एकच आठवडा राहिला होतं.अभि चहाचा घोट घेत कसला तरी विचार करत बसला होता.
"काय अभि, कसला विचार करतोय?" प्राची.
" काही नाही.एक विचारायचं होतं....." चहाचा कप खाली ठेवत अभि म्हणाला.
" अरे मग विचार ना यार.दिल मे कुछ नहि रखनेका..बोलुन डालनेका..." प्राची.
" अगं निदान हिंदी तरी नीट बोल.तसं पण हिंदी जरा ठीक ठाकच आहे म्हणा तुझी." अखिल तिची मस्करी करत म्हणाला.
"अखिल खुप झालं हा आता तुझं..." आणि पुन्हा त्या दोघांची तु-तु मै-मै सुरु झाली.
" अरे थांबा.अभि काहितरी विचारत होता ना.." नॅनोने सगळ्यांना शांत केले.
" अरे तुम्ही सगळे एवढे का सिरिअस झालात? मला फक्त एवढंच विचारायचं होतं प्राचीला की...तिची ती मैत्रीण दिसली नाही परत कधी???" अभि.
" अरे कोण ती?? तिला काहीतरी नाव असेल ना यार." प्राची.
" अगं तीच त्यादिवशी तुम्ही भांडत होता ना ऑफिसमध्ये त्या क्लर्क सोबत तीच.." अभि.
" अरे वैष्णवीबद्द्ल म्हणतोयस का तु!!!!अरे ती गावाला गेलीये रे येईल आता डायरे़क्ट सबमिशनलाच.का रे असं अचानक का आठवण झाली तिची? आवडली की काय?" प्राची जोरात ओरडली.
" यार मस्त आहे ती दिसायला.सिंपल में डिंपल.अगदी अभिला सुट होईल अशी!!!" नॅनोने कमेंट मारली.
"अरे अभि बरं आठवण केलीस.त्या टकल्याने अजुन माझा रिझल्ट नाही दिला.थांब बघतेच आता त्याला.अखिल चल माझ्यासोबत." प्राची जायच्या तयारीत होती.
"नको तु चिडल्यावर मला पण कंट्रोल नाही होणार!!!" अखिलने हसत उत्तर दिले.
" अखिल,पुरे हा आता." प्राची आता जाम भडकली होती.तिचा तो अवतार बघुन अखिल गपचुप तिच्यासोबत निघुन गेला.
आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता.म्हणुन क्लासमध्ये जेमतेमच मुले होती.
" मे आय कम इन सर?" या आवाजाकडे सगळ्यांचे लक्ष गेले.ती वैष्णवी होती.हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि लाल ओढणी मध्ये ती फारच सुंदर दिसत होती.
" या आता सुरु झालं वाटतं तुमचं कॉलेज..आज शेवटचा दिवस आहे आज तरी कशाला यायचं?" सरांनी प्रश्न केला.
" सर ते जरा घरी काम होतं." ती हसत हसत म्हणाली.
" या." असं म्हणत सरांनी पुढचं शिकवायला सुरुवात केली.
आत येत ती बसायला जागा शोधु लागली.एवढे बाक मोकळे होते पण तिला एकटेच बसायची मुळीच इच्छा नव्हती.
"अगं इथे बस ना." अभि शेजारची मोकळी जागा दाखवत प्राची तिला म्हणाली.
अभि शेजारचा नॅनो कधीच मागच्या बाकावर बसायला गेला होता.
" नॅनो,प्राची काय चालंलय तुमचं?" अभि हळु आवाजात म्हणाला.
"चिल बधीर!!!कोणत्याही मुलाच्या मनात काय आहे हे ओळखायला मला जास्त वेळ नाही लागतं.यार आवडतं तर आवडतं" प्राची हसत होती. यावर मात्र अभि निरुत्तर झाला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 Jan 2015 - 11:10 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

चेतन677's picture

17 Jan 2015 - 6:50 pm | चेतन677

आलेल्या एकुण प्रतिसादावरुन खरंच कथानक रंगत आहे असं वाटत नाहीये. कथेत जिवंतपणा ठेवण्याचा प्रयत्न करतोय...!!!!

आलेल्या एकुण प्रतिसादावरुन खरंच कथानक रंगत आहे असं वाटत नाहीये. कथेत जिवंतपणा ठेवण्याचा प्रयत्न करतोय...!!!!
बरे झाले तुमच्या लक्षात आले ते.
" रटाळ आणि टुकार " असा शेरा लिहीणार होतो. पण तुमचा उत्साहभंग व्हायला नको म्हणून लिहीत नाहिय्ये.
बघु पुढच्या भागात उत्सुकता / रंजकता आणता आली तर....नहितर पुलेशु असाही प्रतिसाद द्यायला लोक घाबरतील

चेतन677's picture

17 Jan 2015 - 7:55 pm | चेतन677

मग आता यापुढील भाग प्रकाशित करणार नाही..धन्यवाद...