Winter Photography २०१४ - कवडी पाट - भाग १

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in मिपा कलादालन
12 Dec 2014 - 12:36 am

Previous Albums
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग २

                                                           कवडी पाट फोटोग्राफी - भाग १

दिनांक - ०८ डिसेंबर २०१४

स्थळ - कवडी पाट ( लोणी-काळभोर टोल नाक्याजवळ, पुणे )

अंतर - चिंचवडवरून येरवडा-मार्गे किमान ३२ किमी.

जवळची खुण - पुण्याकडून जाताना सोलापूर हायवेवर हडपसर पासून पुढे जावे. लोणी काळभोर टोलनाक्यानंतर डाव्या बाजूला 'मनाली' रिसॉर्ट लागते. तिथेच कवडी पाट असा बोर्ड आहे. १.५ किमी आत जावे लागते.

सुचना - 'कवडी पाट' ला पाटाच्या शेजारी दलदल आहे जरी जमीन दिसत असली तरी माती खुप मऊ आहे.तेव्हा पाण्याशेजारी फिरताना जरा जपून!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार मिपाकरांनो,
       बर्‍याच दिवसांनी धागा टाकतोय. नांदेडीअन यांनी यापुर्वी टाकलेल्या धाग्यामूळे 'कवडी पाट' ला जायची इच्छा झाली त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी काढलेले फोटो पाहूनच 'कवडी पाट' ला जायचे निश्चित केले होते. ०६ तारखेलाच मी 'चौकटराजे' ना सांगून ठेवले होते की आपण रविवारी किंवा सोमवारी जायचे आहे. त्यांची स्विकृती मिळालीच कारण फोटोग्राफी मी त्यांच्याकडूनच शिकलो असल्याने त्यांनी अशी नवीन ठिकाणी फोटोग्राफी करण्याची संधी नाकारली असती तरच नवल वाटले असते. मी 'वल्ली' ना सुद्धा विचारले परंतू त्यांचे हापीस असल्या कारणाने ते येऊ शकले नाहीत. मी मात्र रविवारी OT करून सोमवारी रजा घेतली जेणेकरून रविवारची गर्दी मिळणार नाही.

       ठरल्याप्रमाणे मी व चौकटराजे सकाळी ५ ला चिंचवडवरून निघालो. थंडी खुप असल्याकारणाने 'माझ्या' सारखा हेल्मेटसक्तीच्या ठाम विरोधात असणारा माणूसदेखील हेल्मेट घालून निघाला हे नवल. *biggrin* चौकटराजेनी पण हेल्मेट घेतले होते ज्यामूळे कवडी ला पोचेपर्यंत तब्बल ३०-३५ वेळा चौकटराजेनी मला गाडीवरच ठो-दे-ठो (Head bumps) केले. *lol* माझी बाइक Yamaha FZ-16 आहे ज्यावर मागे बसणार्‍या माणसाला थोडा त्रास होतो. बहूतेक चौकटराजे म्हणूनच मला ठो देत असावेत असा पुसटसा विचारही मला एकदा येऊन गेला. *biggrin*

       लोणी-काळभोर च्या टोलनाक्यानंतर डाव्या बाजूला एक चहाची टपरी आहे तिथे आम्ही चहा घेतला. तो चहा पिताना मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. *smile* तिथून लगेच पुढे 'मनाली रिसॉर्ट' नंतर लगेच डाव्या बाजूल कवडी पाट कडील वाटचाल सुरू केली. आत जाईपर्यंत वाटतही नव्हते की एव्हडी छान जागा असेल. परंतू तिथे पोहचल्यावर इतक्या लांब आल्याचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.

        साधारण ६.३० ला आम्ही कवडी पाट ला पोचलो. मी व चौकटराजे नी फोटोग्राफी सुरू केली. सुरवातीला सुर्य उगवला नसल्याकारणाने आम्ही उगवत्या सुर्याच्या प्रकाशाचे फोटोच काढणे पसंत केले.

फोटो क्र. 1 - सुर्योदय
Sunrise1

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/100
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. 2 - सुर्योदय
Sunrise2

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. 3 - सुर्योदय
Sunrise3

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

       तेव्हड्यात सुर्योदयाचा Warm लाईट जाणवला. चौकटराजेनी पुढे चलूया अशी खूण केली.

फोटो क्र. 4 - चौकटराजे
                                        a

Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/170
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

       तिथून पुढे गेल्यावर आम्हाला एक बदक दिसले. बदके खुप प्रकारची होती परंतु खुपच कमी बदके आमच्या कॅमेर्‍याच्या रेंज मध्ये होती. बाकीची खुपच लांब असल्याकारणाने आम्हाला त्यांचे फोटोज मिळाले नाहीत.

फोटो क्र. 5 - Ruddy Shelduck किंवा ब्राह्मणी बदक
Ruddy Shelduck

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-800
Camera Mode - Manual

फोटो क्र. 6 - Ruddy Shelduck किंवा ब्राह्मणी बदक
Ruddy Shelduck

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-320
Camera Mode - Manual

फोटो क्र. 7 - Ruddy Shelduck किंवा ब्राह्मणी बदक
Ruddy Shelduck
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. 8 - Spot-billed Duck किंवा प्लवा बदक/धनवर
Spot-billed Duck
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. 9 - Common Sandpiper किंवा तुतारी
Common Sandpiper

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-400
Camera Mode - Manual

फोटो क्र. 10 - Common Sandpiper किंवा तुतारी
Common Sandpiper

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-320
Camera Mode - Manual

फोटो क्र. 11 - Common Sandpiper किंवा तुतारी
Common Sandpiper

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-1200
Camera Mode - Manual

          फोटो काढणे सुरू असतानाच चौकटराजेनी हाक मारली. त्यांना खंड्या पक्षी दिसला होता. त्याचा फोटो.

फोटो क्र. 12 - White Throated Kingfisher किंवा खंड्या
                             White Throated KingFIsher1

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-320
Camera Mode - Manual

       चौकटराजे पुलावर उभे राहून मी काढत असलेल्या बदकांचे फोटो काढत होते. तेव्हा मलाही त्यांचा फोटो घ्यावासा वाटला. कारण कुठल्याही फोटोग्राफरला त्याचा स्वत:चा फोटो ( तेही फोटो काढत असताना) आवडतोच तोही फोटो काढण्यात बिझी असताना.

फोटो क्र. 13 - चौकटराजे फोटो काढण्यात Busy असताना.
चौकटराजे

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/20
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. 14 - Indian pond heron किंवा भुरा बगळा
Indian pond heron

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/100
ISO - ISO-200
Camera Mode - Manual

       हळूहळू ऊन वाढायला लागले होते. साधारण ८.४५ वाजले होते. आता घरी जाताना गर्दी नक्कीच मिळणार अशी कल्पना होती आणि मलाही दुपारी एका कामाला जायचे असल्या कारणाने आम्ही हळूहळू परतीला लागलो. येताना वाटेत चौकटराजेना एक Green Bee Eater दिसला. त्याचे फोटो.

फोटो क्र. 15 - Green Bee Eater किंवा रानपोपट
                                Green Bee-Eater1

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. 16 - Green Bee Eater किंवा रानपोपट
Green Bee-Eater1

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. 17 - Green Bee Eater किंवा रानपोपट
                            Green Bee-Eater1

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. 18 - Green Bee Eater किंवा रानपोपटाचा Cropped फोटो
Green Bee-Eater Cropped

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

       तिथून आम्ही घरी जायला निघालो. वाटेत एखाद्या हॉटेलमध्ये थांबून पोटपूजा करायची असे ठरले. त्याप्रमाणे पुण्याकडे जाताना लोणी-काळभोर टोल नाका संपल्यावर साधारण ५ मिनिटांवर ’जोशी वडेवाले’ वर थांबलो. पहिल्यांदाच आम्ही वडा-सांबार सोबत पाव आणि मिसळीतला सॅंपल अशी डिश पाहिली. शक्यतो वडा-सांबार सोबत गोड चटणी आणि सांबार असते. परंतू येथे पाव आणि मिसळी सोबतचे सॅंपल होते.

फोटो क्र. 19 - वडा-सांबार
वडा-सांबार

Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/33
ISO - ISO-1/157
Camera Mode - Normal

       वडा-सांबार खाणे सुरू असतानाच चौकटराजेनी विचारले की 'रामदरा' ठिकाण येथून जवळच आहे. जाऊया का ? अंतर फक्त ९-१० किमी होते. मग खादाडी झाल्यावर आम्ही परत कवडी पाट कडे निघालो. कारण कवडी वरून सरळ पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. कवडी वरून साधारण ८ किमी पुढे गेल्यावर एक नदीवरील फ्लायओव्हर आहे. तिथून उजवीकडे वळल्यावर सरळ साधारण २-४ किमी जावे लागते. तिथेच हे शांत ठिकाण आहे. वेळेअभावी जास्त फोटोज वगॆरे काढले नाहीत. आणि तसही तिथे नैसर्गिक पक्षी कमी लव्ह बर्ड्स जास्त होते फक्त चौकटराजांचा एक फोटो काढला.

फोटो क्र. 20 - चौकटराजे
चौकटराजे

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/400
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

       रामदर्‍यावरून साधारण १०.३० वाजता चिंचवडकडे निघालो. कवडी पाट एव्हडे आवडलेय की अजून एक ट्रिप नक्कीच करणारे.

- - - समाप्त - - -

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

12 Dec 2014 - 12:45 am | यसवायजी

मस्त हो.फोटो लैच भारी.

सर्व फोटो कॅलेंडर बनवण्याच्या योग्यतेचे आलेत.
खूप छान.

सूड's picture

12 Dec 2014 - 1:48 am | सूड

मस्त !!

मुक्त विहारि's picture

12 Dec 2014 - 1:57 am | मुक्त विहारि

सगळेच फोटो मस्त आले आहेत.

पण शेवटून दुसरा मात्र टाकायला नको होता.हे असे फोटो (शेवटून दुसर्‍या फोटोसारखे) बघीतले की, भारतवारीची ओढ लागते.

खा लेको वडे खा, पाव खा आणि सँपल पण ओरपा....आणि जळवा आम्हाला...

वा ! पुन्हा जाणार ?तुमच्या भारी डावात बिनहुकमाची किलवरची दुर्री कशी जमणार ?

पुढील ट्रिप ठरवण्यापुर्वी एक धागा टाकीन म्हणजे सर्व हौशी फोटोग्राफरना व ज्यांना फिरायची आवड आहे त्यांना यायचे असेल तर एखादा कट्टाच ठरवता येईल. *smile*

जुइ's picture

12 Dec 2014 - 6:30 am | जुइ

सुरेख फोटो!!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2014 - 7:55 am | अत्रुप्त आत्मा

जबराट मस्त फोटू!

प्रचेतस's picture

12 Dec 2014 - 8:56 am | प्रचेतस

क्या बात है हुकू.

सहीच फोटू. मजा आली. एखाद्या रविवारी सकाळी जाऊयात रे.

सतिश गावडे's picture

12 Dec 2014 - 9:48 am | सतिश गावडे

मी सुद्धा येईन रे.

फोटो मस्त आलेत एकदम.

हुकुमीएक्का's picture

13 Dec 2014 - 1:50 am | हुकुमीएक्का

जाऊया नक्की. पुढच्या रविवारी 'फोटोग्राफी' कट्टाच करूया ना. भिगवण किंवा कवडी पाट ला. स्वतंत्र धागाच टाकूया तसा. म्हणजे सर्व हौशी फोटोग्राफरना एकत्र भेटता येईल.

प्रे़क्षक चालत असतील तर आम्ही पण येऊ!!

हुकुमीएक्का's picture

14 Dec 2014 - 10:39 pm | हुकुमीएक्का

हो चालेल ना. फक्त फोटोग्राफरच हवेत असा नियम नाहिये. मी तसा स्वतंत्र धागाच टाकणारे. शक्यतो येत्या रविवारीच असेल पुढची ट्रिप.

प्रमोद देर्देकर's picture

12 Dec 2014 - 9:18 am | प्रमोद देर्देकर

सुंदर छायाचित्र आहेत. त्यातले रानपोपटाचे खुप आवडले.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2014 - 10:32 am | टवाळ कार्टा

कव्वा फोटो

चौकटराजा's picture

12 Dec 2014 - 10:35 am | चौकटराजा

सिंह्गड व्ह्याली च्या मस्त अनुभवानंतर पक्षांचे फटू काढण्यासाठी भिगवण येथे जाउ ,तिथे " लाईफ ऑफ पाय " वाले फ्लेमिंगो दिसतील असे हुकमी एक्का साहेबाचे म्हणणे होते. पण आधले दिवशी रात्रीच जाउन बसावे लागले असते. कारण
पुणे भिगवण अंतर कवडी पाटाइतके सहज नाही. सबब फ्लेमिंगो ला काट मारावी लागली.

कवडी पाटावरचा सुर्योदय अगदी प्रसन्न , कमालीचा शांत, फक्त पाखरांची चिवचिव हाच काय तो रव ! बदके मस्तीत पोहत जात , मधेच पाण्यात डुबकी घेत. काही जागी सार्वजनिक आंघोळीचा आनंद पक्षीगण घेत होते. एक पक्षी प्रेमी हातात मोठा ट्रायपॉड व दुसर्‍या हातात लांबलचक लेन्स असलेला क्यामेरा सावरीत येत होता. " काय विशेष सापडले का?" त्याने विचारले .बहुदा मी " पक्षी" निरिक्षणातला बाप माणूस असे त्याला वाटले काय कुणास ठाउक ! " काय खास व्हरायटी नाही . उगाच एखादा किंग फिशर बाकी बहुतेक ग्रे कलर वाले. " मी आपले अज्ञान दिसू नये असे काहीतरी उत्तर त्याला दिले. इथे शेवटी दिलेला तो हिरवा पक्षी फार चंचल होता. पण पुन्हा कोठे येऊन बसायचे याचा नकाशा त्याच्या डोक्यात पक्का असावा. त्यामुळे हे फोटो घेता आले.

हुकुमीएक्का's picture

13 Dec 2014 - 1:52 am | हुकुमीएक्का

त्याने मला सुद्धा विचारले काय मिळाले म्हणून. मी २-३ नावे सांगितली. Indian Pond heron, 2-3 ducks, Kingfisher. वगैरे. *smile*

पैसा's picture

12 Dec 2014 - 1:37 pm | पैसा

अप्रतिम फोटो आले आहेत! तो प्रतिबिंब वाला तर एकदम भारी!

मदनबाण's picture

12 Dec 2014 - 1:54 pm | मदनबाण
मधुरा देशपांडे's picture

12 Dec 2014 - 2:21 pm | मधुरा देशपांडे

सुंदर फोटो.

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2014 - 2:32 pm | श्रीगुरुजी

सुंदर प्रकाशचित्रे आहेत. ग्रीन बी ईटर ची प्रकाशचित्रे खूपच सुरेख आहेत.

बादवे, ग्रीन बी ईटर ला मराठीत "वेडा राघू" असेही नाव आहे.

हुकुमीएक्का's picture

13 Dec 2014 - 1:53 am | हुकुमीएक्का

नवीन माहितीबद्दल धन्यवाद गुरूजी. *smile*

एस's picture

12 Dec 2014 - 3:03 pm | एस

कवडीपाट ही छायाचित्रणासाठीची आवडीची जागा आहे. पूल/बंधारा पार करून पलिकडे गेल्यावर डावीकडे काठाकाठाने गेल्यास 'लपण' करायला छान जागा आहेत. पक्षी भरपूर संधी देतात छायाचित्रणाच्या. दलदलीपासून मात्र जपून. तसेच उजवीकडे थोडे आत पळसाचे मोठे झाड आहे. तिथेही फुलांवर खूप छोटे पक्षी येतात फुलोर्‍याच्या दिवसांत. आमचे काही मित्रवर्य कवडीपाटला सुट्टीच्या सकाळी पडीक असतात ट्रायपॉड आणि एक्स्ट्रीम टेलिलेन्सेस घेऊन...

किका (किरण पुरंदरे) किंवा डॉ. सतीश पांडे कधीकधी दिसू शकतात एखादे वर्कशॉप घेताना.

हुकुमीएक्का's picture

13 Dec 2014 - 1:54 am | हुकुमीएक्का

आम्ही गेलो होतो डाव्या बाजूला पण तिकडे फार चिखल होता म्हणून फार पुढे गेलो नाही.

किरण पुरंदरेंचा ठाण्यात सहयोग मध्ये १मेला दोन वर्षाँपूवी कार्यक्रम झाला होता त्याची आठवण झाली. पन्नास रानपक्षांचे आवाज काढून दाखवले होते. सोबत ७०स्लाइडस दाखवल्या होत्या. यांचा कार्यक्रम चुकवू नका.

अजया's picture

12 Dec 2014 - 4:17 pm | अजया

सुंदर फोटो!

किसन शिंदे's picture

12 Dec 2014 - 5:43 pm | किसन शिंदे

मस्त फोटो आले आहेत सगळे, विशेषत: वेडा राघूचे.

सौंदाळा's picture

12 Dec 2014 - 5:49 pm | सौंदाळा

सुंदर फोटो
हल्ली पोपट सर्रास दिसतात, लहानपणी पण इतके सहज पाहील्याचे आठवत नाही.
पोपटांच्या नव्या पिढीने शहरी वातावरणाशी जुळवुन घेतले आहे असे वाटते.
कोणी तज्ज्ञ माहीती सांगु शकेल का?

भिंगरी's picture

12 Dec 2014 - 5:53 pm | भिंगरी

पण या बदकांना ब्राह्मणी बदक नाव का असेल बरे?
शाकाहारी आहेत की कुठे पूजा सांगायला जातात?

>>पण या बदकांना ब्राह्मणी बदक नाव का असेल बरे?
(ओळखा पाहू कोणता मोड) असं काय करता गोरे नाहीयेत का ते!! ( ओळखा पाहू कोणता मोड संपला )

भिंगरी's picture

12 Dec 2014 - 8:18 pm | भिंगरी

सगळेच 'गोरे' ब्राम्हण नसतात.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2014 - 8:22 pm | टवाळ कार्टा

आणि सगळेच ब्राम्हण गोरे नसतात

काही ब्रह्मणांचे आड्नाव काळे आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2014 - 8:34 pm | श्रीगुरुजी

पक्ष्यात सुद्धा जातीपाती असतात.

उदा. ब्राह्मणी बदक, ब्राहमणी घार, शिंपी, मराठा सुतार, तांबट इ. *LOL*

भिंगरी's picture

12 Dec 2014 - 8:41 pm | भिंगरी

मराठा सुतार कसा असतो?
इतर पक्षांना पुढे उडू देतो का?

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2014 - 8:57 pm | श्रीगुरुजी

मराठा सुतार (Yellow-Crowned Woodpecker) असा दिसतो.

मला एकदा तळजाई वनविहारात दिसला होता. खूप उंचावर असल्याने फोटो फारसा चांगला आला नाही. वरील फोटो जालावरील आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2014 - 1:14 am | अत्रुप्त आत्मा

मूळात तो मराठी सुतार असेल...
पण कुणितरी (अती)आनंदि(असलेल्या)बाईनी,उगाच ठि चा ठा केला असेल. ;)

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2014 - 8:58 pm | टवाळ कार्टा

=))

आतिवास's picture

12 Dec 2014 - 5:56 pm | आतिवास

सूर्योदयाचे फोटो आवडले.
'पाहुणे' पक्षी यंदा अजून आले नाहीत? की इथं येत नाहीत? (फक्त 'रोहित' नाही, तर इतरही पक्षी!)

हुकुमीएक्का's picture

13 Dec 2014 - 1:56 am | हुकुमीएक्का

आम्ही लवकर आलो म्हणून जास्त पक्षी पहायला मिळाले नाहीत. भिगवण ट्रिप करणारे लवकरच तेव्हा खुप पक्षी पहावयास मिळतील अशी अपेक्षा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2014 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट फोटो !

सुरेख फोटो, तिसरा विशेष आवडला.

खेडूत's picture

13 Dec 2014 - 9:21 am | खेडूत

सुंदर!
सर्व पक्षी आणि वर्णन आवडले.
एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा .

सुंदर छायाचित्र आहेत....

नांदेडीअन's picture

17 Dec 2014 - 10:39 am | नांदेडीअन

सुंदर फोटोज.

माझा एक मित्र काही दिवसांपूर्वी सांगत होता की त्याने कवडी पाटजवळ काही रोहित पक्ष्यांना अगदी कमी उंचीवरून उडतांना पाहिले आहे.
खरे खोटे त्यालाच माहित.

हुकुमीएक्का's picture

17 Dec 2014 - 12:46 pm | हुकुमीएक्का

परंतु भिगवण सारखी छान जागा सोडून रोहित पक्षी कवडी पाट ला येणे जरा कठिणच वाटतंय. परंतु असू शकेल. मी पण पुढल्या वेळी प्रयत्न करेन एखादा रोहित पक्षी शोधण्याचा.

सविता००१'s picture

17 Dec 2014 - 12:12 pm | सविता००१

फोटो

नांदेडीअन's picture

30 Dec 2014 - 10:44 am | नांदेडीअन

आज एकाने हा फोटो टाकलाय Facebook वर.
कवडीपाटचा आहे.

सूड's picture

30 Dec 2014 - 11:58 am | सूड

मानलं राव !! __/\__