फोटोग्राफी कट्टा कम ट्रिप - २१ डिसेंबर २०१४

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in भटकंती
23 Dec 2014 - 11:47 pm

Previous Albums
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १ --> 09 May 2014
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग २ --> 10 April 2014
Winter Photography २०१४ - कवडी पाट - भाग १ --> 08 Dec 2014

                                                      फोटोग्राफी कट्टा कम ट्रिप - २१ डिसेंबर २०१४

***************************************भिगवण***************************************

      फोटोग्राफी कट्टा हा धागा १६ डिसेंबरलाच टाकला होता जेणेकरून सर्वांना ४-५ दिवस आधीच कळावे की रविवारी ही ट्रिप आहे. त्याप्रमाणे गुरूवारी अजित सावंत यांचा फोन आला की त्यांना वेळ आहे आणि ते येत आहेत. परंतू आम्ही दोघेच तयार होतो मग तिसरा मेंबर कोण हा प्रश्न मला पडला. परंतू 'कंजूस' यांनी सुद्धा येत आहोत असे कळवले. म्हणून मग मी चौ.रा. काकांना विचारले तर त्यांनी येतो म्हणून सांगितले परंतू 'बाईक' वरून असेल तर नाही जमणार कारण थंडी खुप आहे. कंजूस यांना ऐन वेळी रिझर्वेशन न मिळाल्यामुळे त्यांनी फोन करून कळवले की इच्छा असूनही मला यायला जमणार नाहीये. मग उरलो आम्ही तिघेच. मग अजित सावंत म्हणाले त्यांची चारचाकी घेऊन जायला काहीच हरकत नाही.

     रविवारी सकाळी साधारण ४.१५ ला चिंचवडवरून निघालो. चौ. रा. काकांना माझ्या गाडीची 'अ‍ॅलर्जी' (मागे बसण्याची) असल्याने त्यांच्याच गाडीवरून निघालो. सकाळी रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्याने आम्ही साधारण ४.४० वाजता कोथरुड ला बायपास मार्गे पोहोचलो. तिथून अजित सावंत यांच्या गाडीतून प्रवास सुरू झाला.

     भिगवणमधील एका मित्राला आधीच फोन करून आम्ही येणार असल्याची माहिती दिली. त्याने त्याच्या एका मित्राचा मोबाईल नंबर दिला जो Bird Guide आहे आणि तो Flemingo Birding Point चा मालक आहे. त्याच्याकडे दर शनिवारी-रविवारी खुप पक्षीमित्र बर्ड फोटोग्राफीसाठी बुकिंग करतात. त्याने भिगवण ला आल्यावर पुढे कसे यायचे याची माहिती दिली. भिगवण ला आल्यावर तेथून कुंभारगाव कडे जावे लागते. त्यासाठी भिगवण वरून सरळ पुढे जावे व चढ सुरू झाल्यावर थोड्या अंतरावर कुंभारगाव कडे जाण्याचा मार्ग आहे. जिथून आपल्याला बोटिंगची सोय उपलब्ध होऊ शकते.

    कुंभारगाव ला पोहोचल्यावर Kranti Flemingo Point चा मालक संदिप नगरे याने आम्हाला बोटीं निघण्याच्या वेळेची माहिती दिली. या Point वर सकाळी पोहोचल्यावर चहा व नाष्ट्याची सोय उपलब्ध आहे. तसेच जेवणाची (फक्त ६० रू. मध्ये) सोयही आहे परंतू तसे आधी सांगावे लागते. मिपाकरांसाठी सुचना चहा व नाष्टा ठीक आहे. परंतू जेवण हे केवळ उदर-भरणासाठीचे आहे. ज्यांना चवीने खायची सवय आहे त्यांनी शक्यतो बाहेरच जेवण करावे.

    पोहोचल्यावर आम्ही चहा घेतला व पोहे वगैरे बोटिंगवरून आल्यावर खायचे असे ठरले.

फोटो क्र. १ - चहा with अजित काका
Tea

    चहा घेतल्यावर लगेच बोटी लागण्याच्या जागेकडे निघालो जेणेकरून गर्दी वाढायच्या आतच आम्हाला जास्त फोटो मिळतील.

फोटो क्र. २ - फोटोग्राफीला निघायची तयारी
Start

    अंदाजाप्रमाणे बोटी लागण्याच्या ठिकाणीच आम्हाला खुप पक्षी पहावयास मिळाले.येथे खुप प्रकारचे बगळे, बदके, लहान-मोठे पक्षी पहावयास मिळाले.

फोटो क्र. ३ - Little Egret किंवा पिसारी बगळा
Little Egret
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/320
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४ - Black-winged Stilt किंवा शेकाट्या
Black-winged Stilt
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/400
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. ५ - Black-winged Stilt किंवा शेकाट्या
Black-winged Stilt
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/400
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. ६ - White-throated Kingfisher किंवा खंड्या
White Thoratted KingFisher
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/800
ISO - ISO-800
Camera Mode - Manual

फोटो क्र. ७ - White-throated Kingfisher किंवा खंड्या
White Thoratted KingFisher
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/800
ISO - ISO-800
Camera Mode - Manual

    त्यानंतर आम्ही बोटीमध्ये बसून फ्लेमिंगो पाहण्यासाठी निघालो. मी, चौ. रा. काका आणि अजित काका आम्ही तिघे आणि आमच्यासोबत एक ५ जणांचे कुटूंब असे आम्ही ८ जण बोटीत होतो. आमच्यासोबत 'बाळू' नावाचा गाईड व बोट चालवणारा मुलगा आला होता. फक्त १०० रु. मध्ये बोटिंग आणि तेही १ - १.३० तास.

फोटो क्र. ८ - बोटिंगची सुरूवात
Start
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1250
ISO - ISO-200
Camera Mode - Manual

फोटो क्र. ९ - संथ भीमा नदी
Bhima River
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1250
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

    किनार्‍यापासून थोडे लांब आल्यावर आमचा थोडा हिरमोड झाला कारण म्हणावे तेव्हडे पक्षी दिसत नव्हते आणि फ्लेमिंगो देखील खुप लांब होते. फोटोग्राफी शिकताना मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे फोटोग्राफीसाठी तुमच्याकडे भरपूर "Patience" असले पाहिजेत. कारण कधी-कधी एक फोटो मिळवण्यासाठी २-३ तास सुद्धा घालवावे लागतात. असो, थोड्या वेळाने आम्हाला दुरवर फ्लेमिंगो दिसले. परंतू तिथवर पोहोचेपर्यंत खुप वेळ लागणार एव्हडे नक्की होते.

    तोपर्यंत आम्ही सभोवताली दिसणार्‍या पक्ष्यांचे फोटो काढणे सुरूच ठेवले होते.

फोटो क्र. १० - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ११ - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. १२ - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. १३ - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1000
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    आमच्या गाईड कम बोट चालवणार्‍याची खरच कमाल म्हणावी लागेल की त्याने न दमता आम्हाला ऐव्हड्या लांब आणले. थोड्या वेळाने आम्हाला फ्लेमिंगो दिसायला लागले. परंतू ते उडून जावू नयेत यासाठी आम्ही थोडे लांबच राहणे पसंत केले.

फोटो क्र. १४ - Greater Flamingo किंवा रोहित
Greater Flamingo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-125
Camera Mode - Manual

फोटो क्र. १५ - Greater Flamingo किंवा रोहित
Greater Flamingo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-125
Camera Mode - Manual

फोटो क्र. १६ - Greater Flamingo किंवा रोहित
Greater Flamingo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. १७ - Greater Flamingo किंवा रोहित
Greater Flamingo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. १८ - Greater Flamingo किंवा रोहित
Greater Flamingo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/640
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. १९ - Greater Flamingo किंवा रोहित
Greater Flamingo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1250
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

    सर्वजण फोटो काढण्यामध्ये मग्न होते. आम्हाला इथवर यायलाच साधारण एक तास लागला होता. म्हणजे आमचे बोटिंग साधारण २-२.३० तासाचे होणार एव्हडे नक्की होते. मला अपेक्षित एव्हड्या अंतरावरून फ्लेमिंगोंचे फोटो मिळाले नाहीत. कारण आम्ही बर्‍यापैकी लांब असल्याने ते कॅमेराच्या फोकस मध्ये नीट येत नव्हते. शेवटी मी एक व्हिडियोच काढण्याचा प्रयत्न केला.

व्हिडियो क्र. १ - Greater Flamingo किंवा रोहित

    साधारण ३००-३५० फोटो काढून झाले होते. आम्ही साधारण ७.३० वाजता बोटिंगला सुरुवात केली होती. साधारण ९.०० वाजता आम्ही परत किनार्‍याकडे निघालो. येताना देखील तेथे झाडांवर तसेच पाण्यात असणार्‍या बगळ्यांचे फोटो घेतले. आकाशातून उडत जाणारे पक्षी यांचेही फोटो घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हड्यात दोन बगळे आकाशातून आमच्यासमोर कमी उंचीवरून उडत आले त्यांचे फोटो.

फोटो क्र. २० - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. २१ - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1200
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    साधारण १० वाजता आम्ही किनार्‍यावर पोहोचलो. पोहोचल्यावर किनार्‍यावरील पक्ष्यांचे पुन्हा एकदा फोटो काढले.

फोटो क्र. २२ - Indian Pond Heron किंवा भुरा बगळा
Indian Pond Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/800
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. २३ - Black-winged Stilt किंवा शेकाट्या
Black-winged Stilt
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/800
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. २४ - White-throated Kingfisher किंवा खंड्या
White Thoratted KingFisher
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/160
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. २५ - Grey Heron किंवा राखी बगळा
Grey Heron
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    सुट्टी असल्यामूळे हौशी फोटोग्राफर तसेच खुप लोक कुटूंबासोबत फिरायला आले होते त्यामूळे गर्दी वाढायला लागली होती. आम्हालाही पुढे भुलेश्वर व रामदर्‍याला ला जायचे असल्यामूळे थोडे पोहे खावून आम्ही भुलेश्वर ला निघालो.

पोहे -
Pohe

    भिगवण गावात आल्यावर गावाबाहेरीला एका छोट्या हॉटेलमध्ये चहा घेतला तो खुपच अप्रतिम होता. चहासोबत अजित काकांनी खास बनवून आणलेली कचोरी खाल्ली. लगेच भुलेश्वर ला निघालो.

***************************************भुलेश्वर***************************************

    भुलेश्वर ला जाण्यासाठी 'यवत' गावापासून एक फाटा आहे जिथून भुलेश्वर साधारण ७ ते ८ किमी. आहे. भुलेश्वर ला पोहोचल्यावर आम्हाला सर्वात आधी 'वल्लींची' आठवण झाली. वल्ली असते तर आम्हाला भुलेश्वर ची छान माहिती ऐकायला मिळाली असती. मंदिरात पोहोचल्यावर फोटो घेणे सुरू केले. फोटोंवरून वल्ली काही माहिती देतील अशी आशा आहे. मंदिरात पोहोचल्यावर अजित काका व चौ. रा. काकांचा फोटो.

फोटो क्र. २६ - अजित सावंत व चौकटराजे
Group

    मंदिरातील फोटो काढत असताना एक एक गोष्ट जाणवली ती म्हणजे अंधार्‍या भागातील फोटो उदा. मंदिरातील शिलालेखांचे, प्रतिमांचे, अथवा कोणत्याही कोरिव कामाचे फोटो काढताना फ्लॅश चा वापर करणे म्हणजे फोटोची दशाच बिघडवणे आहे. चौ. रा. काकांनी Long-Exposure वर फोटो काढण्याचा सल्ला दिला. तो ऐकून मी प्रयत्न केला तेव्हाही एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे Long-Exposure वर फोटो काढताना ट्रायपॉड चा वापर केलाच पाहिजे अन्यथा फोटो मनासारखा येत नाही कारण आपला हात Shake होतो जरी कॅमेरा कितीही Steady पकडला तरीही. त्यामूळे मंदिरातील फोटोग्राफी करताना मला दोन धडे मिळाले.
१. फ्लॅश चा वापर न करणे ज्याने Details मार खातात
२. Long-Exposure साठी ट्रायपॉड चा वापर करणे.

   भुलेश्वर मधील फोटो खाली टाकत आहे. फारशी माहिती नसल्याने जेव्हा माहिती मिळेल तेव्हा ती ADD करेन.

फोटो क्र. २७ - भुलेश्वर चे मंदीर
Bhuleshwar Temple
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. २८ - घंटा
Temple Bell
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. २९ - प्रवेशद्वार
Door
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३० - प्रवेशद्वार व आतील भाग
Door
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/15
ISO - ISO-1600
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३१ - खांब
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३२ - शरशय्येवरील भीष्म ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
    खाली कृष्णार्जुन आणि इतर पांडव दिसताहेत. भुलेश्वरच्या महाभारत पटांवरील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे कृष्ण हा त्याच्या विष्णू फॉर्म मध्ये दाखवला आहे. चतुर्भुज - शंख, चक्र, गदा, पद्म अशा परीवेषात. अगदी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतानाही तो विष्णू स्वरूपातच दाखवलाय.
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३३ - भीष्मवध ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
    अर्जुनाचा वानरध्वज, सारथी कृष्ण, त्याच्या पुढे उभे राहिलेला शिखंडी आणि समोर भीष्म त्याच्या मकरध्वज रथासह.
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३४ - नंदी
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/4
ISO - ISO-1600
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३५ - दगडातील कोरिवकाम
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३६ - दगडातील कोरिवकाम
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३७ - दगडातील कोरिवकाम
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३८ - रामायण पट ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
    मधल्या भागातील धर्नुधारी व्यक्ती म्हणजे राम लक्ष्मण. उजव्या बाजूच्या खालच्या कोपर्‍यात यज्ञपुरुषाने दशरथाला दिलेले पायसदान आणि सीतेची सुयोग्य पती मिळण्यासाठीची शिवप्रार्थना. त्याचे वरचे बाजूस धनुर्भंग आणि आणि हातात वरमाला धारण केलेली सीता त्याचे पुढे उंट विवाहा झाला म्हणून दवंडी पिटत आहेत.
    डाव्या बाजूचे वरचे कोपर्‍यात बहुधा चित्रकूट पर्वतावर ऋषी मुनींसह मग्न असलेले राम लक्ष्मण व त्याचे खालचे बाजूस किष्किंधेतील प्रसंग, वानरांसह.
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ३९ - दगडातील कोरिवकाम
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४० - वैष्णवी ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/6
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४१ - दर्पणा ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-6400
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४२ - दर्पणा ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-6400
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४३ - दगडातील कोरिवकाम
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-6400
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४४ - सरस्वती ( माहिती - वल्ली यांच्याकडून साभार )
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/125
ISO - ISO-6400
Camera Mode - Manual

   तिथे असलेल्या एका दरवाजातून बाहेरील नजारा फार छान दिसत होता. मी चौ. रा. काकांना पोझ घ्यायला लावली आणि हा फक्त Outline असलेला फोटो काढला.

फोटो क्र. ४५ - चौकटराजे
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-200
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४६ - नंदी
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४७ - नंदी
.
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. ४८ - भुलेश्वर वरून घराकडे प्रयाण
Return Journey

    जर कोणास भिगवण ला जायचे असल्यास कसे जावे याची सुधारित आवृत्ती खाली देत आहे. तसेच आम्ही ज्या Point ला गेलो होतो तेथील पत्ता व संदिप नगरे यांचा मोबाईल नंबर देत आहे.

प्रवासाचा मॅप (सुधारित) -

मॅप लवकरच टाकीन.!!!

फ्लेमिंगो बर्डिंग पॉइंट -
    या ठिकाणी जाण्यासाठी भिगवण वरून सरळ पुढे सोलापूर हायवेवर जावे साधारण ७-८ किमी. नंतर एक चढ लागतो. चढ संपतानाच डाव्या बाजूला कुंभारगावकडे असा बोर्ड आहे. तिथेच वळावे. आत गेल्यावर पहिला Right Turn घ्यावा. नंतर साधारण १.५० किमी. तिथून डावीकडे वळावे. साधारण ३ किमी पुढे गेल्यावर उजवीकडे वळावे. तुम्हाला शक्यतो वाटेतच संदिप चा भाऊ वगैरे भेटेल. जर त्यापुर्वी कोणी विचारले तर संदीपकडे जायचेय असे सांगावे. तिथे २-३ पॉईंट असल्याने शक्यतो Flamingo Birding Point वरच जावे. काही अडचण असल्यास संदिप नगरे ला खालील नंबरवर विचारावे.

संदिप नगरे - ९९६० ६१० ६१५

आभार -
१. अजित काकांचे व त्यांच्यासोबत आलेल्या ताकवले काकांचे आभार. अजित काकांनी गाडी आणल्यामुळे एव्हड्या लांब जाणे सहज शक्य झाले आणि ताकवले काकांनी ११६ किमी अंतर अगदी कमी वेळात (१ - १.३० तास) पार केल्यामुळे आम्ही सुर्योदयापुर्वीच भिगवणला पोहोचलो.
२. संदीप नगरे व आमच्या सोबत आलेल्या 'बाळू' गाईडचे आभार. आधी दिसलेले फ्लेमिंगो उडून गेल्यामूळे बाळूने बोटिंगचा अवधी १ - १.३० तास असूनही साधारण अजून पुढे नेऊन आम्हाला फ्लेमिंगो दाखवले त्यात अवधी जवळपास २.३० झाला तरीही केवळ आमच्या आनंदासाठी त्या मुलाने बोटिंगचा कालावधी वाढवून आम्हाला फ्लेमिंगो दर्शन घडवले आणि वेळोवेळी आम्ही जिथे सांगू तिथे बोट थांबवून आम्हाला फोटो घेण्यास मदत केली त्या बद्दल त्या दोघांचेही आभार.

    पुढील भिगवण ट्रिप लवकरच होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीमध्येही २-३ ट्रिप्स आहेत. शक्यतो तसा धागा आधीच टाकेन म्हणजे ज्यांना खरोखर फिरायची व फोटोग्राफीची आवड आहे अश्यांना प्लॅन करणे सोपे होईल.

...समाप्त...

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 12:08 am | मुक्त विहारि

आमची ट्रिप हुकली...

पण खंत वगैरे अजिबात वाटली नाही.कारण व्रुत्तांताने ती कसर भरून काढली.

पुढच्या ट्रिप्स पण हुकणार, असो.

कालाय तस्मै नमः.

हुकुमीएक्का's picture

25 Dec 2014 - 12:18 am | हुकुमीएक्का

जानेवारीमधील ट्रिप्स हुकल्या तरी फेब्रुवारीमध्ये होणार्‍या ट्रिप्सच्या वेळी भेटूच. तेव्हा एखादी One Night Stay असणारी ट्रिप काढू. बर्‍याच महिन्यांमध्ये Night Stay ट्रिप नाही काढलीय. *smile

मुक्त विहारि's picture

25 Dec 2014 - 7:18 am | मुक्त विहारि

नक्कीच प्रयत्न करू या...

अजया's picture

24 Dec 2014 - 9:00 am | अजया

सुरेख फोटो!
भुलेश्वरला एक दर्पणा बै राहातात.त्या नाही दिसल्या.चिंचवडला गेल्या असतील का? ^_~

प्रचेतस's picture

24 Dec 2014 - 10:21 am | प्रचेतस

त्यांना नसल्या दिसतील त्या. :)

छान. मीपण बघतो कधी जमते ते.ग्रे हेरॉन मस्त.

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:28 am | टवाळ कार्टा

अय्या शेकट्या कित्ती क्युट आह्हे नै ;)

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:29 am | टवाळ कार्टा

राखी बगळा पुणे-३० इथला आहे का? ;)

एस's picture

24 Dec 2014 - 10:07 am | एस

चेंडू सोडून देत आहे. उगाच चांगल्या धाग्यावरची चर्चा भरकटायची. :-)

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:30 am | टवाळ कार्टा

खंड्या ८० च्या दशकातला टिपिकल हिंदी पिच्चरचा व्हिलन वाटतोय

खटपट्या's picture

24 Dec 2014 - 9:39 am | खटपट्या

जबरदस्त फोटो !! फ्लेमींगो तर अप्रतीम !!

आयुर्हित's picture

24 Dec 2014 - 9:48 am | आयुर्हित

सुंदर आलेत फोटो!
त्यात फोटो क्र. २१ - Grey Heron किंवा राखी बगळाची छोटी मान करून उडतांना व
फोटो क्र. ४५ - चौकटराजे : चौराकाकांच्या छायेचा(भुलेश्वर येथील)तर उत्तम आला!

प्रचेतस's picture

24 Dec 2014 - 10:19 am | प्रचेतस

जबरदस्त झालाय दौरा. छान लिहिलंय. फोटोही मस्त.
मनापासून हुरहुर वाटतीय ही भटकंती हुकल्याची. मला स्वतःला पक्षीनिरिक्षणात फारसा रस नाही पण चौराकाका, अजितकाका आणि हुकूबरोबर गप्पा मारायचा योग हुकलाच. त्यात भुलेश्वरला तुम्ही जाऊन आल्याने प्रचंड जळजळ झाली.

भुलेश्वरचे काही फोटोंची माहिती.

फोटो क्र. ३२- शरशय्येवरील भीष्म.
खाली कृष्णार्जुन आणि इतर पांडव दिसताहेत. भुलेश्वरच्या महाभारत पटांवरील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे कृष्ण हा त्याच्या विष्णू फॉर्म मध्ये दाखवला आहे. चतुर्भुज - शंख, चक्र, गदा, पद्म अशा परीवेषात. अगदी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतानाही तो विष्णू स्वरूपातच दाखवलाय.

फोटो क्र. ३३. भीष्मवध.
अर्जुनाचा वानरध्वज, सारथी कृष्ण, त्याच्या पुढे उभे राहिलेला शिखंडी आणि समोर भीष्म त्याच्या मकरध्वज रथासह.

फोटो क्र. ३८

रामायण पट
मधल्या भागातील धर्नुधारी व्यक्ती म्हणजे राम लक्ष्मण.
उजव्या बाजूच्या खालच्या कोपर्‍यात यज्ञपुरुषाने दशरथाला दिलेले पायसदान आणि सीतेची सुयोग्य पती मिळण्यासाठीची शिवप्रार्थना. त्याचे वरचे बाजूस धनुर्भंग आणि आणि हातात वरमाला धारण केलेली सीता त्याचे पुढे उंट विवाहा झाला म्हणून दवंडी पिटत आहेत.
डाव्या बाजूचे वरचे कोपर्‍यात बहुधा चित्रकूट पर्वतावर ऋषी मुनींसह मग्न असलेले राम लक्ष्मण.
व त्याचे खालचे बाजूस किष्किंधेतील प्रसंग, वानरांसह.

फोटो क्र. ४० - वैष्णवी

फोटो क्र. ४१ - दर्पणा

फोटो क्र. ४४ - सरस्वती

हुकुमीएक्का's picture

25 Dec 2014 - 12:21 am | हुकुमीएक्का

माहितीबद्दल आभारी आहे. भुलेश्वर ला पोहोचल्यावर प्रत्येक ठिकाणी आपली आठवण झाली. मुर्ती समोर असूनही माहिती नसल्याने आम्ही कोर्‍या मनाने त्या मुर्तींकडे पहात होतो. आता त्यांची नावे व माहिती कळल्याने ट्रिपला पुर्णत्व आले. म्हणूनच माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. *smile*

रुस्तम's picture

24 Dec 2014 - 10:26 am | रुस्तम

सुंदर आलेत फोटो!

एस's picture

24 Dec 2014 - 10:27 am | एस

काही छायाचित्रे छान आली आहेत. आपण ज्या कॅमेर्‍याने (Canon PowerShot SX50) शूट करताय त्याच्या छोट्या संवेदकाच्या मर्यादांच्या तुलनेत फोटो चांगलेच आहेत.

एकदोन टिप्सः
१. जेव्हा आपल्याकडे एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्स इ. नसेल तेव्हा पक्ष्यांसारख्या विषयवस्तूंचे क्लोजअप घेतले पाहिजेत असे काही नाही. त्यापेक्षा त्या पक्ष्यांच्या हॅबिटॅटचाही (अधिवास) समावेश चित्रचौकटीत करता आला तर उत्तम.

ही प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी घेतलेली प्रतिमा पहा:

FlamingosBySudhirShivaram

*Copyright by Sudhir Shivaram.

२. फोकसिंग (संकेंद्रीकरण) हे पक्ष्यांच्या डोळ्यांवर व्हायला हवे.
३. पक्ष्यांच्या डोळ्यांत प्रकाशाची चमक दिसली की त्यांचे फोटो जिवंत आणि त्रिमितीय वाटतात.
४. कॅमेरा जास्तीतजास्त पाण्याच्या जवळ धरावा (म्हणजे क्षितिजसमांतर). त्याने बॅकग्राउंड ब्लर जास्त मिळेल, शिवाय योग्य कॉम्पोझिशनही साधता येईल.
५. पेशन्स इज द की. जास्त फोटो काढण्यापेक्षा एकदोनच, पण लाजवाब फोटो असतील असा प्रयत्न करावा. त्यासाठी बराच संयम आणि एकाच जागी तासनतास न हलता बसण्याची क्षमता हवी.
६. बेस्ट वे टू वॉच बर्ड्स इज टू इग्नॉर देम! तरच ते पण आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि चांगली 'फ्रेम' मिळू शकते.
७. प्रकाश हा पक्ष्याच्या समोरून किंवा थोडा बाजूने आला तर उत्तम. आपली बोट अशा पद्धतीने थांबवायला लावावी.
८. बोटीत जास्त माणसे नसावीत. बोट त्यांच्या हालचालीने हलू शकते. शिवाय कॅमेर्‍याच्या पोझिशनिंगसाठी नीट जागा मिळत नाही. थोडे पैसे जास्त गेले तरी बोट आपल्यापुरती ठरवून न्यावी. नक्कीच फायदा होईल.

जास्त झाल्या का? थांबतो! :-P

चला, शुभेच्छा!

चौकटराजा's picture

24 Dec 2014 - 11:27 am | चौकटराजा

आपण दिलेला हा फटू पाहिल्याने प्रचंड न्यूनगंड मनात निर्माण झाला आहे. पुनर्जन्माशिवाय असा फोटो माझ्याकडून येणे नाही . बाकी आपल्या सूचना एकदम सही. संख्यपेक्षा गुणवत्ता महत्वाचीच . हुकमीएक्का बहुतेक किमान ५५ /२०० असे काही लेन्स असलेला एसेलार घेणार हे सर्व वाचून.
हलीत मजा आली. दमणूक झाली नाही. पक्षी मात्र मर्यादितच पहायला मिळाले. सावंतांच्या फोर व्हीलरने वेळेत पोहोचलो.

एस's picture

24 Dec 2014 - 12:31 pm | एस

त्यात काय? काढलेला फोटो नाही आवडला की लगेच पुनर्जन्म घ्यायचा, त्यातही नाही जमले की पुन्हा एक जन्म, एक कलाकार म्हणून आपण क्षणोक्षणी इतके नवीन जगतो की एकेका दिवसात असे कित्येक जन्म जगून होतात. काय म्हणता? ;-)

५५-२०० सारख्या किट लेन्सेस वापरून अशा प्रकारचे फोटो येणे थोडे अवघड आहे. त्या 'स्लो' लेन्सेस आहेत. f/2.8 किंवा f/4 इतके फास्ट अ‍ॅपर्चर असणार्‍या व किमान 600mm ते 800mm नाभीय अंतर असणार्‍या प्राइम लेन्सेस अत्यावश्यक. त्यानेही भागत नाही. मध्ये 1.4 नाहीतर 1.7 TC वापरावा लागतो. आणि गिम्बल हेड असणारा दणकट ट्रायपॉडपण.

कारण हा फोटो अतिशय कमी प्रकाशात, सूर्याच्या पहिल्या-वहिल्या किरणांनी भरतपूरच्या तळ्यातील पाण्याचं चुंबन घेतलं-न घेतलं तेव्हा काढलेला आहे. त्यामुळे रोहित तेवढे प्रकाशात न्हाऊन निघालेत आणि बाकीचे सराउंडिंग गडद, आळसावलेले असे दिसतेय. अशा आव्हानात्मक प्रकाशात इतक्या दुरूनही संकेंद्रीकरण करू शकणार्‍या लेन्सेस म्हणजे वर सांगितलेल्या प्राइम्स्. आणि कॅमेरा हाय आयएसओला हाय न खाणारा हवा.

पण सुरूवात करायला काय हरकत आहे? कॅननच्या 50x ने तर 50X ने. आधी त्यानेही चांगले फोटो काढता येतात हा आत्मविश्वास आला की मग वरचे उड्डाण मारायचे. :-) स्वतःला चॅलेंज करत रहायचं.

@स्वॅप्स - सध्या Canon SX50 HS च्या शक्य तेव्हड्या सर्व Features चा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतोच आहे. परंतू SLR मधील फोटोग्राफीला जी Quality आहे ती पाहून नजीकच्या काळात SLR वर Divert होणार हे मात्र नक्की. SLR Camera आणि Lenses घेताना आपले मत नक्कीच घेईन. कारण मला SLR च्या Lenses ची फारशी माहिती नाहीये. त्यामूळे Camera घेताना तसेच Lenses ची निवड करताना आपला सल्ला नक्कीच घेईन.

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 10:42 pm | हुकुमीएक्का

चौ. रा. काका म्हणाले ते अगदी बरोबर आहे. आताच मला काही फोटो काढताना माझ्या कॅमेराच्या Limitations जाणवायला लागल्या आहेत. आणि मी SLR घेणार यात वादच नाही. परंतू त्याला लागणार्‍या Lenses आणि Converters यांचा खर्च याचा विचार करूनच घेणार. जेणेकरून घेतल्यावर परत Point n Shoot घ्यायला लागला नाही पाहिजे.

@ स्वॅप्स - आपण खुपच मोलाच्या टिप्स दिल्या आहेत. Patience तर वाढवतोयच पण आता लांब असलेल्या Objects चे फोटो काढताना आपण सांगितलेल्या टिप्स चा खुप उपयोग होईल. कंपोझिशनही खुप सुधारायचे आहेच मला त्यामुळे Parallel To Sky या गोष्टीचा वापर नक्कीच करेन. आमच्या बोटीत ८ माणसे होती. २ मुले सुद्धा होती त्यामूळे बोट हलण्याचे प्रमाणही जास्त होते. आपल्या सर्व टिप्स अत्यंत उपयोगी ठरतील पुढील फोटोग्राफीमध्ये एव्हडे नक्की.

नं ६ची टिप स्वॉप्स बरोब्बर.कैमरावाल्याला एक, ,मोबाइलने फोटो काढणाऱ्याला दोन, कैमरा नसल्यास तीन, सुरसुंदरींचे सौष्टव आणि अदा समजली नसल्यास चार पुनजन्म घ्यावे लागणार.

एस's picture

24 Dec 2014 - 1:07 pm | एस

*ROFL*

त्रिवेणी's picture

24 Dec 2014 - 2:28 pm | त्रिवेणी

मस्त फोटो.
आम्ही 2 आठवड्यापुर्वी गेलो होतो भिगवणलाच संदीप नगरे यांच्याचकडे. आम्ही मुक्कामालाच गेलो होतो, संध्याकाळी आणि दुसर्याम दिवशी भल्या पहाटे गेलो होतो फ्लेमिंगो बघायला. संध्याकाळी सकाळपेक्षा जास्त पक्षी आणि फ्लेमिंगो पाहायला मिळाले होते. आणि त्या दिवशी गुरुपोर्णिमा असल्याने रात्री त्यांच्या गच्चीत बसल्यावर भीमा नदीचे पात्र मस्तच दिसत होते.
तुम्ही सांगितल्याप्रमाणेच फ्लेमिंगो दाखवल्याशिवाय ते हार मनात नाही.
ऐनवेळी कॅमेराने दगा दिला आणि मोबाइल मध्येच फोटो घ्यावे लागले.
जाता जाता- कॅमेरा कोणता घ्यावा असा काही धागा आहे का आपल्याकडे. मी शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडला.

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 3:47 pm | हुकुमीएक्का

माझ्या पाहण्यात नाही आलाय अजुन.

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 4:04 pm | हुकुमीएक्का

नवीन माहिती बद्दल धन्यवाद. पुढील ट्रिप करताना संध्याकाळी थांबायचा प्लॅन करावा लागेल. आपल्या ट्रिपचे फ़ोटो असतील तर जरूर अपलोड करा.

त्रिवेणी's picture

24 Dec 2014 - 4:40 pm | त्रिवेणी

माझ्याकड्चे फोटो मोबाइल ने काढले असल्याने फारच सुमार आले आहेत. तरी त्यातल्या त्यात जरा बरे फोटो टाकेन.
अजून एक- हा जो बोर्ड चा फोटो दिला आहे ते क्रांती वेगळे आहे. मी टाकेन संदीप नगरे च्या बोर्डचा फोटो.आम्ही चिलापी खाल्ला होता त्यांच्याकडे. फ्राय मस्त केला होता.

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 4:50 pm | हुकुमीएक्का

अनावधानाने हा फ़ोटो टाकलाय. संदीप च्या पॉइंट चे नाव FLAMINGO BIRDING POINT आहे. परंतू त्या बोर्ड चा फ़ोटो नाहिये म्हणून कुठे वळायचे या सदराखाली हा फ़ोटो टाकला. तुमच्याकडे असलेला फ़ोटो जरूर टाका म्हणजे योग्य तो फ़ोटो अपलोड करता येईल.

नांदेडीअन's picture

24 Dec 2014 - 4:08 pm | नांदेडीअन
नांदेडीअन's picture

24 Dec 2014 - 4:10 pm | नांदेडीअन

हा २०१४ चा एक धागा आहे.
पण मला याचा ऍक्सेस नाहीये.
http://www.misalpav.com/node/27410

त्रिवेणी's picture

24 Dec 2014 - 4:47 pm | त्रिवेणी

धन्यवाद धागा शोधून दिलात.
वाचलं मी बरचसे पण जास्तच कन्फ्युज झाले. माझे ही बजेट जास्त नाही. माहीतगार व्यक्तींना इथेच विनंती करते की आमच्या सारख्या सामान्य जणांसाठी कॅमेराचा धागा काढावा प्लीज.

मी लवकरच या विषयावर सुधारित धागा टाकणार आहे. कारण खुप कॅमेरा SPECIFICATIONS पाहूनच मी कॅमेरा विकत घेतला आणि खुप अश्या गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ज्या TECHNICAL असतात...

सूड's picture

24 Dec 2014 - 4:44 pm | सूड

लवकर लिही रे हुक्का!!

सविता००१'s picture

24 Dec 2014 - 3:32 pm | सविता००१

मस्तच आहेत सगळे फोटो.
काय सुरेख पक्षी आहेत एकेक

नांदेडीअन's picture

24 Dec 2014 - 4:03 pm | नांदेडीअन

फोटो छान आहेत.
स्वॅप्स यांनी मोलाच्या टिप्स दिल्या आहेत.
त्यात एकाच गोष्टीची भर टाकावीशी वाटते.

पक्ष्यांच्या बर्‍याच फोटो अंडरएक्स्पोज्ड्‌ दिसत आहेत.

जेव्हा धुके पडले असेल, तेव्हा एक्स्पोजर १ किंवा २ ने वाढवून प्रयत्न करत जा.
Fog always fools the exposure meter.

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 10:53 pm | हुकुमीएक्का

अगदी खरं. परंतू Exposure जास्त झाले की Details मार खातात. Exposure कमी असेल तर नंतर वाढवता येते Editing करून परंतू Over-expose फोटोचे Exposure कमी नाही करता येत. तरीही पुढील वेळेस नक्की प्रयत्न करून पाहीन. धुकं पडल्यावर exposure meter फसणे हे नेहमीचेच आहे.

नांदेडीअन's picture

24 Dec 2014 - 11:33 pm | नांदेडीअन

तुम्ही म्हणताय ते नेहमीच्या वातावरणात लागू पडते.
धुके असतांना जर एक्स्पोजर वाढवले, तर प्रत्यक्षातफोटो ओव्हरएक्स्पोज्ड येत नाही.
एकदा प्रयत्न करून बघा.

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 11:38 pm | हुकुमीएक्का

हे नव्हते माहीत. पुढील फोटोग्राफीमध्ये नक्की वापरून पाहीन.

उमा @ मिपा's picture

24 Dec 2014 - 4:28 pm | उमा @ मिपा

एकापेक्षा एक सरस फोटो!

पैसा's picture

24 Dec 2014 - 10:56 pm | पैसा

सगळेच फोटो आणि व्हिडिओ आवडले.

त्या दर्पणसुंदरीला "दगडातले कोरीवकाम" खाती जमा करून मा. वल्ली यांच्या काळजाला किती घरे पाडली असतील याची काही कल्पना आहे का?

हुकुमीएक्का's picture

24 Dec 2014 - 11:40 pm | हुकुमीएक्का

कुठला फोटो कशाचा आहे हेच माहीत नव्हते. म्हणून निदान कोरीवकाम आहे असे शीर्षक टाकले होते. आता एकेक फोटोचे नाव अपडेट करायला घेतलेय.

नांदेडीअन's picture

24 Dec 2014 - 11:33 pm | नांदेडीअन

तुम्ही म्हणताय ते नेहमीच्या वातावरणात लागू पडते.
धुके असतांना जर एक्स्पोजर वाढवले, तर प्रत्यक्षातफोटो ओव्हरएक्स्पोज्ड येत नाही.
एकदा प्रयत्न करून बघा.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2014 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा

छान फोटों ची,रम्य सफ़र! *GOOD*

कंजूस's picture

25 Dec 2014 - 7:49 am | कंजूस

@त्रिवेणी/कोणता कैमरा ?
याविषयी मीही काही टिप्स देऊ शकतो.

कोणता CAMERA घेऊ मी हाती ?२०१५

तुम्ही/संपादक यांनी हा धागाच काढावा. सर्वजण त्यात भर घालतील आणि दरवर्षी अपडेट केला की कायमचा एक संदर्भ धागा तयार होईल.

सर्वसाक्षी's picture

25 Dec 2014 - 4:07 pm | सर्वसाक्षी

वृत्तांत आणि फोटो दोन्ही मस्त

अनुप कोहळे's picture

21 Jan 2015 - 6:41 pm | अनुप कोहळे

फोटो खुप छान आले आहेत. वृत्तांत फारच सुरेख.
जानेवारीची ट्रिप कधी निघणार? मला यायला नक्की आवडेल.