माझा गाव ... (यात्रा... )-- ०१

मॅक's picture
मॅक in भटकंती
6 Jan 2015 - 3:25 pm

डिसेंबर महीना असल्यामुळे आणि ब-याच रजा शिल्लक असल्यामुळे वर्षाच्या शेवटी सुट्टी काढायच निश्चित केला होत... त्यातच नेमकी गावची यात्रा पण 28-29डिसेंबरला असल्यामुळे मग लगेच प्लॅन निश्चित केला शनिवारी सकाळी लवकर निघालो...मजल दर मजल करत आखेर रात्री सात पर्यंत गावी पोहचलो.
दुस-या दिवशीच गावच्या खंडोबा देवाची यात्रा होती, या वेळी गावच्या यात्रेला खास महत्व होत कारण मंदीराचा जिर्णोध्दार करण्यात आला असून जवळ-जवळ एक कोटी रूपये खर्च करून नवीन मंदीर बांधण्यात आले आहे,तसेच मंदीर परिसराच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.
प्रचि 01:- गावचे मंदीर.....

खंडोबा देवाच्या यात्रेला पहिल्या दिवस पुरण-पोळीचा नैवद्य असतो. दुपार नंतर संपूर्ण गावातील लोक तसेच पै-पाहूणे मंदीर परीसरात जमायला सुरवात होते.
प्रचि 02:---

गावच्या पुजारकीचा मान ज्या घरी असतो त्याच्या घरी एक मोठी काठी घटस्थापने पासून उभी केलेली असते तिच्या टोकाला मोराची पिसे बांधून कापड गुंडाळून, नारळाची तोरणे बांधून सजविण्यात आलेली असते तिला "सासणकाठी" म्हणतात.
प्रचि 03:- पुजा-याच्या घरी उभा केलेली सासणकाठी.....

चार वाजल्यानंतर सासणकाठी तसेच पालखित देवाची स्थापना करून पुजा-याच्या घरातून मंदीराकडे ढोलताशाच्या गजरात देवळाकडे आणली जाते.प्रथम ती आडवीच आणली जाते,पण मंदीर परिसरात आली की ती उभी करून ती उचलण्याचा मान असणा-यांन किंवा ज्यांची इच्छा असेल त्यांनी ती खांद्यावर उचलून मंदीराची प्रक्षिणा पुर्ण करावयाची असते.
प्रचि 04:----

प्रचि 05:----

प्रचि 06:----

प्रचि 07:----

मंदीराच्या समोर सासणकाठी आली कि देवाची आणि तिची भेट घडवून आणली जाते.
प्रचि 08:----

प्रचि 09:----

सासणकाठीची मंदीराला प्रदक्षिणा पुर्ण झाली का काठी गावच्या चावडीच्या मैदानात रोवली जाते दुस-या दिवशी रात्री "लंगर"(प्रचि 07 मध्ये काठी समोर दिसतोय तो साखळदंड) तोडण्याचा कार्यक्रम असतो. संध्याकाळपासून पारपारिक गजीनृत्य, धनगरी ओव्या व नंतर वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम असतो व रात्री बारा नंतर लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो, वाघ्या प्रचि07 मध्ये दिसतोय तो साखळदंड हाताने आडटून हिसका देऊन तोडतो..... तो किती क्रमांकाच्या कडीवर तुटतो त्यानुसार पुढील वर्ष कसे जाणार या बाबत अंदाज वर्तविण्यात येतात.
प्रचि 10:--पारंपारीक गजी नृत्य.....

वरचे सगळे देवाचे कार्यक्रम होण्यापुर्वी सकाळच्या सत्रात लोकांचच्या मनोरंजनासाठी सर्व यात्रांप्रमाणे तमाशा, धावण्याच्या स्पर्धा वगैरे कार्यक्रम असतात...पण या सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे बैलगाडी शर्यत............
प्रचि 11:--- धावाधाव चालू ---

प्रचि 12:- चुरस.......

प्रचि 13:- मिच जिंकणार.........

प्रचि 14:-.........

प्रचि 15:- जय मल्हार....

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 3:39 pm | मुक्त विहारि

लेख आणि प्रकाश-चित्रे एकदम भारी...

पण तुमच्या गावाचे नांव कळाले नाही...

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 3:54 pm | विशाल कुलकर्णी

गाव कुठले हेच विचारायला आलो होतो मी सुद्धा. असो, पण प्रचि खासच आलेत. विशेषतः ते सामुहिक नृत्याचे आणि बैलगाड्यांच्या शर्यतीचे प्रचि जबराच आलेत.

कपिलमुनी's picture

6 Jan 2015 - 3:44 pm | कपिलमुनी

जेवायला काय असते हो ?
पोळी की नळी ??

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 3:50 pm | मुक्त विहारि

"खंडोबा देवाच्या यात्रेला पहिल्या दिवस पुरण-पोळीचा नैवद्य असतो."

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 3:55 pm | विशाल कुलकर्णी

वाघ्या प्रचि07 मध्ये दिसतोय तो साखळदंड हाताने आडटून हिसका देऊन तोडतो..... तो किती क्रमांकाच्या कडीवर तुटतो त्यानुसार पुढील वर्ष कसे जाणार या बाबत अंदाज वर्तविण्यात येतात.>>>>

हे विंटरेस्टींग हाये. जरा स्पष्ट करणार का?

कंजूस's picture

6 Jan 2015 - 4:18 pm | कंजूस

बैलगाड्यांच्या शर्यती असल्यामुळे गावाचे नाव दिलेले नसावे.

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 5:00 pm | विशाल कुलकर्णी

खरंच की.., हे लक्षातच आले नाही ;)

रुस्तम's picture

6 Jan 2015 - 4:46 pm | रुस्तम

आवडलं …. सुंदर प्रकाश-चित्रे….

स्पंदना's picture

6 Jan 2015 - 5:21 pm | स्पंदना

भारी झाली की यात्रा!!

वेल्लाभट's picture

6 Jan 2015 - 5:55 pm | वेल्लाभट

खलास फोटो, वर्णन... अगदी तिथे असल्यासारखं वाटलं. सहीच. गाव कुठलं सांगा की !

खटपट्या's picture

7 Jan 2015 - 12:51 am | खटपट्या

खूप छान फोटो !!

वर्णनावरून हे सातार्‍याजवळचे " खंडोबाची पाली" गाव असावे.

जिन्क्स's picture

7 Jan 2015 - 4:06 pm | जिन्क्स

" शनिवारी सकाळी लवकर निघालो...मजल दर मजल करत आखेर रात्री सात पर्यंत गावी पोहचलो." ह्या वरुन गाव जवळचे नसावे.

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)

पदम's picture

7 Jan 2015 - 7:41 pm | पदम

वर्णानावरुन आणी फोटो वरुन सातारा वाट्तय.

मॅक's picture

7 Jan 2015 - 9:18 pm | मॅक

सर्वाना धन्यवाद......
जरा कामात होतो...त्यामुळे तुमच्या प्रश्नांना उत्तर लिहायला उशिर झाला....क्षमस्व...
गावाचे नाव:-करंजे ता.खानापूर जि.सांगली...
बाराही महिने जवळ-जवळ दुष्काळ असतो.....पण माणसांनी चिकाटीने थोडे फार हिरवळ निर्माण केली आहे.
त्यात-आत्ता उघड्या-बोडक्या पठारावर पवनचक्क्या फिरायला लागल्यात.....
बाकी निसर्ग सौंदर्य नावाच्या गोष्टीचा लवलेश सुध्दा नाही....

बैलगाडी शर्यतीचे म्हणाल तर.... मधल्या काळात बंदच होत्या....पण सरकारच्या निर्णयामुळे या वर्षी झाल्या..... पण बैलांना कोणी मारू नये म्हणून काळजी घेतली जाते......

कपिलमुनी's picture

8 Jan 2015 - 11:58 am | कपिलमुनी

विट्याजवळचा का ?

मॅक's picture

8 Jan 2015 - 1:13 pm | मॅक

आगदि बरो ब र

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 12:13 pm | टवाळ कार्टा

सगळे फोटो छानच आहेत पण...

जवळ-जवळ एक कोटी रूपये खर्च करून नवीन मंदीर बांधण्यात आले आहे,तसेच मंदीर परिसराच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.

हे वाक्य मनातून जात नाहिये...विषेशतः

बाराही महिने जवळ-जवळ दुष्काळ असतो.....पण माणसांनी चिकाटीने थोडे फार हिरवळ निर्माण केली आहे.
त्यात-आत्ता उघड्या-बोडक्या पठारावर पवनचक्क्या फिरायला लागल्यात.....
बाकी निसर्ग सौंदर्य नावाच्या गोष्टीचा लवलेश सुध्दा नाही....

यामुळे

कपिलमुनी's picture

9 Jan 2015 - 11:24 am | कपिलमुनी

एक कोटी रूपये खर्च करून गावामधल्या दुष्काळासाठी खूप काही करता आला असता , पण ती काम सरकारची !

येथून जवळच असलेल्या माझ्या बलवडी या गावी गावकर्‍यांनी स्वतः श्रमदान करून आणि लोकवर्गणीमधून खर्च करून बांधलेले बळीराजा धरण
या बद्दलचा लेख
लेख १

स्वधर्म's picture

9 Jan 2015 - 12:24 pm | स्वधर्म

बळीराजा धरणाची गोष्ट प्रेरणादायी. असं सकारात्मक काही वाचलं की दिवस चांगला जातो. लिंकबद्दल धन्यवाद.

- स्वधर्म

कपिलमुनीजी....खूप बर वाटल गावाकडचं कोणी तरी आहे...
तुमचं. मत अगदी बरोबर आहे. तुम्हाला जे वाटत ते मला ही पहिल्यांदा मंदीराचे बजट ऐकल्यावर वाटल.... पण आपण त्या गावचे आसून सुध्दा काही करू किंवा बोली शकत नाही.... कारण आपण फक्त यात्रा किंवा काही घरगुती कामासाठीच गावी जातो... आणि आवचे राजकारण तुम्हाला काही नविन नाही..... आपली इतकी पोहच म्हणा.....वय म्हणा.... नाही कि त्यांना काही सांगावे.... बाकी पश्चिम खानदेश..मानदेश लोकांची श्रध्दा तुम्हाला माहित आहेच..... असू द्या.... समजून जा.....

खानापूर तालूका हा गलाई व्यावसायासाठी प्रसिध्द आहे.... त्यामुळे गावातील 70 ट्क्के लोक या व्यवसायात संपूर्ण देशभरच काय..पण परदेशातही पसरलेले आहेत.... त्यामुळे त्यांच्याकडून स्थानिक पुढा-यांनी पैसे गोळा करून इतका निधी गोळा केला आहे...

पैसा's picture

7 Jan 2015 - 9:46 pm | पैसा

छान लिखाण आणि फोटो!

विट्याची रेणुका ,तासगावजवळचे कवठे एकंड ,पलूस ,औदुंबर , दहिवडी जवळ शिखरशिंगणापूर चे वर्णन टाका कधीतरी माघाच्या थंडीनिमित्त.

मॅक's picture

10 Jan 2015 - 3:28 pm | मॅक

नक्की प्रयत्न करीन....

छायाचित्रे आणि गावाचे वर्णन छान आहे.

द. महाराष्ट्रात भर शहरातही पूर्वी होणार्‍या बैलगाडीच्या शर्यतींमधे मेलेले बैल अनेकदा पाहिले आहेत. खिळे मारलेल्या फळकुटांनी त्यांना हाणायचे. तोंडाला नुसता फेसच नव्हे तर ते बैल खूप ब्रीथलेस झालेले दिसायचे.

बैलजोडीच्या गाड्यांचा शर्यतीही असायच्या.

त्यात एका बैलाचा पाय ठेचकाळला किंवा एक बैल दुसर्‍यापेक्षा कमी पडला तर दुसराही प्रचंड वेगापायी खेचला जाऊन एकमेकांत अडकून हाडे मोडल्याचे पाहिले आहे.

हार्टफेलने बैल मेलेला पाहिला आहे.

एका बैलाच्या अडखळण्याने दोन्ही बैल हिसकले जाऊन एकाचे शिंग दुसर्‍याच्या डोळ्यात घुसून डोळा नष्ट झालेला आणि दुसर्‍याचे शिंग पहिल्याच्या छातीत घुसून तो ठार झाल्याचंही पाहिलं आहे.

जिंकलेल्या बैलाची अवस्थाही दयनीय झालेली असताना त्याच्या गळ्यात पाचशेच्या नोटांची माळ घालून सत्कार करताना त्याचा चेहरा बघून जबरदस्त वाईट वाटलेलं आहे.

असो.

हो बरोबर...आम्ही लहान असताना असे प्रकार चालायचे..... मध्ये सर्व बंद होते... आत्ता काही अटीवर परवानगी मिळाल्यामुळे पुन्हा शर्यती चालू झाल्या... पण तसे प्रकार घडू नयेत तरूण मंडळी जागृत असते... मार्गावर ठिक-ठिकाणी कमिटी तर्फ लोक उभे असतात...

छान लिहिलंय.फोटोही सुरेख.